Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label niteshrane. Show all posts

१२ एप्रिल-जिल्ह्याची खबरबात

 NEWS 24 सह्याद्री-नितेश राणेंची संजय राऊत यांच्यावर हास्यास्पद टीका-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..




१२ एप्रिल-मोठी बातमी

 NEWS24सहयाद्री-कायदा-सुव्यवस्थेशी निगडित मुद्द्यांवर राणे आणि  जिल्हाधिकारी यांची चर्चा- अधिक महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा..




७ फेब्रुवारी-नितेश राणे यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

                            

NEWS24सह्याद्रि 

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा कोठडीमधील मुक्काम वाढलाय. नितेश राणेंना आता १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज त्यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती. मात्र भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने न्यायालयाचं कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे आज सुनावणी होणार नाही.

सध्या नितेश राणे न्यायालयानी कोठडीमध्ये आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. आता मंगळवारी त्यांच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. तुरुंगामध्ये न जाता प्रकृती अवस्थेचं कारण देत नितेश राणे सिंधुदुर्ग रुग्णालयात दाखल झालेत. आजची सुनावणी लांबल्याने त्यांचा मुक्काम वाढलाय. सरकारी वकिलांनी जिल्हा न्यायालयामध्ये म्हणणं मांडण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी केलेली. तेव्हा नितेश यांनी सुनावणी न्या. रोटे यांच्यासमोर नको अशी मागणी केली होती.

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये आज म्हणजेच सोमवारी दुपारी दोन वाजल्यानंतर सुनावणी होणं अपेक्षित होतं. मात्र भारतरत्न लता मंगेशकर यांचं दु:खद निधन झाल्याने राज्य सरकारने दुखवटा जाहीर करत सुट्टीची घोषणा केलीय. राज्य सरकारशीसंबंधित सर्व कार्यालयांबरोबरच न्यायालयीन कामकाज आणि बँकांचं कामकाजही बंद राहणार आहे. मात्र या सुट्टीचा आणि कामकाज बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका आता नितेश राणेंच्या या सुनावणीला बसणार आहे.


६ फेब्रुवारी-नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

NEWS24सह्याद्रि 

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राणे यांना पोलिसांच्या ताब्यात दिले नसल्याने या न्यायालयात नियमित जामीन अर्जावर सुनावणी होऊ नये, असा अर्ज विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात देत खटला वर्ग करण्याची मागणी केली आहे. त्यावर सोमवार दि.७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याप्रकरणी राणे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. आमदार राणे यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार होती.

परंतु विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ऐवजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्याची मागणी केल्याने ही सुनावणी सोमवार दि. ७ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.


५ फेब्रुवारी-नितेश राणेंचा रक्तदाब वाढला

NEWS24सह्याद्रि 

सिंधुदुर्ग न्यायालयाने भाजप नेते नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर नितेश राणे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने ओरोस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नितेश राणेंचा रक्तदाब वाढला, ओरोसमधून कोल्हापूरला नेणार; कुणालाही भेटण्यास मनाई

भाजपचे आमदार नितेश राणे यांना आज कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचा अवधी संपल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा पोलिसांकडून 8 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे सावंतवाडी कारागृह  अधीक्षकांकडे अर्ज करण्यात आल्याची माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जोरदार टोला लगावलाय.

नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच बरी नव्हती. तरीही कोर्टाच्या आदेशानुसार ते पोलीस कोठडीत गेले होते. पण आता जसं रेग्युलर चेकअप होईल, डॉक्टरांना जे काही आढळून येईल त्यानुसार पुढील कारवाई होईल, असं नितेश राणे यांचे वकील म्हणाले. त्यामुळे आता नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडीदरम्यान रुग्णालयात ठेवलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आज कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नितेश राणे यांच्याकडून सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी पार पडेल.त्यानंतर त्यांना जामीन मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

५ फेब्रुवारी-राकेश परब यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी...


NEWS24सह्याद्रि  

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणी आजच जिल्हा न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राणे यांचे वकील सतीश माने शिंदे व संग्राम देसाई यांच्याकडून प्राप्त झाली आहे,


कणकवली करंजे येथील शिवसैनिक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे बँक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडे आमदार नितेश राणे व पीए राकेश परब आदींची नावे समोर आली होती त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची प्रक्रिया करण्यात आली होती. या दरम्यान आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी जिल्हा न्यायालयात नियमित जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. तोही न्यायालयाने फेटाळला होता. कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी  यांच्या न्यायालयात दोन दिवसांपूर्वी शरण आले होते त्यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती. आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी सरकारी पक्षाचे वकील प्रदीप घरत यांनी आमदार राणे यांना पोलिस कोठडी मिळावी म्हणून युक्तिवाद केला त्यांना तपासासाठी पुणे येथे न्यावयाचे आहे. तसेच काही आर्थिक व्यवहार केले आहेत किंवा कसे ते तपासायचे आहे तसेच फिर्यादीचा फोटो मुख्य संशयिताला त्यांनी मोबाईल द्वारे पाठवला होता त्याबाबत तपास करण्यासाठी आठ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.


भाजपचे आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणे यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता तब्येत बरी नसल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यायालयीन कोठडीत ऐवजी आमदार राणे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत.



५ फेब्रुवारी -मॉर्निंग हेडलाइन्स

   NEWS24सह्याद्री : पुण्यातील स्लॅब दुर्घटना प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई

.. पहा! सकाळच्या महत्वाच्या  बातम्या...

                               MORNING HEADLINES

NEWS24सह्याद्रि  

महाबळेश्वरच्या लिंगमळा, वेण्णालेक परिसरात तापमानाचा पारा 5 अंशावर

कोल्हापुरात तब्बल 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी, महावितरणकडून गुन्हा दाखल

नागपूर मनपा नगरसेवक छोटू भोयर यांच्या अपात्रतेसाठी भाजप सक्रिय

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात आज कोरोना आढावा बैठक

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी



५ फेब्रुवारी-गुड मॉर्निंग सह्याद्रि

   NEWS24सह्याद्री:हिजाब घातला म्हणून महाविद्यालयात प्रवेश नाकारला

. पहा! सकाळच्या महत्वाच्या  बातम्या...

                                      GOOD MORNIING

NEWS24सह्याद्रि  

दहावी, बारावीच्या परीक्षा सरावासाठी प्रश्नपेढी

हिजाब घातला म्हणून महाविद्यालयात प्रवेश नाकारला

केसरकरांचा नितेश राणेंना टोला




४फेब्रुवारी-नितेश राणेंना जेल की बेल?




NEWS24सह्याद्री 

संतोष परब  हल्लाप्रकरणी दोन दिवस  पोलीस कोठडीत काढल्यानंतर नितेश राणेंना जामीन मिळणार? की कोठडीतला त्यांचा मुक्काम वाढणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. जिल्हा न्यायालयानं सुनावलेली पोलीस कोठडी आज संपत असल्यानं नितेश राणेंना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.त्याचबरोबर सिंधुदुर्ग पोलिसांकडून कोठडी वाढवून मागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

दरम्यान काल पोलिसांनी नितेश राणे यांची सुमारे दोन तास चौकशी केली. याच प्रकरणातील दुसरे आरोपी राकेश परब आणि नितेश राणेंची समोरासमोर बसवून चौकशी केल्याचं कळतंय. राकेश परब हे नितेश राणेंचे पीए आहेत. यांच्यासमोर बसवूनही या दोघांची पोलिसांनी चौकशी केली. काल राणेंचे वकील संग्राम देसाईंनीही त्यांची भेट घेतली. राकेश परब यांच्या मार्फत नितेश राणे हल्लेखोर सचिन सातपुतेंच्या संपर्कात होते का? याबाबतची पोलिसांनी चौकशी केल्याचं कळतंय. आज न्यायालयात हजर केल्यानंतर नितेश राणेंना जामीन मिळतो की त्यांचा कोठडीतला मुक्काम वाढतो हे पाहावं लागेल.

संतोष परब हल्लाप्रकरणी दोन दिवस  पोलीस कोठडीत काढल्यानंतर नितेश राणेंना जामीन मिळणार? की कोठडीतला त्यांचा मुक्काम वाढणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. जिल्हा न्यायालयानं सुनावलेली पोलीस कोठडी आज संपत असल्यानं नितेश राणेंना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल. सिंधुदुर्ग पोलिसांकडून कोठडी वाढवून मागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

दरम्यान काल पोलिसांनी नितेश राणे यांची सुमारे दोन तास चौकशी केली. याच प्रकरणातील दुसरे आरोपी राकेश परब आणि नितेश राणेंची समोरासमोर बसवून चौकशी केल्याचं कळतंय. राकेश परब हे नितेश राणेंचे पीए आहेत. यांच्यासमोर बसवूनही या दोघांची पोलिसांनी चौकशी केली. काल राणेंचे वकील संग्राम देसाईंनीही त्यांची भेट घेतली. राकेश परब यांच्या मार्फत नितेश राणे हल्लेखोर सचिन सातपुतेंच्या संपर्कात होते का? याबाबतची पोलिसांनी चौकशी केल्याचं कळतंय. आज न्यायालयात हजर केल्यानंतर नितेश राणेंना जामीन मिळतो की त्यांचा कोठडीतला मुक्काम वाढतो हे पाहावं लागेल.

नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब हे पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या मोबाईलवरून आमदार नितेश राणे यांचं आरोपींशी संभाषण झालं आहे. त्यामुळे समोरासमोर बसवून,चौकशी करायची आहे म्हणून पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद  सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला. सरकारी वकिलांच्या युक्तीवांदानंतर पोलिस कोठडीला नितेश राणेंच्या वकिलांनी विरोध केला. नितेश राणेंचे वकिल म्हणाले,  आम्ही तपासात सहकार्य  केले आहे. 


आमदार नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयाला शरण आल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मात्र दहा दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली होती. 


नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला होता. नितेश राणे यांची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले होते. नितेश राणे यांनी 10 दिवसांत  सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जामिनासाठी नितेश राणे उच्च न्यायालयात अर्ज करणार होते. परंतु, अचानक निर्णय बदलत ते जिल्हा सत्र न्यायालयाला शरण आले. त्यानंतर त्यांना न्यायालीन कोठडी सुनवण्यात आली.

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्‍यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. 




२३ डिसेंबर - सह्याद्री सुपरफास्ट

    NEWS24सह्याद्री : नाशिक जिल्ह्यातल्या 400 विद्यार्थ्यांचे मोदींना पत्र.. ....पहा! देशभरातील महत्वाच्या बातम्या....



                                       TOP HEADLINES



पंजाबच्या लुधियाना कोर्टात स्फोट
---------------------
शिवसेनेच्या वाघाचे मांजर झाले - नितेश राणे
--------------------
नाशिक जिल्ह्यातल्या 400 विद्यार्थ्यांचे मोदींना पत्र*
--------------------
तळेगाव हत्येने हादरलं !
---------------------
आता झेड प्लस सुरक्षेसाठी महिला कमांडोही रिंगणात

Contact Me

Name

Email *

Message *