bhandara
fake
overnight
possibility
the
trip
two
wheeler
with
February 13, 2022
१३ फेब्रुवारी-दोन आरोपींना भंडारा पोलिसांनी केले जेरबंद
NEWS24सह्याद्रि
भंडाऱ्यात देशी कट्टासह दोघांना अटक करण्यात आली. मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. बनावट नंबरची दुचाकी जप्त करण्यात आली.
भंडारा : रात्रीच्या वेळेत संशयितरित्या दोन युवक फिरत होते. गस्तीवरील पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पंचासमक्ष त्यांची बॅग खोलण्यात आली.त्यांच्याकडे देशी कट्टा आढळला. शिवाय त्यांच्या दुचाकीवर चारचाकी गाडीचा नंबर होता. त्यामुळं पोलिसांचा संशय आणखीणच बळावला. भंडारा शहरात लगत ही घटना घडली. या प्रकरणी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपीला अटक केली आहे. अमन ओमप्रकाश ब्रह्मो व नीतेश भोजलाल पटले अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही बालाघाट जिल्ह्यातील कोसमी येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून देशी कट्टासह चोरीची दुचाकी सुद्धा जप्त कररण्यात आली.