१४ फेब्रुवारी - वाइन विक्री विरोधावरुन खडसेंचा हल्लाबोल..
NEWS24सह्याद्रि
किराणा दुकानातून वाइन विक्री करणार नाही तसेच वाइन विक्रीचा निर्णय जनतेला विचारात घेऊन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा यांनी आजपासून सुरू होणारे नियोजित उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र याच मुद्द्याचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाची वाइन विक्रीसंदर्भातील भूमिका दुटप्पी असल्याचा टोला लगावलाय. रविवारी सायंकाळी भुसावळमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वाइन विक्रीला विरोध करणाऱ्या भाजपावर निशाणा साधला.
वाइन बाबत भाजपा एका राज्यात विरोध करते तर दुसरीकडे स्वागत करत आहे, अशी स्थिती असल्याचं खडसे म्हणालेत. वाइन ही दारू आहे त्यामुळे अण्णा हजारे यांनी यासाठी विरोध केला आहे असं सांगण्यात येत असल्याचा उल्लेख करत खडसेंनी भाजपाची सत्ता असणाऱ्या इतर राज्यांचं उदाहरण दिलं.
१४ फेब्रुवारी- १४ फेब्रुवारी-प्रसाद लाड यांची आक्रमक भूमिका
NEWS24सह्याद्रि
काही दिवसांपूर्वी काँग्रेसनं भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर भाजप नेतेही आता आक्रमक झाले आहेत.आता त्या विरोधात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी हल्ल्याची भाषा करालं , तर आम्हीही तसचं उत्तर देऊ असं म्हटलंय.
. आमच्या नेत्याबद्दल बोलला अजून आक्रमक उत्तर मिळेल.त्यावेळी ते असहि म्हणालेत की अण्णा म्हणतात मला जगण्याची इच्छा नाही मग या गोष्टीला आता काँग्रेसनं उत्तर द्यावं, असंही लाड म्हणाले.त्याचबरोबर अण्णा हजारेंबद्दल काँग्रेसचं काय मत आहे, असा सवाल प्रसाद लाड यांनी केला.
१३ फेब्रुवारी-मोठी बातमी
*अखेर अण्णा हजारेंचं उपोषण स्थगित*
*'या' कारणामुळे अण्णा हजारेंचा उपोषण न करण्याचा निर्णय*
१३फेब्रुवारी- उपोषणबद्दल अण्णा हजारेंचा महत्वपूर्ण निर्णय
अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत आज ग्रामसभा झाली.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार होते. मात्र, अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला.त्यामुळे अण्णांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतलाय.राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते.मात्र,अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला.वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली.अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे.त्यामुळे अण्णा आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत आज ग्रामसभा झाली.दरम्यान,यावेळी अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. अण्णांना वयाचा विचार करून उपोषण निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली.अखेर अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे.
१३ फेब्रुवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज
News२४सहयाद्री:-उपोषणाबाबत अण्णांकडून आज फैसला......पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये........
*खरवंडी जिल्हा परिषद गटात अातापर्यंत ४० कोटी रुपयांचा निधी*
----------------------
*सुरेशनगर हनुमान मंदिर जीर्णोद्धार विकास कामांचं उद्घाटन*
१२ फेब्रुवारी-वाईन विक्रीचा वाद सुरुच निर्णय लांबणीवर
NEWS24सह्याद्रि
याच अनुषंगाने येत्या सोमवारपासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन पाऊलं मागे घेण्याचं ठरवलं आहे. नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे हे यापूर्वीच अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याआधीच अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. आज या विभागाच्या सचिव वत्सला नायर या याबाबतचे पत्र घेऊन आण्णा हजारे यांच्या भेटीला जाणार आहेत.याबाबत अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे होणारे दुष्परिणाम सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटत असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे, हेही आश्वचर्यकारक असल्याचे अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.
६ फेब्रुवारी-जिल्ह्याची खबरबात
NEWS24सह्याद्री - जिल्ह्यातील या रेल्वे मार्गाकडे केंद्राचे दुर्लक्ष
. पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या..
बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावरील हल्ल्याचा बोधेगावात निषेध...
आपल्या सुरांमधून लतादीदी अजरामर झाल्या
६ फेब्रुवारी - सह्याद्री बुलेटिन
NEWS24सह्याद्री-औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचा वाद चव्हाट्यावर
लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची भाचीच्या लग्नाला हजेरी
लातूरात 256 एसटी कामगार बडतर्फ
विश्वास नांगरे पाटलांची चौकशीच्या फेऱ्यात
नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अजूनही पाच हजारांवर
२४ जानेवारी - जिल्ह्याची खबरबात
News२४सह्याद्री:- करुणा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट.....पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा..
-----------
*करुणा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट*
-----------
*नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची संगमनेर भाजपाची मागणी*
-----------
*सुपा बसस्थानक चौक बनला मृत्यूचा सापळा*