Breaking News

1/breakingnews/recent

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा एकदा ईडीची नोटीस

No comments



मुंबई -

शिवसेना नेते  संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी ने नोटीस पाठवली होती परंतु ईडी ने वर्षा राऊत यांना परत नोटीस पाठून चौकशी साठी बोलावले आहे. पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ११ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही या समन्समध्ये देण्यात आले आहे. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहे. प्रवीण राऊत यांच्याशी संजय राऊत आणि वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध आहे. त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आला आहे. त्याच संशयाच्या आधारे चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. मात्र, ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याची मुदत वाढवून घेण्यासाठी त्यांनी पत्र लिहिले होते. त्यानंतर ईडीने त्यांना ५ जानेवारी रोजी नव्याने समन्स बजावले होते. वर्षा राऊत त्याआधीच म्हणजे ४ जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिल्या होत्या परंतु, त्यावेळी चौकशी पूर्णपने न झाल्यामुळे ईडीने पुन्हा एकदा वर्षा राऊत यांना नोटीस पाठवले आहे. तसेच उर्वरित चौकशी ११ जानेवारीला करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमसी बँकेतील घोटाळ्याच्या तपासासंबधित गेल्या ४ जानेवारी रोजी वर्षा राऊत यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली होती . प्रवीण राऊत यांनी कर्ज म्हणून दिलेले ५५ लाख रुपये नेमके कशासाठी घेण्यात आले होते? तसेच ते व्याजमुक्त कर्ज कशासाठी होते?, हा व्यवहार कसा होता? आदी प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याखेरीज वर्षा राऊत यांचे आणखीही काही आर्थिक संबंध आहेत का?, याचीही ईडीकडून माहिती काढली जात आहे. पीएमसी बँकेतील घोटाळ्याला हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ही कंपनी जबाबदार आहे. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही एचडीआयएलची उप कंपनी आहे. प्रवीण राऊत याच कंपनीत संचालक होते. संचालक असताना त्यांनी एचडीआयएलच्या खात्यातून १.६० कोटी रुपये पत्नी माधुरी यांच्या खात्यात जमा केले होते. माधुरी यांनी याच १.६० कोटी रुपयांपैकी ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांना व्याजमुक्त कर्ज म्हणून दिले होते. त्या रक्कमेतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला. या सर्व घडामोडी २०१०-११ दरम्यान घडल्या आहे. पुढे एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ६,६७० कोटी रुपयांचे कर्ज बुडवले. त्यातून पीएमसी बँक कोसळली. याचाच  पूर्ण तपास ईडीकडून केला जात आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *