शहराची खबरबात - संगमनेरचा विषय गाजला
News24सह्याद्री - संगमनेरचा विषय गाजला...पहा शहराची खबरबात मध्ये
दलित वस्ती सुधार योजनेतील दिवाबत्तीची कामे निकृष्ट झालेली आहेत. मात्र, प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप शरद नवले यांनी केला. त्याची दखल घेत दिवाबत्तीच्या कामांची चौकशी करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी दिला.
जिल्हा परिषदेची जागा संगमनेर नगरपालिकेला देण्याच्या मुद्द्यावरून राजेश परजणे व अजय फटांगरे यांच्यात खडाजंगी झाली. हा विषय ऐनवेळच्या विषयात घेण्यात आला असून, याबाबत सभागृहाला माहिती का दिली गेली नााही, असा प्रश्न परजणे यांनी केला.
3. राज्य सरकारी कर्मचार्यांनी पाळला निषेध दिन
केंद्र सरकार कोरोना महामारीची ढाल पुढे करुन कामगार विरोधी धोरण राबवित असल्याच्या निषेधार्थ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने निषेध दिन पाळण्यात आला.
4. घरफोडी व मोटारसायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद
शेवगाव व पाथर्डी तालुक्यात रात्रीची घरफोडी करणारा व मोटारसायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. पुढील कारवाईसाठी आरोपीला पाथर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली
5. शहर पोलीस आणि महानगर पालिकेडून व्यावसायिकांचे प्रबोधन
अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली असून शहर पोलीस आणि महानगर पालिकेच्या पथकाने काल रात्री कापडबाजार चितळे रोड आणि प्रोफेसर कॉलनी चौक येथे येऊन व्यावसायिकांचे प्रबोधन करत मास्क लावण्याचे आव्हान केले.
27 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - ऊसतोडणी टोळ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
1. जिल्हा बँकेचे कारभारी ६ मार्चला ठरणार
5. नववधूची बिदाई चक्क बैलगाडीतून
शहराची खबरबात - मनपाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मुहूर्त कधी?
News24सह्याद्री - मनपाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मुहूर्त कधी?...पहा शहराची खबरबात मध्ये
1. आई - वडील वाऱ्यावर तर पगार मिळेल धारेवर
आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून 30 टक्के रक्कम कपात करून ती आई-वडिलांच्या खात्यावर वर्ग करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा प्राथमिक बँकेसह ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद कर्मचारी सेवा संस्थेची कर्ज वसुली आगामी निर्णय होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
2. मनपाचा सौर ऊर्जा प्रकल्पाला मुहूर्त कधी ?
केंद्र सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी नगरच्या महापालिकेला सात कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र हा प्रकल्प वर्ष उलटूनही पूर्ण होऊ शकलेला नाही. काम सुरू होण्याआधीच सल्लागार संस्थेला तीन कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय, पण या संस्थेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने अजूनही कामाला सुरुवात न केल्याने सौर ऊर्जा प्रकल्पाला मुहूर्त कधी लागणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
3. नियमित कर भरणाऱ्यांना ७५ टक्के सवलत देण्याची मागणी
महापालिकेने थकबाकीदारांना शास्ती मध्ये 75 टक्के सवलत दिली असून शहरातील नियमित कर्ज भरणाऱ्यांना कर वसुली मध्ये 75 टक्के सवलत द्यावी अशी मागणी केडगाव मधील जागरूक मंचाने महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळावा यासाठी महापालिकेने शास्ती वर 75 टक्के माफीची योजना मध्यंतरी राबवली होती, या योजनेला प्रतिसादही मिळाला.
4. मनसेकडून हल्लबोलचा इशारा
महावितरण सध्या वसुली भाईगिरी करून सक्तीची वीज बिल वसूली करत आहे. ती तात्काळ थांबवावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सांगळे यांना देण्यात आले आहे.
5. विडी कारखाने व कामगारांचा संप
केंद्र सरकारने 2003 च्या कोटप्पा कायद्यात दुरुस्ती करुन विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने घातलेले बंधन आणि जाचक कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक), महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, इंटक विडी कामगार संघटना आणि महाराष्ट्र विडी उद्योग संघाच्या वतीने शुक्रवारी एकदिवसीय विडी कारखाने बंद ठेऊन संप करण्यात आलाय .
जिल्ह्याची खबरबात - कान्हूराज बागाटे यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल
News24सह्याद्री - कान्हूराज बागाटे यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे काळे वस्तीवर अफुची झाडे लावलेल्या शेतात जामखेड पोलिसांनी टाकला या छाप्यात १ लाख ७० हाजारांची ५६ किलो वजनाची झाडे जप्त करण्यात अली आहेत.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाणे विना मास्क धारकावर कारवाई करत आहेत व्यापारी वर्ग ग्राहक व रस्ता वाहतूक यामध्ये विना मास्क धारकवर कारवाई करण्यात येत आहे पोलीस ठाण्याचे एपीआय राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज विना मास्क यांना दंड ठोकला आहे.
3. शेती उद्योगाला जोड उद्योग म्हणून स्वंनिर्मित मिनी हॅचरी मशीन
शेती उद्योगाला नेहमी एक जोडीचा उद्योग असायला हवा. तसाच एक उद्योग म्हणजे कुकूटपालन. शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील प्रगतशील शेतकरी जालिंदर पायघन हे कुकुटपालनाचा व्यवसाय उत्तम रित्या चालवत आहेत. त्यांनी स्वतः मिनी हॅचरी मशीन बनवले आहे.
ऑगस्ट 2019 पासून 3 लाख 78 हजारांची थकीत रक्कम न भरल्याने कोपरगाव तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा वीज वितरण कार्यालयाकडून खंडित करण्यात आला असल्याची माहिती वीज वितरण कार्यालयाचे सहायक अभियंता अतुल खंडारे यांनी दिली आहे.
राजमुद्रेचा गैरवापर झाल्याबद्दल श्री साईबाबा संस्थांनाच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. कान्हूराज बागाटे यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन ला सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचा तक्रार अर्ज दाखल केला.
6. शेवगावात घरकुल उतारा व चावी वाटप
शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज घुले यांनी ढोरजळगाव घरकुल सर्वसामान्य नागरिकांचा जीवनातील मुख्य आधार असल्याचे प्रतिपादन केले. ढोरजळगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या घरकुलाची प्रत्यक्ष पाहणी करून घरकुल उतारा व चावी वाटप करण्याचा कार्यक्रम यावेळी पार पडला.
यशस्वीनी महिला ब्रिगेड च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येला 67 दिवस उलटून गेले परंतु अद्यापही त्यांचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे यास अद्यापही अटक झालेली नाही तसेच त्याचा ठावठिकाणा देखील पोलिसांना लागलेला नाही रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने प्रशासनाला एवढे सक्षम अधिकारी असताना देखील गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार फरार असून सरकार त्यास पाठीशी घालत आहे असा सवाल पोलिस प्रशासन तसेच यंत्रणेला केला आहे.
राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील आदिवासी कुटुंबातील विजय पांडुरंग गांगर्डे यांच्या राहत्या घराच्या छताला काल दुपारी आग लागली घरात झोपलेल्या दोन मुलांना आईने जीवाची पर्वा न करता बाहेर काढल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र..
गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहरात मोकाट वर्णांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे बरा हो मालकांना सांगूनही ते आपल्यावर यांचा बंदोबस्त करत नव्हते अखेर जामखेड नगर परिषदेमार्फत मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी तमिळनाडू येथून एक पथक पाचारण करण्यात आला आहे.
संगमनेर नगर परिषदेच्या वतीने आजपासून पुन्हा कोविड सेंटर सुरू करण्यात आलेत कॉटेज हॉस्पिटल आवारामध्ये हे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट पुन्हा सुरू झाल्याने संगमनेर तालुक्यामध्येकोरोना रुग्णांचे प्रमाण वाढ होताना दिसत आहे.
शहराची खबरबात - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेटला पुन्हा कुलूप
News24सह्याद्री - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेटला पुन्हा कुलूप....पहा शहराची खबरबात मध्ये
1. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेटला पुन्हा कुलूप
कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराचे एक गेट १० ऑक्टोबर २०१८ पासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून एकेरी वाहतूक नावाखाली बंद करण्यात आलेले होते. त्या गेटचे कुलूप शहर शिवसेनेने तोडून ते वापरासाठी खुले केले होते. पण त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात आले आहे. शिवसेनेचे गेट उघडण्याचे आंदोलन औट घटकेचेच ठरले आहे
2. इमामपूर परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करा
नगर तालुक्यातील इमामपूर परिसरातील डोंगररांगांमध्ये वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी सरपंच भीमराज मोकाटे यांनी वनविभागाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.वनविभागाला दिलेल्या निवेदनात मोकाटे यांनी इमामपूर परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवत असून वन्य प्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यामुळे डोंगररांगांमध्ये पाणवठे तयार करून त्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
3. संकट काळात निधी उपलब्ध करणे नगरसेवकांचे कौशल्य
कोरोना संकटाच्या काळामध्ये संपूर्ण राज्यासह आपल्या महापालिकेवर आर्थिक संकट ओढलेले असतानाही प्रभाग दोन च्या नगरसेविका रुपाली वारे, संध्या पवार नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे सुनील त्र्यंबके आणि बाळासाहेब पवार यांनी प्रभागाच्या विकासासाठी महापालिका व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.
