Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label Nanded. Show all posts

१८ नोव्हेंबर- सह्याद्री वेगवान आढावा

  News24सह्याद्री :अमेरिकेला मागे सारत चीन ठरला जगातील सर्वात श्रीमंत देश... पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या .....




                       TOP HEADLINES


*कुलभूषण जाधवांना आंतरराष्ट्रीय न्यायालयामुळे मोठा दिलासा*

गुडमॉर्निंग सह्याद्री

   News24 सह्याद्री - लष्करच्या एका पाकिस्तानी कमांडरसह तीन दहशतवादी ठार ...! पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...!



TOP HEADLINES

२ राज्यात निर्बंध कठोरच!

करोना रुग्णसंख्या कमी झालेल्या भागांत दुकानांच्या वेळा वाढविण्यासह निर्बंध शिथिल करण्याची मंत्र्यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मागणी मुख्यमंत्र्यांनी  अमान्य केली. रुग्णसंख्येत अपेक्षित घट झालेली नसून, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहतील, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

===========



27 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

 News24सह्याद्री - चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे  चक्काजाम आंदोलन...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEALINES

1. विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणारा अटकेत.

अकोला शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या विशेष पथकाने विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास रंगेहात अटक केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकाजवळ एक जण विदेशी बनावटीचे पिस्टलसह येत आहे. त्याच्याकडे पिस्टल असून तो त्यांचा वापरही करू शकतो. 

2. संचारबंदीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व भाजप आमदारानी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा.
अकोल्यात जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात वाढविलेल्या संचारबंदीच्या विरोधात व्यापारी संघटना आणि भाजप आमदारांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. संचारबंदी वाढविल्यापेक्षा दुकाने जास्तवेळ उघडी ठेवण्यास परवानगी दिली तर कोरोना संसर्ग कमी होईल.तसेच व्यापाऱ्यांचे ही आर्थिक नुकसान होणार नाही,अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

3. पाचोरा तालुक्यातील घटना 
पिंपळगाव हरेश्वर येथील एका दलित कुटुंबातील २० वर्षीय तरुणीवर एका महिलेच्या मदतीने जिवे मारुन टाकण्याची धमकी देत शरीर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडून आरोपी गोपाल पाटील याच्या शेतातील पत्री शेडमध्ये तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला यातून ती गरोदर राहून तिने एका मुलीला जन्म दिला आहे. 

4. संत रविदास महाराज यांच्या जयंती 
संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी  मुकेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.. तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश अपार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

5. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा  मनमानी कारभार शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा आरोप
चोपडा येथील  कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 तारखेला  हरभरा मोजणी दरम्यान राडा झाला असून सदर शेतकऱ्याचा  हरभरा व्यापाऱ्याने सहा हजार तीनशे रुपये भावाने खरेदी केला व हरभराचे जवळपास 90 टक्के मोजणी सुद्धा झाली असताना व शेवटी हरभरा थोडाफार मोजणीचा  शिल्लक असतांना त्या मालाचा पुन्हा लिलाव  करून भाव ठरविणार व नन्तर  मोजणी करू असे व्यापाऱ्यांनी सांगितले या कारणावरून बाजार समितीच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते  .
       
6. चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे  चक्काजाम आंदोलन
चोपडा - येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडीच्या वतीने पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युची योग्य ती चौकशी व्हावी तसेच शिवसेनेचे नेते तथा वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्या द्यावा म्हणून होत असलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरा जवळील धरणगाव नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

7. ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी टी-20 वर्ल्ड कपमध्ये गेलचे पुनरागम
वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हटले गेलेल्या ख्रिस गेलचा आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड मध्ये समावेश करण्यात आला आहे. गेलनं वयाच्या 41 व्या वर्षी 18 महिन्यानंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी वेस्ट इंडिजनं सुरू केली आहे.

8. "मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपावाले माझ्यावर दिवसभर टीका करतात"
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले आहे तसेच मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

 9. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले 'कारण'
गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवरूनच विरोधक सरकारवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवरच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं विधान केलंय.

10. मराठीच्या मुद्द्यावरून भाजपचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप
आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने 2021 च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मरठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत आहे,' अशी विखारी टीका भाजपचे  मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.    

27 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

 News24सह्याद्री - मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबींवर चर्चा; बैठक होण्याची शक्यता....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मुलुंड टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं.

2. राज ठाकरे  यांना  कोरोना झाला तर सरकार जबाबदार नाही: विजय वडेट्टीवार
राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे

3. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चित्रा वाघ यांच्याकडून आणखी एक गंभीर आरोप
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्या दिवशी अरुण राठोडने पुणे कंट्रोल रुमला कबुली जवाब दिला होता. 

4. शिवसेनेनं भाजप नगरसेवकांच्या आर्थिक नाड्या आवळल्या 
 महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये  सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर आता भाजपनेही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सेनेचं नाक कापण्यासाठी तयारी सुरु केली आहे. 

5. अमरावतीत लॉकडाऊन वाढणार? कोरोना थांबेना

विदर्भातली कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचं वाढणारं प्रमाण प्रशासनाची झोप उडवणारं आहे. अमरावती जिल्हात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप थांबण्याचं नाव घेत नाही. 

6. तीव्र, अतितीव्र कुपोषणग्रस्त बालकांची वाढली संख्या

कोरोना काळात कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण आहार व अमृत आहार योजना सक्षमपणे राबविण्याचा दावा केला जात आहे; परंतु त्यानंतरही तीव्र व अतितीव्र स्वरूपातील कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढली आहे. 


7. महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण

गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर गावांमध्ये असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महानुभव पंथाच्या वतीने फिरत्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि साठ साधकांचा हा समूह जळगाव मध्ये काही दिवस राहून गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर या ठिकाणी असलेल्या महानुभव पंथाच्या आश्रमात आले होते.


8. शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे:  चित्रा वाघ

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केल्याची बातमी समजली तेव्हापासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ  यांनी केले. 

9. मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबींवर चर्चा? बैठक होण्याची शक्यता
मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

10. इंजिनिअरिंगचा अभ्यास आता मराठीतही उपलब्ध होणार
 मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित ठेवू नये. ते 365 दिवस चालू ठेवणे आवश्यक आहे, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ग्रंथालय संचालनालय आयोजित प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष आणि मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमावेळी त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले. 

16 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

   News24सह्याद्री  - भाजपच्या मोठ्या आमदाराला राष्ट्रवादीकडून जाहीर ऑफर....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

 1. जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार
 ठाणे ग्रामीणामधये 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार  केल्याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबद्दल तिनं कोणालाही सांगितलं, तर तिच्या पालकांना ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती.

2. भाजपच्या मोठ्या आमदाराला राष्ट्रवादीकडून जाहीर ऑफर
 एकीकडे राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग सुरू आहे तर दुसरीकडे भाजपला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. आता साताऱ्यात सुद्धा भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राष्ट्रवादीने मोठी ऑफर दिली आहे. 

3. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. 

4. आज विठ्ठल-रुक्मिणी विवाहाचा सोहळा
आज वसंत पंचमी विठुरायाच्या विवाहाची तिथी. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. साक्षात देवाचा विवाह असल्याने याला उपस्थित राहण्यासाठी शेकडोच्या संख्येने भाविक येत असतात मात्र कोरोनामुळे यंदा भाविक नसले तरी थेट स्वर्गातील देव या विवाहासाठी उपस्थित असल्याची फुल सजावट केली आहे. 

5. टूलकिट प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत
 दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात   'टूलकिट'चा  वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या टूलकिट  प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत असल्याचे पुढे आले आहे. टूलकिट तयार करणाऱ्या तिघांपैकी शंतनू मुळूक  बीडचा असल्याचे समोर आले आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला आहे. 

6. देशातील या ४ बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता
देशातल्या चार सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू झाल्य़ा आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या चार बँकांचं खासगीकरण होण्याची शक्यता आहे.  या वर्षी यातल्या दोन बँकांचं खासगीकरण होण्याची शक्यता आहे. 

7. पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च  
सध्या पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. 31 मार्चनंतर, ज्यांचे पॅन आधारशी जोडलले गेले त्यांचे पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून डिअॅक्टिव्हेट केलं जाईल.पॅनकार्ड बंद झालं तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी दंड भरावा लागणार आहे . याची शेवटची तारीख 30 जून 2020 होती, जी 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

8. शेतकऱ्यांनी हायवेवर उभारली स्वत:ची बाजारपेठ
कोरोना काळातील लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार हिरावल्याचे आपण पाहिलं. मात्र नांदेड जिल्ह्यातील वाका इथल्या शेतकऱ्यांनी संकटात संधी निर्माण केल्याचे काम केलंय. वाका गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा भाजीपाला कोरोना काळात शहराततील  कवडीमोल दराने विकल्या जात होता. 

9. भररस्तात एसटी बसच्या चाकाचे नटबोल्ट गायब
रस्त्यावर चालत असताना एसटी बसमधून आवाज आल्यानंतर बस थांबवून जेव्हा बघितलं गेलं, तर बसमधील एका चाकाचे सर्व नटबोल्टच गायब होते. वेळेवर प्रसंग माहिती पडल्याने एक मोठा अपघात टळला आहे. मात्र, 

10. विदर्भाला कोरोनाचा विळखा
कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढत असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होताना दिसत आहे. काल नागपुरात 498 कोरोनाबाधित वाढले. शहरात तीन आणि ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. 


6 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा

 News24सह्याद्री - "मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा" : रतन टाटा....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES
1. महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट

गेले काही दिवस राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परतली आहे. महाराष्ट्रात या हिवाळ्यातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात आज किमान तापमान 11.3 अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं. तर मुंबईतही सांताक्रुझमध्ये 16.9 तर कुलाब्यात 19.8 एवढं तापमान नोंदवण्यात आलं आहे. 

2. प्राधान्यक्रम ठरवून योजनांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन योजना राबविण्याचे निर्देशित करत औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. 


3. मानखुर्दमधील आग अजूनही धुमसतीच,कोट्यवधींचं नुकसान

मानखुर्द येथील मंडाला परिसरात काल दुपारी भीषण आग लागली होती. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी महापालिका विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामध्ये शीत युद्ध पाहायला मिळत आहे. 


4. सिंधी बांधवांना नागरिकत्वासाठी तातडीने कार्यवाही करा

भारतीय नागरिक त्वासाठी सिंधी बांधवांचे 215 प्रस्ताव प्राप्त होते. त्यापैकी आजअखेर 136 जणांना नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे. प्रलंबित प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने पाठपुरावा करण्याचा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.


5. धक्कादायक ! रुग्णास वैधता संपलेले सलाइन चढवले

पेठ वडगाव येथील महादेव खंदारे  यांना शुक्रवारी सकाळी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना डिसेंबर २०२० हे वैधता संपलेले सलाइन लावण्याचा प्रकार रात्री उशिरा घडला. 


6. 'कही ख़ुशी कही गम' ठेवींवर वाढीव व्याज; तर कर्जे महागणार !

शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पत धोरण जाहीर करण्यात आले आहे. मात्र यामध्ये यावेळी आरबीआयने व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर व्याजदरमध्ये बदल होण्याची अपेक्षा करत असलेल्या मध्यम वर्गाच्या अपेक्षाभंग झाला आहे.


7. 'सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी पात्र नाही

केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये गेल्या 72 दिवासांपासू शेतकरी आंदोलन चालू आहे. अशातच या आंदोलनाना परदेशी पॉपस्टार रिहानाने पाठींबा दिल्यानंतर भारतातील बड्या हस्तींनी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. यामध्ये भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर सचिनवर जोरदार टीका होताना दिसत आहे.


8. बंदी उठल्यानंतर श्रीसंतची आयपीएलच्या लिलावासाठी नोंदणी

आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. 

9. "मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा" : रतन टाटा

टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी दीड हजार कोटीची मदत केली. टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे.


10. मोदी सरकारने देशाचं आणि घराचं बजेट बिघडवलं
देशात इंधानाचे दर शंभरीकडे वाटचाल करत आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम म्हणून इतर गोष्टींचे दरही वाढत आहेत. गुरुवार आणि शुक्रवार सलग दोन दिवस तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. 

सह्याद्री टॉप २४ न्यूज - मुंबईनंतर आता कर्नाटकचा शिवाजी महाराजांवर दावा

  News24सह्याद्री - मुंबईनंतर आता कर्नाटकचा शिवाजी महाराजांवर दावा....पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES



गॉसिप कल्ला - मृण्मयी देशपांडेनी प्रेक्षकांची जिंकली मने

   News24सह्याद्री - मृण्मयी देशपांडेनी प्रेक्षकांची जिंकली मने....पहा गॉसिप कल्ला


TOP HEADLINES

1. जान्हवी कपूर नंतर आता धाकटी बहीण खुशी ही देखील बॉलिवूडमध्ये

अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने काही काळापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. धडक या तिच्या पहिल्या चित्रपटाने तिने बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकलं.आता तिच्या पावलावर पाऊल टाकत तिची धाकटी बहीण खुशी ही देखील बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती तिचे वडील आणि निर्माते बोनी कपूर यांनी दिली आहे.


2. विजयच्या या सिनेमाच्या नावाचा टॅटू, चाहत्यांमध्ये क्रेझ   

साऊथचे  सुपरस्टार विजय देवरकोंडाचा बहुप्रतिक्षीत 'लायगर' या सिनेमाचा फर्स्ट लूक काल सोमवारी रिलीज करण्यात आला आणि हा लूक पाहून विजय देवरकोंडाचे चाहते अक्षरश: सैराट झालेत. चाहत्यांनी असे काही केले की, सगळेच थक्क झालेत. साऊथच्या क्रेजी चाहत्यांनी फटाके फोडले, काहींनी केक कापला, काहींनी या विजयच्या या सिनेमाच्या नावाचा टॅटू काढला.


3. कंगना राणावतच्या आगामी 'धाकड'  

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या आगामी 'धाकड' चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला होता. यामध्ये कंगनाचा दमदार ऍक्शन लुक दिसून आला. आता या बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून येत्या 2 ऑक्टोबर 2021 ला प्रदर्शित व्हायची शक्यता आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टिझरवरून हा एक ऍक्शन पॅक्ड धमाका असणार यात किंचितही शंका नाही. 


4. मृण्मयी देशपांडेनी प्रेक्षकांची जिंकली मने

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे छोट्या पडद्यावरील मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. तिने आपल्या वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सोशलवर ती नेहमीच सक्रिय असून नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना पहायला मिळाला. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पहायला मिळतो आहे. 


5. अभिनेता कमल हासन रुग्णालयात भरती   

दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांना सध्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाली आहे. यासंदर्भात कमल हासन यांच्या दोन मुली अभिनेत्री श्रुति हासन आणि अक्षरा हासन यांनी माहिती दिली आहे.ते पुढील चार ते पाच दिवसांत घरी परत येतील. 

9 जानेवारी सह्याद्री बुलेटिन

 News24सह्याद्री - ट्रॅव्हल्स बस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES


1. ट्रॅव्हल्स बस शॉर्टसर्किटमुळे जाळून खाक 

परभणी जिल्ह्यातील जिंतूर औरंगाबाद महामार्ग वर 15 किलोमीटर अंतरावर जोगवाडा पाटीजवळ खाजगी ट्रॅव्हल्स ने अचानक पेट घेतला  हि आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याने बस पूर्ण जळून खाक झालेली दिसून आली या बसमध्ये 12 प्रवासी होते ही ट्रॅव्हल्स औरंगाबाद कडून हिंगोली कडे जात होती दरम्यान बस ने पेट घेतल्याचे समजताच  त्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला नंतर हि  खबर अग्निशामक दलाला  देण्यात आली अग्निशामक पोहोचेपर्यंत ट्रॅव्हल्स पूर्ण जळून खाक झाली होती 
2. भंडार्‍याच्या बालमृत्यू अग्नितांडव्याच्या दोषींवर कारवाई करा  
भंडार्‍याच्या बालमृत्यू अग्नितांडव चे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई ही होईलच पण ही घटना हृदय हेलावून टाकणारी आहे अशा दुर्दैवी व  मनाला सुन्न करून टाकणाऱ्या या  दुर्दैवी  घटनेत  मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या परिवारा सोबत राज्य सरकार आहे,शब्दाने हे दुःख  कमी होणार नाही,आर्थिक मदत दिल्याने पण राज्य सरकार या सर्व परिवारांना लवकरात लवकर  त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांची साहाय्यता करणार असल्याचं भाष्य राज्याचे महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केलय या घटनेत जिल्हा शल्य चिकित्सक व डॉक्टर असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहेय.
3. मुख्यमंत्र्यांनी ‘त्या १९ मालमत्तां’ची माहिती लपवली
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या परिवाराने २०१४ साली अन्वय नाईक यांच्याकडून रायगड जिल्ह्यतील कोर्लेई येथील जमिनी आणि मालमत्ता खरेदी केल्या. मात्र २०२० पर्यंत या जमिनींवरील मालमत्ता आपल्या नावावर चढविल्या नाहीत. बेनामी मालमत्ता म्हणून सहा वर्षे त्यांनी वापरली. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांनी जमिनीवरील १९ मालमत्तांचा उल्लेख केलेला नाही, ही माहिती लपविली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला  
4. गोसेखुर्द प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
गोसेखुर्द हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वाटचालीची माहिती घेतली तर येथील जलविद्युत प्रकल्पाला हि  भेट दिलीये.
5. पुणे न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून होणार सुरु
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्याच धर्तीवर मागील काही महिन्यांपासून पुण्यातील न्यायालयीन कामकाज देखील महत्वपूर्ण आणि जलदगती खटल्यांपुरतेच सुरू होते. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्व समाजजीवन व सरकारी कामकाज पूर्वपदावर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून सकाळी 11 ते दीड आणि दुपारी 2 ते 4.30 पर्यंत सुरू राहणार आहे.  
6. संभाजीनगर' विषयावरच्या चर्चा आता थांबवा-बाळासाहेब थोरात 
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला काँग्रेसचा विरोध नाही. ते आमचे अराध्य दैवत आणि श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे 'संभाजीनगर' विषयावरच्या चर्चा आता थांबवा, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बजावून सांगितले.  बाळासाहेब थोरात यांनी आज ठाण्यातील काँग्रेस कार्यालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना संभाजीनगरच्या चर्चेबद्दल विचारले असता ते म्हणाले, आता यावर चर्चा करण्याचे काही कारण नाही. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. महाराज आमचेही श्रद्धास्थान आहेत, यात काहीही शंका असण्याचे कारण नाही. 
7. रत्नागिरीतील बिनविरोध ग्रामपंचायतींमुळे 47 लाखांचा खर्च वाचला!
ग्रामीण भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीतील वाद टाळण्यासाठी युवावर्गाने पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ आणि युवक यांच्यात गाव बैठकांमधून ताळमेळ घडून आणल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीमधील तब्बल 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एका ग्रामपंचायतीला निवडणुकीसाठी 40 हजार रुपये खर्च येत असून बिनविरोध ग्रामपंचायतींमुळे सरकारचे 47 लाख 60 हजार रुपये वाचले आहेत. निवडणुका जाहीर झाल्यावर युवा वर्गाचा कल ग्रामपंचायतीत काम करण्यासाठी वाढला आहे. अगदी ज्येष्ठांनीही त्यांना मार्गदर्शन करत सहकार्याचा हात दिला. त्यामुळे जिल्हाभरात तब्बल 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
 8. उद्धव ठाकरे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.  
सोलापूर येथील शिवसेना नगरसेवकआणि  नेते महेश कोठे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.यानंतर उद्धव ठाकरे यांनी महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले होते.महेश कोठे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पवार यांच्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट केले होते.दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली होती . यानंतर काही तासातच शरद पवार यांच्या ट्विटर अकाउंट वरून महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे ट्विट डिलीट करण्यात आले आहे. त्यामुळे महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश रद्द करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. .तर उद्धव ठाकरे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.महेश कोठे यांच्या सोबत १३ नगरसेवक असल्याचे म्हटले जाते  
9. मनपाच्या विद्यार्थिनींची अंतरिक्षातील भरारी 
तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे होणाऱ्या जागतिक रेकॉर्डसाठी देशभरातील १ हजार विद्यार्थ्यांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या स्वाती मिश्रा व काजल शर्मा या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे.   मनपाच्या विद्यार्थिनींचे हे यश इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरेल यात शंका नाही, अशा शब्दांमध्ये नागपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वाती विनोद मिश्रा व काजल रामनरेश शर्मा या मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींचा गौरव केला आहे.  
10.  'मुंबई महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर'
बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा प्रस्ताव आणला. या प्रस्तावात महापालिकेच्या वैद्यकीय सेवेतील ४० ते ५० टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक कबुली आयुक्तांनी दिली. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची आरोग्यसेवाच व्हेंटिलेटरवर असल्याची टीका करत महापालिका रुग्णालयात किती पदे रिक्त आहेत, ती पदे भरण्यासाठी प्रशासनाने काय कार्यवाही केली याबाबतची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली  



9 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

News24सह्याद्री - पुण्यात पावसाचा 73 वर्षांचा रेकॉर्ड 'ब्रेक'....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. चीनच्या दोन शहरांमध्ये लॉकडाऊन

कोरोना संकटावर लवकर नियंत्रण मिळवल्याचा दावा चीन करत होता. पण चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्ग पसरू लागला आहे. हेबेई प्रांतातील  दोन शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले  आहेत. यामुळे चीन सरकारने हेबेई प्रांतातील या दोन शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. यातील एका  शहराची लोकसंख्या १ कोटी १० लाख एवढी आहे. तर दुसऱ्या शहराची लोकसंख्या ७० लाख आहे. या दोन्ही शहरांची मिळून १ कोटी ८० लाख एवढी लोकसंख्या लॉकडाऊनमुळे घरात बंदीस्त झाली आहे.

2. डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठा झटका
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरनं आणखी एक मोठा झटका दिला आहे. ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट बंद केल्यानंतर ट्विटरने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट्सची आम्ही समीक्षा केली. त्यांच्या ट्विट्समुळे अमेरिकेत दंगे भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला असे ट्विटरने सांगितलं आहे.

3. सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे पालन करावे-अजित पवार
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हातांची स्वच्छता तसेच सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.  

4. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना तुर्तास तरी बदलू नका अशी सूचना राज्यातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या प्रभारींना केली आहे पण तरीही प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी तीन नाव सुचवण्याचे आवाहन काँग्रेसच्या शक्ती अँपव्दारे केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसने डिजिटल मत मागण्यास सुरवात केल्याचे वृत्त आहे  
5. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाचा फलक फाडल्याने शहरात तणाव
चोवीस तासापूर्वी उद्घाटन झालेल्या ग्रेड सेपरेटरच्या एका मार्गीकेचा नामकरण झालेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक अज्ञाताने फाडल्याने साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.या घटनेचा खासदार उदयनराजे भोसले यांनी निषेध करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या राजे समर्थकांनी ग्रेड सेपरेटरच्या पुलावरच निषेध सभा घेतली. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे अॅड दत्ता बनकर, नगरसेवक किशोर शिंदे, संग्राम बर्गे, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी यावेळी उपस्थित होते
6. पुण्यात पावसाचा 73 वर्षांचा रेकॉर्ड 'ब्रेक'
शहरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. गेल्या 12 तासांत शहरात 32.5 मिलिमीटर पावसाची उच्चांकी नोंद झाली. तर, या पावसाने सुमारे 73 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ झाली. तर, शनिवारीदेखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  
7. लोहगाव आणि धानोरीला आजपासून मिळणार भामा आसखेडचे पाणी
बहुप्रतिक्षित भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतून आजपासून पूर्व भागाला पाणी पुरवठा सुरू होणार आहे. पहिल्या टप्यात धानोरी आणि लोहगाव परिसराला पाणी मिळणार असून त्यामुळे आता लोहगावकारांना आठ दिवसांऐवजी तीन दिवसांनी पाणी मिळणार आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी यासंबंधीची माहिती दिली.  
8. येरवडा पुणे पालिका रुग्णालयात 'ड्राय रन'
कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात केंद्र सरकार लवकरच करणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून राज्यातील अनेक महापालिकेच्या रुग्णालयात शुक्रवारी लसीकरणाची 'ड्राय रन' म्हणजेच रंगीत तालीम घेण्यात आली. येरवडा येथील पुणे महापालिकेच्या भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालयातही अशी रंगीत तालीम घेण्यात आली. या ड्राय रनमध्ये 25 आरोग्य कर्मचाऱ्यांवर लस वगळता इतर संपूर्ण प्रक्रियेची रंगीत तालीम घेण्यात आली.  
9. परभणीत बर्ड फ्लूच्या भीतीचं सावट
 देशभरात सध्या कोरोनाच थैमान सुरु असताना,आता बर्ड फ्लूने देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झालेली असली, तरी महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्लूचा कोणताही प्रकार आढळलेला नव्हता. मात्र, परभणीतील मुरुंबा गावात गेल्या दोन दिवसापासून कोंबड्यांचा अचानक मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे गावात एकाच खळबळ उडाली आहे. 'बर्ड फ्लू'च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला गेलाय.
10. लस वाटपाचे पुणे प्रमुख केंद्र
 देशभरात लस पोहोचवण्यासाठी पुणे हे मुख्य केंद्र असणार आहे. तेथूनच अन्य ठिकाणी लसीचे वितरण केले जाणार आहे. पुणे विभागातील शीतगृहांमध्ये एकावेळी सुमारे 25 ते 27 लाख लसींची साठवण करण्याची क्षमता असल्यामुळे या लसीची साठवणूक औंध, ताडीवाला रस्त्यावर कुटुंब कल्याण विभागाच्या शेजारी एक संपूर्ण मजला याठिकाणी करून ते सगळीकडे पाठवण्यात येणार आहे


सह्याद्री ब्रेकिंग - कोरोना लसीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

 News24सह्याद्री -



 केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आता कोरोना लस हि सर्वाना मोफत मिळणार आहे. अशी माहिती दिली आहे. फक्त दिल्लीतील नागरिकांना लस मोफत न देता  संपूर्ण देशातील नागरिकांना हि लस मोफत मिळणार आहे. अत्यंत दिलासादायक अशी हि बातमी आहे. आजपासून लसीच्या ट्रायल रनला सुरवात झाली आहे . दरम्यान या लसीकरणाला शुक्रवारपासून सुरु होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. 


2 जानेवारी Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच झालं - सामना....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. ‘कोव्हिशिल्ड’ला मंजुरी
करोना विषाणू संसर्गाच्या सावटाखाली असलेल्या भारतीयांसाठी चांगली बातमी आहे.
ऑक्सफर्ड- अॅमस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या आणि सीरम संस्थेने तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरात आज होणाऱ्या लसीकरणाच्या सराव फेरीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय औषध मानक नियामक संस्थेच्या तज्ज्ञ समितीची बैठक झाली. या बैठकीत ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपत्कालीन वापरास तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली असून आता भारताच्या महाऔषध नियंत्रकांच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी मिळवणारी ही पहिली लस ठरेल.
------------

2. तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
शेतकरी आंदोलनाचा आज ३८ वा दिवस. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी देशाच्या राजधानीच्या सीमांवर शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. नववर्षात 4 जानेवारी रोजी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होणार आहे. अशातच शेतकरी संघटनांनी 4 जानेवारीपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांची पुन्हा एकदा 4 जानेवारीला सरकारसोबत चर्चा होणार आहे. या चर्चेत जर आमच्या मागण्यांबाबत जर तोडगा निघाला नाही तर मात्र आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील असं म्हणत शेतकऱ्यांनी आता आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
---------
3. भीमा-कोरेगावची जागा ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढा लढणार - ऊर्जामंत्री
 
“महाविकास आघाडी सरकार भीमा-कोरेगावातील विजयस्तंभ या प्रेरणास्थळाचा विकास करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करेल. त्यासाठी या स्थळाचा ताबा राज्य सरकारकडे येणे गरजेचे आहे. त्यासंदर्भातील कायदेशीर लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. ही लढाई अधिक प्रभावीपणे लढता यावी म्हणून सरकारच्यावतीने विशेष वकील नेमण्यासाठी, राज्य सरकारने आपली बाजू प्रभावीपणे दिलेल्या तारखांना न चुकवता मांडली जावी, यासाठी सरकारमधील एक मंत्री म्हणून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी म्हणून मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे,” असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भीमा कोरेगाव येथे दिले  
--------------

4. औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच झालं - सामना

‘शिवसेनेने भूमिका बदललेलीच नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपास त्याची काळजी नको,’ असे म्हणत शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून भाजपवर घणाघाती टीका केली. तसेच महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे.  
-------
5. नविन वर्षाच्या सुरुवातीला पँनल 12 च्या नगरसेविकेने घेतली स्वच्छतेची शपथ  
उल्हासनगर महानगरपालिका पँनल क्रमांक 12 च्या नगरसेविका सविता तोरणे रगडे यांनी नवीन वर्षाच स्वागत पॅनेलमध्ये स्वच्छता अभियान घेऊन विभाग स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली. यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेचे सॅनिटरी इन्स्पेंंक्टर सुरेश बिनिवाले,संतोष यादव तसेच पॅनल12 मधील सर्व मुकादम व सफाई कर्मचारी यांच्या सहकार्याने स्वछता अभियान राबविण्यात आले. प्रशासन आपलं कर्तव्य बजावत आहे.नागरिकांनी देखील असाच प्रतिसाद देत रहावे आपण सर्व मिळुन आपला प्रभाग आपल्या घराप्रमाणे स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ नगरसेविका सविता तोरणे रगडे,समाजसेवक शीवाजी रगडे व विभागातील जनतेने घेतली.
-------
6. घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास मानपाडा पोलिसांनी केले जेरबंद 
डोंबिवली मध्ये गेल्या काहि दिवसात घरफोडीचे प्रमाण वाढले होते. मानपाडा पोलीस हद्दीतील आढवली - ढोकळी गावामध्ये घरफोडी झाल्याचा प्रकार नुकताच घडला होता. यामध्ये कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना  मानपाडा पोलिस स्टेशनचे हवालदार व पोलीस उपनिरीक्षक यांनी वरिष्ठांच्या सहकार्याने सीसीटीव्हीच्या आधारे सराईत चोरट्यास अटक केली. त्याकडे चोकशी केली असता आरोपी हा इगतपुरी वरून कल्याण- डोंबिवली मध्ये भाजीविक्री करण्यास येत असत व अजून अश्याच प्रकारच्या चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून यामध्ये एकूण ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्धेमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला असल्याचेपोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले
----------
7. मसाल्याच्या गोदामातून १५ हजाराची चिल्लर चोरीला
डोंबिवली मधील सुनीलनगर येथील मच्छिंद्र कुटे यांच्या मसाल्याच्या गोदामात चोरीची घटना घडली. चोरट्याने गोदामाचे शटर उचकटून गोदामातील १५ हजार रुपयांची चिल्लर आणि ५ हजार रुपये किंमतीचे पापड, लोणचे, मसाल्याची पाकिटे चोरुन नेली आहेत. ही चोरीची घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.  याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोराचा शोध घेत आहेत
---------
8. मोकाट कठाळ्या कुत्र्याचा बंदोबस्त लावा - नगरसेवक पवार 
जालना जिल्ह्यातील देहेडकरवाडीत परिसरात मोकाट कठाळ्या व कुत्राचा बदोबस्त लावा अशी मागणी शिवसेना गटनेते ,नगरसेवक विजय पवार यांनी जालना नगर परिषदेकडे केली आहे. रिक्षा ड्रायव्हर धन्यकुमार हिरप यांच्यावर कठाळ्या कुत्र्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या कंबरेला पायाला मार लागला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यानं एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिरप यांच्या नातेवाइकानी याबद्दल नागरदेवाक विजय पवार यांच्याकडे तक्रार केली असता नगरसेवक पवार यांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे 
---------
9. टोयोटा कडून सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार लाँच
टोयोटा मोटर कॉर्पोरेशनने C+pod अल्ट्रा कॉम्पॅक्ट बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच केली आहे. ही कार कॉर्पोरेट युजर्स, लोकल गवर्मेंट आणि इतर कंपन्यांसाठी उपलब्ध केली आहे. टोयोटा कंपनी सध्या Battery Electric Vehicle ला प्रोमोट करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये नवीन बिझनेस मॉडेल आणि 2022 पर्यंत लाँच होणाऱ्या वाहनांचा समावेश आहे.  
-------
10. जायबंदी उमेशच्या जागी नटराजनचा समावेश
तमिळनाडूचा उदयोन्मुख डावखुरा वेगवान गोलंदाज नटराजनचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी जायबंदी उमेश यादवच्या जागी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय दुखापतीमुळे यापूर्वीच संघाबाहेर गेलेल्या मोहम्मद शमीऐवजी मुंबईकर शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.  



सह्याद्री टॉप २४ न्यूज - कोरोनामुळे कोरेगाव भीमा विजयस्तंभाला घरातूनच अभिवादन

 News24सह्याद्री - कोरोनामुळे कोरेगाव भीमा विजयस्तंभाला घरातूनच अभिवादन...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES



30 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

   News24सह्याद्री -  धान्यापासून इथेनॉल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. मकरविलक्कू उत्सवासाठी आज खुलं होणार शबरीमला मंदिर

केरळचे प्रसिध्द शबरीमला मंदिर बुधवारपासून खुलं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या मकरविलक्कू या उत्सवासाठी आज संध्याकाळी पाच वाजता हे मंदिर खुलं करण्यात येत असून भाविकांना उद्यापासून दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. त्रावणकोर देवसोम बोर्डने या संबंधी एक निवेदन प्रसिध्द केलं असून 31 डिसेंबर ते 19 जानेवारीपर्यंत भाविकांना भगवान अयप्पाच्या दर्शनासाठी हे मंदिर खुलं राहणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर 20 जानेवारीला हे मंदिर पुन्हा बंद करण्यात येणार आहे.
-------
2. धान्यापासून इथेनॉल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकीत इथेनॉलच्या उत्पादनासंबंधी मोठा निर्णय झालाय. कॅबिनेटनं इथेनॉलचं उत्पादनावर सबसिडी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. सरकार इथेनॉल उत्पादनावर कंपन्यांना व्याज सबसिडी देणार आहे. त्याशिवाय धान्यापासून इथेनॉल तयार करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिलीय. आता उसाशिवाय तांदूळ, मका, गव्हापासून इथेनॉल तयार केलं जाऊ शकतं.
---------
3. हरियाणात भाजपाला जोरदार धक्का
कर्नाटसोबतच भाजपा सत्ताधारी असलेल्या हरियाणामध्येही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. शेतकरी आंदोलनाने पंजाब, हरियाणातील वातावरण तापलेले असतानाच नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्याने याचा थेट फटका भाजपाला बसल्याचे दिसत आहे. यामुळे दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका भाजपाला गमवाव्या लागल्या आहेत.
-----
4. सज्ञान जोडपे एकत्र राहू शकते
तरुणाचे लग्नाचे वय झाले नसेल, मात्र तो कायद्याने सज्ञान असेल, तरी त्याला सज्ञान जोडीदारासोबत राहण्याचा अधिकार आहे, असं पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने स्पष्ट केलं. भारतात तरुणांना वयाच्या 21 व्या, तर तरुणींना 18 व्या वर्षी विवाह करण्याचा अधिकार प्राप्त होतो. परंतु हायकोर्टाच्या निर्णयामुळे लग्नाचं वय न गाठलेल्या, मात्र कायद्याने सज्ञान म्हणजेच 18 वर्षांवरीलव्यक्तींना लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार मिळाला आहे.  
-------
5. शेतकऱ्यांसोबत कृषी आणि रेल्वेमंत्र्यांंचं जेवण
मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला कायद्यात दुरुस्त नको, तर कायदा रद्द करुन हमी भावाचा कायदा करण्याची मागणी केलीय. तसेच याच अटीवर चर्चेसाठी तयारी दाखवलीय. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होणार याकडे आंदोलनकारी शेतकऱ्यांसह देशाचं लक्ष आहे. त्यातच कोणत्याही परिस्थिती कायदा मागे घेणार नाही अशी भाषा करणाऱ्या मोदी सरकारचीही बॉडी लँग्वेज बदललेली दिसत आहे. मात्र आज केंद्राचे दोन मंत्र्यांनी शेतकऱ्यांनी आणलेलं जेवण करत काहीशी नरमाईची भूमिका दाखवली आहे  
------
6. शिवसेना यूपीमध्ये पंचायत निवडणुका लढवणार
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) आणिएआयएमआयएम पक्षानंतर आता शिवसेनाही आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सेमीफायनल मानल्या जाणार्‍या पंचायत निवडणुका मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत. यासाठी अनेक राजकीय पक्ष तयारीमध्ये गुंतले आहेत.  
------------
7. केडीएमसीच्या बारावे प्रकल्पात प्लास्टीक पासून इंधन तेलाची निर्मिती
कल्याण डोंबिवली महापालिकेने सीएसआर फंडातून बारावे येथे उभारलेल्या प्रकल्पात प्लास्टीक पासून इंधन तेल तयार करण्यात यश आले आहे. या प्रकल्पाची काल चाचणी घेण्यात आली. पहिल्याच चाचणीत प्रकल्पात प्लास्टीक पासून ८५ लिटर इंधन तेलाची निर्मिती केली आहे. रिसेल व्हॅल्यू नसलेले प्लास्टीक वापरून इंधन तेलाची निर्मिती केली आहे. महापालिकेस सीएसआर फंड प्राप्त झाला होता. महापालिकेने बारावे येथे प्लास्टीक पासून इंधन तेलाचा प्रकल्प उभारला आहे. रुद्र इन्व्हारमेंट सोल्यूशन लिमीटेड आणि कल्याण डोंबिवली महापालिका हा प्रकल्प संयुक्त विद्यमाने चालविणार आहे.  
-------
8. सायरस पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण' द्या; मनसेची मागणी
 सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून या संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी अनेक रोगांवर लस उपलब्ध करून दिल्या आहेत. आता ही संस्था कोविडवरील लसीचं संशोधन करत आहे. सायरस पुनावाला यांचं हे योगदान लक्षात घेऊन त्यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे.  
-------
9. 18 गावे वगळण्याचा वाद टोकाला
कल्याण डोंबिवली महापालिकेतून 18 गावे वगळण्याचा राज्य सरकारच्या निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निकाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सरकार दाद मागू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ही शक्यता खरी ठरली आहे. राज्य सरकार आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे.  
--------
10. भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीचा अपघात
भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अजहरुद्दीन हे थोडक्यात बचावले आहेत. राजस्थानच्या लालसोट कोटा मेगा हायवेवर हा अपघात झाला आहे. सुरवाल पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली.  


27 डिसेंबर Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - 'किसान रेल्वे' ला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES


1. मोदी सरकारला धक्क्यावर धक्के सुरुच
भाजपप्रणित NDA आणि पर्यायाने केंद्रातील मोदी सरकारला धक्क्यावर धक्के सुरुच आहेत. कारण कृषी कायद्यावरुन आणखी एका मित्रपक्षाने NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानातील राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने भाजपची साथ सोडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते हनुमान बेनीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, हा निर्णय जाहीर केला.  
----------
2. शेतकरी संघटना 29 डिसेंबर रोजी सरकारसोबत चर्चेस तयार
केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांनी सरकारशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी संघटनांनी सरकारबरोबर पुढच्या फेरीतील चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, या चर्चेसंदर्भात शेतकरी संघटनांनी चार अटी सरकारसमोर ठेवल्या आहेत. सरकारने तीनही नवीन कृषी कायदे रद्द करावे, एमएसपीची कायदेशीर हमी द्यावी, वीज बिलाच्या मसुद्यात बदल करावा ,पराली कायद्यातून शेतकऱ्यांना वगळावे ह्या चार अटी शेतकऱ्यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत.
---------
3. 'किसान रेल्वे' ला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील 100 व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडणार आहे. या प्रसंगी पंतप्रधानांसोबत रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या दरम्यान धावणारी ही किसान रेल्वे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहे असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. ही किसान रेल्वे देशातील 100 वी किसान रेल्वे असणार आहे.
-------
4. सीबीएसई दहावी,बारावी बोर्डाचे वेळापत्रक ३१ डिसेंबर रोजी जाहीर होणार
सीबीएसई 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा 31 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरु झाले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. मात्र यावर शिक्षणमंत्री पोखरीयाल यांनी 31 डिसेंबरला याबाबतच वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे  
---------
5. आगामी निवडणुकीत भाजपला यश मिळणारच - केंद्रीय राज्यमंत्री दानवे 
प्रत्येक घटनेचे अवलोकन करून भारतीय जनता पक्ष वाटचाल करीत असून व्यक्तिगत आधारित पक्ष म्हणून भाजपा नसून सामुहिक नेतृत्वाचा पक्ष असल्यामुळे महाराष्ट्रात तीन विचार धारेचे वेगवेगळे पक्ष एकत्रित येऊन भाजपा द्वेषाने निवडणुकीमध्ये मैदानात उभे राहिले तरी जनता जनार्धनाचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्व व कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी महानगर पालिका,नगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळणारच असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केले. पक्ष व पंतप्रधान मोदी त्यांच्या कामांचा प्रचार- प्रसार तसेच पक्षाने राम मंदिर निर्माणाचे काम,कलम ३७० रद्द केले आहे. हि कामे सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे ही आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले.दानवे हे खाजगी कार्यक्रमासाठी अकोल्यात आले होते . यावेळी ते बोलत होते.  
-----------
6. कोरोना विरुध्द लढाई; विद्यार्थ्यांची पथ नाटयाद्वारे जनजागृती
उल्हासनगर कँम्प.नंबर पाच येथील स्वामी हंसमुनि महाविद्यालयाच्या एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यद्वारे कोरोनाच्या विरुध्द लढायचे कसे यासंदर्भात शहरातील विविध विभागात जावुन जनजागृती केली. आणी कोरोना काळात मुत्त्यु पावलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उल्हासनगर सिंधु एज्युकेशन सोसायटी,एस.एच.एम.महाविद्यालय,अतुल्य विचार फाउंडेशन,वान्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिललाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन खंदारे,व उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, जेष्ट समाजसेविका रेखा ठाकुर,आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
----------
7. चंद्रपूरमध्ये भाजपचे डिजिटल सदस्य नोंदणी पर्व सुरू
भारतरत्न पंतप्रधान स्व .अटलबिहारी बाजपेयी यांच्या 95 व्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी पर्वाला सुरवात करण्यात आली या अभियानाचा शुभारंभ आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. बाबू पेठ स्थित माजी पंतप्रधान अटलबिहारी स्टेडियम येथील अटलजींच्या पुतळ्याला आदरांजली स्वरूप माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच डिजिटल सदस्य नोंदणीपर्वाला सुरवात होत आहे. 25 जानेवारी पर्यंत अटल डिजिटल भाजप सदस्य नोंदणी अभियान राबविले जाणार आहे .
------------
8. डोंबिवलीत प्रथमच महिलांसाठी विशेष वैद्यकीय शिबीर  
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यात प्रथमच डोंबिवलीतील कोपरगाव येथील ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी महिलांसाठी हिमोग्लोबिन चेकअप शिबिर ठेवले होते. काही दिवसांपूर्वी कोपरगाव येथे रक्तदान शिबीर भरविले होते. त्यावेळी काही महिला रक्तदान करण्यासाठी आल्या होत्या. मात्र हिमोग्लोबिनची कमतरता असल्याने त्यांना रक्तदान करता आले नाही. म्हणून मी यावर उपाययोजना करावी म्हणून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली. खासदार डॉ.शिंदे यांनी महिलांसाठी विशेष वैद्यकीय शिबीर भरविण्यास सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार शिबीर भरविले असून या शिबिरात अनेक  महिलांनी शरीरातील हिमोग्लोबिनची तपासणी करून घेतल्याची माहिती रमेश म्हात्रे यांनी दिली. 
------------
9. गोळीबारात एकाचा मृत्यू 
अकोला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील बाभूळगाव जहाँगीर नजीक सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अकोल्यातील खोलेश्वर येथील गोपाल हनुमान प्रसाद अग्रवाल यांच्यावर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पाठलाग करीत दोन गोळ्या झाडल्या यामध्ये त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .  या हल्लेखोरांनी गोळीबार करून रोकड घेऊन घटना स्थळाहून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच एमआय डि सी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे सुरु केले आहे. यावेळी गोपाल अग्रवाल यांची नेमकी हत्या का व कशासाठी झाली त्या मागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरां विरोधात गुन्हे दाखल करून तपास सुरु केला आहे.
----------
10. कर्णधार अजिंक्य रहाणेचे बॉक्सिंग डे कसोटीत दमदार नेतृत्त्व
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरदुसरा कसोटी सामना खेळण्यात येतोय. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली भारतात परतला आहे. त्यामुळे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे या कसोटी मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. रहाणेने या दुसऱ्या कसोटीत आपल्या नेतृत्वाची चूणुक दाखवून दिली. तसेच रहाणेने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. रहाणेने आपल्याकडे असलेल्या गोलंदाजांचा योग्य आणि गरजेनुसार वापर केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करण्यास यश आले.  

मोठी बातमी - अण्णा हजारे करणार दिल्लीला आंदोलन

  News24सह्याद्री - 


राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या २५ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. नव्या कृषी कायद्यांना या शेतकऱ्यांचा विरोध आहे. याबाबत सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप सरकारला त्यावर यश मिळालेल नाही. अण्णा हजारे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होत, आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी दिल्लीतील 6 शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ अण्णांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीत दाखल झाले आहे.  या शिष्टमंडळा बरोबर अण्णा हजारे यांनी चर्चा केली , त्यांनतर अण्णांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

अण्णा हजारे यांनी लोकपाल कायद्यासाठी दिल्ली येथे मोठे आंदोलन आणि उपोषण केले होते या आंदोलनाला देशभरातून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळला होता दरम्यान आता जवळपास २४ दिवसापासून सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अण्णांनी स्वतः पाठिंबा दरसवला आहे ,त्याचबरोबर सरकराने आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून दिली तर दिल्लीला आंदोलन करणार असल्याचे अण्णांनी स्पष्ट केले आहे , यामुळे आता शेतकऱ्यांच्या  या आंदोलनाला वेगळ वळण मिळण्याची शक्यता आहे 

गॉसिप कल्ला - जुहीचा झुमका शोधणाऱ्याला मिळणार बक्षीस

         News24सह्याद्री - जुहीचा झुमका शोधणाऱ्याला मिळणार बक्षीस...पहा गॉसिप कल्ला


TOP HEADLINES


1. दक्षिणात्य सुपरस्टार राणा दग्गुबाती याचा वाढदिवस

2. सोनू सूद गरीब मजुरांना ई-रिक्शा भेट देणार

3. थलायवी’चं शूटिंग पूर्ण

4. जुहीचा झुमका शोधणाऱ्याला मिळणार बक्षीस



14 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा

   News24सह्याद्री - पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

१.ख्रिसमस आणि 'न्यू इयर'वर कोरोनाचं सावट ' 

२.महाराजा'साठी कोण बोली लावणार

३.चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन

४.भारतात मोठा हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट

५.राजस्थानमध्ये नगर परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसची मुसंडी

६.शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होणार

७.आज  वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण

८.भिवंडीत विना परवाना फाईट क्लब

९.अवकाळी पावसानं महाराष्ट्र का धास्तावला

१०.पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन



14 डिसेंबर Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - एक वर्ष बेपत्ता असणाऱ्या तरुणाचा सापडला सांगाडा....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. अन्नदात्यांचं आज 'उपोषण'

2. पुंछमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

3. डिसेंबरच्या अखेरपर्यंत EPF वर मिळणार 8.50 टक्के व्याज

4. भाजप नेत्यांना नैराश्य, त्यांचे चेहरे पडलेले - उपमुख्यमंत्री 

5. लोकल खाली उडी घेवुन प्रेमी युगुलाची आत्महत्या  

6. वृद्ध महिलेचे दागिने हिसकावून चोरट्यांचा पोबारा 

7. कचऱ्यातील टाकाऊ कपड्यापासून साकारणार कापडी पिशवी

8. नागपुरातून चोरी झालेला टँकर नवेगावबांध येथे सापडला   

9. एक वर्ष बेपत्ता असणाऱ्या तरुणाचा सापडला सांगाडा 

10. लासिन मठाच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा माजी सहकार मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ  




Contact Me

Name

Email *

Message *