७फेब्रुवारी - सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सह्याद्री: जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची शिवसेनेवर मिश्किल टीका...पहा देशविदेशातल्या महत्वाच्या बातम्या...
*ओवेसींनी सुरक्षा नाकारली-अमित शाह*
----------------------
*पंजाबमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत चूक*
----------------------
*23 वर्षांपूर्वीचा अनिल कुंबळेचा ऐतिहासिक विक्रम*
----------------------
*लतादीदींच्या अंत्यसंस्काराला काँग्रेस नेते का नव्हते*?
-----------------------
६ फेब्रुवारी-मोठी बातमी
NEWS24सह्याद्रि-विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून लता दीदींना श्रद्धांजली
...संपुर्ण माहितीसाठी खलील लिंक वर क्लिक करा.....
NEWS24सह्याद्रि
६ फेब्रुवारी-‘मला शब्दांमध्ये व्यक्त होता येणार नाही-पंतप्रधान मोदी
NEWS24सह्याद्रि
भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
‘मला शब्दांमध्ये व्यक्त होता येणार नाही. लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी कुणीही भरुन काढू शकत नाही. येणारी पिढी ही त्यांना भारतीय संस्कृतीमधील एक दिग्गज म्हणून स्मरणात ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’ या आशयाचे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व अवयव निकामी होत गेले. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
६ फेब्रुवारी-गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन
NEWS24सह्याद्रि
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची आज प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती अणि त्याचवेळेला त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अणि तिथेच त्याना त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं.मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.पण आज अखेर उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व अवयव निकामी होत गेले. त्यानंतर आज सकाळी
त्यांची प्राणज्योत मालवली,अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
६ फेब्रुवारी-मोठी बातमी
NEWS24सह्याद्रि-भारताचा सूर हरपला, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड...संपुर्ण माहितीसाठी खलील लिंक वर क्लिक करा.....
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळच्या सुमारास निधन.....
कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.....
६ फेब्रुवारी-स्पेशल रिपोर्ट
NEWS24सह्याद्रि-भारताचा सूर हरपला, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड...संपुर्ण माहितीसाठी खलील लिंक वर क्लिक करा.....
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळच्या सुमारास निधन.....
५फेब्रुवारी-मोठी बातमी
NEWS24सह्याद्रि-लता मंगेशकर यांना व्हेंटिलेटरवर करण्यात आलं शिफ्ट- संपुर्ण माहितीसाठी खलील लिंक वर क्लिक करा....
NEWS24सह्याद्रि
गाणंसामरदानी लता मंगेशकर यांची तब्बेत बिघडली
ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
३० जानेवारी - सहयाद्री वेगवान आढावा
NEWS24सह्याद्री : उद्धव ठाकरे द टायगर या पुस्तकाचे झाले प्रकाशन... पहा देशभरातील महत्वाच्या बातम्या....
----------
*जम्मू काश्मीर खोऱ्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक*
----------
*राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता*
-----------
*लता मंगेशकर कोरोनामुक्त*
-----------
११ जानेवारी-मोठी बातमी
News२४सह्याद्री:-गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण.......पहा संपूर्ण बातमी......