३० मे - जिल्ह्याची खबरबात
NEWS24सह्याद्री - नगर मधून पहिल्यांदाच तुळजापूरला ११००० लाडूच्या प्रसादाचं वाटप..पहा नगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातमी....
------------------------
*३१ मे ला शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्तारोको आंदोलन*
------------------------
*नगर-पुणे महामार्गावर मालट्रक लुटणाऱ्या दोघांना अटक*
-------------------------
*नगर मधून पहिल्यांदाच तुळजापूरला ११००० लाडूच्या प्रसादाचं वाटप*
-------------------------
*विधवा प्रथेविरुद्ध रुंभोडी ग्रामसभेचा पहिला ठराव*
७ मे - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सह्याद्री: मांडओहोळ धरणामध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू..अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
---------------------
*मांडओहोळ धरणामध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू*
----------------------
*न्यू आर्ट्समध्ये १० मे पासून प्रतिबिंब चित्रपट महोत्सव*
----------------------
*६३८ शाळांना संरक्षक भिंतीची प्रतीक्षा*
----------------------
*प्रा. राम शिंदे यांचे आघाडीला खुले आव्हान*
६एप्रिल - सह्याद्री टॉप १० न्युज
NEWS24सह्याद्री : तमाशात धुडगूस, सरपंचाविरूध्द गुन्हा..पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...
--------------------
*तरुणाच्या मृत्यूची चौकशी करण्याची नाभिक समाजाची पोलिसांकडे मागणी*
--------------------
*तमाशात धुडगूस, उक्कलगावच्या सरपंचाविरूध्द गुन्हा*
---------------------
*वांबोरीला निधी कमी पडणार नाही : तनपुरे*
---------------------
*लिंबाची आवक घटली*
---------------------
१४ फेब्रुवारी - वाइन विक्री विरोधावरुन खडसेंचा हल्लाबोल..
NEWS24सह्याद्रि
किराणा दुकानातून वाइन विक्री करणार नाही तसेच वाइन विक्रीचा निर्णय जनतेला विचारात घेऊन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा यांनी आजपासून सुरू होणारे नियोजित उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र याच मुद्द्याचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाची वाइन विक्रीसंदर्भातील भूमिका दुटप्पी असल्याचा टोला लगावलाय. रविवारी सायंकाळी भुसावळमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वाइन विक्रीला विरोध करणाऱ्या भाजपावर निशाणा साधला.
वाइन बाबत भाजपा एका राज्यात विरोध करते तर दुसरीकडे स्वागत करत आहे, अशी स्थिती असल्याचं खडसे म्हणालेत. वाइन ही दारू आहे त्यामुळे अण्णा हजारे यांनी यासाठी विरोध केला आहे असं सांगण्यात येत असल्याचा उल्लेख करत खडसेंनी भाजपाची सत्ता असणाऱ्या इतर राज्यांचं उदाहरण दिलं.
११फेब्रुवारी-किरीट सोमय्या यांचा पुन्हा पुणे दौरा
NEWS24सह्याद्रि
भाजप नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आहेत.गेल्या आठवड्यात किरीट सोमय्यांना पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की झाली होती त्यामुळे पुणे महापालिकेच्या आवारात पुणे पोलिसांच्यावतीनं चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्याच आठवड्यात किरीट सोमय्यांना पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. भाजपनं त्याच पायऱ्यांवर किरीट सोमय्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. या सत्काराला काँग्रेसनं विरोध दर्शवला आहे. काँग्रेस सोमय्यांचा विरोध करणार त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पुणे महापालिका परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.आज दुपारी 4 वाजता किरीट सोमय्यांचा भाजपकडून सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून आता चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.