Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label morhi batmi. Show all posts

मोठी बातमी - २० नोव्हेंबर

  News24सह्याद्री - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले...पहा महत्वाची  बातमी....

                                   

                                             


   विविध पक्षातील मातब्बरांना आपल्या पक्षात आणण्याची रस्सीखेच

मोठी बातमी १७सप्टेंबर

 

 News24सह्याद्री - मोठी बातमी... संपूर्ण  बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..






२९ जून मोठी बातमी - महापौर निवडणुकीत काँग्रेसला चमत्काराची अपेक्षा

  News24सह्याद्री - महापौर निवडणुकीत काँग्रेसला चमत्काराची अपेक्षा....संपूर्ण बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ...



२५ जून- शहराची खबरबात - उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार स्पर्धा

 News24सह्याद्री - उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार स्पर्धा ...पहा शहराची खबरबातमध्ये...


                           
                       TOP HEADLINES


*नाट्यसंकुलाच्या कामाला निधीचे सलाईन*

सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात महानगरपालिकेच्या नाट्य संकुलाचे काम मागील आठ वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. या कामाला आता निधीच सलाईन मिळाल्याने वेग आलाय, नाट्यगृहाची  आसन क्षमता ही 500 वरून एक हजारांवर वाढवण्यात आली आहे, मात्र निधीचा सलाईन संपल्यावर काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक आणि कला संचालनालयाने या कामासाठी 2010 मध्ये दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला होता, मात्र केवळ 60 लाख रुपये या कामासाठी मिळाले आहेत. या निधीतून संकुलाचा पाया खोदण्यात आला असून कॉलम उभे राहिलेत मात्र निधीअभावी या नाट्यगृहाचे काम रखडलं आहे.

२५जून - सह्याद्री सुपरफास्ट

   News24सह्याद्री - उद्या भाजपचं राज्य सरकारविरोधात चक्का जाम!...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...


TOP HEADLINES

 *माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक*
     माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आपलं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक करण्यात आलं असल्याचा आरोप केला आहे. "अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन" असल्याच्या कथित कारणावरून सुमारे एक तास अकाऊंट बंद करण्यात आले होते. रविशंकर प्रसाद यांनी स्वदेशी कू अॅपवर याबाबत निवेदन काढून या कारवाईचा निषेध केला आहे.


 

मोठी बातमी - तर हे सर्व संचालक कायमस्वरुपी होणार अपात्र

 News24सह्याद्री -



सहकारी बँकेत अपहार आणि भ्रष्टाचार करणार्‍यांना मोठी चपराक बसणार आहे. बँक, पतसंस्था अथवा मल्टीस्टेट पतसंस्था आणि बँकेत अपहार, भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आणि या अनुषंगाने पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असतील तर अशा बँका, पतसंस्थांच्या संचालक मंडळाच्या विरोधात कठोर भूमिका आता केंद्रीय निबंधक कार्यालयाने घेतली आहे. नगर अर्बन बँकेतील कथीत अपहार आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण रिझर्व्ह बँकेने गांभिर्याने घेतले आहे. या बँकेच्या अध्यक्षांसह, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळला कायमस्वरुपी अपात्र ठरविण्यात आले आहे. 

याबाबतचे आदेश असिस्टंट कमीशनर डॉ. सत्येंद्र कुमार नायक यांनी आज काढले. याबाबत अर्बन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार दिलीप गांधी, तत्कालीन उपाध्यक्ष अशोक कटारिया यांच्यासह संपूर्ण संचालकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून तीस दिवसांच्या आत योग्य तो खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खुलाशाने समाधान झाले नाही तर या सर्वांना अर्बन बँकेसह अन्य कोणत्याही सहकारी संस्थेवर संचालक, सभासद म्हणून राहाता येणार नाही. नवी दिल्ली येथील केंद्रीय निबंधकांनी काढलेल्या या आदेशाने आता भ्रष्ट संचालकांना मोठा दणका बसणार असल्याचे मानले जाते.

मोठी बातमी - हत्तीवरून पडले रामदेव बाबा...

  News24सह्याद्री - 


हत्तीवर बसून योग करणं योगगुरु रामदेव बाबांना चांगलंच भारी पडलं. कारण हत्तीवर योग करताना रामदेव बाबा खाली कोसळले. रामदेव हत्तीवर बसून प्राणायाम करत होते. परंतु हत्तीने हालचाल केल्याने त्यांचा बॅलन्स गेला आणि ते हत्तीवरुन खाली पडले. या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, परंतु एका क्षणासाठी तिथे उपस्थित लोक घाबरुन गेले.

बाबा रामदेव यांनी मथुरेतील महावन रमणरेतीमध्ये असलेल्या कार्ष्णि गुरु शरणानंद महाराजांच्या आश्रमात योग शिबीर आयोजित केलं होतं. यावेळी रामदेव बाबांनी आश्रमातील संतांना योग शिकवला. मंचावर असलेल्या गुरु शरणानंद महाराज यांनीही योगासनं केली होती. यावेळी रामदेव बाबा हत्तीवर बसून योग करत होते. पण हत्तीने हालचाल करताच रामदेव बाबांचा बॅनल्स गेला आणि ते हत्तीच्या पाठीवरुन घसरले.

मोठी बातमी - शिवाजी कर्डिले रात्री अजित पवारांच्या पाया का पडले?

 News24सह्याद्री - 


माजी खासदार दादा पाटील शेकळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार स्वच्छ असल्याचा गवगवा बाजार समिती सत्ताधार्‍यांकडून केला जात आहे. बाजार समितीचा कारभार स्वच्छ आहे, तर मग माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंधारात पाय का धरले, असा सवाल नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केेला. दरम्यान, बाजार समितीची चौकशी थांबविण्यासाठीच ज्या पक्षावर टीका केली त्याच पक्षाच्या नेत्यांचे पाय धरण्याची वेळ आली असल्याचा टोलाही यावेळी लगावला.

कार्ले म्हणाले, पीएफ बाबत बाजार समितीच्या कर्मचार्‍यांच्या अनेक तक्रारी आहेत. योग्य वेळी पुरावे बाहेर काढू. कुठल्या जागा विकल्या, कोणी कुठे अतिक्रमण केले हे समोरासमोर येऊन सांगू. बाजार समितीचा कारभार स्वच्छ आहे तर कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंधारात पाय का धरले, असा सवाल कार्ले, हराळ यांनी केला. दुसुंगे म्हणाले, बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरु असून मतदारांनी चोरांच्या हातात बाजार समिती दिल्याचा आरोप केला. शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे काम कर्डिले यांनी केले असल्याचे ते म्हणाले.

मोठी बातमी - भाऊ कोरगावकर आणि विक्रम राठोड यांची शिष्टाई यशस्वी; शिवसेनेतील वाद संपुष्टात

  News24सह्याद्री - 


नगर शहर शिवसेनेतील गटबाजीला अखेर पुर्णविराम मिळाला आहे. संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर आणि  विक्रम राठोड यांच्या पुढाकारातून हा वाद संपुष्टात आला आहे. जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे आणि शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनीही याकामी पुढाकार घेतला. सावेडी उपनगरातील एका मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या सदस्य नोंदणीबाबत आढावा झाला आणि त्याच बैठकीत गटतटावर यापुढे कोणीही कोणतीही प्रतिक्रिया आणि पत्रकबाजी करणार नाही असा सज्जड दमच भरला गेला.

शिवसेनेतील पक्षसंघटनेची शिस्त सर्वांनी पाळावी असे आवाहन संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर आणि जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले. त्यास सर्वांनीच प्रतिसाद दिला.

आरोग्य सह्याद्री - जाणून घ्या नारळाचे बहुगुणी उपयोग

News24सह्याद्री -जाणून घ्या नारळाचे बहुगुणी उपयोग......पहा आरोग्य सह्याद्री मध्ये



            


मोठी बातमी - भाजपचे खासदार सुजय विखे भाजपमध्ये अस्वस्थ

     News24सह्याद्री - 



लोकसभेच्या निवडणुकीवेळी नाही नाही म्हणत अखेर सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवली आणि ते भाजप काढून खासदार झाले मात्र सुजय विखे यांचा स्वभाव परखड असल्याने अनेक वेळा त्यांची वक्तव्य वादग्रस्त झाली होती. कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून त्यांनी लॉकडाऊनची मागणी केली होती. त्या वरून जिल्हा प्रशासनावावर सुजय विखे यांनी थेट आरोप लावले होते. खासदारांना मिळणारा  निधी असेल अथवा काही शासकीय योजना असतील या वरून विखे यांनी सरकार आणि प्रशासनाला लक्ष केले होते मात्र आता त्यांनी थेट पक्षात चालू असलेल्या घुस्मटि बद्दल जाहीर वक्तव्य केले आहे. होय  मी बंडोखर आहे माझा स्वभाव वेगळा आहे मी कोणत्याच पक्षात ऍडजेस्ट होत नाही मात्र माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असं इशाराच त्यांनी दिला आहे.

 अत्यंत परखड शब्दात सुजय विखे यांनी आपल्याच पक्षातील पधाधिकाऱयांना सुनावले आहे . सुजय विखे पाटील नेमक्या कोणत्या घुसमटीत पक्षात वावरत आहेत आणि कोणते दुःख ते सहन करत आहेत याची चर्चा आता त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये चांगलीच झडू लागलीय.  सुजय विखे यांनी पहिल्यांदाच पक्ष बदलला असला तरी विखे घराणे हे काँग्रेस शिवसेना पुन्हा काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करून आलेले आहे. त्या मुले पुन्हा स्वगृही जाण्याचे हे संकेत तर नाही ना अशी चर्चा कार्यकर्त्यां मध्ये घडू लागली आहे.

Contact Me

Name

Email *

Message *