७फेब्रुवारी- विश्वजीत कदम यांची वाट पाहत बसल्याने कार्यक्रमाला उशीर.
७ फेब्रुवारी -खरंच... शाहरुख लतादीदींच्या पार्थिवावर थुंकला?
NEWS24सह्याद्रि-पहा व्हायरल होणाऱ्या फोटो मागचे सत्य-संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा...
शाहरुखने आधी दुवा मागितली नंतर त्याने स्वत:च्या चेहऱ्यावरील मास्क खाली करत केलेली एक कृती सध्या चर्चेत आहे...या फोटोवरून सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं दिसतंय...शाहरुख थुंकल्याचा दावा करणाऱ्या अनेकांना इतरांनी थोडी माहिती घ्या आणि मग बडबड करा असा खोचक सल्ला काही नेट कार्यांनी दिलाय.
७ फेब्रुवारी-राणेंना आज दुहेरी धक्का
आज ची सुनावणी पुढे ढकल्याने आणि नितेश राणेंच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे.अशाचत आता राणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या सुट्टीमुळे एक दिवसांनी पुढे गेली आहे. ही सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवारी होणार आहे. यामुळे राणेंचा कोठडीमधील मुक्काम वाढण्याबरोबरच त्यांना छातीत दुखू लागल्याने कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे. अशाचत आता राणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज आज फेटाळला. संतोष परब हल्ल्याप्रकरणी गोट्या सावंत संशयित आरोपी होता. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंचे विश्वासू आणि जवळचे सहकारी गोट्या सावंत यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना आता स्थानिक न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
७ फेब्रुवारी - सह्याद्री बुलेटिन
NEWS24सह्याद्री-ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी 101 बकऱ्यांची कुर्बानी
कर्नाटकात शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा
शिवसेनेची माझी हत्या करण्याचा हेतू होता
ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी 101 बकऱ्यांची कुर्बानी
औरंगाबादेत MIM ची बॅनरबाजी
तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी
७ फेब्रुवारी-नितेश राणे यांचा कोठडीतील मुक्काम वाढला
NEWS24सह्याद्रि
सध्या नितेश राणे न्यायालयानी कोठडीमध्ये आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. आता मंगळवारी त्यांच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. तुरुंगामध्ये न जाता प्रकृती अवस्थेचं कारण देत नितेश राणे सिंधुदुर्ग रुग्णालयात दाखल झालेत. आजची सुनावणी लांबल्याने त्यांचा मुक्काम वाढलाय. सरकारी वकिलांनी जिल्हा न्यायालयामध्ये म्हणणं मांडण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी केलेली. तेव्हा नितेश यांनी सुनावणी न्या. रोटे यांच्यासमोर नको अशी मागणी केली होती.
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये आज म्हणजेच सोमवारी दुपारी दोन वाजल्यानंतर सुनावणी होणं अपेक्षित होतं. मात्र भारतरत्न लता मंगेशकर यांचं दु:खद निधन झाल्याने राज्य सरकारने दुखवटा जाहीर करत सुट्टीची घोषणा केलीय. राज्य सरकारशीसंबंधित सर्व कार्यालयांबरोबरच न्यायालयीन कामकाज आणि बँकांचं कामकाजही बंद राहणार आहे. मात्र या सुट्टीचा आणि कामकाज बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका आता नितेश राणेंच्या या सुनावणीला बसणार आहे.
७ फेब्रुवारी-लतामंगेशकरांच्या अंत्यविधीतले बाप- लेकीच्या नात्याचे काही क्षणचित्रे
NEWS24सह्याद्री-लतामंगेशकरांच्या अंत्यविधीतले बाप- लेकीच्या नात्याचे काही क्षणचित्रे-संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
वडिलांची काळजी घेताना सुप्रिया सुळे
बाप लेकीचे भावनिक असे नाते
७ फेब्रुवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज
अहमदनगर - गाण्याचा आत्मा परमेश्वराने हिरवला - कोल्हे
...-अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये....
सोनईत पडक्या घरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या
भूपाळी ते भैरवी गाणारे स्वररत्न देशाने गमावले - आ.विखे
आपल्या सुमधुर सुरांमधून लतादीदी अजरामर झाल्या- ना. थोरात
७ फेब्रुवारी-दीदींवर उपचार सुरु असतानाचा व्हिडीओ व्हायरल
NEWS24सह्याद्री-हॉस्पिटल मधला शेवटचा व्हायरल व्हिडिओ -पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.....
दिदींच्या जाण्याने ससप्तसुर पोरके झाले,,,
सर्व स्तरातून श्रद्धांजली व्यक्त,,,
दीदींवर उपचार सुरु असतानाचा व्हिडीओ व्हायरल,,,
७ फेब्रुवारी-लतादीदींच्या निधनाने नगरकर भावूक
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने नगरकरही शोकाकुल झाले. शहरात अनेक भागात फलक लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोनानगर भागातील महिला भजनी मंडळाने त्यांच्या अंतयात्रेसमयी भजने व त्यांची भक्तिगीते गाऊन श्रद्धांजली अर्पण केली.जादूई आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांनी जगभरातील श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध केले. लताजी म्हणजे गान सरस्वतीच. एक कलाकार म्हणून लताजींचे चित्र साकारणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. हे शिवधनुष्य पेलत मी लताजी व त्यांच्या जोडीला सरस्वती असे चित्र साकारले. त्यांची सही असलेले कृष्णधवल छायाचित्र माझ्या संग्रही होते. परंतु स्टुडिओला लागलेल्या आगीत ते नष्ट झाले. पुन्हा त्यांची सही घेण्यासाठी सरस्वती व लताजी यांचे चित्र साकारले, परंतु अनेकदा प्रयत्न करूनही करोना संकटामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. सरस्वतीचा आशीर्वाद व कृपादृष्टी असेल, तरच लताजींसारखा महान कलाकार घडू शकतो, अशा भावना मी या चित्रातून व्यक्त केल्या.– प्रमोद कांबळे, चित्रशिल्पकार.
लतादीदी नगर शहरातील दत्त देवस्थानमध्ये व गुरुदेव क्षीरसागर महाराजांच्या दर्शनासाठी १९९५, १९९६ व १९९७ अशा सलग तीन वर्ष राम शेवाळकर, व. दी. कुलकर्णी यांच्या समवेत आल्या होत्या. त्यानंतर १९९८ मध्ये गुरुदेव मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या भेटीसाठीही गेल्या होत्या. तेथे त्यांच्या संतचरित्रावर चर्चा रंगल्या होत्या. एकदा महाराज मौनामध्ये असताना लतादीदींनी त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. गुरुदेव मौनामध्ये असतानाही लतादीदी त्यांच्याशी संवाद साधू शकल्या.– मंदा जोशी, गुरुदेवांच्या शिष्य, नगर.
‘गाण्याचा आत्मा हिरावला’ एकशेतीस कोटी भारतीयांच्या मनातील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने गाण्याचा आत्मा परमेश्वराने हिरावला, अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाने आपण सर्वच जण भारतरत्नाला पारखे झालो आहोत, त्यांचा आवाज भारतीय सिनेमात अजरामर राहील.– स्नेहलता कोल्हे, माजी आमदार.
गाण्यातून जगणे शिकविणाऱ्या, त्याचा आनंद देणाऱ्या लतादीदींचे निधन वेदनादायी आहे. भूपाळी ते भैरवी अशा व्यापक गानप्रवासामुळे त्या रसिकांसह सर्वसामान्य माणसाला आपल्या वाटत राहिल्या. देशाने आज एक स्वररत्न गमावले. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळालेला सांगीतिक वारसा दीदींनी जोपासला आणि आपल्या भावंडांसह समृद्ध केला. शेवटच्या श्वासापर्यंत केलेली स्वरसाधना वैशिष्टय़पूर्ण म्हणावी लागेल.– राधाकृष्ण विखे , आमदार
७ फेब्रुवारी-शहराची खबरबात
NEWS24सह्याद्री :छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न...
.... पहा नगर शहरातील महत्वाच्या बातम्या...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न.......
लतादीदींना महिला भजनी मंडळाने भक्तिगीते गाऊन वाहिली श्रद्धांजली
महापालिकेतील अर्थहीन संकल्प
तहसील कार्यालयात राडा करणारे जेरबंद
७ फेब्रुवारी-सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या
.. पहा सकाळच्या महत्वाच्या महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात बातम्या...
काश्मीर सीमेवर तस्करीचा प्रयत्न, ३ घुसखोर ठार
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली
आता तो आनंदघन बरसणार नाही – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे
७ फेब्रुवारी-गुड मॉर्निंग सह्याद्री
NEWS24सह्याद्री : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली
.. पहा सकाळच्या महत्वाच्या बातम्या...
६ फेब्रुवारी-जिल्ह्याची खबरबात
NEWS24सह्याद्री - जिल्ह्यातील या रेल्वे मार्गाकडे केंद्राचे दुर्लक्ष
. पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या..
बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावरील हल्ल्याचा बोधेगावात निषेध...
आपल्या सुरांमधून लतादीदी अजरामर झाल्या
६ फेब्रुवारी-सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सह्याद्री..काँग्रेस कोणत्याही हल्ल्याचे समर्थन करत नाही - नाना पटोले
...पहा देशविदेशातल्या महत्वाच्या बातम्या...
*काँग्रेस कोणत्याही हल्ल्याचे समर्थन करत नाही - नाना पटोले*
६ फेब्रुवारी-वेगवान आढावा
NEWS24सह्याद्री:लवकरच सुरु होणार 15 वर्षाखालील वयोगटाचे लसीकरण
.. पहा! देशविदेशातल्या महत्वपूर्ण बातम्यां वेगवान आढावा मध्ये
NEWS24सह्याद्रि
*लतादीदींच्या जाण्याने मोदी,राष्ट्रपतींसह दिग्गजांकडून शोक व्यक्त*
--------------------
*पंतप्रधान मोदींनी युवा खेळाडूंची पाठ थोपटली*
---------------------
*टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची भारतात चाचणी*
.webp)


