Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label diet. Show all posts

५ फेब्रुवारी -थेट भेट

 NEWS24सह्याद्रि -नगरचे सिव्हील सर्जन डॉ. संजय घोगरे ‘ऍक्शन मोड’वर; कोणाचीही गय करणार नाही!

-संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 




४फेब्रुवारी -विद्यार्थ्यांना मिळणार 8 महिन्यांचा एकत्रित पोषण आहार



NEWS24सह्याद्री 

पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्ह्यातील 4 हजार 550 शाळांमधील 4 लाख 76 हजार विद्यार्थ्यांना एकत्रित गेल्या आठ महिन्यांचा पोषण आहार वाटप होणार आहे. त्यासाठी सुमारे 11 हजार टन तांदूळ लागणार आहे. तांदळासह कडधान्य व डाळींचेही वाटप होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने तयारी सुरूकेली आहे.

     राज्य सरकारच्या 21 जानेवारी 2022 च्या परिपत्रकानुसार शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जून 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीतील 194 कार्यदिनासाठी विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप केला जाणार आहे. शासन नियमानुसार पहिली ते आठवीपर्यंच्या अनुदानित शाळांना पोषण आहार वाटप केला जातो. त्यात जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, तसेच महापालिका अशा एकूण 4 हजार 550 शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये पहिली ते पाचवीचा पट 2 लाख 86 हजार 497, तर सहावी ते आठवीचा पट 1 लाख 90 हजार 223 एवढा आहे. अशा एकूण 4 लाख 76 हजार 720 विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाकडून सुरू आहे. एप्रिल 2021 पर्यंतचा पोषण आहार वाटप झालेला आहे. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षातील पोषण आहार जून 2021 पासून वाटप झालेला नव्हता. नोव्हेंबरमधील दिवाळी, नाताळ व इतर सुट्या वगळता जून 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीतील 194 कार्यदिनासाठी हा पोषण आहार वाटप होणार आहे.

    यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्याला प्रतिदिन 100 ग्रॅमप्रमाणे 19 किलो 400 ग्रॅम तांदूळ, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याला प्रतिदिन 150 ग्रॅमप्रमाणे 29 किलो 100 ग्रॅम तांदूळ मिळणार आहे. या प्रमाणे 4 लाख 76 हजार विद्यार्थ्यांना 11 हजार 93 टन तांदूळ लागणार आहे. याशिवाय पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 964 रूपये व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 1445 रूपये किमतीच्या दाळी व कडधान्यही मिळणार आहे.

४फेब्रुवारी-निरोगी राहण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी आहार कसा असावा



NEWS24सह्याद्री 

गरमा गरम वरणामध्ये तूप टाकून खाण्याची मजाच काही वेगळी आहे. तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर तुम्ही भात, भाकरी आणि चपातीमध्येही करू शकता. त्यात आवश्यक फॅटी ऍसिड असतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, ए, ई मुबलक प्रमाणात असते. जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

थंडीच्या मोसमात सर्दी, ताप अशा अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. या हंगामात आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतेच पण ऋतूतील आरोग्याच्या समस्यांपासून तुमचे रक्षण देखील होते.

डिंकाच्या लाडूचा हिवाळ्याच्या हंगामात आहारात समावेश करा. हे लाडू बनवण्यासाठी डिंक तुपात भाजून त्यात पिठीसाखर घालून लाडू बनवा. ते फायबरने समृद्ध असतात. हे हाडांसाठी चांगले असतात. पचनसंस्थेला निरोगी ठेवते.हिवाळ्यात तुम्ही अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. यामध्ये पालक, मेथी, पुदिना, कांद्याची पात इत्यादी हिरव्या भाज्यांचा समावेश होतो. तुम्ही ते करी, सूप आणि सॅलडच्या स्वरूपात घेऊ शकता. ते अँटिऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे समृध्द असतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.

रताळे आणि बटाटे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. रताळे उकडा आणि खा. बटाट्याचे अनेक पदार्थ तयार करून आपण खाऊ शकतो. हे वजन कमी करण्यास मदत करतात आणि पचनसंस्था निरोगी ठेवतात.



Contact Me

Name

Email *

Message *