Breaking News

1/breakingnews/recent

प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीतून बसविलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हटवला

3 comments

सुशील थोरात । न्युज 24 सहयाद्री-  अहमदनगरमधील प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीतून बसविलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा महापालिका प्रशासनाने पोलीस बांदोस्तात हटवला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी होत होती. परंतु त्यास प्रशासनाकडून दाद मिळाली नाही. त्यामुळे स्वयंसेवी संघटनांचे नेते सुमित वर्मा व घनश्याम बोडखे यांच्या पुढाकारातून रात्रीतून रविवारी पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला.
दरम्यान पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून  प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीतून बसविलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हटवला. खबरदारी म्हणून पोलिसांनी प्रोफेसर कॉलनी चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

3 comments

  1. हा देश नेमका कुणाचा आहे तेच समजत नाही. छत्रपतींचा कि औरंगजेबाचा. या बावळट प्रशासनाला याचे उत्तर कधी मिळनार याची वाट पाहत बसायचं का आता ?

    ReplyDelete
  2. शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत ना मग हा विषय वरपर्यंत पोहोचायला हवा होता

    ReplyDelete

Contact Me

Name

Email *

Message *