Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label policestationdamage. Show all posts

७ फेब्रुवारी-बुलढाण्यात डीजे बंद केला म्हणून जमावाचा पोलीस स्थानकावरच हल्ला

 


 NEWS24सह्याद्री   

कायद्याचे रक्षक असणाऱ्याना आता असुरक्षितता वाटायला लागली आहे कारण बुलढाण्यात चक्क कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस स्थानकावरच  हल्ला करण्यात आला आहे. जमावाने शेगाव पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड केली आहे. मध्यरात्री जमावाने थेट पोलीस स्थानकात घुसून तोडफोड करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शेगाव पोलिसांना मध्यरात्री एकच्या सुमारास एका वाढदिवसाच्या पार्टीत डीजे सुरु असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि डीजे बंद करायला लावला. यानंतर काही वेळातच पोलीस ठाण्यावर ३० जणांचा जमाव धावून गेला. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात पोलीस ठाण्यातील सामानाची तोडफोड करण्यात आली.

जमावाकडून पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. थेट पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या या समाजकंठकांविरोधात पोलीस काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागलं आहे.

Contact Me

Name

Email *

Message *