Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label bharatratanalatadidi. Show all posts

११ फेब्रुवारी -'स्मारक शिवाजी पार्कात व्हावे अशी आमची ईच्छा नाही'

NEWS24सह्याद्री 

आपले मनोगत व्यक्त करताना पंडित मंगेशकर म्हणाले की, भारतरत्न लता मंगेशकर, म्हणजे आमची दीदी, आमचीच नाही तर साऱ्या जगाची दीदी. तिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती पोकळी आकाशएवढी नाही, तर ती अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगानदी ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणारी नाही. लता मंगेशकरांच्या स्मारकावरून वाद चालू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबीयांनी या वादात भाग घेण्याचे काही कारण नाही. कारण दीदींचे स्मारक शिवाजी पार्कात व्हावे ही आमची ईच्छाच नाही.

पंडित मंगेशकर पुढे म्हणाले की, शिवाजी पार्कात दीदीचे स्मारक होण्याऐवजी उलट आमचे असे म्हणणे आहे की, शिवाजी पार्कातील स्मारकावरून जो राजकीय लोकांचा वाद सुरू झाला आहे तो वाद त्यांनी बंद करावा आणि दीदींच्याबाबत कृपया राजकारण करू नये. महाराष्ट्र सरकारने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. ती विनंती स्वत: लतादीदींनीच केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी ती मागणी अतिशय आनंदाने मान्य केलेली होती. त्याची सर्व पूर्वतयारी त्यांनी केलेली आहे. आता दीदीचे एक संगीत स्मारक होत आहे. त्यापेक्षा कोणतेही मोठे स्मारक होऊ शकत नाही.


६ फेब्रुवारी-मोठी बातमी

    NEWS24सह्याद्रि-विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून लता दीदींना श्रद्धांजली

...संपुर्ण माहितीसाठी खलील लिंक वर क्लिक करा.....


NEWS24सह्याद्रि 

माजी क्रिकेटपटू विरेंद्र सहवाग यांनीही लतादीदींना श्रद्धांजली दिली आहे....

दक्षिणात्य अभिनेते चिरंजिवी यांनी व्यक्त केल्या त्यांच्या भावना....

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील लता दीदींना  श्रद्धांजली वाहिलीये

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे....

तसेच  लता मंगेशकर यांच्या निधनाने अलौकिक स्वर आज हरपला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

६ फेब्रुवारी-‘मला शब्दांमध्ये व्यक्त होता येणार नाही-पंतप्रधान मोदी

                 

NEWS24सह्याद्रि 

भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘मला शब्दांमध्ये व्यक्त होता येणार नाही. लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी कुणीही भरुन काढू शकत नाही. येणारी पिढी ही त्यांना भारतीय संस्कृतीमधील एक दिग्गज म्हणून स्मरणात ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’ या आशयाचे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व अवयव निकामी होत गेले. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

६ फेब्रुवारी-गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

 

NEWS24सह्याद्रि 

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची आज  प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती अणि त्याचवेळेला त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अणि तिथेच त्याना त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं.मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.पण आज अखेर उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व अवयव निकामी होत गेले. त्यानंतर आज सकाळी 

त्यांची प्राणज्योत मालवली,अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

६ फेब्रुवारी-मोठी बातमी

   NEWS24सह्याद्रि-भारताचा सूर हरपला, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड...संपुर्ण माहितीसाठी खलील लिंक वर क्लिक करा.....



गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर  यांचे आज सकाळच्या सुमारास निधन.....

कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.....

29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते......


६ फेब्रुवारी-स्पेशल रिपोर्ट

  NEWS24सह्याद्रि-भारताचा सूर हरपला, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड...संपुर्ण माहितीसाठी खलील लिंक वर क्लिक करा.....

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर  यांचे आज सकाळच्या सुमारास निधन.....

कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.....

29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते......



Contact Me

Name

Email *

Message *