4. सक्तीची वसुली थांबवा
महावितरनाचे वसुली भाई ज्याप्रकारे लोकांकडून सक्तीची वीज बिले वसूल करत आहेत. तो थुकरट पणा तात्काळ थांबवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कार्यक्रम हाती घेईल. नाहीतर येत्या आठ दिवसात हल्लाबोल आंदोलनाला सामोरे जावे लागणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
5. अंगणवाडीतील मुलांच्या बौद्धिक विकासासाठी करणार खेळणी खरेदी
बुधवारी जिल्हा परिषदेत समितीची मासिक सभा झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा करून साहित्य खरेदीचा निर्णय झाला. बाल्यावस्था ही मानवी विकासाच्या अवस्थेमध्ये महत्त्वाची अवस्था आहे. या टप्प्यात बालकांचा बौद्धिक विकास होणे गरजेचे असते. बालकांच्या मूलभूत सुधारणा कार्यक्रमांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर असा उपक्रम कर्जत-जामखेडमध्ये राबविण्यात आला आहे.
सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - शहरातील बाजार पेठेत विनामास्क फिरणाऱ्यांची वेगळीच खातीरदारी
News24सह्याद्री -
26 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर आमदार निलेश लंके....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
1. कोरोना बाबतचे नियम मोडणाऱ्यांकडून 90 हजार वसूल
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नेवासा पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले बिना मास्क सोशल डिस्टन्स सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अवैध वाहतूक विरोधात वाहतूक शाखेच्या पथकाने धडक मोहीम राबविली याअंतर्गत मागील आठ दिवसात 799 जणांवर दंडात्मक कारवाई करून 90 हजारांचा दंड वसूल केला.
2. नवीन शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन करा
शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांची मुदत जून 2020 मध्ये संपली होती मात्र कोरोना संकटात शाळा कधी सुरू होतील हे नक्की नव्हते त्यामुळे राज्य शासनाने या समित्यांच्या नव्याने निवड न करता शाळा सुरू होईपर्यंत आहे.
3. माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर आमदार निलेश लंके यांची वर्णी
नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर निवड झाली आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने सोमवार दि.२२ फेब्रुवारी रोजी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार यांनी राजपत्र केले.
4. महावितरणचा तहसील कार्यालयाला झटका
कोपरगाव तहसील कार्यालयाच्या पाच लाखांच्यावर थकीत वीजबिलापोटी महावितरण विभागाच्या पथकाने गुरुवारी वीजपुरवठा खंडित करून तहसील कार्यालयाला झटका दिला आहे. भगवंत खराटे यांनी सांगितले की,
5. साई संस्थानला न्यायालयाची नोटीस
शिर्डीच्या साईबाबा संस्थानने पत्रकारांना मंदिर प्रवेश देताना विशिष्ट नियमावली घालून दिली आहे. परंतु ही नियमावली अन्यायकारक असल्याने पत्रकार माधव ओझा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने साई संस्थानला नोटीस काढून म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
6. गोरगरिबांच्या स्वप्नपूर्तीसाठी शेवगाव पंचायत समिती सरसावली
महाआवास योजनेचा तळागाळातील सर्व घटकांना लाभ मिळावा. गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी शेवगाव पंचायत समिती सरसावली असून, विशेष नियोजन केले आहे. पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या प्रयत्नातून तालुक्यात ९३३ घरकुले मंजूर झाली आहेत.
7. मंत्री तनपुरेंच्या उपस्थितीत महत्वपूर्ण गोष्टीवर चर्चा होणार
राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली वांबोरी चारीच्या पाण्यासंदर्भात चिचोंडी येथील शिवनेरी मंगल कार्यालयात उद्या दुपारी चार वाजता बठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वांबोरी चारी टप्पा दोन बाबतही या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याने दोन्ही योजनांच्या लाभधारक शेतकर्यांनी शनिवारी दुपारी चार वाजता चिचोंडी येथील बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन संभाजीराव पालवे, मोहनराव पालवे यांनी केले आहे.
8. बिल भरण्याचा शब्द देतात वीजपुरवठा सुरळीत
यंदा कुकडी कालव्याचे पाणी मिळण्यास विलंब झाला त्यामुळे विहिरी बोअरवेल बंद पडण्याच्या मार्गावर होते अशा परिस्थितीत महावितरणने थकित वीज बिलाचा नावाखाली रोहित्र बंद केली होती मात्र थकीत वीजबिल भरण्याचा शेतकऱ्यांनी शब्द देतात महावितरणने निघून जा तालुक्यातील पिंपळगाव पिसा खरातवाडी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला
9. नगर जिल्ह्यात गुरुवारी २७८ कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार १११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००६ इतकी झाली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला कौठा-म. ल. हिवरा रस्ता अखेर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे हा प्रश्न सुटला.आता या रस्त्याचे डांबरीकरण निम्यापर्यत झाले असल्याने गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे
शहराची खबरबात - मनपाची वर्षाकाठी तीन कोटींची होणार बचत
News24सह्याद्री - मनपाची वर्षाकाठी तीन कोटींची होणार बचत....पहा शहराची खबरबात मध्ये
पेन्शन शिक्षकांचा हक्क आहे ती मिळवण्याच्या लढ्यात मी तुमच्या पाठीशी राहील असे डीसीपीएस धारक शिक्षकांचे जिल्हा पातळीवरील प्रश्न आपण प्राधान्याने सोडवू असे आश्वासन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी जुनी पेन्शन हक्क शिक्षण समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे
महापालिकेने हाती घेतलेल्या स्मार्ट एलइडी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून प्रायोगिक तत्वांवर श्रमिकनगर येथे आठ एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत तुलनात्मक अभ्यास करून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे त्यामुळे महापालिकेची सुमारे तीन कोटींची बचत होणार असल्याचे विद्युत विभागाकडून सांगण्यात आले
कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे कोरोना विषाणूंचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मास्क वापरा सुरक्षित अंतर ठेवा हात सॅनिटाईझ करा ही त्रिसूत्री आखून दिली आहे काहीजण घराबाहेर पडताना मास वापरून नियमांचे पालन करताना दिसत आहेत आपणहि आपल्या कुटुंबासाठी नियमांचे पालन करावे मास्क चा वापर तर महत्त्वाचा आहे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो.
स्वच्छ सर्वेक्षणात पंचतारांकीत मानांकन मिळवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या महानगरपालिकेसमोर प्लास्टिक नियंत्रणाचे मोठे आव्हान आहे प्लास्टिकच्या बेशुमार वापरावर निर्बंध आणण्यात मनपा अपयशी ठरलेली आहे
महापालिकेच्या घनकचरा विभाग प्रमुख नरसिंग पैठणकर लाच लुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला त्यामुळे रिक्त झालेल्या घनकचरा प्रमुख पदाचा पदभार घेण्यास अधिकारी तयार नाहीत कचरा विभाग नको रे बाबा अशी भूमिका महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे.
जिल्ह्याची खबरबात - घरगुती गॅस टाक्यांचा वापर हॉटेल व्यवसायासाठी; १४ टाक्या जप्त
News24सह्याद्री - घरगुती गॅस टाक्यांचा वापर हॉटेल व्यवसायासाठी; १४ टाक्या जप्त....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
1. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१६ टक्के
जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार १११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१६ टक्के इतके झाले आहे.
2. वर्गातच गळफास घेवून विद्यार्थ्याने केली आत्महत्या !
शेवगाव शहरात कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कॉमर्समध्ये शिक्षण घेत असलेल्या आदेश विजय म्हस्के या १८ वर्षीय विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या रिकाम्या वर्गात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी साडेसात वाजता उघडकीस आला .
3. नियम तोडणाऱ्या साडेचार हजार जणांवर कारवाई
कुराणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करा असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे बहुतांशी जण मात्र नियम मोडण्यात धन्यता मानत असल्याने पोलिसांनी ही कारवाई बडगा उगारला आहे गेल्या सहा दिवसात साडेचार हजार जणांवर कारवाई करीत त्यांना दंड केला आहे.
4. कारखान्यांचे इथेनॉल पडून
केंद्र सरकारने पेट्रोल मध्ये मिश्रणात करिता साखर कारखान्यांमधून उत्पादित होणारे संपूर्ण इथेनॉल आकर्षक दरामध्ये खरेदी करण्याची घोषणा केली प्रत्यक्षात मात्र नगर जिल्ह्यातील कारखान्यांना या निर्णयाचा फायदा होत नसल्याचे चित्र आहेत कंपन्यांकडे इथेनॉलची साठवणूक करण्याची सुविधा नाही त्यामुळे कारखान्यांना इथेनॉलचे उत्पादन बंद ठेवण्याची वेळ आली आहे
5. बंद घराचे कुलूप तोडून चोरी
पाथर्डी तालुक्यातील आनंदवाडी येथे चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 71 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात संतोष हरिभाऊ गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक मस्के करीत आहेत.
6. नगर मुंबई - परळी रेल्वे सेवा चा नगर- आष्टी मार्ग कार्यान्वित करण्याची मागणी
अनेक वर्षांपासून नगर मुंबई परळी रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे या रेल्वे साठी साकारण्यात आलेल्या नगर आष्टी दरम्यान चा रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्याची मागणी people's हेल्पलाइन भारतीय जणसंसद व मेरे देश मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे रेल्वे क्रांती आंदोलनाचा भाग म्हणून ही मागणी करण्यात आली.
7. साडेपाच हजार शेतकऱ्यांना साडेचार कोटी अनुदान
जिल्ह्यात मार्च 2020 ते मे 2020 या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी शेवगाव कर्जत आणि जामखेड तालुक्यातील 139 गावातील पाच हजार 48 शेतकऱ्यांना अनुदानापोटी जिल्हा प्रशासनाच्यावतीने चार कोटी 27 लाख 84 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत .
8. पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ
घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा तिच्या सासरी वैजापूर येथे छळ करण्यात आला शिवीगाळ मारहाण व दमदाटी करून उपाशीपोटी ठेवून घराबाहेर काढून छळ केल्याची घटना समोर आली आहे
9. इंधनासह वाढत्या महागाई सोबत लढा
इंधनाच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य बरोबर व्यावसायिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे पेट्रोल-डिझेल सह खाद्य तेलाचे दर पुन्हा वाढल्याने खिशाला कात्री लागत आहे पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने प्रवास खर्च महागळसून असून अनेक व्यवसायिकांच्या दैनदिन खर्चात वाढ झाली आहे त्यामुळे मालवाहतुकीच्या दरातही दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे
10. घरगुती गॅस टाक्यांचा वापर हॉटेल व्यवसायासाठी; 14 टाक्या जप्त
कोठला येथील कुरेशी या हॉटेल च्या किचन मध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत आहे अशी माहिती डी वाय एस पी ढुमे याना मिळताच त्याच्या पथकानं आणि पुरवठा अधिकारी यांनी संयुक्त अशी कारवाई करत बेकायदेशीर वापरण्यात येणार्या 14 गॅसटाक्या जप्त करण्यात आले. नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी ढुमे यांच्या पथकानेही कारवाई केली आहे.
शहराची खबरबात - महाराजांचा इतिहास प्रेरणादायी- अजित कोतकर
News24सह्याद्री - महाराजांचा इतिहास प्रेरणादायी- अजित कोतकर....पहा शहराची खबरबात मध्ये
1. सेक्सटॉर्शन च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीन प्रकार समोर
बातमी पत्राच्या सुरवातीलाच एक महत्वपूर्ण बातमी आहे आता सायबर टोळ्यांनी सेक्सटॉर्शन च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीन प्रकार सुरू केला आहे. मागील काही दिवसात नगर जिल्ह्यात अनेक जण या नवीन प्रकाराचे बळी ठरले आहेत.गेल्या दोन महिन्यात नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तब्बल तीस जणांनी संपर्क करून त्यांच्या सोबत घडलेला हा प्रकार सांगितला आहे.
20 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याचे काम प्रगतिपथावर....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
1. दहिगाव बोलका येथे घरफोडी
कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून चोरी केली. ही घटना 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान घडली आहे. या घरफोडीत घरातील सोन्या-चांदीचे विविध दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण 21 हजारांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला आहे. याप्रकरणी दिलीप त्र्यंबक ससाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2. गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याचे काम प्रगतिपथावर
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावसाचे समुद्रात जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्या तुन पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी 30 प्रवाही वळण योजना आणि दोन नद्या जोड प्रकल्पातून एकोणावीस पूर्णांक दशलक्ष घनमीटर पाणी देण्याची महत्त्वपूर्ण योजना प्रगतीपथावर असल्याचे पत्र लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सहाय्यक अधीक्षक अभियंत्यांनी नेवासा तालुका भारतीय जनता संसदेला पाठविले आहे.
3. तलवार बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात तलवार बाळगत सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. लोकांमध्ये दहशत पसरवून शांतता भंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी पोलीस हवालदार संभाजी शिंदे यांनी आकाश नारायण कोंढारे याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4. शेवगाव नगर परिषदेने विविध प्रस्ताव पाठविले
नगरपरिषदेचे प्रशासक प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली विविध कामांचे प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत 8 फेब्रुवारीला संपली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी केकाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. नंतर केकान यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली.
5. भाजपने "ध" चा "मा" केला:- तनपुरे
पोलीस बंदोबस्तात वीजबिल वसुली करू, वीज तोडू, शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, करू असे मी कुठेही बोललेलो नाही. मात्र माझ्या तोंडी तसेच घालून ध चा मा केला जात आहे. सोशल मीडियाद्वारे भाजपने मला बदनाम करण्याचे षड्यंत्र चालविला आहे. शेतकऱ्यांनी भाजपच्या अपप्रचाराला बळी पडू नये. विज बिल सवलत योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
6. शिवजयंती चे महत्व कमी केल्याची खंत
कोरोणा च्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती वर कायद्याची बंधने घालणाऱ्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आणि मंत्र्यांच्या मिरवणुकी मध्ये झालेली गर्दी दिसत नाही का? छत्रपतींच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेने छत्रपतींच्या जयंती दिनाचे महत्त्व कमी केल्याची खंत वाटते अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर केली. शिवजयंतीनिमित्त माळवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
7. २३ हजारांचा मावा जप्त, चारजण अटकेत
अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी शहरातील विविध टपऱ्यावर धाड टाकुन सुमारे २३ हजार रुपयाचा गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त केली आहे.याप्रकरणी सात जणाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तर यातील चार जणांना अटक केली आहे, तर तिन जण पसार झाले आहेत.
8. वाळू उपसा व लिलावास नागरिकांचा विरोध
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावने येथील नागरिकांनीच पुढाकार घेवून नदीपात्रातील वाळूउपसा व वाळूचा जाहीर लिलाव करण्यास विरोध केला.वाळू चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेची असल्याने शासकीय यंत्रणेमार्फत बेकायदेशीर वाळू चोरी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी.
9. कुकडी कारखाना बचाव समिती निवडणूक लढविणार
तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंदरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्ते, कुुकडी कारखाना बचाव समितीची बैठक पार पडली.
10. पावसाच्या सरींनी आंबा उत्पादकांना फटका
पारनेर तालुक्यातील सुपा व गोरेगाव परिसर गावरान आंब्यांसाठी प्रसिद्ध असून, यंदा मोहरही मोठ्या प्रमाणावर आला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासूनच्या ढगाळ वातावरणाने व पावसाच्या सरींनी मात्र फटका बसण्याची चिन्हे आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
मोठी बातमी - आमदार निलेश लंके यांनी रात्री १ वाजता पाण्यात मारली डुबकी
News24सह्याद्री -
शहराची खबरबात - जिल्हा बँकेच्या चारजागांसाठी आज मतदान
News24सह्याद्री - जिल्हा बँकेच्या चारजागांसाठी आज मतदान...पहा शहराची खबरबात मध्ये
1. कचरा आग प्रकरणाचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे
सावेडीतील कचरा डेपोला लागलेली आग चार दिवस धुमसत होती. परिसरात उठलेला धुराचा लोट व उग्र वासाने या भागातील नागरिक हैराण झाले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने घटनास्थळाची पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. डेपोत सध्या पडून असलेल्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याबाबत उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबईच्या कार्यालयाला कळवले आहे.
2. जिल्हा बँकेच्या चारजागांसाठी आज मतदान
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४ जागांसाठी शनिवारी (२० फेब्रुवारी) सकाळी आठ ते सायंकाळी चारपर्यंत मतदान होणार आहे.जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांवर मतदान होईल. मतमोजणी रविवारी होईल. नगर, पारनेर व कर्जत तालुक्यातील विकास सेवा सोसायटी मतदारसंघासाठी, तसेच ११ तालुक्यांत केवळ बिगरशेती मतदारसंघासाठी मतदान घेण्यात येणार आहे.
3. महानगरपालिकेच्या गरजू व्यक्तींना धनादेशांचे वाटप
महानगरपालिकेच्या वतीने महापौर वैद्यकिय सहाय्यता निधी तुन महानगरपालिका हद्दीतील गरिब गरजू व निराधार व्यक्तींना हदय शस्त्रक्रिया , कॅन्सर, मेंदूवरील शस्त्रक्रिया, मुत्रपिंड इत्यादी आजारावरील शस्त्रक्रियेसाठी व उपचारासाठी तसेच इतर आजारासाठी आर्थिक मदत धनादेशद्वारे दिली जाते. याअंतर्गत स्वाती खरात या रूग्णाला महापौर .बाबासाहेब वाकळे यांचे शुभहस्ते धनादेश देण्यात आला.
4. रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात जाताना पकडला
नगर तालुक्यातील अरणगाव बायपास येथे मंगळवारी राञी रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजाराचा आहे, हे माहिती असूनही गोविंद विद्यासागर वाघमारे, राहुल भगवान घोरपडे व त्याचा अनोळखी साथीदारांसह साठा करून ट्रक ने वाहतूक करत असताना नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली.
जिल्ह्याची खबरबात - खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश
News24सह्याद्री - खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश..पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
1. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
दादा पाटील राजळे महाविद्यालयात युगपुरुष राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती निमित्ताने तसेच लोकनेत्या आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र अगदी साधेपणाने संपन्न केली जात आहे. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथेही कोरोना पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महराज यांच्या प्रतिमेचे शिवपूजन करून साधेपणाने शिवजयंती साजरी करण्यात आली.एका लहानशाने येथे शिवरायांचा पेहराव केला.
3. जिल्हा परिषद सदस्य सदा अण्णा पाचपुते यांचे निधन
श्रीगोंदा तालुक्यातील नेते सदाशिव उर्फ सदाअण्णा पाचपुते यांचे आज दुपारी अल्पशः आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडली त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
4. छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती लोणी बुद्रुक येथे उत्साहात साजरी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीदिनी प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने कोव्हीडच्या सर्व नियमांचे पालन करुन प्रवरानगर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आ.विखे पाटील यांच्यासह संस्थाच्या पदाधिकार्यानी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
5. कोपरगाव शिवजयंती जल्लोषात साजरी
कोपरगाव शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पहाटे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यास महामास्तंभिषेक विधिवध पूजा करण्यात आली. याप्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी करत तुतारींची सलामी देण्यात आली.
