Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - भंडारा येथील सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केअर युनिट मध्ये आग

No comments

 News24सह्याद्री -


मनाला चटका लावणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. मृत बालकांच्या कुटुबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. 

तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल,असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *