Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label Mumbai. Show all posts

१७ मे - मोठी बातमी

  NEWS24सहयाद्री: आमदार जगताप थोडक्यात बचावले.. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी  खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.






आ.संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात

मुंबई-पुणे महामार्गावर एसटीला दिली धडक

अपघातात थोडक्याच बचावले जगताप

१६ मे - सह्याद्री बुलेटिन

NEWS24सहयाद्री: संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा सोमय्या दाखल करणार ! राज्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*सिन्नरला भगवान गौतम बुद्धची ५० फूट रांगोळी साकारली*
---------------------
*संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा सोमय्या दाखल करणार*
----------------------
*केतकी चितळेच्या कृत्यामागे कर्ता करविता कोणी वेगळाच*
----------------------
*यंदाही मुंबईची तुंबई होणार का* ?
-----------------------
*चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या गँगचा पोलिसांकडून पर्दाफाश*

१४ मे-सह्याद्री-गुड मॉर्निग सह्याद्री

 NEWS24सहयाद्री-आनंद दिघे अमर रहेच्या घोषणांनी दुमदुमूले  चित्रपटगृह-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





७ एप्रिल - गॉसिप कल्ला

  NEWS24सह्याद्री : ‘भारत माझा देश आहे’ चं पोस्टर रिलीज.. मनोरंजन विश्वातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*४ वर्षानंतर शाहरूख खानचे कमबॅक*
--------------------
*उर्मिला कोठारेचं १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक*
---------------------
*‘भारत माझा देश आहे’ चं पोस्टर रिलीज*

१४ मार्च - गॉसिप कल्ला

  NEWS24सह्याद्री : स्मार्टफोनवर चित्रित केलेला ‘पॉंडीचेरी’ आता ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर.. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी खाली  दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*प्रवीण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित*
============
*‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’: नागराज मंजुळे*
============
*‘विशू’च्या आयुष्यात ‘ती’ येणार ? टीझर रिलीज*
============

२८ फेब्रुवारी - मोठी बातमी

  NEWS 24 सह्याद्री: खा.संभाजीराजेंचं उपोषण मागे, राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य संपूर्ण बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा...





२८ फेब्रुवारी - गॉसिप कल्ला

News२४सह्याद्री: व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या सोनालीला नेटकऱ्यांनी झापलं.. पहा मनोरंजन विश्वातील रंजक घडामोडी गॉसिप कल्ला मध्ये.....




*अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे चाहते चिंतेत*
===========
*मंदार देवस्थळींची नवी मालिका येणार*
===========
*व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या सोनालीला नेटकऱ्यांनी झापलं*

२७ फेब्रुवारी-उपोषण स्थळी संभाजीराजेंची मेडिकल तपासणी

 News२४सह्याद्री:-उपोषण स्थळी संभाजीराजेंची मेडिकल तपासणी .....






२७ फेब्रुवारी-गॉसिप कल्ला

News२४सह्याद्री:-झी मराठीवर 'गर्जतो मराठी' विशेष कार्यक्रम होणार सादर......पहा मनोरंजन विश्वातील रंजक घडामोडी गॉसिप कल्ला मध्ये.......









२६ फेब्रुवारी - गॉसिप कल्ला

  News२४सह्याद्री: '८ दोन ७५' चित्रपटाला ५० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार..पहा मनोरंजन विश्वातील  काही ठळक घडामोडी



 



*गंगुबाई’ सुपरहिट, पहिल्याच दिवशी साडे दहा कोटींची कमाई*
============
*ह्रतिकनं शेअर केली सबासाठी खास पोस्ट*
============
*राखीच्या डान्सचं चाहत्यांकडून कौतुक*
============

मोठी बातमी - तो म्हणाला, तुलाच स्मशानभूमीत जाळतो.

        News24सह्याद्री - 





मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर सत्ताधारी ‘मविआ’चे आंदोलन

उद्या महाविकास आघाडीतील नेते,कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करणार,हसन मुश्रिफांचा इशारा 

नवाब मलिक यांच्या अटकेने राज्यात राजकारण तापले,महाविकास आघाडी आक्रमक 

भाजपकडून राजीनाम्याची मागणी 

२२ फेब्रुवारी-गॉसिप कल्ला

NEWS२४सह्याद्री:-पंडित वसंतराव देशपांडे यांचा जीवनपट उलगडणार...पहा मनोरंजन विश्वातील घडामोडी गॉसिप कल्ला मध्ये....




*अंकित मोहनचा अॅक्शनपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला*

=========
*प्रशांत दामलेंची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल*

२१ फेब्रुवारी-सह्याद्री बुलेटिन

 News२४सह्याद्री:-महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला........पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिन मध्ये.......




*किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्र्यांविरोधात हल्लाबोल*

--------------------
*हिंदुत्व मुद्यावरून मुंबईच्या महापौरांनी भाजपला फटकारले*
----------------------
*पुण्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्ट्रॉबेरी महोत्सवाचे आयोजन*
-----------------------
*आयपीएल २०२२ गुजरात टायटन्स संघाचा लोगो रिलीज*

१६ फेब्रुवारी - स्पेशल रिपोर्ट

 News२४सह्याद्री : बप्पीदांचा संगीत क्षेत्रातील अनोखा जीवनप्रवास.. पहा ! न्यूज २४ सहयाद्रीच्या  स्पेशल रिपोर्टमध्ये ....





१५ फेब्रुवारी-सह्याद्री वेगवान आढावा

 News२४सह्याद्री:-एसटी संपावरून दरेकरांचा सरकारवर आरोप.....पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा.......








*सरकारविरोधात स्वाभिमानी आक्रमक*
---------------------
*कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुनावणी*
---------------------
*मुंबईत ईडीचं सर्जिकल स्ट्राईक*

झुंडचं धमाकेदार गाणं रिलीज

 NEWS24सह्याद्रि 

                            


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणारा 'झुंड'  या  चित्रपटामधील आया ये झुंड  है हे गाणं नुकताच प्रदर्शित झाला आहे. हे गाणं अतुल गोगावले  यांने गायले आहे. अजय आणि अतुल या दोघांनी हे गाणं लिहिले असून हे गाण्याला संगीत देखील त्यांनी दिलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे.

गाण्यामध्ये अमिताभ यांच्यासोबतच काही लाहान मुलं देखील दिसत आहेत. तसेच गाण्यामध्ये अभिनेता आकाश ठोसर देखील दिसत आहे. आकाश या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. सैराट या चित्रपटामुळे आकाशला विशेष लोकप्रियता मिळाली. 

झुंड चित्रपटाचे कथानक हे  विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित असणार आहे, असं म्हणटलं जात आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपली अशी फुटबॉल टीम तयार केली होती. याच कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट आधारित असणार आहे. गेल्या वर्षी 18 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 








मुंबईकरांसाठी मोठी बातमी

NEWS24सह्याद्रि 



आता मुंबईकरांना एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो प्रवास करता येणार आहे. बेस्ट उपक्रमाकडून या महिन्याच्या अखेरपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांना एकाच कार्डवर बेस्ट , रेल्वे आणि मेट्रोचा  प्रवास करता येणार आहे. बेस्ट उपक्रमाकडून या महिन्याच्या अखेरपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशभरात ज्या बस, मेट्रो आणि अन्य परिवहन सेवेमध्ये सामायिक कार्डची सुविधा आहे. तिथंही बेस्टच्या या कार्डचा वापर करता येणार आहे.

दररोज अनेकजण मुंबईत कामासाठी येत असतात. अनेकदा प्रवासासाठी काढाव्या लागणाऱ्या तिकीटासाठी बराच वेळ वाया जातो. अशातच बेस्ट उपक्रमातून राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच, तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाकडून ही सुविधा देण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाने 2020 च्या ऑक्टोबरपासून 'सामायिक कार्ड'च्या चाचणीला सुरुवात केली होती. त्यालाच अंतिम रुप देताना हे कार्ड प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

बेस्टच्या कार्डचे फायदे : 

रोख रकमेशिवाय प्रवास करणं शक्य 

डेबिट कार्डप्रमाणेही वापर करता येणार 

वीजबिलासह अन्य देयके भरण्याचीही सविधा 

कार्ड वापरताना प्रवाशांना तिकिटाचे पैसे कार्डद्वारे भरावे लागणार आहेत. त्यासाठी कार्डमध्ये पैसे असणं गरजेचं असणार आहे. प्रवाशी हे कार्ड रिचार्ज करु शकणार आहे. याशिवाय बेस्टच्या या कार्डाचा वापर देशभरातील बस, मेट्रो आणि इतर परिवहन सेवांमध्ये जिथे-जिथे 'सामायिक कार्ड'ची सुविधा देण्यात आली आहे. तिथे-तिथे बेस्टच्या कार्डाचा वापर करणं शक्य होणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. 


१४ फेब्रुवारी - भाई जगताप यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

 

NEWS24सह्याद्रि 

PM मोदी यांनी केलेल्या वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प का?  असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलाय.


१२ फेब्रुवारी- लता मंगेशकरांना वाहिली अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली

NEWS२४सह्याद्रि 

 ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना लोक आपापल्या शैलीत आदरांजली वाहताहेत. एका मेकअप आर्टिस्टचा  व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांनी लता मंगेशकर यांना त्यांच्या कलेतून  अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली.

ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण जग शोक करत आहे. सोशल मीडियावर लोक लतादीदींना आपापल्या शैलीत आदरांजली वाहताहेत. अनेक लोक त्यांनी गायलेली गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत, तर त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. याच प्रकारामध्ये एका मेकअप आर्टिस्टचा  व्हिडिओ  समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांनी लता मंगेशकर यांना त्यांच्या कलेतून  अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्लीस्थित मेकअप आर्टिस्ट दीक्षिताचा आहे. ज्यामध्ये तिने मेकअपच्या मदतीने स्वत:ला लता मंगेशकरसारखा लूक दिला आहे. मेकअप आर्टिस्टचे हे कौशल्य पाहून अनेकजण थक्क झाले. दीक्षिताने तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. जी सध्या सोशल मीडियावर झपाट्याने चर्चेत आहे.


११ फेब्रुवारी- मोहीत कंबोज यांचं खुलं आव्हान

                                       

NEWS24सह्याद्रि 

सध्या पाच राज्यांमधल्या निवडणुकांचा हंगाम सुरू असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. देशभरात भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसोबतच प्रादेशिक पक्षांनीही आपापली ताकद पणाला लावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं देखील गोवा, उत्तर प्रदेश या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या निवडणूक असणाऱ्या राज्यांमध्ये दौरा करत असून त्यांना भाजपाकडून आव्हान देण्यात आलं आहे.भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर ‘महाराष्ट्रातील सलीम-जावेद जोडीतील जावेद’ असं म्हणत खोचक निशाणा देखील साधला आहे.

संजय राऊतांच्या निवडणूक दौऱ्यांना लक्ष्य करत मोहित कंबोज यांनी निशाणा साधला आहे. “माझा तुम्हाला प्रश्न आहे. ४० वर्षांपासून तुम्ही शिवसेनेत आहात. पूर्ण देशभरात फिरून तुम्ही निवडणुकीचं काम करत आहात. मला एक सांगा, आजपर्यंत तुम्ही कोणती निवडणूक लढवली? कोणत्या ठिकाणी असं झालं की तुम्ही जाऊन प्रचार केला आणि तो उमेदवार निवडून आला. तुम्ही जिथे जिथे गेलात, तिथे उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं”, असं मोहित कंबोज म्हणाले.

यावेळी मोहित कंबोज यांनी संजय राऊतांना मुंबई पालिकेची निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. “मी तुम्हाला आव्हान देतो राऊतसाहेब. २०२२च्या महानगरपालिका निवडणुकीत तुमची चाणक्यनीती दाखवून द्या. मुंबईतला तुम्हाला वाटेल तो सर्वात सुरक्षित वॉर्ड घ्या आणि तिथून निवडणूक जिंकून दाखवा. तेव्हा आम्ही मानू की तुम्ही किती मोठे चाणक्य आहात. २०२२ आणि २०२४-२९ च्या गोष्टी तुम्ही करता. उत्तर प्रदेशपासून गोवा आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या गप्पा तुम्ही करता. पण त्याआधी २०२२मध्ये संजय राऊत निवडणूक जिंकू शकतात का, हे लोकांना सिद्ध करून दाखवा”, अशा शब्दांत मोहित कंबोज यांनी निशाणा साधला आहे.


Contact Me

Name

Email *

Message *