6. जामगाव ला सुंदर गाव पुरस्कार
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.(आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्व.आर.आर.(आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार २०१९-२०२० चे वितरण करण्यात आले. पारनेर तालुक्यातील जामगाव ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
साई निवारा मित्र मंडळ, निवारा यांचे वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षेसाठी प्रभाग क्र २ मध्ये रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी मशीन लोकार्पण सोहळा
8. अवैध बांधकाम करणारे येणार आता प्रशासनाच्या रडारवर
पाथर्डी शहरातील विनापरवाना बांधकामे व गेल्या तीन वषांर्तील बांधकामांना दिलेल्या परवानग्या आणि नगरपरिषदेने बांधकाम पूर्णत्व झालेले दाखल्यांची चौकशी करण्यासाठी सरकारी सदस्यांची समिती नेमून चौकशी करावी व दोषींविरुद्ध करावाई करावी,असा महत्वपूर्ण ठराव नगपालिकेने गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केला आहे.
9. डॉक्टर सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश
गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यासाठी ११० घरकुलांच्या प्रस्तावास केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.या घरकुलांच्या पहिल्या हप्त्यापोटी केंद्र सरकारच्या हिश्श्याचे ४० टक्क्यांच्या निधी देण्यात आल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्याला अनेक तहसीलदार लाभले मात्र आमचे काम करण्यास कोणताही अधिकारी तयार नाही त्यामुळे तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणच्या शेतकऱ्याने शेतात पाईपलाईन करण्यासाठी आतापर्यंत ८ वेळा अर्ज करूनही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आता आम्हाला कुटुंबासोबत इच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी निंभोरे कुटुंबीयांनी निवेदनातून तहसीलदार याना केली आहे.
16 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - उद्धव ठाकरेंनी दिला शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश.....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. एक-दोन नव्हे, चाळीस घरं फोडली
घरफोड्या करणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना अखेर सोलापूर पोलिसांनी अटक (Thieves Arrested By Solapur Police) केली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनीही या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या महिनाभरापासून हे चोरटे पोलिसांना चुकवत होते. अखेर आता सोलापूर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
2. जिल्हाधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय बैठकीत मास्क न घातल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. मास्क विसरल्याची कबुली अध्यक्षा कामडी यांनी दिल्यानंतर त्यांना दोनशे रुपयांचा दंड आकारुन मास्क देण्यात आला.
3. वासिम जाफरनं दिला राजीनामा; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वासिम जाफर हा मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्यावर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळेच जाफरनं उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वासिमवर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
4. ३९ जणांचा मृत्यू तर इतरांचा शोध सुरू
मध्य प्रदेशातील सीधी येथे बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत ३९ जणांचा मृतदेह सापडला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकारने सर्व कार्यक्रम स्थगित केले असून मयताच्या कुटुंबीयांना ५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
5. युद्ध लढलेले मेजर जनरल बीके महापात्रा यांचे निधन
मेजर जनरल निवृत्त बसंतकुमार महापात्रा यांचे सोमवारी रात्री निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी ओडिशाच्या भुवनेश्वर येथील रुग्णालयात अखेरचा त्यांनी श्वास घेतला. दिग्गज लष्कर अधिकारी मेजर जनरल बी.के. महापात्रा यांना लढाऊ अधिकारी म्हणून भारतीय लष्कराच्या आर्म्ड कॉर्प्स (टॅंक) वर नेण्यात आले.
6. उद्धव ठाकरेंनी दिला शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश
सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेची पॉवरफुल बैठक आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राज्यातील प्रत्येक गावात शिवसेना पोहोचवा, असा महत्त्वाचा आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना दिला.
7. ममतांचे माँ कँटीन देणार पाच रूपयांत जेवण
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी कोलकत्ता येथे पाच रूपयांमध्ये जेवण देणारी ”माँ कँटीन” ही योजना सुरू केली. सुरूवातीला कोलकत्त्यामध्ये १६ ठिकाणी ही योजना राबवली जाईल, जिथे कमीतकमी एक हजारापेक्षा जास्त लोकांना दुपारचे जेवण देण्यात येईल.
8. गोपनीयतेबाबत व्हॉटसअॅपला नोटीस
युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात व्हॉटसअॅप वापरकर्त्यांची गोपनीयता कमी राखत असून न्यायलयानेच लोकांच्या गोपनीयतेचे रक्षण करावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व व्हॉटसअॅप यांना नोटिसा जारी केल्या आहेत.
9. कंटेनरने चार वाहनांना दिली धडक
मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. वाहनांनी एकमेकांना धडक देऊन झालेल्या या भीषण अपघाताच पाच जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.
10. सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू
तारापूर येथील जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राला पुन्हा कार्यरत करण्यासाठीही सशर्त परवानगी देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक निर्बंध घातले असले तरीसुद्धा हे प्रक्रिया केंद्र सुरू झाल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.
शहराची खबरबात - उड्डाणपूलास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे.
News24सह्याद्री - उड्डाणपूलास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे...पहा शहराची खबरबात मध्ये
1. नगर देशात पहिल्या क्रमांकाचे शहर करणार
नगर शहर देशात एक नंबर करण्याचा माझा मानस आहे. शाळा अंगणवाडी स्मशानभूमीसाठी भरीव निधी देण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली. राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या चौदा तालुकास्तरीय आणि सहा जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
2. तपोवन प्रकरणात मुलाणींचा पक्षपातीपणा.
शहरातील तपोवन ह्या रस्त्यावर गणपती मंदिरात भजनावरून झालेल्या भांडणात तोफखाना पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हारुण मुलानी यांनी पक्षपातीपणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
3. उड्डाणपूलास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे.
नगर शहरामध्ये सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
4. कोरोना काळात बंद केलेल्या सिव्हिल मधील आरोग्यसेवा पूर्ववत करा
कोरोना संसर्गाच्या काळामध्ये सिविल हॉस्पिटल मधील इतर आरोग्य सेवा बंद करण्यात आल्या होत्या. तरी आता इतर सर्व आरोग्य सेवा पूर्ववत सुरु कराव्यात अशी मागणी सिव्हील सर्जन तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील पोखरणा यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली.
5. पोलिसांचा वेग वाढणार: पोलिसांच्या ताफ्यात नव्या गाड्यांचा समावेश
जिल्हा पोलिस दलाला वेगवान करण्यासाठी डीपीसी फंडातून 20 गाड्या देण्यात येणार आहे. या गाड्या एसपिंकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. दरम्यान यामध्ये 5 स्कार्पिओ आणि पंधरा बोलेरो अशा वीस नवीन गाड्या जिल्हा पोलीस दलात जिल्हा नियोजन मधून देण्यात येणार आहे.
16 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - चोरट्यांनी मारला जिल्हा पोलिस दलाच्या बिनतारी यंत्रणेवरच हात...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार शेवगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रशासनाने सोमवारी प्रसिद्ध केली. मतदार यादीत ३१ हजार ४५० मतदारांच्या नावाचा समावेश करण्यात आला असून, त्यात १६ हजार ०८३ पुरुष, तर १५ हजार ३६७ महिला मतदार आहेत.
2. रेशनवर आता मका-ज्वारी मिळणार
स्वस्त धान्य दुकानावर आता गव्हासोबत मका आणि ज्वारीही मिळणार आहे. जिल्हयात शेतकऱ्यांकडून शासनाने मका मोठ्या प्रमाणावर खरेदी केला आहे.तीच मका स्वस्त धान्य दुकानांवरून लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.
3. डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करा; भाजपच्या माजीमंत्र्यांची मागणी
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही. मग सत्य बाहेर कसे येणार? असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
ऐतिहासिक खर्डा किल्ल्यासमोरील दोन एकर परिसर विकसीत करून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा तेथे उभारण्यात येणार आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. विंचरणा नदीकाठी बसवण्यात आलेल्या भगवान शंकराची २१ फुटी मूर्तीचे लोकार्पण सोमवारी झाले. यावेळी आमदार पवार बोलत होते.
5. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे महावितरणला आदेश
वीज व पाणी हा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे सांगतानाच शेतीपंपांचे रोहित्र जळाल्याची तक्रार येताच २४ तासांत नवीन रोहित्र बसवावे.
चोरीच्या वाढत्या घटनांनी पठारावरील सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला असताना आता चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. गेल्या चार दिवसांतील विविध घटनांनी चर्चेत आलेल्या घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवळेबाळेश्वरच्या मंदिरालगत असलेली जिल्हा पोलिस दलाची बिनतारी संपर्क यंत्रणाच आज पहाटे चोरट्यांनी चोरून नेली.
जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यात नव्याने एक पोलीस निरीक्षक व ४ सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्यांचे आदेश सोमवारी झालेल्या अहमदनगर जिल्हा पोलिस आस्थापना बैठकीत काढण्यात आले.
राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाला एक - दोन नव्हे तर चक्क वीस नव्या कोऱ्या गाड्या दिल्या जाणार आहे.दरम्यान जिल्हा पोलीस दलाला वेगवान करण्यासाठी डीपीसी फंडातून या 20 गाड्या देण्यात येणार आहे.
9. तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील निकाल तरुण शेतकऱ्याने कर्जबाजरीपणास कंट्रोल आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
10. जबरी चोरीप्रकरणी दोन जणांना अटक
कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील जोरवर वस्ती वरील महिलेस मारहाण करून लुटल्याच्या गुन्ह्यातील दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली. तर तिसरा आरोपी संकेत उर्फ महेंद्र चव्हाण याचा शोध पोलीस घेत आहेत. अटक केलेल्या दोघांकडून 76 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला