Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label arested. Show all posts

१३ फेब्रुवारी-माणुसकीला काळीमा फासनारी घटना पुण्यात



 NEWS24सह्याद्रि 

पुण्यात माणुसकीला कालिमा फासनारी घटना घडलीये।प्रेमसंबंधातून जन्मलेल्या सहा दिवसांच्या बाळाला दरीत फेकले,या बाबत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।या बदल सविस्तर माहिती अशी की, 

         फिर्यादी महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते.ती अकरा वर्षाच्या आपल्या मुलीसोबत गोडांबेवाडी येथे राहत होती. या दरम्यान नात्यातीलच  सचिन चव्हाण याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. याच काळात महिला गर्भवतीही राहिली. मात्र, सचिन याचे महिलेसोबत राहणे त्याचे भाऊ संजय, नितीन, अजय यांना आवडत नव्हते. अणि त्यातच प्रेमसंबंधातून जन्मलेल्या सहा दिवसांच्या बाळाला ताम्हिणी घाटाच्या दरीत फेकून दिल्याची क्रूर घटना घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात पौड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चौघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण, अजय गंगाराम चव्हाण, सचिन गंगाराम चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघांनी 4 फेब्रुवारी रोजी बाळाला ताम्हिणी घाटातील दरीत फेकले होते. ट्रेकर्सच्या मदतीने बाळाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे आणि पुढील तापस स्थानिक पोलिस करत आहे. 




Contact Me

Name

Email *

Message *