Breaking News

1/breakingnews/recent

11 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

       News24सह्याद्री - पोलीस दलात १२,५०० जागांसाठी जम्बो भरती....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. पंतप्रधान निधीतून भंडारा दुर्घटनेतील पीडितांना दोन लाखांची मदत 

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटना प्रकरणी पीडित कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तर या घटनेत जे गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना ५०,००० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ही मदत दिली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.  

2. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया 

 शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यावर फडणवीस यांनी आज हि प्रतिक्रया दिलीय. 

३.एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० ,रविवार, ११ एप्रिल २०२१ ला पार पडणार आहेत. याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार  असून  यासाठी आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे, उमेदवारांच्या हिताचे राहील. असे आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

४.पंढरपूरच्या गाढवांचे नशीब उघडले !

 कोंढवाड्यात पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे या गाढवांचं नशीब चमकल्याचं म्हटलं जात आहे . विशेष म्हणजे त्या गाढवांना रोज चारा टाकण्याचे काम पोलीस कर्मचारी करत होते. तसेच, गाढवं पळून जाऊ नये, यासाठी दोन होमगार्डचा बंदोबस्तही करण्यात आला होता.

५. २४वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार

6 जानेवारीला हि घटना  घडली होती, मात्र या घटनेनंतर तरुणीचं मानसिक स्वास्थ खचलं होतं. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने घडलेला सारा प्रकार नुकताच समोर आला आहे. ६लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर भोसरीत गुन्हा  दाखल 

6. हिंदू - जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीतील काही मजकुरावर आक्षेप

राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' या पुस्तकात नेमाडे यांनी लमाण समाजाच्या महिलांबाबत वादग्रस्त लिखाण केले आहे. यामुळे जाती आणि समाज यांच्यात द्वेषाची भावना निर्माण झाली आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आलंय . 

 ७.पोलीस दलात 12,500 जागांसाठी जम्बो भरती

अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर तीन टप्प्यात भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

८'मावळा' खोदणार कोस्टल रोडचा बोगदा

आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असे पुढेच राहू. त्यासाठी या लढाईत अशा अनेक "मावळ्यांची" कामगिरी महत्त्वाची ठरेल. मुंबईच्या दृष्टीने आजचा हा समाधान देणारा आणि महत्त्वाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय.    

९.सुनील ग्रोव्हर 'तांडव' वेबसीरिजमध्ये दिसणार

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवर बहुप्रतिक्षित अ‍ॅमेझॉन ओरिजिनल सीरिज 'तांडव'मधून एका नवीन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकतेच सुनीलने 'तांडव'बद्दल ऐकल्यानंतरची त्याची पहिली प्रतिक्रिया काय होती, त्याच्या विनोदी व्यक्तिमत्वाहून वेगळी अशी ही व्यक्तिरेखा त्याला कशी मिळाली याबद्दल त्याने माहिती दिलीय. 

१०.मुंबईत अंड्यांचे दर घसरले 

 मुंबईत आज  अंड्यांचे दर 6 रुपयांवरुन  5 रुपयांवर घसरले आहेत. तर येत्या दोन दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर अंडी  बाजारात दर 3 ते 4 रुपयांवर येण्याची भीती अंड्यांच्या व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.आज सकाळपासून एकही ग्राहक दुकानावर आला नसल्याची खंत अंडा विक्रेत्यांनी केली आहे. मात्र, नागरीकांनी घाबरु नये अशी विनंती दुकानदारांनी केली आहे..यावेळी सरकारने नागरिकांना मार्गदर्शन करण्याची विनंती विक्रेत्यांनी  केली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *