6 जानेवारी डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - पुन्हा बिबट्याची शिकार....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. पुन्हा बिबट्याची शिकार
बिबट्याचे अवयव शोध मोहीम राबविणाया वन विभागाच्या पथकाला तिल्ली मोहगाव परिसरात आणखी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. हा मृत बिबट्या विहिरीत आढळलेल्या बिबट्या पासुन 50मीटर दूर अंतरावर आढळला .त्या बिबट्या ची 15 दिवसांपूर्वी शिकार करण्यात आली असावी.अशी शक्यता वर्तविल्या जात आहे.
2. चंद्रकांत पाटलांच्या खानापुरात भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी
भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी झाली असून आता शिवसेना त्यांच्याविरोधात लढणार आहे.त्यामुळे आता शिवसेनेचे प्रकाश अबिटकर विरुद्ध चंद्रकांत पाटील असा सामना पाहायला मिळणार आहे.
2. चंद्रकांत पाटलांच्या खानापुरात भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी
भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी झाली असून आता शिवसेना त्यांच्याविरोधात लढणार आहे.त्यामुळे आता शिवसेनेचे प्रकाश अबिटकर विरुद्ध चंद्रकांत पाटील असा सामना पाहायला मिळणार आहे.
3. खाद्यतेलांच्या दरांमध्ये मोठी वाढ
नैसर्गिक आपत्ती, विदर्भातील पूरस्थिती यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. परिणामी सोयाबीनच्या उत्पादन कमी झाल्यामुळे खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोयाबीन तेलाच्या किमंतीमध्ये 35 रुपयांची वाढ झाली आहे.
4. ग्रामंपचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला जागा दाखवून देऊ: आशिष शेलार
ग्रामपंचायतीमध्ये मोठा विजय मिळवू, असं आशिष शेलार म्हणाले. विधानपरिषदेत जसं यश मिळालं तसं यश ग्रामपंचायत निवडणुकीत मिळणार नाही. यावेळी महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.
5. मुंबई सेंट्रलचं नाव ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ होणार
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पत्र लिहिलं आहे. नामांतराबाबत सर्व यंत्रणांचा अहवाल प्राप्त झाला असून, केंद्र सरकार याबाबत कार्यवाही करत असल्याची माहिती त्यांनी सावंत यांना दिली आहे.
6. राष्ट्रवादी आणि सेनेच्या कार्यकर्ते निवडणूक कार्यालयात भिडले
निवडणूक कार्यालयात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. एवढंच नाहीतर एकमेकांवर खुर्च्यांनी हल्ला केला.
7. पुण्यातील बजाज फायनान्सवर RBI ची मोठी कारवाई
कंपनीच्या विरोधातही फेअर प्रॅक्टिस कोडचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अशा परिस्थितीत नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला हा दंड लावण्यात आला आहे.
8. तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांना प्रशासनाचा दणका
कोरोना नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन केल्याने देऊळ ए कवायत कायदानुसार कारवाई करण्यात आली असून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने ही प्रवेशबंदीची कारवाई केली आहे.
9. ट्रकची बाईकला धडक, MIM च्या धुळे जिल्हाध्यक्षांचा मृत्यू
अपघातात गंभीर जखमी झालेल्या 58 वर्षीय समसुल हुद्दा मोहम्मद शहा यांनी रुग्णालयात जाताना अखेरचा श्वास घेतला. तर त्यांच्यासोबत असलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नापास करण्याची
10. धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार
जिल्हा परिषदेतील एका नराधम शिक्षकाने नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment