Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label graund report. Show all posts

मोठी बातमी - २० नोव्हेंबर

  News24सह्याद्री -  मंत्री सावंत यांनी नेमकं कोणाला लावला टोला ...पहा महत्वाची  बातमी....


                                


गुड मॉर्निंग सह्याद्री अफगाणिस्तानातून आयात केलेली औषधे गौतम अदानीच्या बंदरात कशी पोहोचली?....!

 News24सह्याद्री:-  अफगाणिस्तानातून आयात केलेली औषधे गौतम अदानीच्या बंदरात कशी पोहोचली?....! 

पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये ..




TOP HEADLINES  

अफगाणिस्तानातून आयात केलेली औषधे गौतम अदानीच्या बंदरात कशी पोहोचली?

हेरॉईनची सर्वात मोठी खेप गुजरातच्या कच्छमधील मुंद्रा बंदरात पकडली गेली आहे, ज्याची किंमत सुमारे ९ हजार कोटी रुपये आहे. अफगाणिस्तानातून आयात केलेल्या २ कंटेनरमधून सुमारे ३००० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. यासह २ जणांना अटक करण्यात आली आहे. अदानी पोर्ट ही गौतम अदानीची कंपनी आहे. एजन्सीकडून जप्त करण्यात आलेल्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि सीमाशुल्क यांच्या कारवाईमध्ये हेरॉईन जप्त करण्यात आली आहे.

ग्राऊंड रिपोर्ट - आता होणार गाव तिथे नाटक !

 News24सह्याद्री -



कला हि कलाकाराचा आत्मा असते, मात्र २०२० मध्ये आलेल्या कोरोनाच्या संकटाने  कलाकाराला सुद्धा आपल्या कलाक्षेत्रापासून वंचित केलंय. कोरोनाच्या काळामध्ये तर अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली  होती, सरकारने आता लोकडाऊनला शिथिलता दिल्यानंतर अनेक व्यवसाय हळू हळू पूर्वपदावर येत आहे. मात्र चित्रपट गृहे आणि नाट्यगृहे अजूनही बंदच आहेत, त्यामुळे कलाकाराचे होणार काय हा प्रश्न उपस्थित झालाय. हीच बाब लक्षात घेत  गावागावात नाटक हि कला पोहोचवण्यासाठी नगरमधील  काही तरुण कलाकारांनी लोकडाऊन  नंतर पहिल्यांदाच गाव तिथं नाटक हि संकल्पना  सादर करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलाय. 

सह्याद्री ग्राउंड रिपोर्ट - अश्या पद्धतीने महिलांनी साजरी केली संक्रांत

 News24सह्याद्री - अश्या पद्धतीने महिलांनी साजरी केली संक्रांत




कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेले काही दिवस सण-उत्सव साजरे करण्यास निर्बंध होते. परंतु अनलॉक मुळे सर्व गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. मकरसंक्रांत हा सण नविन वर्षातला पहिलाच आणि खास महिलांचा सण आहे. आज मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आमची प्रतिनिधी प्रिया हिने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन महिलांशी संवाद साधून संक्रांतिच काय महत्व आहे हे जाणून घेतलंय 

सह्याद्री ग्राउंड रिपोर्ट - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेचा पहिला दिवस

  News24सह्याद्री -


राज्य सरकारच्या परवानगीनंतर राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांमधील नववी आणि बारावीच्या वर्गांना आजपासून प्रारंभ झाला. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये शाळा सुरु होणार नाहीत. ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे अहमदनगरसह सोलापूर, रत्नागिरी, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, वाशिम आणि अमरावतीमधील शाळा आजपासून झाल्या आहे. 

शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये अनेक शिक्षक कोरोनाबाधित असल्याचं आढळून येत आहे. त्यामुळे शिक्षक, पालक संघटनांकडून शाळा सुरु करु नये अशी मागणी करण्यात येत आहे. तर शाळा सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.

कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या मानसिकतेने पालकांसह शिक्षकही धास्तावलेले दिसत आहेत. मात्र, असे असले तरी फिरोदिया प्रशालेचे कामकाज सुरू झाले आहे. विद्यार्थ्यासह शिक्षकांची पूर्णपणे काळजी घेतली असल्याचा दावा फिरोदिया प्रशालेने केला आहे.

ग्राउंड रिपोर्ट - कापसावर बोंड अळीचा प्रकोप ; शेतकरी चिंतातुर ....

 News24सह्याद्री - 


अमरावती जिल्ह्यातील बहूतांश शेतकरी खरीपात कापसाची लागवड करतात. यातून भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी प्रतिकारक वाणांची निवड करतात. मात्र आता त्या वाणांवरच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बॉण्ड आळीच्या  प्रधुरभावाची तीव्रता हि जास्त आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत.  

शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास बोन्ड आळीच्या प्रधुरभावमुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे , त्यामुळे शेतकऱ्यांना आशा आहे कि सरकार शेतकऱ्यांना काही तरी मदत करेल , मात्र  शेतकृयांचा  आवाज राज्यसरकार प्रायन्त पोहचणार का आणि बॉण्ड अळीग्रस्त भागात मदत पुरवली जाणार का ? हे पाहून महत्वाचं ठरेल.  

ग्राऊंड रिपोर्ट - पहा नगर शहरात यावर्षी कशा पद्धतीने साजरी होतेय "ईद ए मिलाद"

 News24सह्याद्री - 




आज शहरात हा दिवस मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत आहे. मुस्लिम बांधवांमध्ये हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीला विशेष महत्त्व आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर आलेला हा सॅन मुस्लिम बांधव कशा पद्धतीने साजरा करत आहे. मुस्लिम बांधवांचा मोठा सण आहे. दर वर्षी हा दिवस मोठ्या उत्सहात साजरा केला जात असतो. यावर्षी काय परिस्थिती आहे शहरात. तर आपण पहिलंच कि अत्यंत सध्या पदतीने आणि शांततेत हा सण साजरा केला जातोय  आणि अनेक सामाजिक उपक्रम काही समाजिक संघटनेच्या वतीने आज राबवले गेले आहेत.

 


Contact Me

Name

Email *

Message *