७ मे-सह्याद्री सुपरफास्ट न्यूज
NEWS24सह्याद्री-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्ते सरसावले-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
३० मार्च - सह्याद्री बुलेटिन
NEWS24सह्याद्री: नवनीत राणांच्या तक्रारीवरून चार अधिकाऱ्यांना नोटीस..पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री बुलेटिनमध्ये..
---------------------
*पुण्यात इंधन दरवाढीचा भडका*
---------------------
*हिमायतनगर शहरानजीक असलेल्या जंगलाला आग*
---------------------
*जळगाव जिल्ह्यात उष्मा घातचा पहिला बळी*
---------------------
*नवनीत राणांच्या तक्रारीवरून चार अधिकाऱ्यांना नोटीस*
५ मार्च - स्पेशल रिपोर्ट
NEWS24सह्याद्री : शेतकऱ्याची हिंमत तर पहा...! ३ एकरात केली अफूची शेती..संपूर्ण रिपोर्ट पाहण्यासाटःई खाली दिलेल्या लिकांवर क्लिक करा.
26 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - “मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या”....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही
राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असं भाजपाने स्पष्ट केलं आहे. राठोड यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असं भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
2. “मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या”
हिंगोलीमधील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये या तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केलीय. सेनगाव तालुक्यातील ताकातोडा गावाचे रहिवाशी असणाऱ्या नामदेव पतंगे या शेतकऱ्याने हे पत्र लिहीलं आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये पतंगे यांनी केलाय.
5. केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ
केरळमध्ये आज सकाळी प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रोटेक्शन टास्क फोर्सने जिलेटनच्या 100 पेक्षा जास्त कांड्या जप्त केल्या आहे. ही स्फोटक केरळच्या कोझिकोड रेल्वे स्थानकावर चेन्नई-मंगलपुरम या सुपरफास्ट ट्रेनमधून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशीसाठी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाईन्स - दुसऱ्या टप्प्यात २७ कोटी लोकांना लस टोचणार
News24सह्याद्री - दुसऱ्या टप्प्यात २७ कोटी लोकांना लस टोचणार...पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
20 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - कोरोना नियम पाळण्यात 'आम्हीच चुकतोय' - विश्वजित कदम ..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. चेतनकुमार चोरडिया यांनी परिवारासह समाजबांधवाकडून मागीतली माफी
२२ फेब्रुवारी रोजी मालेगाव शहरात मुमुक्षु दिक्षार्थी चेतनकुमार चोरडिया यांची जैन भगवती दिक्षा संपन्न होणार असल्याचे औचित्य साधून विदाई चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंगलाचरणाची सुरुवात दिपाली ललवाणी यांनी केली. चरण कमल धुवून बालवयात माझ्याकडून काय चुका झाल्या असतील त्या चुकांना विसरून मला माफ करा.
2. दीक्षाभूमी एक्स्प्रेसचे लातूर रेल्वेस्थानकात भव्य स्वागत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी लातूर रेल्वे स्थानकावर कोल्हापूर - धनबाद (झारखंड) दीक्षाभूमी एक्सप्रेस या नवीन रेल्वेचे लातूरचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी स्वागत करून हिरवा झेंडा दाखवून सदरील रेल्वे पुढच्या प्रवासास मार्गस्थ केली.
3. कीर्ती ऑइल मिल मध्ये जाळली जातात बेकायदेशीर लाकडे
लातूर येथील एम आय डी सी मध्ये असलेल्या किर्ती ऑईल मध्ये बॉयलर साठी लाकडी जाळली जातात. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा हे शासनाचे धोरण जरी असले, तरी झाडे तोडून जाळण्याचे काम या कीर्ती उद्योगाच्या माध्यमातून जोरदार चालू असल्याचे स्पष्ट दिसते. रात्रीच्यावेळी लाकडांनी भरलेले ट्रक या मिलमध्ये येतात. आणि लाकडे टाकून निघून जातात. या कीर्ती ऑईल मिल ला कोण पाठीशी घालत आहे.
4. नाना पटोले बिग बींची भूमिका असलेल्या झुंडला विरोध करणार
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पदभार स्वीकारल्यानंतर अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. पटोले यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
5. कोरोना नियम पाळण्यात 'आम्हीच चुकतोय' - विश्वजित कदम
एकीकडे महाविकास आघाडीमधील 3-4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता मेळावे, सभा घेत आहेत. याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये 'आमचे चुकतेय'असे म्हणत स्वतः जीभ चावली. दुर्दैवाने आम्ही ना सोशल डिस्टन्स पाळतोय ना पूर्णवेळ मास्क लावतोय
6. मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वरील बोरघाट बनतोय 'डेंजर झोन'
मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावरील बोरघाट या मार्गावरुन जाणाऱ्यांसाठी आता अतिधोकादायक ठरत आहे. बोरघाटातील वळण आणि उतार हे अनेकांच्या आयुष्यावर काळ होऊन घाला घालत आहेत. मागील काही दिवसांमध्ये अमृतांजन पूल, आडोशी बोगदा, ढेकू गावनजीकच्या परिसरात अपघातात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे, तर २०१८ ते जानेवारी २०२१ दरम्यान बोरघाट परिसरात ६५ प्रवाशांचा मृत्यूही झाला आहे.
7. जमावबंदीनंतर नियमांची ऐशीतैशी, शेवटी जिल्हाधिकारीच उतरले रस्त्यावर
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढता असल्याने जमावबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी लागू केले आहेत. गुरुवारी सायंकाळपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली, मात्र शुक्रवारीच या आदेशाची पायमल्ली होताना पाहायला मिळाली. शहरामध्ये या नियमांचे पालन होताना फारसे पहायला मिळाले नाही.
8. भारत आणखी ४९ देशांना देणार कोरोना लस
कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत गरीब देशांना कोट्यवधींच्या लस दिल्याबद्दल जगभरात भारताचं कौतुक होत आहे. आता अनेक श्रीमंत देशही आपल्या नागरिकांसाठी लसीची मागणी करत आहेत. कोरोनाची लस शेजारच्या देशांना पुरविल्यानंतर भारत आता कॅरिबियन देशांनाही लस देत आहे. भारतानं केलेल्या या लसींच्या वाटपाचं जगभरातून कौतुक होत आहे
9. आमदारांसह 300 ते 400 जणांविरोधात गुन्हा दाखल
राज्य सरकारने आखून दिलेले नियम धाब्यावर बसवत अकोला जिल्ह्यातील अकोट याठिकाणी शिवजयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. अकोट तालुक्याती कुटासा याठिकाणचा हा प्रकार आहे. याप्रकरणी दहीहंडा पोलिसांनी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शिवजयंतीच्या उत्साहाला एक वेगळे वळण मिळाले आहे.
10. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला 'हा' स्तुत्य निर्णय!
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. याबरोबरचं कोरोनाचे नियम सर्वांनी पाळावेत अशा सूचना सरकारने केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
11 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - पोलीस दलात १२,५०० जागांसाठी जम्बो भरती....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. पंतप्रधान निधीतून भंडारा दुर्घटनेतील पीडितांना दोन लाखांची मदत
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटना प्रकरणी पीडित कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तर या घटनेत जे गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना ५०,००० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ही मदत दिली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
2. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यावर फडणवीस यांनी आज हि प्रतिक्रया दिलीय.
३.एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० ,रविवार, ११ एप्रिल २०२१ ला पार पडणार आहेत. याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे, उमेदवारांच्या हिताचे राहील. असे आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
४.पंढरपूरच्या गाढवांचे नशीब उघडले !
कोंढवाड्यात पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे या गाढवांचं नशीब चमकल्याचं म्हटलं जात आहे . विशेष म्हणजे त्या गाढवांना रोज चारा टाकण्याचे काम पोलीस कर्मचारी करत होते. तसेच, गाढवं पळून जाऊ नये, यासाठी दोन होमगार्डचा बंदोबस्तही करण्यात आला होता.
५. २४वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार
6 जानेवारीला हि घटना घडली होती, मात्र या घटनेनंतर तरुणीचं मानसिक स्वास्थ खचलं होतं. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने घडलेला सारा प्रकार नुकताच समोर आला आहे. ६लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर भोसरीत गुन्हा दाखल
6. हिंदू - जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीतील काही मजकुरावर आक्षेप
राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' या पुस्तकात नेमाडे यांनी लमाण समाजाच्या महिलांबाबत वादग्रस्त लिखाण केले आहे. यामुळे जाती आणि समाज यांच्यात द्वेषाची भावना निर्माण झाली आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आलंय .
७.पोलीस दलात 12,500 जागांसाठी जम्बो भरती
अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर तीन टप्प्यात भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
८'मावळा' खोदणार कोस्टल रोडचा बोगदा
आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असे पुढेच राहू. त्यासाठी या लढाईत अशा अनेक "मावळ्यांची" कामगिरी महत्त्वाची ठरेल. मुंबईच्या दृष्टीने आजचा हा समाधान देणारा आणि महत्त्वाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय.
९.सुनील ग्रोव्हर 'तांडव' वेबसीरिजमध्ये दिसणार
प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवर बहुप्रतिक्षित अॅमेझॉन ओरिजिनल सीरिज 'तांडव'मधून एका नवीन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकतेच सुनीलने 'तांडव'बद्दल ऐकल्यानंतरची त्याची पहिली प्रतिक्रिया काय होती, त्याच्या विनोदी व्यक्तिमत्वाहून वेगळी अशी ही व्यक्तिरेखा त्याला कशी मिळाली याबद्दल त्याने माहिती दिलीय.
१०.मुंबईत अंड्यांचे दर घसरले
मुंबईत आज अंड्यांचे दर 6 रुपयांवरुन 5 रुपयांवर घसरले आहेत. तर येत्या दोन दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर अंडी बाजारात दर 3 ते 4 रुपयांवर येण्याची भीती अंड्यांच्या व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.आज सकाळपासून एकही ग्राहक दुकानावर आला नसल्याची खंत अंडा विक्रेत्यांनी केली आहे. मात्र, नागरीकांनी घाबरु नये अशी विनंती दुकानदारांनी केली आहे..यावेळी सरकारने नागरिकांना मार्गदर्शन करण्याची विनंती विक्रेत्यांनी केली आहे.
मोठी बातमी - भंडारा येथील सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केअर युनिट मध्ये आग
News24सह्याद्री -
मनाला चटका लावणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. मृत बालकांच्या कुटुबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल,असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत.
8 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - खुशखबर! भारत बायोटेकनं बनवली कोरोनाची नेझल लस; DCGI कडे परवानगीसाठी निवेदन...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. "डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही"
2. भारत बायोटेकनं बनवली कोरोनाची नेझल लस; DCGI कडे परवानगीसाठी निवेदन
कोरोनाच्या लसीबाबत भारतानं अजून एक पाऊल उचललं आहे. भारत बायोtekकेनं कंपनीने आता नेझल स्प्रे लसीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला निवेदन दिलं आहे. चाचणीदरम्यान या नेझल स्प्रेचे चांगले परिणाम दिसून आल्यास कोरोनाच्या लढाईत यश मिळू शकतं. विशेष म्हणजे कोणत्याही इन्जेक्शनचा वापर न करता ही लस नाकाद्वारे दिली जाणार आहे. एका रिसर्चनुसार ही लस इंजेक्शच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरू शकते.
3. दिल्लीमध्ये Bird Flu ची भीती! सेंट्रल पार्कमध्ये आढळले 100 मृत कावळे,
4. काम करू की सत्कार स्वीकारू, अजितदादांनी प्रवक्त्याला सर्वांसमोर झापलं,
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच पक्षाचा प्रवक्त्याला भर गर्दीत झापल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ' काम करू की सत्कार स्वीकारू' असा दमच अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भरला.
5. मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान नाशिकला मिळाला ही आंनददायी बाब - छगन भुजबळ
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरात होणार असल्याची घोषणा आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली आहे. नाशिकला हा बहुमान मिळाल्याने आपल्यासाठी अतिशय आनंददायी बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
6. दरोड्याच्या घटनेची तपासणी करण्यासाठी मुंबई सायबर क्राईमची टीम येणार
नांदेड शहरातील वाजीराबाद येथील IDBI बँकेच्या चौदा कोटी रुपयाचा ऑनलाइन दरोडा प्रकरणाला तीन दिवस उलटले. तरीही ग्राहकांच्या पैशांविषयी IDBI आणि शंकर नागरी बँकेने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. हॅकरने IDBI बँकेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यातील तब्बल 14 कोटीच्या रकमेवर RTGS द्वारे डल्ला मारण्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. परंतु अद्याप या घटनेत ना IDBI बँकेने ना शंकर नागरी बँकेने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे या दोन्ही बँकेतील खातेदारांची धाकधूक मात्र वाढली आहे.
7. नेत्यांच्या हत्येप्रकरणी इराकच्या न्यायालयाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अटक वॉरंट
इराकच्या एका न्यायालयाने गेल्या वर्षी एका इराणी जनरल आणि एका प्रभावशाली इराणी नेत्याच्या हत्येप्रकरणीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात गुरुवारी अटकेचे वॉरंट जारी केले आहे. कोर्टाच्या माध्यमप्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी आणि अबू माहदी अल मुहंदिस यांचा मृत्यू झाला होता, याच प्रकरणी बगदाद न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हे वॉरंट जारी केले आहे.
8. चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी
चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालवा स्थळाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भेट दिली. राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणातून जे पाणी चंद्रपूरच्या वाट्याला येणार आहे, त्यातील घोडाझरी पर्यटन तलावाशेजारी असलेल्या कालव्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. विविध कंत्राटदारांनी थातूरमातूर कामे करून हे काम इरकले होते. महाविकास आघाडी सरकारने या कामाला गती देण्याचे निश्चित केले आहे. नागभीड तालुक्यातील या घोडाझरी कालवा स्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले होते.
9. मराठा आरक्षणाचा विषय हाताळण्यात उद्धव ठाकरे कमी पडले, रामदास आठवलेंचा आरोप
“मराठा आरक्षणाचा विषय हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमी पडले आहेत,” असा थेट आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. “आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण द्यावं. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये,” असेही रामदास आठवलेंनी सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे यांच्या हत्याप्रकरणाची आजपासून पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. लॉकडाऊनमुळे ही सुनावली थांबली होती. आता पुन्हा पनवेलच्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू होताच बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी या प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.
''आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो'', बाळासाहेब थोरातांचा इशारा
मुंबई -
गेल्या काही दिवसापासून राज्यात सध्या औरंगाबाद नामांतराचा विषय चांगलाच जोरात रंगला आहे. त्यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे अशी मागणी होत आहे. परंतु काँग्रेसचा त्याला पूर्णपणे विरोध आहे. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहे. मात्र हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही अशी आठवण काँग्रेस करुन देत आहे. दुसरीकडे भाजपा शिवसेना आणि काँग्रेस नाटक कंपनी असल्याची टीका करत आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेसाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा नामांतराला पूर्णपणे विरोध असल्याचे म्हटले आहे.
बाळासाहेब थोरातानी यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.असे बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले आहे.
बाळासाहेब थोरात यांनी यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले आहे की माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.असे बाळासाहेब थोरातांचे म्हणे आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया असेही बाळासाहेब थोरात म्हणाले आहे.
7 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - पुणे पालिकेस सोडावे लागणार 200 कोटींवर पाणी....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. जवळपास चार तास ही झटापट सुरु होती. यामध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
देशभरातील सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, प्राणिगंग्रहालये, अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प प्रमुखांनी आपल्याकडील वन्यजीवांची काळजी घ्यावी, अशी सूचना केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने दिली आहे.
न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांनी या याचिकेवरील सुनावणी तहकूब करत असल्याचं स्पष्ट केल्याने पोलिसांनी 15 जानेवारीपर्यंत कारवाई न करण्याचं आश्वासन न्यायालयाला दिलं.
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याने ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेत, २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू लागू केला. त्यानुसार, रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत नाईट कर्फ्यू होता. या कर्फ्यूची ५ जानेवारीपर्यंत मुदत होती.
6. मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे इमारतमधील बदलासाठी आपण ल्याकडे महापालिकेकडे यूझर चेंजसाठी परवानगी घेतली आहे. आता फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडूनमंजुरीसाठी थांबलं होतं
7 जानेवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - जादुई शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या जाहिराती बेकायदेशीर - उच्च न्यायालय...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. जादुई शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या जाहिराती बेकायदेशीर - उच्च न्यायालय
7 जानेवारी सह्याद्री राशी भविष्य
News24सह्याद्री - कसा असेल तुमचा आजचा दिवस?
सह्याद्री टॉप २४ न्यूज - पुढील आठवड्यापासून लसीकरणास सुरवात...
News24सह्याद्री - पुढील आठवड्यापासून लसीकरणास सुरवात.....पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
6 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केलं होतं वादग्रस्त विधान....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. महाराष्ट्र पोलिसांच्या ‘स्निफर डॉग’ची कमाल
चिमुरडीचं अपहरण करुन बलात्कार केल्याप्रकरणी तलासरी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘स्निफर डॉग’च्या मदतीने पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात.
2. शत्रूचे फायटर विमान नष्ट करण्याची अत्याधुनिक टेक्नोलॉजी....
इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने (IAI) मंगळवारी ही माहिती दिली. भारत आणि इस्रायल दोघांनी मिळून हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. या क्षेपणास्त्राद्वारे हवेत ५० ते ७० किलोमीटर अंतरावरील शत्रूचे फायटर विमान नष्ट करता येऊ शकते.
3. दिल्लीच्या वेशीवर गेल्या ४१ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु
११ जानेवारीला नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या सर्व याचिकांवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आंदोलनाशी संबंधित परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं यावेळी सरन्यायाधीश शरद बोबडे, ए एस बोपन्ना आणि व्ही रामसुब्रहमण्यम यांच्या खंडपीठाने नमूद केलं.
4. हेल्थकेअर प्रोफेशनल्समध्येही संभ्रम
लस घेण्याबाबतच्या लोकांच्या मानसिकतेबाबत एक ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आलं होतं यामधून ही बाब समोर आली आहे. या सर्वेनुसार, ६९ टक्के भारतीय अद्यापही द्विधा मनस्थितीत आहेत, तर २६ टक्के नागरिकांनी ठामपणे आपण लवकरात लवकर लस घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे.
5. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपाने कसली कंबर!
भाजपाच्या प्रदेशस्तरीय बैठकांमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषदेतून दिली आहे. शिवाय, आगामी निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे.
6. नराधमांनी केलं क्रूर कृत्य; पीडितेचा मृत्यू
हादरवून सोडणारी बाब म्हणजे महिलेच्या गुप्तांगात जखमा आढळून आल्या असून, या अत्याचारात पीडित महिलेचा पायही मोडला. या घटनेच पीडितेचा मृत्यू झाला असून, एका पुजाऱ्याने तिचा मृतदेह घरी आणल्याचं पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
7. रुरकेला पोलाद प्रकल्पात विषारी वायूची गळती; चार कामगारांचा मृत्यू, सहा गंभीर
ओडिशा राज्यातील रुरकेला पोलाद प्रकल्पात विषारी वायूची गळती झाल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला असून इतर सहाजण आजारी पडले आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे. कोल केमिकल युनिटमध्ये बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. इंडियन एक्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.
8. “सोनिया गांधी, मायावती यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा”
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांना भारतरत्नने सन्मानित करायला हवं, असं मत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी व्यक्त केलं आहे.
9. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केलं होतं वादग्रस्त विधान
भाजपाच्या उत्तराखंड प्रदेशांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना मध्यरात्री ट्विट करून काँग्रेसच्या नेत्या आणि विरोधी पक्षनेत्या इंदिरा ह्रदयेश यांची माफी मागावी लागली. प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांची ह्रदयेश यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती.
10. चीनमधूधनच करोनाचा फैलाव झाल्याचे दावे
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी चीनवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. चीनने अद्यापही करोना व्हायसरसाठी कारणीभूत ठरलेल्या कारणांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीमला प्रवेश दिला नसल्याने टेड्रोस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिनिवा येथून ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा एकदा ईडीची नोटीस
मुंबई -
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी ने नोटीस पाठवली होती परंतु ईडी ने वर्षा राऊत यांना परत नोटीस पाठून चौकशी साठी बोलावले आहे. पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ११ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही या समन्समध्ये देण्यात आले आहे. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहे. प्रवीण राऊत यांच्याशी संजय राऊत आणि वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध आहे. त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आला आहे. त्याच संशयाच्या आधारे चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. मात्र, ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याची मुदत वाढवून घेण्यासाठी त्यांनी पत्र लिहिले होते. त्यानंतर ईडीने त्यांना ५ जानेवारी रोजी नव्याने समन्स बजावले होते. वर्षा राऊत त्याआधीच म्हणजे ४ जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिल्या होत्या परंतु, त्यावेळी चौकशी पूर्णपने न झाल्यामुळे ईडीने पुन्हा एकदा वर्षा राऊत यांना नोटीस पाठवले आहे. तसेच उर्वरित चौकशी ११ जानेवारीला करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमसी बँकेतील घोटाळ्याच्या तपासासंबधित गेल्या ४ जानेवारी रोजी वर्षा राऊत यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली होती . प्रवीण राऊत यांनी कर्ज म्हणून दिलेले ५५ लाख रुपये नेमके कशासाठी घेण्यात आले होते? तसेच ते व्याजमुक्त कर्ज कशासाठी होते?, हा व्यवहार कसा होता? आदी प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याखेरीज वर्षा राऊत यांचे आणखीही काही आर्थिक संबंध आहेत का?, याचीही ईडीकडून माहिती काढली जात आहे. पीएमसी बँकेतील घोटाळ्याला हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ही कंपनी जबाबदार आहे. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही एचडीआयएलची उप कंपनी आहे. प्रवीण राऊत याच कंपनीत संचालक होते. संचालक असताना त्यांनी एचडीआयएलच्या खात्यातून १.६० कोटी रुपये पत्नी माधुरी यांच्या खात्यात जमा केले होते. माधुरी यांनी याच १.६० कोटी रुपयांपैकी ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांना व्याजमुक्त कर्ज म्हणून दिले होते. त्या रक्कमेतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला. या सर्व घडामोडी २०१०-११ दरम्यान घडल्या आहे. पुढे एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ६,६७० कोटी रुपयांचे कर्ज बुडवले. त्यातून पीएमसी बँक कोसळली. याचाच पूर्ण तपास ईडीकडून केला जात आहे.
काँग्रेसची मोठी घोषणा, आमचा स्टँड क्लिअर, महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार
मुंबई -
महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. देशात एका राज्याएवढे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. आता काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आम्ही वॉर्डमध्ये 100 दिवसांचा रिव्ह्यू प्लॅन आखलाय वॉर्डनिहाय रिव्ह्यू करणार आणि एकटं लढण्याची आमचा निर्णय ठाम असल्याचंही भाई जगताप यांनी अधोरेखित केलंय.
मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मोफत पाणी देण्याची मागणीही या निमित्तानं काँग्रेसने केलीय. मनपाच्या तिजोरीवर केवळ 168 कोटींचा बोजा पडणार असला तरी मोफत पाणी देणं गरजेचे असल्याचंही मतही भाई जगतापांनी व्यक्त केलीय.पाणी माफिया मोठ्या प्रमणात पाणीचोरी करतात, त्याऐवजी हे पाणी गोरगरिबांना मिळायला हवं. देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत झोपडपट्टीवासीयांची घरे नियमित करण्याच्या घोषणा केल्या, पण त्याचे पुढे काय झाले? असा प्रश्नही भाई जगपातांनी उपस्थित केलाय. बाळासाहेब थोरातांना मुंबईबद्दल आदर आहे मुंबई अध्यक्षाबद्दल हे आज ठरलेले नाहीये. आमचे प्रभारी एच. के. पाटलांनी जे काही सांगितले ते योग्यच असल्याचंही भाई जगतापांनी अधोरेखित केलेय. मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत. महाविकास आघाडीचे सदस्य आहोत.
महाविकासआघाडी कॉमन मिनिमम प्रोगामवर चालते. त्यामुळे महापालिकेचा आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही. कारण आम्ही इथे विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे 227 जागांवर लढण्याचा मनसुबा मी पहिल्याच दिवशी सांगितला होता. मुंबई अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा पुनर्ऊल्लेख केलाय होता, असंही भाई जगताप काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. आम्ही पुढील 100 दिवसांत प्रत्येक वॉर्डात जाऊ. तिथे जनता दरबार करू लोकांची काम करू त्या कार्यकर्त्याला विचारू आणि त्यानंतर वरिष्ठांना 227 जागा का लढायच्या हे सांगू असेही जगताप यांनी सांगितले होते. भाजपबरोबर सेना सत्तेत असताना मुंबई पालिकेत भाजप विरोधी पक्षात होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना भाकितं करायची सवय आहे. भविष्य पाहून सरकार येत नाही असा टोलाही त्यांनी लगावला होता.
आगामी महापालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपाची तयारी
मुंबई -
भाजपाच्या प्रदेशस्तरीय बैठकांमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषदेतून दिली आहे. राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या १४ हजार ५०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसह मार्च किंवा एप्रिलच्या मध्यात होण्याची शक्यता असलेल्या पाच महानगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. शिवाय, आगामी निवडणुकांमध्ये अतिशय चांगले यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे असे देखील त्यांनी बोलून दाखवले आहे.
या बैठकांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोना काळात थोडी अनियमितता आली असली तरी देखील भाजपाची ही परंपरा आहे. प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांची कोअर कमिटीची कार्यकारिणीची विविध मोर्चांच्या अध्यक्षांची नियमीत बैठक होत असते. त्यामुळे दोन दिवस त्याच नियमीतपणे होणाऱ्या बैठकींचा भाग म्हणून सर्व बैठका झाल्या. करोनाकाळात व्हर्चुअल बैठका झाल्या, सेवा झाली परंतु संघटन या विषयात आता थोडा वेळ द्यावा लागेल. त्यामुळे सर्व बैठका या लाईनवर झाल्या.
ज्या सहा विधानपरिषद निवडणुका झाल्या त्याची या बैठकांमध्ये समीक्षा झाली. आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना झाली. २८ कार्यकर्ते आगामी तीन दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवासाला निघाले आहे. काही जणांकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. हे कार्यकर्ते ग्रामपंचात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय स्थिती आहे. किती ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते उभे आहे. त्यातील किती गावं ही भाजपाच्या सरपंच करण्याच्या दिशेने जातील, अशी सर्व योजना आखतील. असे देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच, राम मंदिर उभारणीसाठी सुरू असलेल्या निधी संकलनात भाजपाचा मोठा सहभाग असणार आहे. त्या दृष्टीने देखील योजना या बैठकीत झाली असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शेतकरी आंदोलनावरुन सुप्रीम कोर्टाची चिंता: सर्व याचिकांवर सुनावणी करण्याचा निर्णय
दिल्ली -
दिल्लीच्या वेशीवर गेल्या ४१ दिवसांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलनाशी संबंधित परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे यावेळी सरन्यायाधीश शरद बोबडे, ए एस बोपन्ना आणि व्ही रामसुब्रहमण्यम यांच्या खंडपीठाने नमूद केले.यासोबतच सुप्रीम कोर्टाने ११ जानेवारीला नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या सर्व याचिकांवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायाधीश एम एल शर्मा यांनी नव्या कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली असून यावेळी हे मत मांडण्यात आले. एम.एल. शर्मा यांनी याचिकेत १९५४ घटनेतील दुरुस्ती कायदा ज्यामध्ये संविधानाच्या समकालीन यादीत शेतीचा समावेश होता, तो चुकीच्या पद्धतीने पारित करण्यात आल्याचा म्हटले आहे. तसंच यादीमध्ये शेतीचा समावेश करणे घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद केला आहे.
सुरुवातीला खंडपीठाने नव्या कृषी कायद्यांना विरोध करणारी सर्व प्रलंबित प्रकरणे तसेच शेतकरी आंदोलनासंबंधी याचिकांवर शुक्रवारी (८ जानेवारी) सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी विरोध दर्शवला. वेणुगोपाल यांनी यावेळी कोर्टाला शुक्रवारी शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार असून भविष्यात तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं सांगितलं. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी सुप्रीम कोर्टाने सध्या शेतकरी आणि केंद्रामध्ये सकारात्मक चर्चा सुरु असून तात्काळ सुनावणी घेतली जाऊ नये अशी विनंती केली. यानंतर सुप्रीम कोर्टाने सोमवारी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टात नव्या कृषी कायद्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर वैधतेला विरोध करणाऱ्या सहा याचिका दाखल आहेत. याशिवाय दोन याचिका आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या आहेत. यासोबत आंदोलक शेतकऱ्यांच्या मानवाधिकार हक्कांचं उल्लंघन केल्याप्रकरणीही अनेक याचिका दाखल आहेत.
6 जानेवारी डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - पुन्हा बिबट्याची शिकार....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
2. चंद्रकांत पाटलांच्या खानापुरात भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी
भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी झाली असून आता शिवसेना त्यांच्याविरोधात लढणार आहे.त्यामुळे आता शिवसेनेचे प्रकाश अबिटकर विरुद्ध चंद्रकांत पाटील असा सामना पाहायला मिळणार आहे.
3. खाद्यतेलांच्या दरांमध्ये मोठी वाढ
नैसर्गिक आपत्ती, विदर्भातील पूरस्थिती यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. परिणामी सोयाबीनच्या उत्पादन कमी झाल्यामुळे खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोयाबीन तेलाच्या किमंतीमध्ये 35 रुपयांची वाढ झाली आहे.
4. ग्रामंपचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला जागा दाखवून देऊ: आशिष शेलार
ग्रामपंचायतीमध्ये मोठा विजय मिळवू, असं आशिष शेलार म्हणाले. विधानपरिषदेत जसं यश मिळालं तसं यश ग्रामपंचायत निवडणुकीत मिळणार नाही. यावेळी महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.
5. मुंबई सेंट्रलचं नाव ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ होणार
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पत्र लिहिलं आहे. नामांतराबाबत सर्व यंत्रणांचा अहवाल प्राप्त झाला असून, केंद्र सरकार याबाबत कार्यवाही करत असल्याची माहिती त्यांनी सावंत यांना दिली आहे.
6. राष्ट्रवादी आणि सेनेच्या कार्यकर्ते निवडणूक कार्यालयात भिडले
निवडणूक कार्यालयात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. एवढंच नाहीतर एकमेकांवर खुर्च्यांनी हल्ला केला.
7. पुण्यातील बजाज फायनान्सवर RBI ची मोठी कारवाई
कंपनीच्या विरोधातही फेअर प्रॅक्टिस कोडचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अशा परिस्थितीत नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला हा दंड लावण्यात आला आहे.
8. तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांना प्रशासनाचा दणका
कोरोना नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन केल्याने देऊळ ए कवायत कायदानुसार कारवाई करण्यात आली असून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने ही प्रवेशबंदीची कारवाई केली आहे.
9. ट्रकची बाईकला धडक, MIM च्या धुळे जिल्हाध्यक्षांचा मृत्यू
अपघातात गंभीर जखमी झालेल्या 58 वर्षीय समसुल हुद्दा मोहम्मद शहा यांनी रुग्णालयात जाताना अखेरचा श्वास घेतला. तर त्यांच्यासोबत असलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नापास करण्याची
10. धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार
जिल्हा परिषदेतील एका नराधम शिक्षकाने नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




