२० मे-गुडमॉर्निंग सह्याद्री
NEWS24सह्याद्री-थेट हायवेवर होर्डिंग लावून प्रपोज-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा....
११ फेब्रुवारी-जयंत पाटलांचं शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रॉमिस.
NEWS24सह्याद्रि
'प्रॉमिस डे' चे औचित्य साधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्याचे प्रॉमिस आदरणीय शरद पवारसाहेब आणि कार्यकर्त्यांना केले आहे. मंत्री जयंत पाटील यांचे सोशल मीडिया तसे तरुणांमध्ये असणाऱ्या ट्रेंडवर नेहमीच लक्ष असते. सोशल मीडियावर असलेला ट्रेंड ते नेहमीच फॉलोही करतात. सध्या सोशल मीडियावर व्हेलेंटाईन वीकचा ट्रेंड सुरू असून व्हेलेंटाईन वीकमध्ये आज 'प्रॉमिस डे' आहे हे लक्षात येताच मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार आणि कार्यकर्त्यांना ट्वीटरवर 'प्रॉमिस' केले आहे.
जयंत पाटील यांनी आपट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आज प्रॉमिस डे' ! आजच्या या दिनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी,वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे जयंत पाटीलल्या यांनी म्हटले.
५ फेब्रुवारी -उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?
उदयनराजे भोसले यांची राष्ट्रवादीमध्ये पुन्हा घरवापसी होणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या असून त्यावर उदयनराजेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजे भोसले यांनी २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सध्या उदयनराजे भोसले भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा तशीच चर्चा सुरू झाली आहे ती उदयनराजे भोसले यांच्या घरवापसीची अर्थात ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची. उदयनराजे भोसले यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.
उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी साताऱ्यातील विकास कामांविषयी आपली अजित पवारांशी चर्चा झाल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. “अजित पवारांसोबत विकास कामांबाबत चर्चा झाली. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात अजित पवारांना विनंती केली”, असं ते म्हणाले.
५ फेब्रुवारी-बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांसमोर हजर
NEWS24सह्याद्रि
वाई :गुरुवारी साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेने दंडवत आणि दंडुका असे आंदोलन केले. या वेळी विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी व महिला नेत्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्त्यव्या प्रकरणी बंडातात्यांसह १२५ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.आज त्यांना सातारा पोलिसांनी पिपरंद ता फलटण राष्ट्रसंत गुरुवर्य दीक्षित आश्रमात भेटून पोलिसात हजर होण्याबाबत कळवले. त्यानंतर बंडातात्या कराडकर पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.
बंडा तात्या कराडकर यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली त्यावेळी त्यांचा जबाब घेण्यात आला. त्यामुळे त्यांना अद्याप पर्यंत अटक केलेली नाही. अटक करण्याची गरज देखील नाही,असे अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केले आहे .गुरुवारी केलेल्या आंदोलनाप्रकरणी व करोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा समिन्द्राताई जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात बंडा तात्या कराडकर यांच्याविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल केली आहे.
सरकारने घेतलेल्या वाईनच्या बाबतीतल्या निर्णयावर या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी जमली होती. त्या सर्वानी करोना नियमाचे उल्लंघन केले. यामुळे पोलिसांनी प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडा तात्या कराडकर, विकास शंकर जवळ, मनोज निंबाळकर यांच्यासह १२५ जणांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर टीका करत खालच्या पातळीवर टीका केली होती.बंडातात्या कराडकर पोलीस ठाण्यात हजर झाले. गुरुवारी केलेल्या आंदोलनाची आणि वक्तव्याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याच दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिस ठाणे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.