Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label maharashtrapolitics. Show all posts

काँग्रेस आमदार भाई जगताप पोलिसांच्या ताब्यात

 NEWS24सह्याद्रि 


भाजपा आमदाराचा महाविकास आघाडीवर आरोप महाविकास आघाडी सरकारने कल्याण-डोंबिवली पालिकेची प्रभाग रचना करताना सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे.विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न प्रभाग रचनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे असा आरोप भाजपचे कल्याण पूर्व विभागाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. गणपत गायकवाड कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

“निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसाठी जी मार्गदर्शक तत्त्वे पालिकेने घालून दिली होती, त्याचे उल्लंघन महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केले आहे. या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवक, उमेदवारांचे प्रभाग सोयीप्रमाणे करून घेतली आहेत. या कामासाठी त्यांनी पालिका अधिकाऱ्यांचाही उपयोग करून घेतला आहे,” अशी टीका गायकवाड यांनी केली.

त्यानंतर “सत्ता हातात आहे म्हणून तुम्ही पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला आणू शकत नाही,” असा घणाघाती आरोप त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला. “भाजपमधून जे नगरसेवक शिवसेनेमध्ये गेले आहेत ते नगरसेवक आयाराम गयाराम वातावरणातील होते. त्यांच्याकडे पक्षनिष्ठा नव्हती. ते ज्या मूळ पक्षातून आले होते त्या पक्षात ते निघून गेले आहेत.त्यामुळे त्यांच्या जाण्याने भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही,” असे आमदार गायकवाड यांनी सांगितले.



Contact Me

Name

Email *

Message *