Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label ajitpawar. Show all posts

१८ जून-मॉर्निंग हेडलाइन्स

 NEWS24सह्याद्री-21 जूनपासून देशात धावणार 'भारत गौरव ट्रेन',धार्मिक स्थळांचा घडवणार प्रवास-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा,,,





९ एप्रिल-सह्याद्री वेगवान आढावा

 NEWS24सह्याद्री-भारताविरोधात बोलण्याची कोणत्याही महासत्तेची हिंमत नाही-इम्रान खान-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...




१४ फेब्रुवारी - राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य



NEWS24सह्याद्रि 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल.”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

 चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या टीकेला भुसावळ येथील एका कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी उत्तर दिलंय. “चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार असून महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्यात. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वणवण फिरावे लागत असल्याने ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत,” असा टोला खडसे यांनी लगावलाय.

१२ फेब्रुवारी- कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार?



NEWS24सह्याद्रि 

पुण्यातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्के असून राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट  9 टक्के. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून राज्यातील कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर आपली बाजू मांडली. ते म्हणाले, "शिवजयंती साजरी  करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून नियमात शिथिलता आणणार आहे. 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मी आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहोत" प्रवास करण्यास मनाई असल्यामुळे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. 

"कोवॅक्सिन लसीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे 15 ते 18 वयोगटालीत लसीकरणाचा वेग सध्या मंदावला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रासोबत चर्चा करणार आहे. त्याचबरोबर सध्या थिएटरमधे 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांशी बोलून यामधेही शिथिलता आणणार आहे असहि अजित पवार म्हणाले आहेत,


११ फेब्रुवारी-आदित्य ठाकरें सारथ्य

 

NEWS24सह्याद्रि 

कही दिवसांपासून आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी करण्यात येत आहे. तर नुकतीच महालक्ष्मी रेसकोर्स  वरळी ,धोबी तलावंची या ठिकानांची  पाहणी दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे आणि आजित पवार एकाच गाडीने प्रवास करत असल्याचं दिसून आलं आहे.त्यावेळी आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत असल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी कही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये अजित पवार यांनी गाडीचं सारथ्य केलं होतं तर, उद्धव ठाकरे त्यावेळी बाजूला बसले होते. आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी करण्यात येत आहे. त्यावेळी महालक्ष्मी, रेसकोर्स  वरळी ,धोबी तलावंची पाहणी दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली आहे.


५ फेब्रुवारी -उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?

NEWS24सह्याद्रि 

उदयनराजे भोसले यांची राष्ट्रवादीमध्ये पुन्हा घरवापसी होणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या असून त्यावर उदयनराजेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजे भोसले यांनी २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सध्या उदयनराजे भोसले भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा तशीच चर्चा सुरू झाली आहे ती उदयनराजे भोसले यांच्या घरवापसीची अर्थात ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची. उदयनराजे भोसले यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.


उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी साताऱ्यातील विकास कामांविषयी आपली अजित पवारांशी चर्चा झाल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. “अजित पवारांसोबत विकास कामांबाबत चर्चा झाली. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात अजित पवारांना विनंती केली”, असं ते म्हणाले.

५फेब्रुवारी-सह्याद्री बुलेटिन

    NEWS24सह्याद्री- डॉ. सुवर्णा वाजे खुन प्रकरणाचे गूढ उलगडले !...राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये.



*उत्तर प्रदेशातून शिवसेनेनं मोदींविरोधात दंड थोपटले*

*शेतकऱ्याने घरावर उभा केला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा*

*कल्याण ग्रामीण मधील शेतकरी कुटूंबाला मारहाण* !

*मुंबईत उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा*

५ फेब्रुवारी- पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्णवेळ भरणार

 


NEWS24सह्याद्रि  

1 फेब्रुवारीपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत.पुण्यातही शाळा सुरू झाल्या आहेत.मात्र पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या अर्धवेळ भरवल्या होत्या. त्या आता पूर्णवेळ भरतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना अजून संपलेला नाही. कारण अजूनही सक्रिय रुग्णांची संख्या मोठी आहे.त्यामुळे एक दोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे पण मृत्यूच्या संख्येत वाढ दिसून येत आहे.  पुण्यात, राज्यात,  देशात आणि जगात हा ट्रेंड दिसून येतोय. 5 ते 18 वयोगटातील मुलांना देण्यासाठी जेवढी लस हवी तेवढी उपलब्ध नाही. त्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क करणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, जंबो कोवीड सेंटर सध्या उभे आहे, पण त्यामधे रुग्ण नाहीत. मात्र,तरीही 28 फेब्रुवारीपर्यंत ते सुरु ठेवण्यात येईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ कारण त्यासाठी भाडे द्यावे लागते असे पवार यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना संपला असे अद्याप म्हणता येणार  नाही. कारण अजूनही 45 हजार सक्रिय रुग्ण आहेत.त्यामुळे एकदोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ असे ते म्हणाले. 


५ फेब्रुवारी -मॉर्निंग हेडलाइन्स

   NEWS24सह्याद्री : पुण्यातील स्लॅब दुर्घटना प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई

.. पहा! सकाळच्या महत्वाच्या  बातम्या...

                               MORNING HEADLINES

NEWS24सह्याद्रि  

महाबळेश्वरच्या लिंगमळा, वेण्णालेक परिसरात तापमानाचा पारा 5 अंशावर

कोल्हापुरात तब्बल 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी, महावितरणकडून गुन्हा दाखल

नागपूर मनपा नगरसेवक छोटू भोयर यांच्या अपात्रतेसाठी भाजप सक्रिय

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात आज कोरोना आढावा बैठक

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी



४ फेब्रुवारी-वेगवान आढावा

 NEWS24सह्याद्री: पुण्यातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

 ... पहा! देशविदेशातल्या महत्वपूर्ण बातम्यां वेगवान आढावा मध्ये 




पुण्यातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

घसरणीसह शेअर बाजार सुरू


मध्य रेल्वेच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद

मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक



Contact Me

Name

Email *

Message *