१ जून - सह्याद्री बुलेटिन
NEWS24सहयाद्री: यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विलंब होणार ? अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
*कोल्हापूर जिल्ह्यावर यंदाही महापुराची टांगती तलवार*
---------------------
*तळा तालुक्यात बनवली टाकाऊ वस्तुंपासून इलेक्ट्रिक जीप*
---------------------
*उद्धव ठाकरेंच्या सभेची तयारी सुरु*
----------------------
*यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विलंब होणार* ?
-----------------------
*एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस 'शिवाई' प्रवाशांच्या सेवेत रुजू*
७ फेब्रुवारी-राणेंना आज दुहेरी धक्का
आज ची सुनावणी पुढे ढकल्याने आणि नितेश राणेंच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे.अशाचत आता राणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या सुट्टीमुळे एक दिवसांनी पुढे गेली आहे. ही सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवारी होणार आहे. यामुळे राणेंचा कोठडीमधील मुक्काम वाढण्याबरोबरच त्यांना छातीत दुखू लागल्याने कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे. अशाचत आता राणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज आज फेटाळला. संतोष परब हल्ल्याप्रकरणी गोट्या सावंत संशयित आरोपी होता. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंचे विश्वासू आणि जवळचे सहकारी गोट्या सावंत यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना आता स्थानिक न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
५ फेब्रुवारी -मॉर्निंग हेडलाइन्स
NEWS24सह्याद्री : पुण्यातील स्लॅब दुर्घटना प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई
.. पहा! सकाळच्या महत्वाच्या बातम्या...
MORNING HEADLINES
NEWS24सह्याद्रि
महाबळेश्वरच्या लिंगमळा, वेण्णालेक परिसरात तापमानाचा पारा 5 अंशावरकोल्हापुरात तब्बल 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी, महावितरणकडून गुन्हा दाखल
नागपूर मनपा नगरसेवक छोटू भोयर यांच्या अपात्रतेसाठी भाजप सक्रिय
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात आज कोरोना आढावा बैठक
नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
२० जानेवारी - सह्याद्री सुपरफास्ट
News२४सह्याद्री: गोव्यात एकत्र येण्याची सुबुद्धी काँग्रेसला झाली नाही खा.संजय राऊत ....पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री सुपरफास्ट मध्ये.....
-----------
*गोव्यात एकत्र येण्याची सुबुद्धी काँग्रेसला झाली नाही : संजय राऊत*
-----------
*उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपच्या 59 उमेदवारांची यादी जाहीर*
-----------
*कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ*
२० नोव्हेंबर - *NEWS24सह्याद्री* *सह्याद्री सुपरफास्ट*
News24सह्याद्री - *'दारू पिणारे कधीच खोटं बोलत नाहीत' अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल*.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...
*स्मशानात जा आणि भुतांशी बोला, सदाभाऊ खोत यांचा अनिल परब यांना खोचक सल्ला*
-----------------
*'दारू पिणारे कधीच खोटं बोलत नाहीत' अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल*
-----------------
*आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाही : मुंबई उच्च न्यायालय*
-----------------
*स्वच्छ सर्वेक्षणात सांगलीचं विटा शहर देशात प्रथम*
------------------
१८ नोव्हेंबर- सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री :अमेरिकेला मागे सारत चीन ठरला जगातील सर्वात श्रीमंत देश... पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या .....
१५ नोव्हेंबर- सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - एसटी कामगार आणि पोलिसांमध्ये झटपट......पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
----------------------
राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा निराधार संप सुरूच
--------------------------------
मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका-शरद पवार
१४नोव्हेंबर - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News24सह्याद्री : टीम इंडिया' करणार इंग्लंडचे अनुकरण; द्रविड पर्वात पडणार नवा पायंडा..पहा देशविदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये
वेगवान आढावा..
News24सह्याद्री -केंद्राकडून डाटा घेण्याचा टाइमपास कशासाठी? फडणवीसांचा सवाल.!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
केंद्राकडून डाटा घेण्याचा टाइमपास कशासाठी?
ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी केंद्राकडून डाटा मिळविणे आवश्यक नाही. पण, केंद्राकडे बोट दाखवत महाविकास आघाडी सरकार टाइमपास करीत असून, त्यामुळे येत्या डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यातील दोन तृतीयांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण न मिळण्याचा धोका दिसत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी असा सवाल केला.
वेगवान आढावा
News24सह्याद्री - मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हापहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव डावलण्यात आल्यामुळे बीडमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. नाराज पदाधिकाऱ्यंची समजुत काढण्यासाठी मुंबईतील वरळीमध्ये असलेल्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. कोरोना नियमांना पायदळी तुडवत त्या ठिकाणी शेकडो पदाधिकारी जमले होते. यानंतर आता गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ जुलै -सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - पेट्रोलचे भाव पुन्हा भडकले! पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
८ जुलै - सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - फडणवीस यांचे फलक हटविल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
मोदी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा विस्तार झाला असून, राज्यातून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवण्यात आलीत. यात भारती पवारांनी राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचा पदभार देखील सोपवण्यात आला आहे.
७ जुलै - सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - कल्याण डोंबिवलीत झोपडपट्टीतील चाळ परिसरात मोबाईल लसीकरण सुरू...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
27 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे चक्काजाम आंदोलन...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणारा अटकेत.
2. संचारबंदीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व भाजप आमदारानी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा.
अकोल्यात जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात वाढविलेल्या संचारबंदीच्या विरोधात व्यापारी संघटना आणि भाजप आमदारांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. संचारबंदी वाढविल्यापेक्षा दुकाने जास्तवेळ उघडी ठेवण्यास परवानगी दिली तर कोरोना संसर्ग कमी होईल.तसेच व्यापाऱ्यांचे ही आर्थिक नुकसान होणार नाही,अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
3. पाचोरा तालुक्यातील घटना
4. संत रविदास महाराज यांच्या जयंती
5. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा आरोप
चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 तारखेला हरभरा मोजणी दरम्यान राडा झाला असून सदर शेतकऱ्याचा हरभरा व्यापाऱ्याने सहा हजार तीनशे रुपये भावाने खरेदी केला व हरभराचे जवळपास 90 टक्के मोजणी सुद्धा झाली असताना व शेवटी हरभरा थोडाफार मोजणीचा शिल्लक असतांना त्या मालाचा पुन्हा लिलाव करून भाव ठरविणार व नन्तर मोजणी करू असे व्यापाऱ्यांनी सांगितले या कारणावरून बाजार समितीच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .
6. चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे चक्काजाम आंदोलन
चोपडा - येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडीच्या वतीने पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युची योग्य ती चौकशी व्हावी तसेच शिवसेनेचे नेते तथा वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्या द्यावा म्हणून होत असलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरा जवळील धरणगाव नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
7. ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी टी-20 वर्ल्ड कपमध्ये गेलचे पुनरागम
वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हटले गेलेल्या ख्रिस गेलचा आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड मध्ये समावेश करण्यात आला आहे. गेलनं वयाच्या 41 व्या वर्षी 18 महिन्यानंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी वेस्ट इंडिजनं सुरू केली आहे.
8. "मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपावाले माझ्यावर दिवसभर टीका करतात"
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले आहे तसेच मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
9. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले 'कारण'
गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवरूनच विरोधक सरकारवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवरच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं विधान केलंय.
10. मराठीच्या मुद्द्यावरून भाजपचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप
आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने 2021 च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मरठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत आहे,' अशी विखारी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
27 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबींवर चर्चा; बैठक होण्याची शक्यता....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मुलुंड टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं.
5. अमरावतीत लॉकडाऊन वाढणार? कोरोना थांबेना
विदर्भातली कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचं वाढणारं प्रमाण प्रशासनाची झोप उडवणारं आहे. अमरावती जिल्हात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप थांबण्याचं नाव घेत नाही.
6. तीव्र, अतितीव्र कुपोषणग्रस्त बालकांची वाढली संख्या
कोरोना काळात कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण आहार व अमृत आहार योजना सक्षमपणे राबविण्याचा दावा केला जात आहे; परंतु त्यानंतरही तीव्र व अतितीव्र स्वरूपातील कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढली आहे.
गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर गावांमध्ये असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महानुभव पंथाच्या वतीने फिरत्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि साठ साधकांचा हा समूह जळगाव मध्ये काही दिवस राहून गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर या ठिकाणी असलेल्या महानुभव पंथाच्या आश्रमात आले होते.
8. शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे: चित्रा वाघ
मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
27 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - मुख्यमंत्र्यांकडून 'मराठी भाषा गौरव दिना'च्या शुभेच्छा...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
5. इंग्लंडला मोठा धक्का
पाहुण्या इंग्लंड संघाला तिसऱ्या कसोटीत लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागलाय.. अहमदाबाद कसोटीत टीम इंडियानं १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे इंग्लंडचा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधून पत्ता कट झाला. त्यात त्यांना शनिवारी आणखी एक झटका बसला.
6. आर्थिक सेवा या विषयावर मोदींचे वेबिनार
करोनामुळे देशाची अर्थव्यवस्था घसरत असताना बँकांनी उद्योगांची कर्जाची गरज भागवावी, तसेच नवोद्योगांसाठी सुलभ आर्थिक साधने उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. खासगी क्षेत्राला पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी सार्वजनिक क्षेत्राचे अस्तित्व बँकिंग व विमा क्षेत्रात गरिबांसाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
7. क्रिकेट स्पर्धेसाठी चक्क मेंढा, बोकड, कोंबडय़ांची बक्षिसे
वाळवा तालुक्यातील एका मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांसाठी चक्क मेंढा, बोकड, देशी कोंबडय़ा, अंडी अशा बक्षिसांची घोषणा केली आहे. वाळवा तालुक्यातील बोरगावच्या साथीदार ग्रुपच्या वतीने क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आलं आहे.
8. अंबानींच्या बंगल्याबाहेर एक महिना रेकी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर शस्त्रास्त्राने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अंबानींच्या अँटालिया बंगल्याबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मोर आली आहे.
9. चित्रा वाघ अडचणीत
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती.
10. कोरोनामुळे पिफ चित्रपट महोत्सव लांबणीवर
पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच पिफ पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे उद्धाटन 11 मार्चला होणार आहे. पिफ चित्रपट महोत्सव 11 ते 18 मार्च या कालावधीत असणार आहे.
सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाईन्स - कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबईतील आयपीएलच्या सामन्यांवर टांगती तलवार
News24सह्याद्री - कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबईतील आयपीएलच्या सामन्यांवर टांगती तलवार....पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
27 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - शाळेतील २९९ विद्यार्थ्यांना कोरोना....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
3. पुणे-सातारा महामार्गावर बनावट पावत्यांआधारे टोलवसुली
पुणे-सातारा महामार्गावर आनेवाडी आणि खेड-शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्यांद्वारे टोलवसुली केली जात असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. गेल्या ४२ दिवसांपासून या दोन्ही नाक्यावरील संगणक ‘हॅक’ करून रात्री बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंत बनावट पावत्यांद्वारे टोलवसुली सुरू होती.
4. बनावट करोना अहवालाद्वारे धनप्राप्ती
व्यक्तीच्या मर्जीने करोनाचे बनावट अहवाल तयार करून विम्याची रक्कम लाटण्याचे प्रकार अमरावती जिल्ह्य़ात समोर आले आहेत. याच टोळीशी संबंधित एका विमा एजंटची ध्वनिफीत सर्वत्र प्रसारित झाल्याने या कथित गैरव्यवहार प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आता जिल्हा प्रशासनासमोर आहे.
6. ‘मोदी, शहा यांच्या सूचनेनुसार बंगालमध्ये आठ टप्पे?’
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी आठ टप्प्यांत मतदान घेण्यात येणार असल्याचे शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले, त्यावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपच्या निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेवरून मतदानाच्या तारखा घोषित करण्यात आल्या असाव्यात,असा संशय ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.
सह्याद्री टॉप २४ न्यूज - संशयास्पद गाडी विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती
News24सह्याद्री - संशयास्पद गाडी विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
26 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - नरेंद्र मोदींचे नाव स्टेडीयमला का दिले? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. नरेंद्र मोदींचे नाव स्टेडीयमला का दिले? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण
नरेंद्र मोदींचे नाव स्टेडीयमला का दिले? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण.. अहमदाबाद मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल या जगातल्या सर्वोत मोठ्या स्टेडीअमच्या उद्घाटन समारंभात स्टेडीअमचे नामकरण नरेंद्र मोदी केल्यानंतर सर्व स्थरातून टिका होत असताना बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दलची खात्री नसल्यानेच स्टेडिअमला आपलं नाव दिल्याची टीका केली आहे.
2. अकोला परिमंडळात ४८ तासात ३४० वीज चोरांवर कारवाई..17 लाखांची वीज चोरी
परिमंडळातील थकबाकी वसूलीचे आवाहन समोरअसतांना परिमंडळाअंतर्गत अकोला,बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात वीज चोरीचा वाढलेला प्रकार महावितरणसाठी मोठे आव्हान ठरत आहे.त्यामुळे महावितरणने वीज अशा चोराविरूध्द एक्शन घेत वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या धाडीत परिमंडळात गेल्या ४८ तासात ३४० वीज चोरांवर कारवाई केली आहेय.यामध्ये थेट वीज चोरी किंवा मीटरमध्ये फेर फार करून वीज चोरी करणाऱ्यांची संख्या ही ३२६ आहे.
3. शिरपूर शहरात मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राबवायच्या उपाययोजना आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी 10 वाजता उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रमसिंग बांदल यांच्या अध्यक्षतेखाखाली आढावा बैठक झाली.या बैठकीनंतर शिरपूर शहरातील दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरात मास्क न वापरणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
4. अकोल्याच्या दामिनी पथकाच्या प्रमुखपदी पीएसआय स्वाती इथापे.
महिला व मुलींच्या छेडखानीला पायबंद घालणे आणि प्रत्येक महिलेला भयमुक्त वातावरणात वावरता यावे, म्हणून पोलिस दलाने स्वतंत्र दामिनी पथक गठित केले आहेय. अकोल्यात या पथकाच्या प्रमुख पदी पोलिस उपनिरीक्षक स्वाती मधुकर इथापे यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केली आहे.
5. पाच दिवसांपासून कचरा संकुलात पडून,परिसरात पसरली दुर्गंधी !
डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड येथील बालाजी गार्डनमध्ये 9 सोसायट्या असून 522 सदनिका असून 2 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. दरवर्षाला 55 लाख रुपये कर भरुनही पालिका प्रशासन रहिवाशांना सहकार्य करीत नाही. सोसायटी आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही.
6. पेट्रोलियम मंत्र्यांचं अजब विधान
इंधनाच्या वाढत्या दरांमुळे एकीकडे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना विरोधकांनीही या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला घेरलं आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हिवाळा संपल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी हिवाळ्यात मागणी वाढत असल्याने इंधनाचे दर वाढत असल्याचं वक्तव्य केलं आहे.
7. WHOने मानले नरेंद्र मोदींचे आभार
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानॉम घेबेरियसस यांनी गुरुवारी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छोट्या देशांना मदत करण्यासाठी आणि लस समानतेला समर्थन देण्यासाठी आभार मानले. त्यांनी अशी आशा व्यक्त केली की, इतर देशांनीही भारताच्या अनुसरण केले पाहिजे.
8. प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ;
केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. एका महिलेकडून रेल्वे पोलिसांकडून हा साठा जप्त केला असून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.
9. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचं वक्तव्य
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुनावलं आहे. दोन्ही नेत्यांनी केरळमध्ये आपल्या रॅलीदरम्यान डाव्या सरकारवर टीका केली होती. “वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केरळच्या बाबतीत वेगळा दृष्टीकोन असेल, पण डाव्यांबाबत त्यांची भावना मात्र समान आहे. याबाबीत त्यांचं एकमत आहे,” असं पिनराई विजयन यांनी म्हटलं आहे.
10. दैनंदिन प्रवाशांना, पासधारकांना प्रवेश नसल्याने संताप
मुंबई ते वलसाड दरम्यान धावणारी व हजारो दैनंदिन प्रवाशांचा आधार असणारी वलसाड फास्ट पॅसेंजर ही गाडी १ मार्चपासून पुन्हा सुरू करण्याचे पश्चिम रेल्वेने योजिले आहे. मात्र, ही गाडी पूर्णपणे आरक्षित राहणार असल्याचे घोषित केल्याने दैनंदिन प्रवाशांना तसेच पासधारकांना या गाडीतून प्रवास करता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांत संताप व्यक्त होत आहे.
