Ahmednagar
Breaking
Breaking crime
breaking news
CORONA
crime
drugscase
economics
Entertainment
India
INDIA MAHARSHTRA
MAHARASTRAA
morhi batmi
mothi batmi Breaking
November 20, 2021
मोठी बातमी - २० नोव्हेंबर
News24सह्याद्री - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले...पहा महत्वाची बातमी....
विविध पक्षातील मातब्बरांना आपल्या पक्षात आणण्याची रस्सीखेच
mothi batmi Breaking
March 23, 2021
मोठी बातमी - लोकसभेत पहिल्यांदाच मांडलेत डॉ. सुजय विखे यांनी मातृ भाषेत प्रश्न
News24सह्याद्री -
अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लोकसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या तासात आपले प्रश्न मांडताना आपल्या मातृभाषेत प्रश्न मांडण्याची अध्यक्षांकडे विनंती केली आणि अध्यक्षांनी ती विनंती मान्य केल्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्न आपल्या मराठी भाषेत मांडलेत तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच मराठीमध्ये प्रश्न मांडले आहेत गेले आहे...
प्रश्न मांडताना ते म्हणालेत कि कुकडी प्रकल्पांतर्गत डिंबे धरण आणि कालव्याचे निर्माण झालेला आहे. या डिंभे कालव्याचा विसर्ग बाराशे 40 क्युसेक डिझाईन आहे पण बऱ्याच वर्षापासून त्या कालव्याच्या नूतनीकरण न झाल्यामुळे साधारण साडे तीनशे कुसेक पाणी त्यातून जातं आणि फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने 15 किलोमीटर डिंबे ते माणिकडोह वॉटर टर्नल चा प्रस्ताव त्या ठिकाणी मंडला होता त्याला ३०० कोटींची आवश्यकता आहे राज्यांमध्ये महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती पाहता हा प्रकल्प मला वाटतं की राज्य शासनाकडून होऊ शकत नाही आणि म्हणून मी या सभेत केंद्र सरकारला हि ३०० कोटींची तरतूद केंद्र सरकार ने करावी अशी वीणाताई केलीये तशेच ह्या तरतूद झाली तर हा प्रकल्प लवकरात लवकर होईल आणि शेतकऱ्यांना पुरेसा पाणी साथ मिळेल अशी भावना व्यक्त केली आहे
mothi batmi Breaking
March 20, 2021
मोठी बातमी - नियम न पाळणार्यांना विरोधात दिले कारवाईचे संकेत
News24सह्याद्री -
कोरोना रुग्णांची संख्या पारनेर तालुक्यात दररोज वाढत चालली असुन पुढच्या एक आठवड्यात ही परीस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभागाने प्रयत्नशील राहावे अन्यथा गेल्या वर्षी सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने शिथिलता जी आली आहे ती मरगळ झटकून टाका. जिल्हा पातळीवरून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. जिल्ह्यांमध्ये 67 टक्के लसीकरण झाले असून नियम न पाळणार्यांना विरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले की, जिल्ह्यात तालुकानिहाय कोरोना आढावा बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे गांभीर्याने यावर उपाययोजना गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या हातावर शिक्के व विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना तपासणी केंद्र उभारणीसाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या गावात मोठ्या प्रमाणात रूग्ण आहेत त्या गावात उपाययोजना गरजेचे आहे. प्रत्येकाने आप आपली जबाबदारी पार पडली पाहिजे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शनिवारी दुपारी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
mothi batmi Breaking
March 20, 2021
मोठी बातमी - व्हीआरडीइचे चे स्तलांतर अखेर होणार नाहीच
News24सह्याद्री -
गेल्या २ महिनयांपासून व्हीआरडीई चे स्तलांतर होणार अशी चर्चा सुरु होती.दरम्यान व्हीआरडीई मध्ये कार्यरत असणारे काही कर्मचारी येथेच स्थायी झाले होते तसेच काही ची सेवानिवृत्ती होण्याची देखील वेळ जवळ अली होती आणि त्यात व्हीआरडीई चे स्तलांतर होणार या बातमीने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते मात्र त्या बाबत आज दिलासा दायक बातमी आहे....
व्हीआरडीई चे कुठल्याही प्रकारचे स्थलांतर होणार नसून तसे लेखी पत्रच डीआरडीओ यांच्याकडून मिळाली आहे,’अशी माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. नवी दिल्ली येथील डीआरडीओ भवन येथे विखे यांनी डी आर डी ओ चे चेअरमन रेड्डी, संजीव जोशी आणि डी आर डी ओ च्या विविध विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हीआरडीई संदर्भात बैठक घेतली. या बैठकीमध्ये नगरमधील व्हीआरडीई लॅबच्या स्थलांतरासंदर्भात चर्चा झाली. त्याबाबत माहिती देताना खासदार विखे म्हणाले, ‘आज या प्रश्नी सविस्तर बैठक झाली आहे. व्हीआरडीई मध्ये कार्यरत असणारे कर्मचारी, अरणगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यासर्वांना सांगण्यास मला आता आनंद होत आहे की, व्हीआरडीईचे कोणत्याही प्रकारचे स्थलांतर होणार नाही. तसे मला लेखी पत्र मिळाले आहे. या लेखी पत्रात व्हीआरडीई मध्ये तुर्तास कुठलेही बदल होणार नसून त्याचे स्थलांतर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट व्हीआरडीई मध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहेत. तसेच व्हीआरडीईचे विस्तारीकरण होणार आहे, अशी मला माहिती देण्यात आले आहे. व्हीआरडीई विस्तारीकरणाबाबतचा निर्णय घेतला जात असल्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानतो,’ असेही विखे यांनी स्पष्ट केले.. व्हीआरडीई स्थलांतर होत असल्याच्या बातमी मुळे मधल्या काळात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते तसेच आमदार संग्राम जगताप आमदार निलेश लंके याना भेटून
व्हीआरडीई स्थलांतर करू देऊ नका या बाबतचे निवेदन देण्यात आले होते या बाबत खा शरद पवार यांच्याशी नगर जिल्ह्यातील; आमदारांनी चर्चा केली होती अखेर
व्हीआरडीई स्थलांतर होणार नाही या विषयवारखा सुजय विखे यांनी पडदा टाकलं आहे