१४ मे-सह्याद्री-गुड मॉर्निग सह्याद्री
NEWS24सहयाद्री-आनंद दिघे अमर रहेच्या घोषणांनी दुमदुमूले चित्रपटगृह-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१६ फेब्रुवारी-गॉसिप कल्ला
News२४सह्याद्री:-अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित........पहा मनोरंजन विश्वातील घडामोडी गॉसिप कल्ला मध्ये........
'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील नवीन गाणं रिलीज*
=========
*आई कुठे काय करते मालिकेत ट्विस्ट
११ फेब्रुवारी-गॉसिप कल्ला
News२४सह्याद्री:-*‘रणबीरच्या 'शमशेराचा' दमदार टीझर प्रदर्शित....पहा मनोरंजन विश्वातील रंजक घडामोडी गॉसिप कल्ला मध्ये...
*झी मराठीची 'ही' नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला*
*‘या’ दिवशी रिलीज होणार अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज*
८ जानेवारी-गॉसिप कल्ला
News२४सह्याद्री:-'पुष्पा' सिनेमा आता ओटीटीवर झाला प्रदर्शित.....पहा मनोरंजन विश्वातील रंजक घडामोडी गॉसिप कल्ला मध्ये.....
*बॉलिवूडला कोरोनाचा फटका,पाच बिग बजेट सिनेमांच्या प्रदर्शनाला ब्रेक*
============
*‘केजीएफ चॅप्टर २’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!*
=============
*मदतीसाठी पुन्हा पुढे आला सोनू सूद*
१ डिसेंबर-गॉसिप कल्ला-अभिनेत्री अमीषा पटेल अडचणीत
News२४सह्याद्री:-बिग बॉसच्या घरातील वातावरण होणार भावुक....पहा मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी गॉसिप कल्ला मध्ये....
*'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला*
-----------
*भाईजानचा 'टायगर 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला*
२५ नोव्हेंबर-गॉसिप कल्ला-मोठ्या पडद्यावर दिसणार ‘पावनखिंड’चा अजरामर इतिहास
News२४सह्याद्री:-शेहनाज गिलचा 'हौसला रख' प्रेक्षकांच्या भेटीला...पहा मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी गॉसिप कल्ला मध्ये....
*'रात्रीस खेळ चाले' मधील 'शेवंता'चा मालिका सोडण्याचा निर्णय*
=====
*'फँड्री' मधील जब्याचा 'फ्री हिट दणका*
=====
२४ नोव्हेंबर-गॉसिप कल्ला-सारा-धनुष-अक्षयचा ‘अतरंगी’ अंदाज
News२४सह्याद्री:-आला रे आला ‘पांडू’ चा ट्रेलर आला..पहा मनोरंजन विश्वातील काही घडामोडी गॉसिप कल्ला मध्ये..
प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लवकरच येणार धमाकेदार कुकरी शो
====
जयदीप-गौरीचं पुन्हा शुभमंगल सावधान,कुटुंब रंगलं रेट्रो रंगात
===
'मिस्टर अॅंड मिसेस माही' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
वाचा! डिसेंबरमध्ये रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सिरीज ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतोय
नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा महिना हा चित्रपट आणि मालिका रसिकांसाठी खूपच खास ठरणार आहे. कारण या महिन्यात मोस्ट अवेटेड मनी हिस्टच्या 5 व्या सीझनचा दुसरा भाग प्रदर्शित होतोय. या वर्षाच्या अखेरीस, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने प्लस हॉटस्टार, वूट सिलेक्ट आणि झी 5 यासह अनेक चित्रपट आणि वेब सीरिज OTT वर प्रदर्शित होणार आहेत, ज्याची प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर बघूया OTT वर कोणते चित्रपट आणि वेब रिलीज होणार आहेत -
१. दिल बेकरार
२६ नोव्हेंबर - डिस्ने प्लस हॉटस्टार
हबीब फैसल दिग्दर्शित 'दिल बेकरार' मध्ये राज बब्बर, पद्मिनी कोल्हापुरे, पूनम ढिल्लन, अक्षय ओबेरॉय आणि सहार बंबा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुजा चौहानच्या दोज प्राईसी ठाकूर गर्ल्स या कादंबरीवर ही वेब सीरिज आहे.
२. छोरी
26 नोव्हेंबर - Amazon Prime Video
'छोरी' हा हॉरर चित्रपट प्राइमवर रिलीज होणार आहे,ज्यामध्ये नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे. विशाल फुरिया दिग्दर्शित हा चित्रपट लपाछपी या मराठी चित्रपटाचे अधिकृत रूपांतर आहे.
३. मनी हाइस्ट
डिसेंबर ३ - नेटफ्लिक्स
अॅलेक्स पिना निर्मित, मनी हेस्ट त्याच्या शेवटच्या सीझनसह परत आला आहे. हे 3 डिसेंबर रोजी Netflix वर रिलीज होईल आणि त्यात उर्सुला कोरबेरो, अल्वारो मोर्टे, इत्ज़ियर इटुनो, पेड्रो अलोंसो, मिगुएल हेरान, जैमे लोरेंटे, एस्तेर एसेबो यांच्या भूमिका आहेत. या सीझनमध्ये प्राध्यापकाच्या जीवाला धोका आहे, अशा स्थितीत हा दरोडा कसा यशस्वी होतो, याची प्रत्येक चाहत्याला प्रतीक्षा आहे.
४. बॉब बिस्वास
डिसेंबर ३. -झी5
बॉब बिस्वास 3 डिसेंबर रोजी ZEE5 वर प्रीमियर होईल. बॉब बिस्वास हे सुजॉय घोषच्या 2012 मध्ये आलेल्या 'कहानी' चित्रपटातील एका पात्राचे नाव होते. या चित्रपटात अभिनेता शाश्वत चॅटर्जी बॉबच्या भूमिकेत दिसला होता. तो एक LIC एजंट होता, जो भाड्याने खून करायचा. त्या चित्रपटात बॉब सहाय्यक पात्र म्हणून दिसला असला तरी आता दिया अन्नपूर्णा घोष त्याच्यासोबत चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे.
५. इनसाइड एज सीझन 3
डिसेंबर ३ - Amazon Prime Video
प्राइम सदस्य 3 डिसेंबर 2021 रोजी इनसाइड एज सीझन 3 चे सर्व 10 भाग जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये बघू शकतात. क्रिकेटचे राजकारण, ग्लॅमर, पैसा यावर यापेक्षा चांगला शो क्वचितच अएखादा असेल.
६. अरण्यक
नेटफ्लिक्स - 10 डिसेंबर
बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनची पहिली वेब सीरिज 'अरण्यक' 10 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 'अरण्यक'ची कथा एक भयानक जंगल आणि एक रहस्यमय शहर यांच्यामध्ये फिरते. विनय वैकुल यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले असून चाहते या सिरीजसाठी कमालीचे उत्सुक आहेत.
७. मिनल मुरली
24 डिसेंबर - नेटफ्लिक्स
टोविनो थॉमस अभिनीत मल्याळम सुपरहिरो चित्रपट मिन्नल मुरली २४ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका छोट्या शहरातील एका शिंपीबद्दल आहे, जो सकाळी विजेच्या कडकडाटानंतर अनेक सुपरपॉवरसह उठतो.
८.'अंतिम: द फायनल ट्रुथ'
झी -5
वृत्तानुसार आयुष शर्माचा चित्रपट 'अंतिम: द फायनल ट्रुथ' देखील Zee5 वर प्रदर्शित होईल. याशिवाय हाच चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. मात्र ही बातमी कितपत खरी आहे याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
९. 'आर्या 2'
डिजने हॉटस्टार प्लस
लवकरच डिस्ने हॉटस्टार प्लसवर प्रसारित होणार आहे. चंद्रचुन सिंह, सिकंदर खेर, नमित दास, सुगंधा गर्ग आणि विश्वजित प्रधान यांच्याशिवाय 'आर्या'मध्ये अनेक स्टार्स दिसले होते. सुष्मिता सेन 'आर्या' या वेबसिरीजमध्ये आर्याची मुख्य भूमिका साकारत आहे. पहिल्या भागात सुष्मिताचा अभिनय खूप आवडला होता. चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेनेवाट पाहत आहेत.
२३ नोव्हेंबर-गॉसिप कल्ला-शाहिद कपूरच्या 'जर्सी' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित
News२४सह्याद्री-आशुतोषच्या येण्यानं अरुंधतीच्या आयुष्यात येणार वादळ...पहा मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी....
*दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनला कोरोनाची लागण*
-------------
*बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सना रुबीना दिलैकचे सडेतोड उत्तर*
--------------
*केवळ नाव हटलं पण सारं काही आलबेल*
अंदमान : चित्रपट नव्हे तर कोरोना काळातले धगधगते वास्तव!
अंदमान ही गोष्ट आहे, अंदमानच्या गावाची! जिथे अभिमन्यू प्रताप यांची पंचायत सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभिमन्यू हा नियम आणि कायद्याचे पालन करणारा जागरूक नागरिक आहे. वाचन आणि लेखनात त्यांने नेहमीच प्रावीण्य मिळवले आहे. बोर्डाच्या परीक्षेत अभिमन्यू राज्यात टॉपर राहिलेला विद्यार्थी आहे . त्याने विद्यापीठातही सुवर्णपदक जिंकले मात्र; अभिमन्यू आयएएस मुलाखतीत नापास झाला. म्हणून आता तो निराश होऊन पंचायत सचिवाची नोकरी करतोय.
परंतु इथे या गावाची व्यवस्था आणखीनच निराशाजनक आहे. शहरापासून तुटलेल्या अंदमानची अवस्था वाईट आहे. गावात दवाखाना नाही. शहराकडे जाणाऱ्या लांबीच्या रस्त्याचीही दुरवस्था झालेली आहे. अभिमन्यू मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शहराला जोडण्यासाठी गावात नदीवर पूल बांधण्याची विनंती करतो.
या सगळ्या गडबडीत मार्च 2020 येतो. म्हणजे कोरोनामुळे आता पंतप्रधानांनी देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे. शहरापासून दूर असलेल्या या अंदमान गावात क्वारंटाइन सेंटर हाताळण्याची जबाबदारी अभिमन्यूला मिळते. पण इथे अभिमन्यूला केवळ कोरोना विषाणूचाच सामना करावा लागत नाही, तर अस्पृश्य, हिंदू-मुस्लिम तसेच गावकऱ्यांमधील उच्च-नीच अशा विषाणूलाही सामोरे जावे लागत आहे. मग अशा या परिस्थितीत 'अंदमान' ची व्यवस्था अभिमन्यूमुळे कोरोनाच्या काळात सुरळीत चालली की नाही की इतर काही घडामोडी घडल्या हे बघण्यासाठी तुम्ही स्वतः एकदा हा चित्रपट opentheatre.in वर बघू शकता.
आनंद राज यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून अतिशय सुंदर अशी कथा लिहिली आहे. या चित्रपटाचे लेखन हाच या चित्रपटाचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे, जो चित्रपटाला शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यास मदत करतो. आनंद यांनी त्यांच्या लिखाणात उत्तर प्रदेशातील गाव बारीकसारीक गोष्टींसह उतरवले आहे. 'अंदमान' गाव अगदी खऱ्याखुऱ्या गावासारखं वाटतं. जमेची बाजू म्हणजे हा चित्रपट नसून एखाद्या खऱ्याखुऱ्या गावात असल्याचा फील या चित्रपटादरम्यान येतो. कदाचित हा पहिलाच चित्रपट असेल ज्यामध्ये लॉकडाऊनचा टप्पा किंवा लॉकडाउनची ही बाजू दाखवण्यात आली आहे.
त्यावेळी यूपीच्या एका गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये काय परिस्थिती असेल, त्याचे अगदी जवळून अचूक चित्रण या चित्रपटात पाहायला मिळाले आहे . आनंद राज यांनी खेडेगावातल्या 'हरिजन' सीटची हेराफेरी, जातिवाद, धार्मिक भेदभाव, उच्चपदावर पोहोचलेल्या सुशिक्षित लोकांची हुंड्याची भूक या कथेत अगदी वास्तवात मांडली आहे. होय, शेवटी हॅपी एंडिंगचा मार्ग पत्करून अभिमन्यूला सामान्य माणसातून 'नायक' या श्रेणीत टाकण्याचाही प्रयत्न केला आहे. जे हलके हलके जाणवते. पण तरीही या आगळ्यावेगळ्या विचार आणि विषयासाठी लेखक म्हणून आनंद राज यांचे खरंच आभार.