१४ फेब्रुवारी - वाइन विक्री विरोधावरुन खडसेंचा हल्लाबोल..
NEWS24सह्याद्रि
किराणा दुकानातून वाइन विक्री करणार नाही तसेच वाइन विक्रीचा निर्णय जनतेला विचारात घेऊन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा यांनी आजपासून सुरू होणारे नियोजित उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र याच मुद्द्याचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाची वाइन विक्रीसंदर्भातील भूमिका दुटप्पी असल्याचा टोला लगावलाय. रविवारी सायंकाळी भुसावळमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वाइन विक्रीला विरोध करणाऱ्या भाजपावर निशाणा साधला.
वाइन बाबत भाजपा एका राज्यात विरोध करते तर दुसरीकडे स्वागत करत आहे, अशी स्थिती असल्याचं खडसे म्हणालेत. वाइन ही दारू आहे त्यामुळे अण्णा हजारे यांनी यासाठी विरोध केला आहे असं सांगण्यात येत असल्याचा उल्लेख करत खडसेंनी भाजपाची सत्ता असणाऱ्या इतर राज्यांचं उदाहरण दिलं.
१४ फेब्रुवारी-जे उखडायचे ते उखडा; संजय राऊतांचा मोठा दावा
NEWS24सह्याद्रि
उद्या शिवसेना भवनात शिवसेनची पत्रकार परिषद होणार आहे. मी या पत्रकार परिषदेत असणारच पण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेत असतील. शिवसेना आणि ठाकरे परिवारांवर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल असं ते सांगत आहेत.शिवसेना आणि ठाकरे परिवारांवर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊच . अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जातील असंही वारंवार सांगितलं जात आहे. पण तुम्हाला सांगतो, भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील. आय रिपीट. आता बस्स झालं. राजकीय मर्यादांचं उल्लंघन तुम्ही केलं आहे. आता तुम्हाला कळेल काय असतं ते.त्याच बरोबर हमाम में सब नंगे होते है, असं विधान देखील शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. भाजपचे कोण नेते तुरुंगात जातील यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
१३फेब्रुवारी- उपोषणबद्दल अण्णा हजारेंचा महत्वपूर्ण निर्णय
अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत आज ग्रामसभा झाली.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार होते. मात्र, अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला.त्यामुळे अण्णांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतलाय.राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते.मात्र,अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला.वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली.अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे.त्यामुळे अण्णा आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत आज ग्रामसभा झाली.दरम्यान,यावेळी अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. अण्णांना वयाचा विचार करून उपोषण निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली.अखेर अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे.