Breaking News

1/breakingnews/recent

8 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

     News24सह्याद्री -  खुशखबर! भारत बायोटेकनं बनवली कोरोनाची नेझल लस; DCGI कडे परवानगीसाठी निवेदन...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. "डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही"

अमेरिकेत जनमताचा कौल अमान्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन संकल्पनेचा, लोकशाहीचा अवमान केला आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय.डोनाल्ड ट्रम्प यांना स्वत:ला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

2. भारत बायोटेकनं बनवली कोरोनाची नेझल लस; DCGI कडे परवानगीसाठी निवेदन
 कोरोनाच्या लसीबाबत भारतानं अजून एक पाऊल उचललं आहे. भारत बायोtekकेनं कंपनीने आता नेझल स्प्रे लसीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला निवेदन दिलं आहे. चाचणीदरम्यान या नेझल स्प्रेचे चांगले परिणाम दिसून आल्यास कोरोनाच्या लढाईत यश मिळू शकतं. विशेष म्हणजे कोणत्याही इन्जेक्शनचा वापर न करता ही लस नाकाद्वारे दिली जाणार आहे. एका रिसर्चनुसार ही लस इंजेक्शच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरू शकते.  

3. दिल्लीमध्ये Bird Flu ची भीती! सेंट्रल पार्कमध्ये आढळले 100 मृत कावळे, 
प्रशासनाची घटनास्थळी धावकोरोना व्हायरसचा  सामना करणाऱ्या राजधानी दिल्लीमध्ये  आता बर्ड फ्लूची भीती निर्माण झाली आहे. दिल्लीमधील मयूर विहार सेंट्रल पार्कमध्ये 100 कावळ्यांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनं प्रशासन अलर्ट झालं आहे. या घटनेची माहिती समजताच डॉक्टरांच्या टीमनं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे. यापूर्वी केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये 'बर्ड फ्लू' च्या केस समोर आल्या होत्या.

4. काम करू की सत्कार स्वीकारू, अजितदादांनी प्रवक्त्याला सर्वांसमोर झापलं,
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच पक्षाचा प्रवक्त्याला भर गर्दीत झापल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ' काम करू की सत्कार स्वीकारू' असा दमच अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भरला.

5. मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान नाशिकला मिळाला ही आंनददायी बाब - छगन भुजबळ
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरात होणार असल्याची घोषणा आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली आहे. नाशिकला हा बहुमान मिळाल्याने आपल्यासाठी अतिशय आनंददायी बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

6. दरोड्याच्या घटनेची तपासणी करण्यासाठी मुंबई सायबर क्राईमची टीम येणार
नांदेड शहरातील वाजीराबाद येथील IDBI बँकेच्या चौदा कोटी रुपयाचा ऑनलाइन दरोडा प्रकरणाला तीन दिवस उलटले. तरीही ग्राहकांच्या पैशांविषयी IDBI आणि शंकर नागरी बँकेने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. हॅकरने IDBI बँकेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यातील तब्बल 14 कोटीच्या रकमेवर RTGS द्वारे डल्ला मारण्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. परंतु अद्याप या घटनेत ना IDBI बँकेने ना शंकर नागरी बँकेने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे या दोन्ही बँकेतील खातेदारांची धाकधूक मात्र वाढली आहे.

7. नेत्यांच्या हत्येप्रकरणी इराकच्या न्यायालयाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अटक वॉरंट
इराकच्या एका न्यायालयाने  गेल्या वर्षी एका इराणी जनरल आणि एका प्रभावशाली इराणी नेत्याच्या हत्येप्रकरणीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांच्याविरोधात गुरुवारी अटकेचे वॉरंट जारी केले आहे. कोर्टाच्या माध्यमप्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात  जनरल कासिम सुलेमानी आणि अबू माहदी अल मुहंदिस यांचा मृत्यू झाला होता, याच प्रकरणी बगदाद न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हे वॉरंट जारी केले आहे.

8.  चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी
चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालवा स्थळाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भेट दिली. राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणातून जे पाणी चंद्रपूरच्या वाट्याला येणार आहे, त्यातील घोडाझरी पर्यटन तलावाशेजारी असलेल्या कालव्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. विविध कंत्राटदारांनी थातूरमातूर कामे करून हे काम इरकले होते. महाविकास आघाडी सरकारने या कामाला गती देण्याचे निश्चित केले आहे. नागभीड तालुक्यातील या घोडाझरी कालवा स्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले होते.  

9. मराठा आरक्षणाचा विषय हाताळण्यात उद्धव ठाकरे कमी पडले, रामदास आठवलेंचा आरोप
“मराठा आरक्षणाचा विषय हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमी पडले आहेत,” असा थेट आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. “आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण द्यावं. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये,” असेही रामदास आठवलेंनी सांगितले.

10. अश्विनी बिद्रे प्रकरणाची कोर्टात सुनावणी; डीजीपी नगराळेंना सहआरोपी करण्याची पतीची पुन्हा मागणी
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे यांच्या हत्याप्रकरणाची आजपासून पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. लॉकडाऊनमुळे ही सुनावली थांबली होती. आता पुन्हा पनवेलच्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू होताच बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी या प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *