Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label dilli. Show all posts

९ फेब्रुवारी-मोठी बातमी

  News२४सह्याद्री: संजय राऊत यांची दिल्लीमध्ये स्फोटक पत्रकार परिषद......पहा संपूर्ण बातमी....





११ डिसेंबर - गुडमॉर्निंग सह्याद्री

 News२४सह्याद्री : नवे संरक्षण दल प्रमुख नेमण्यासाठी सरकारच्या हालचाली.....पहा देशभरातील महत्वाच्या घडामोडी गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये.....




                         TOP HEADLINES


शेतकरी आंदोलन मागे
--------------------
नवे संरक्षण दल प्रमुख नेमण्यासाठी सरकारच्या हालचाली
---------------------
कतरिना-विकीच्या लग्नाच्या फोटोंना 20 मिनिटांत 1 मिलियन लाइक्स
----------------------
विधान परिषदेचे १७ आमदार पुढील वर्षी निवृत्त

सह्याद्री सुपरफास्ट - ७ डिसेंबर

News24 सह्याद्री : कुडाळ नगरपंचायत मध्ये आघाडीत बिघाडी....पहा ! देशभरातील  महत्वाच्या बातम्या...

                         



१. कुडाळ नगरपंचायत मध्ये आघाडीत बिघाडी

२. धुळ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे एकविरा देवीला साकडे

३. तुमच्या आयुष्याची किंमत राहिलेली नाही – नितेश राणे





६ डिसेंबर - सह्याद्री सुपरफास्ट

  News24 सह्याद्री : मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून एजाज पटेलचा सत्कार....पहा ! देशभरातील  महत्वाच्या बातम्या...



                                          
                               TOP HEADLINES



विश्व हिंदू परिषदेच्या माजी अध्यक्षांचा मोदी सरकारला टोला
---------------------
"एक वही एक पेन" अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद
---------------------
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून एजाज पटेलचा सत्कार
----------------------
राज ठाकरेंचा नाशिक दौरा पुढे ढकलला
-----------------------
नागालँड गोळीबारावर शहांचं उत्तर

५ डिसेंबर - गुडमॉर्निंग सहयाद्री

   NEWS24सह्याद्री : जानेवारीत तिसरी महाभयंकर लाट - प्रोफेसर मणिंद्र अग्रवाल...पहा सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये... 




                                           TOP HEADLINES



*फेसबुक, गूगल इंडियाचा जाहिरात महसूल सर्वाधिक*
-----------------------
*पुण्यात दाट धुक्याचा आजही विमान वाहतुकीला फटका*
-----------------------
*पुण्यात महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर*
-----------------------
*अवकाळी पावसानंतर मुंबईत दाट धुक्याची चादर*
-----------------------
*पेट्रोल-डिझेलचे आजचे दर आज स्थिर*

गुडमॉर्निंग हेडलाईन्स - ४ डिसेंबर

   NEWS24सह्याद्री -: महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची  तपासणी ... पहा देशविदेशातील महत्वपूर्ण घडामोडी... 

                            


महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची  तपासणी

राज ठाकरेंचा जय श्रीराम नारा मनसेला नवसंजीवनी देणार?

सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

३ डिसेंबर - मॉर्निंग हेडलाईन्स

  NEWS24सह्याद्री -: 'तो' सल्ला मीच शरद पवारांना दिला होता, मलिकांचा गौप्यस्फोट.. पहा देशविदेशातील महत्वपूर्ण घडामोडी... 



TOP HEADLINES




*आयएमएफ मध्ये महिलाराज*
-------------------------
*यंदाचं साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना*!
-----------------------
*इंधन कंपन्यांनी ग्राहकांना दिला मोठा दिलासा*
-----------------------
*डिसेंबरमध्ये मनोरंजनाचा डबल डोस*
-----------------------
*मुंबई महापालिकेने ट्वीट केलेल्या फोटोवरून वाद निर्माण*

१९ नोव्हेंबर - मोठी बातमी

 

 News24सह्याद्री :‘रद्द केलेल्या केंद्रीय कृषी कायद्यांवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रतिक्रिया.. पहा... 




                         TOP HEADLINES



*पंतप्रधान मोदी यांनी केलेली घोषणा ऐकून आनंद झाला - अण्णा हजारे* 


सह्याद्री वेगवान आढावा-मोदींच्या घोषणेवर राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया


News24सह्याद्री :
... क्रिप्टोकरंसीबाबत लोकशाही देशांनी एक समान धोरण आखावं-मोदी..पहा देश विदेशातील  महत्वाच्या बातम्या .....





 

                                           *शरद पवारांच्या सरकारला सूचना*
                                                   -----------------
                                            
*गूगलकडून महत्वाची घोषणा*
                                                   -----------------
                                   *एसटी महामंडळ राबवणार युपी पॅटर्न*
                                              ------------------

१८ नोव्हेंबर - सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स

  News24सह्याद्री : फोन पे वरून दोघा भावांना सव्वा लाखाला फसवले...पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...


TOP HEADLINES


१.
नागपूरच्या नंदनवन पोलिस स्टेशनच्या हद्दीत हत्या…

२.
रेल्वेचा धार्मिक पर्यटनावर भर

३.
मेहबुबा मुफ्ती अनिश्चित काळासाठी नजर कैदेत


१८ नोव्हेंबर- गुडमॉर्निंग सह्याद्री

  News24सह्याद्री - १०० कोटी वसुली प्रकरणाला नवे वळण.. पहा देशभरातील महत्पूर्ण बातम्या.. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये.. 





 TOP HEADLINES


                        

*मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत*


१४नोव्हेंबर - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

  News24सह्याद्री : टीम इंडिया' करणार इंग्लंडचे अनुकरण; द्रविड पर्वात पडणार नवा पायंडा..पहा देशविदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये  




१३ नोव्हेंबर - मोठी बातमी

 

News24सह्याद्री - मोठी बातमी... संपूर्ण  बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक

 करा..








मॉर्निंग हेडलाईन्स - १३ नोव्हेंबर

  News24सह्याद्री :   महत्त्वाच्या चालू घडामोडी पहा  मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...!






१
नागपुरातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय

२
एसटी संपाचा आज सातवा दिवस, राजकीय घडामोडींना वेग

३
वादग्रस्त डीपीडिसी बैठक नियोजित तारखेलाच होणार

११ नोव्हेंबर - गॉसिप कल्ला

 News24सह्याद्री - गोल्डन शिमरी ड्रेसमध्ये खुललं सोनालीच सौंदर्य... पहा मनोरंजन विश्वातील महत्वपूर्ण घडामोडी सहयाद्री गॉसिप कल्लामध्ये... 



TOP HEADLINES


विक्की-कटरीना घेणार सात फेरे

बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कटरीना कैफ यांच्या विवाहाच्या बातम्या येऊ लागल्या असताना हे दोघे डिसेंबरच्या ७ ते १२ तारखेदरम्यान विवाह बंधनात बांधले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. सवाई माधोपुर येथील सिक्स सेन्स बरवाडा फोर्ट हॉटेल मध्ये हा विवाह होत असून त्याचे बुकिंग झाले आहे असेही समजते. लग्नानंतर हे दोघे त्यांचा संसार मुंबईच्या जुहू मधील एका अलिशान सदनिकेत मांडणार असून ही सदनिका त्यांनी भाड्याने घेतली आहे.. कटरीनाच्या सूर्यवंशीने सुद्धा जबरदस्त कमाई केली असून हे दोघे सध्या कामात प्रचंड व्यस्त आहेत असेही सांगितले जात आहे.

११ नोव्हेंबर - शहराची खबरबात


      News24सह्याद्री : *महिलेचा मृत्यू प्रकरणी मनपात चौकशी समिती*... पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये ... 







TOP HEADLINES


विभागीय आयुक्तांकडून आज चौकशी

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 11 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेशी  संबंधित असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटिसा पाठवल्या आहे. संबंधित सर्वांची आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी प्रक्रिया दिवसभर सुरू राहणार आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सहा नोव्हेंबरला लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेला. त्यानंतर विभागीय आयुक्त, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, आरोग्य विभागाचे प्रधान आणि अप्पर सचिव यांची रविवारी जिल्हा रुग्णालयात बैठक झाली. त्यामध्ये सर्व कारणांचा शोध घेण्यात आला आणि संबंधित असलेल्या सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
====================



 

३१ ऑक्टोबर - गुडमॉर्निंग सहयाद्री

   News24सह्याद्री:  वाहनचालकांना आता मोठा दंड लागणार....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ..



TOP HEADLINES  




वर्षा गायकवाड यांची सोनिया गांधींकडे तक्रार

 शालेय शिक्षणमंत्री तथा काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्याविरेाधात थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आलीय. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात गायकवाड यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याची योग्य दखल न घेतल्यामुळे ही तक्रार करण्यात आलीय. थेट हायकमांडकडे तक्रार केल्यामुळे गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.



२३ जुलै - वेगवान आढावा

    News24 सह्याद्री : मनसेचे हटवलेले होर्डिंग कार्यकर्त्यांनी पुन्हा लावले.... पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री वेगवान आढावामध्यें ....


TOP HEADLINES


भारतात २३ सप्टेंबर ला होणार अग्नि-५ या क्षेपणास्त्राची चाचणी

भारत २३ सप्टेंबर रोजी अग्नि-५ या क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे. अण्वस्त्रे वाहून नेणाची क्षमता असणाऱ्या या क्षेपणास्त्राची ही आठवी चाचणी असणार आहे. हे ५ हजार किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या लक्ष्याचा भेद घेऊ शकते. ५ हजार किलोमीटरच्या परिघात चीनची अनेक शहरे येत असल्याने या चाचणीनंतर चीनची चिंता वाढणार आहे. शिवाय या क्षेपणास्त्राचा वेग प्रचंड असल्याने पाकिस्तानलाही धडकी बसली आहे.


27 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

 News24सह्याद्री - चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे  चक्काजाम आंदोलन...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEALINES

1. विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणारा अटकेत.

अकोला शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या विशेष पथकाने विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास रंगेहात अटक केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकाजवळ एक जण विदेशी बनावटीचे पिस्टलसह येत आहे. त्याच्याकडे पिस्टल असून तो त्यांचा वापरही करू शकतो. 

2. संचारबंदीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व भाजप आमदारानी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा.
अकोल्यात जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात वाढविलेल्या संचारबंदीच्या विरोधात व्यापारी संघटना आणि भाजप आमदारांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. संचारबंदी वाढविल्यापेक्षा दुकाने जास्तवेळ उघडी ठेवण्यास परवानगी दिली तर कोरोना संसर्ग कमी होईल.तसेच व्यापाऱ्यांचे ही आर्थिक नुकसान होणार नाही,अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

3. पाचोरा तालुक्यातील घटना 
पिंपळगाव हरेश्वर येथील एका दलित कुटुंबातील २० वर्षीय तरुणीवर एका महिलेच्या मदतीने जिवे मारुन टाकण्याची धमकी देत शरीर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडून आरोपी गोपाल पाटील याच्या शेतातील पत्री शेडमध्ये तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला यातून ती गरोदर राहून तिने एका मुलीला जन्म दिला आहे. 

4. संत रविदास महाराज यांच्या जयंती 
संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी  मुकेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.. तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश अपार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

5. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा  मनमानी कारभार शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा आरोप
चोपडा येथील  कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 तारखेला  हरभरा मोजणी दरम्यान राडा झाला असून सदर शेतकऱ्याचा  हरभरा व्यापाऱ्याने सहा हजार तीनशे रुपये भावाने खरेदी केला व हरभराचे जवळपास 90 टक्के मोजणी सुद्धा झाली असताना व शेवटी हरभरा थोडाफार मोजणीचा  शिल्लक असतांना त्या मालाचा पुन्हा लिलाव  करून भाव ठरविणार व नन्तर  मोजणी करू असे व्यापाऱ्यांनी सांगितले या कारणावरून बाजार समितीच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते  .
       
6. चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे  चक्काजाम आंदोलन
चोपडा - येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडीच्या वतीने पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युची योग्य ती चौकशी व्हावी तसेच शिवसेनेचे नेते तथा वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्या द्यावा म्हणून होत असलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरा जवळील धरणगाव नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

7. ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी टी-20 वर्ल्ड कपमध्ये गेलचे पुनरागम
वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हटले गेलेल्या ख्रिस गेलचा आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड मध्ये समावेश करण्यात आला आहे. गेलनं वयाच्या 41 व्या वर्षी 18 महिन्यानंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी वेस्ट इंडिजनं सुरू केली आहे.

8. "मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपावाले माझ्यावर दिवसभर टीका करतात"
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले आहे तसेच मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

 9. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले 'कारण'
गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवरूनच विरोधक सरकारवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवरच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं विधान केलंय.

10. मराठीच्या मुद्द्यावरून भाजपचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप
आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने 2021 च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मरठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत आहे,' अशी विखारी टीका भाजपचे  मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.    

27 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

 News24सह्याद्री - मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबींवर चर्चा; बैठक होण्याची शक्यता....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मुलुंड टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं.

2. राज ठाकरे  यांना  कोरोना झाला तर सरकार जबाबदार नाही: विजय वडेट्टीवार
राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे

3. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चित्रा वाघ यांच्याकडून आणखी एक गंभीर आरोप
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्या दिवशी अरुण राठोडने पुणे कंट्रोल रुमला कबुली जवाब दिला होता. 

4. शिवसेनेनं भाजप नगरसेवकांच्या आर्थिक नाड्या आवळल्या 
 महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये  सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर आता भाजपनेही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सेनेचं नाक कापण्यासाठी तयारी सुरु केली आहे. 

5. अमरावतीत लॉकडाऊन वाढणार? कोरोना थांबेना

विदर्भातली कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचं वाढणारं प्रमाण प्रशासनाची झोप उडवणारं आहे. अमरावती जिल्हात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप थांबण्याचं नाव घेत नाही. 

6. तीव्र, अतितीव्र कुपोषणग्रस्त बालकांची वाढली संख्या

कोरोना काळात कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण आहार व अमृत आहार योजना सक्षमपणे राबविण्याचा दावा केला जात आहे; परंतु त्यानंतरही तीव्र व अतितीव्र स्वरूपातील कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढली आहे. 


7. महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण

गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर गावांमध्ये असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महानुभव पंथाच्या वतीने फिरत्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि साठ साधकांचा हा समूह जळगाव मध्ये काही दिवस राहून गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर या ठिकाणी असलेल्या महानुभव पंथाच्या आश्रमात आले होते.


8. शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे:  चित्रा वाघ

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केल्याची बातमी समजली तेव्हापासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ  यांनी केले. 

9. मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबींवर चर्चा? बैठक होण्याची शक्यता
मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

10. इंजिनिअरिंगचा अभ्यास आता मराठीतही उपलब्ध होणार
 मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित ठेवू नये. ते 365 दिवस चालू ठेवणे आवश्यक आहे, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ग्रंथालय संचालनालय आयोजित प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष आणि मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमावेळी त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले. 

Contact Me

Name

Email *

Message *