Breaking News

1/breakingnews/recent

काँग्रेसची मोठी घोषणा, आमचा स्टँड क्लिअर, महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार

No comments






मुंबई -

महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. देशात एका राज्याएवढे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. आता काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आम्ही वॉर्डमध्ये 100 दिवसांचा रिव्ह्यू प्लॅन आखलाय वॉर्डनिहाय रिव्ह्यू करणार आणि एकटं लढण्याची आमचा निर्णय ठाम असल्याचंही भाई जगताप यांनी अधोरेखित केलंय.

 मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मोफत पाणी देण्याची मागणीही या निमित्तानं काँग्रेसने केलीय. मनपाच्या तिजोरीवर केवळ 168 कोटींचा बोजा पडणार असला तरी मोफत पाणी देणं गरजेचे असल्याचंही मतही भाई जगतापांनी व्यक्त केलीय.पाणी माफिया मोठ्या प्रमणात पाणीचोरी करतात, त्याऐवजी हे पाणी गोरगरिबांना मिळायला हवं. देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत झोपडपट्टीवासीयांची घरे  नियमित करण्याच्या घोषणा केल्या, पण त्याचे पुढे काय झाले? असा प्रश्नही भाई जगपातांनी उपस्थित केलाय. बाळासाहेब थोरातांना मुंबईबद्दल आदर आहे मुंबई अध्यक्षाबद्दल हे आज ठरलेले नाहीये. आमचे प्रभारी एच. के. पाटलांनी जे काही सांगितले ते योग्यच असल्याचंही भाई जगतापांनी अधोरेखित केलेय. मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत. महाविकास आघाडीचे सदस्य आहोत.

 महाविकासआघाडी कॉमन मिनिमम प्रोगामवर चालते. त्यामुळे महापालिकेचा आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही. कारण आम्ही इथे विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे 227 जागांवर लढण्याचा मनसुबा मी पहिल्याच दिवशी सांगितला होता. मुंबई अध्यक्षपदाचा  पदभार स्वीकारला तेव्हा पुनर्ऊल्लेख केलाय होता, असंही भाई जगताप काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. आम्ही पुढील 100 दिवसांत प्रत्येक वॉर्डात जाऊ. तिथे जनता दरबार करू लोकांची काम करू त्या कार्यकर्त्याला विचारू आणि त्यानंतर वरिष्ठांना 227 जागा का लढायच्या हे सांगू असेही जगताप यांनी सांगितले होते. भाजपबरोबर सेना सत्तेत असताना मुंबई पालिकेत भाजप विरोधी पक्षात होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना भाकितं करायची सवय आहे. भविष्य पाहून सरकार येत‌ नाही असा टोलाही त्यांनी लगावला होता.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *