Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label extraafair. Show all posts

१२ फेब्रुवारी- दुसऱ्या लग्नासाठी नवऱ्याने डॉ.सुवर्णा वाजेंचा काटा काढला?

NEWS24 सह्याद्रि

 डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणाने  नाशिक जिल्ह्यासह  अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे त्यानंतर आता  डॉ.सुवर्णा वाजे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.डॉ सुवर्णा वाजे या नाशिक महापालिकेच्या सिडको रुग्णालयात कार्यरत होत्या.25 जानेवारी, मंगळवारी रात्री नाशिक-मुंबई महामार्गावर मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली होती.तर या अरोपाखाली डॉ. सुवर्णा यांचा पती संदीप वाजे संशयित म्हणून अटकेत आहे. त्याला मागील आठवड्यात इगतपुरी न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी ही पोलीस कोठडी संपल्याने संदीप वाजेला वाडीवऱ्हे पोलिसांनी इगतपुरी सत्र न्यायालयात  हजर केले होते. सात दिवसांच्या पोलीस कोठडीत संदीप वाजेने जास्त प्रतिसाद न दिल्याने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी झाल्याने इगतपुरी न्यायालयाने संदीपच्या पोलिस कोठडीत सहा दिवसांची वाढ केली, अशी माहिती सरकारी वकील जयदेव रिके यांनी दिली. दुसरं लग्न करण्यासाठी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खूप मोठा अडथळा ठरत असल्याने त्यांचा काटा काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. डॉ सुवर्णा वाजे या नाशिक महापालिकेच्या सिडको रुग्णालयात कार्यरत होत्या. 25 जानेवारी, मंगळवारी रात्री नाशिक-मुंबई महामार्गावर मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली होती. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. ही हाडे डॉ सुवर्णा वाजेंचीच असल्याचे डीएनए अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.


 


Contact Me

Name

Email *

Message *