Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label artistdebute. Show all posts

१२ फेब्रुवारी- लता मंगेशकरांना वाहिली अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली

NEWS२४सह्याद्रि 

 ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना लोक आपापल्या शैलीत आदरांजली वाहताहेत. एका मेकअप आर्टिस्टचा  व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांनी लता मंगेशकर यांना त्यांच्या कलेतून  अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली.

ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण जग शोक करत आहे. सोशल मीडियावर लोक लतादीदींना आपापल्या शैलीत आदरांजली वाहताहेत. अनेक लोक त्यांनी गायलेली गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत, तर त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. याच प्रकारामध्ये एका मेकअप आर्टिस्टचा  व्हिडिओ  समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांनी लता मंगेशकर यांना त्यांच्या कलेतून  अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्लीस्थित मेकअप आर्टिस्ट दीक्षिताचा आहे. ज्यामध्ये तिने मेकअपच्या मदतीने स्वत:ला लता मंगेशकरसारखा लूक दिला आहे. मेकअप आर्टिस्टचे हे कौशल्य पाहून अनेकजण थक्क झाले. दीक्षिताने तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. जी सध्या सोशल मीडियावर झपाट्याने चर्चेत आहे.


Contact Me

Name

Email *

Message *