Breaking News

1/breakingnews/recent

6 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

  News24सह्याद्री - भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केलं होतं वादग्रस्त विधान....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


1. महाराष्ट्र पोलिसांच्या ‘स्निफर डॉग’ची कमाल
चिमुरडीचं अपहरण करुन बलात्कार केल्याप्रकरणी तलासरी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘स्निफर डॉग’च्या मदतीने पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात.  

2. शत्रूचे फायटर विमान नष्ट करण्याची अत्याधुनिक टेक्नोलॉजी....
इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने (IAI) मंगळवारी ही माहिती दिली. भारत आणि इस्रायल दोघांनी मिळून हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. या क्षेपणास्त्राद्वारे हवेत ५० ते ७० किलोमीटर अंतरावरील शत्रूचे फायटर विमान नष्ट करता येऊ शकते.

3. दिल्लीच्या वेशीवर गेल्या ४१ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु
 ११ जानेवारीला नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या सर्व याचिकांवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आंदोलनाशी संबंधित परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं यावेळी सरन्यायाधीश शरद बोबडे, ए एस बोपन्ना आणि व्ही रामसुब्रहमण्यम यांच्या खंडपीठाने नमूद केलं.

4. हेल्थकेअर प्रोफेशनल्समध्येही संभ्रम
लस घेण्याबाबतच्या लोकांच्या मानसिकतेबाबत एक ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आलं होतं यामधून ही बाब समोर आली आहे. या सर्वेनुसार, ६९ टक्के भारतीय अद्यापही द्विधा मनस्थितीत आहेत, तर २६ टक्के नागरिकांनी ठामपणे आपण लवकरात लवकर लस घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे.

5. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपाने कसली कंबर!
भाजपाच्या प्रदेशस्तरीय बैठकांमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषदेतून दिली आहे. शिवाय, आगामी निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे.

6.  नराधमांनी केलं क्रूर कृत्य; पीडितेचा मृत्यू
हादरवून सोडणारी बाब म्हणजे महिलेच्या गुप्तांगात जखमा आढळून आल्या असून, या अत्याचारात पीडित महिलेचा पायही मोडला. या घटनेच पीडितेचा मृत्यू झाला असून, एका पुजाऱ्याने तिचा मृतदेह घरी आणल्याचं पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.  

7. रुरकेला पोलाद प्रकल्पात विषारी वायूची गळती; चार कामगारांचा मृत्यू, सहा गंभीर
ओडिशा राज्यातील रुरकेला पोलाद प्रकल्पात विषारी वायूची गळती झाल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला असून इतर सहाजण आजारी पडले आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे. कोल केमिकल युनिटमध्ये बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. इंडियन एक्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.


8. “सोनिया गांधी, मायावती यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा”
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांना भारतरत्नने सन्मानित करायला हवं, असं मत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी व्यक्त केलं आहे.

9. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केलं होतं वादग्रस्त विधान
भाजपाच्या उत्तराखंड प्रदेशांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना मध्यरात्री ट्विट करून काँग्रेसच्या नेत्या आणि विरोधी पक्षनेत्या इंदिरा ह्रदयेश यांची माफी मागावी लागली. प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांची ह्रदयेश यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती.

10. चीनमधूधनच करोनाचा फैलाव झाल्याचे दावे

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी चीनवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. चीनने अद्यापही करोना व्हायसरसाठी कारणीभूत ठरलेल्या कारणांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीमला प्रवेश दिला नसल्याने टेड्रोस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिनिवा येथून ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *