२४ मे-वेगवान आढाव
NEWS24सहयाद्री-मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 82 गुंदवली-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१५ मे-गुड मॉर्निंग सह्याद्री
NEWS 24 सह्याद्री-छत्रपती संभाजी महाराजांच्या शोभायात्रेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.....
१४ मे-सह्याद्री बुलेटिन
NEWS24सहयाद्री-गर्मी पासून दिलासा मिळावा यासाठी स्विमिंग पुलवर गर्दी-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१४ मे-गुड मॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सहयाद्री-वाराणसी ज्ञानवापी प्रकरणी सर्व्हेक्षणाचे व्हिडीओग्राफीचे काम आजपासून-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा,,,
१४ फेब्रुवारी - राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
NEWS24सह्याद्रि
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल.”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या टीकेला भुसावळ येथील एका कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी उत्तर दिलंय. “चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार असून महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्यात. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वणवण फिरावे लागत असल्याने ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत,” असा टोला खडसे यांनी लगावलाय.
१३ फेब्रुवारी- मुख्यमंत्री पदासाठी युतीधर्म मोडला-देवेंद्र फडणवीस..
NEWS24सह्याद्रि
महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिले आहे की,शिवसेनेने भाजपसोबत युतीमध्ये निवडणूक लढवली आणि सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बनवले. तुमच्या सर्व लोकांनी मोदीजींचे फोटो लावून लावून मत मागितली आणि केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा लगावला. मागील 25 वर्षापासून शिवसेना गोव्यात निवडणूक लढवत आहे. पण एकदाही ते त्यांच्या उमेदवाराचे डिपॉजीट वाचूव शकले नाहीत असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. आदित्य ठाकेरेंना इतिहासच माहित नाही. पूर्ण ताकतीने शिवसेना गोव्यात भाजप विरुद्ध लढली. आमची मते घेऊन आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला असे फडणवीस म्हणाले. इतिहास विसरुन हे लोकं बोलतात. मागच्यावेळी मी यांना उत्तर प्रदेशचीही आठवन करुन दिली. राम जन्माच्या आंदोलनानंतर उत्तर प्रेदशमध्ये 200 जागा हे लढले होते. एकाही जागेवर हे डिपॉजीट वाचवू शकले नाहीत. उलट यांनी प्रत्येक वेळी आम्हाला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला असेही फडणवीस म्हणाले.
सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.अशातच या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील अनेक नेते गोव्यात प्रचारासाठी तळ ठोकून बसले आहेत. यातीलच एक नेते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. फडणवीस हे सध्या गोव्यात प्रचार करत असून, गोव्यात भाजपची नेमकी स्थिती काय? भाजपला गोव्यात जनतेचा प्रतिसाद मिळतोय का? भाजपसमोर नेमकी आव्हानं काय आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाना साधला.
महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिले आहे ना भाजपसोबत युतीमध्ये निवडणूक लढले आणि सरकार काँग्रेस-एनसीपीसोबत बनवले. भाजपच्या स्टेजवर माननीय मोदीजींनी घोषणा केली भाजपच्या मुख्यमंत्र्याची, त्याला तुम्ही समर्थन दिलं. एवढचं नव्हे तर तुमच्या सर्व लोकांनी मोदीजींचे फोटो लावून लावून मत मागितली आणि केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला. महाराष्ट्रच्या जनतेला माहीती आहे की कोणी युती धर्म मोडला असे फडणवीस यावेळी म्हणाले.
हे सरकार वाईन आणि दारु विकणाऱ्यांकरीता जेवढी संवेदनशील आहे, तितकी कोणाही करता नाही. कोविड काळात कोणालाही मदत न करणाऱ्या सरकारने बार मालकांना मदत देण्यासाठी त्यांची लायसेंस फी कमी केली. गरिबांना मदत नाही पण बार मालकांना नुकसान झालं म्हणून त्यांना मदत दिली. त्यानंतर विदेशी मद्यावरचा कर आर्धा केला. वाईन प्रोत्साहन धोरण जाहीर करुन महाराष्ट्राला मद्य राज्य बनवण्याचं काम या सरकारने केलं. मला कळत नाही की हे सरकार का असं वागतय. याला आमचा विरोध असल्याचे फडणवीस म्हणाले.
१२ फेब्रुवारी-सोमय्या थेट चहावाल्याच्या दुकानात
NEWS24सह्याद्रि
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरसंदर्भात आरोप केले होते. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट चहावाल्याला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणातील त्या चहावाल्या सोमय्यांनी शोधलं आहे. त्या चहावाल्याच्या शोधात किरीट सोमय्या मुंबईच्या केईएम रुग्णालयासमोरील एका हॉटेलमध्ये पोहचले. यावेळी सोमय्यांनी हॉटेलची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, 'पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे 100 कोटींचे कंत्राट मुंबईतील सह्याद्री हॉटेल मालकाला देण्यात आले. राजीव साळुंखे यांच्या नावे हॉटेल आहे. ठाकरे सरकारने जम्बो कोविड सेंटरप्रकरणी घोटाळा केला आहे.'
यावेळी, सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका चहावाल्याला जम्बो कोविड सेंटरचे 100 कोंटींचे कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत परळमधल्या हॉटेलमध्ये सरप्राईज व्हिजिट दिली. परळमधील या चहावालाच्या सह्याद्री हॉटेलमध्ये पोहोचले. आणि हॉटेलमालकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोमय्या यांनी भेट दिली त्यावेळी हॉटेलचा मालक तिथे हजर नव्हता. यानंतर सोमय्या माध्यमांशी संवाद साधून काही वेळानंतर तिथून निघाले.
११ फेब्रुवारी-किरीट सोमय्या संतापले
NEWS24सह्याद्रि
पुणे महापालिकेत धक्काबुक्की झाल्यानंतर भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या पुन्हा एकदा पुण्यात दाखल झाले आहेत. किरीट सोमय्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळ्याप्रकरणी निवेदन देऊन कारवाईची मागणी करणार होते. पण यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याने किरीट सोमय्या पायरीवर पडून जखमी झाले होते. दरम्यान भाजपा आता त्याच पायरीवर किरीट सोमय्या यांचा सत्कार करत शिवसेनेला उत्तर देणार आहे. मात्र त्याआधी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच शिवसेनेवर गंभीर आरोप केले.
पुणे विमानतळावर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा ठेका उद्धव ठाकरेंना दिला आहे का? उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या मदतीने कोविडमध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केलं असून कारवाई झाली पाहिजे. मी आज पुन्हा एकदा पोलीस, महापालिका यांना आग्रह करणार आहे की, घोटाळा करणारी कंपनी हेल्थकेअर लाइफलाइन यांच्यावर कारवाई करा”.
“गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले आणि तक्रार होऊ दिली नाही. कारवाई कशी होत नाही, पाहतोच,’” असा इशारा यावेळी त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले की, “सत्काराला महत्व नाही. त्या कंपनीवर कारवाई करावी लागणारच आहे. संजय राऊतांना जाब द्यावा लागणार. संजय राऊत धमकी कोणाला देतात?”.
“संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आहे की मी लोकांचा जीव घेणार. बोगस कंपन्याकंडून कंत्राट घेणार, महाराष्ट्रातील लोकांची हत्या होऊ देणार आणि त्यानंतर काही होणार नाही असं वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. अनिल देशमुख जेलमध्ये गेलेत. संजय राऊतांचे मित्र, परिवार, पार्टनर यांच्यावर कारवाई होणारच,” असा विश्वास किरीट सोमय्यांनी व्यक्त केला आहे.
किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह १० जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांना जामीनदेखील मंजूर झाला. दरम्यान दुपारी ४ वाजता किरीट सोमय्या महापालिकेत येऊन आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ज्या पायरीवर सोमय्या यांना धक्काबुक्की झाली तिथे भाजपाकडून जंगी स्वागत आणि पुष्पहार घालण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून महापालिकेला छावणीचे स्वरुप आले आहे.
११ फेब्रुवारी -मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
आज राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचं उद्घाटन झालं यावेळी विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. रोज येत नव्हतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रपतींसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नुतनीकरण केलेल्या वास्तुसाठी मला आनंद होत आहे. आपल राजभवन हे देशातील सर्वोत्तम असेल. 50 एकरात हे राजभवन आहे. इथली हवा ही थंड असते. राजकीय हवा कशी ही असू द्या असाही टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री म्हणाले की, या वास्तुचा जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे जात आहोत. आधुनिकीकरणाच्या नावाखाली सर्व तोडून मोडून टाकलं जातं मात्र इथे जपलेलं आहे. या नवीन वास्तुमध्ये आनंददायी घटना घडाव्यात अशी अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
त्याचबरोबर दरबार हॉलचे अप्रतिम असं सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले आहे. मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन आहे. एका बाजूला अथांग समुद्र दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. पावसाळ्यात थुई थुई नाचणारे मोर आहेत. अशी वास्तू शोधून सापडणार नाही, असं ही ते म्हणाले.
११ फेब्रुवारी -'स्मारक शिवाजी पार्कात व्हावे अशी आमची ईच्छा नाही'
NEWS24सह्याद्री
आपले मनोगत व्यक्त करताना पंडित मंगेशकर म्हणाले की, भारतरत्न लता मंगेशकर, म्हणजे आमची दीदी, आमचीच नाही तर साऱ्या जगाची दीदी. तिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती पोकळी आकाशएवढी नाही, तर ती अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगानदी ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणारी नाही. लता मंगेशकरांच्या स्मारकावरून वाद चालू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबीयांनी या वादात भाग घेण्याचे काही कारण नाही. कारण दीदींचे स्मारक शिवाजी पार्कात व्हावे ही आमची ईच्छाच नाही.
पंडित मंगेशकर पुढे म्हणाले की, शिवाजी पार्कात दीदीचे स्मारक होण्याऐवजी उलट आमचे असे म्हणणे आहे की, शिवाजी पार्कातील स्मारकावरून जो राजकीय लोकांचा वाद सुरू झाला आहे तो वाद त्यांनी बंद करावा आणि दीदींच्याबाबत कृपया राजकारण करू नये. महाराष्ट्र सरकारने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. ती विनंती स्वत: लतादीदींनीच केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी ती मागणी अतिशय आनंदाने मान्य केलेली होती. त्याची सर्व पूर्वतयारी त्यांनी केलेली आहे. आता दीदीचे एक संगीत स्मारक होत आहे. त्यापेक्षा कोणतेही मोठे स्मारक होऊ शकत नाही.
७ फेब्रुवारी-नितेश राणे यांचा कोठडीतील मुक्काम वाढला
NEWS24सह्याद्रि
सध्या नितेश राणे न्यायालयानी कोठडीमध्ये आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. आता मंगळवारी त्यांच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. तुरुंगामध्ये न जाता प्रकृती अवस्थेचं कारण देत नितेश राणे सिंधुदुर्ग रुग्णालयात दाखल झालेत. आजची सुनावणी लांबल्याने त्यांचा मुक्काम वाढलाय. सरकारी वकिलांनी जिल्हा न्यायालयामध्ये म्हणणं मांडण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी केलेली. तेव्हा नितेश यांनी सुनावणी न्या. रोटे यांच्यासमोर नको अशी मागणी केली होती.
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये आज म्हणजेच सोमवारी दुपारी दोन वाजल्यानंतर सुनावणी होणं अपेक्षित होतं. मात्र भारतरत्न लता मंगेशकर यांचं दु:खद निधन झाल्याने राज्य सरकारने दुखवटा जाहीर करत सुट्टीची घोषणा केलीय. राज्य सरकारशीसंबंधित सर्व कार्यालयांबरोबरच न्यायालयीन कामकाज आणि बँकांचं कामकाजही बंद राहणार आहे. मात्र या सुट्टीचा आणि कामकाज बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका आता नितेश राणेंच्या या सुनावणीला बसणार आहे.
७ फेब्रुवारी-किरीट सोमय्या यांचे शिवसेनेवर पुन्हा गंभीर आरोप
पुणे महापालिकेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून आता कारवाईची मागणी केली जात आहे.दरम्यान किरीट सोमय्या यांनाही रुग्णलायातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
“शारिरीक इजा फार झालेली नाही. पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशाप्रकारे कट कारस्थान करतं.अमिताभ गुप्ता हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांनी राकेश वाधवानला पळवून लावलं होतं. सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालतही पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून रितसर कट रचला असल्याचं समोर आलं आहे. किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत. कारण संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडले आहेत. अनिल परब यांच्यावर तर कारवाईच सुरु झाली आहे. संजय राऊत. अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा सहभाग सापडला आहे. त्यांनी ठरवून हे केलं,”असाआरोप देखील किरीट सोमय्यांनी केला आहे.
“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा, दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता. हीच सूचना पोलीस आयुक्त आणि शहराध्यक्षांनाही दिली होती,” असंही ते म्हणाले आहेत.
४फेब्रुवारी- सदाभाऊ खोत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
NEWS24सह्याद्रि
वाईन विक्रीच्या मुद्यावरुन रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. यामध्ये हातभट्टी,मोहफुलांच्या वाईन विक्रीला परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राज्यातील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या निर्णयावर काही नेत्यांनी टीका केली आहे तर काही जणांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. दरम्यान, या मुद्यावरुन रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये त्यांनी वाईनप्रमाणेच गुळापासून बनवलेल्या हातभट्टीची वाईन आणि मोहाच्या फुलांची वाईन विकण्यासाठी मॉल व किराणा दुकानांमध्ये परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानामध्ये आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा जो निर्णय घेतला आहे, त्याचं महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आनंदाने स्वागत करत आहे. आपल्या या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादकांना सोन्याचे दिवस येणार आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी आपल्या घरावर या निर्णयामुळे गुढी उभारुन स्वागत केले आहे.
या पत्राद्वारे आपणास एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून देत आहे, की आपण वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील गुळ उत्पादक शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गुळ व्यवसाय हा सध्या मोठ्या अडचणीतून जात आहे. अनेक गुऱ्हाळघरे बंद पडलेले आहेत. ही गुऱ्हाळघरे जर नव्याने पूर्वीसारखी चालवायची असतील तर गुळापासून गावठी हातभट्टी वाईन बनवायला परवानगी देण्यात यावी. सदर वाईन ही कमी खर्चात तयार करता येईल. गुळाची वाईन तयार करायचे कारखाने गावागावांमध्ये उभा करता येतील. यातून रोजगार तर वाढेलच पण ऊस उत्पादकांना सोन्याचे दिवस येतील. तसेच आदिवासी शेतकऱ्यांनाही आपणास न्याय द्यावा लागेल. मोहाच्या फुलांची वाईन बनवून त्याच्या विक्रीला परवानगी द्यावी. कारण सध्या आपण शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहात, असे सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला प्रदूषणाचा विळखा
NEWS24सह्याद्री
चंद्रभागेच्या पाण्यात भाविक स्नान करून बाहेर येताच त्यांच्या अंगाला खाज सुटणे अश्या अनेक प्रकारचे त्रास होत असल्याची भाविकांची तक्रार आहे.पंढरपुरात गेल्या नंतर विठुरायाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा स्नान आणि पुंडलिकाचे म्हणजे संतांचे दर्शन घेण्याची परंपरा आहे .मात्र सध्या या चंद्रभागेच्या स्नानाला येणाऱ्या भाविकांना प्रदूषित झालेल्या चंद्रभागेमुळे त्वचा विकार होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. तसंच या पाण्यात आळ्या आणि किडेही मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. त्यामुळं तातडीने चंद्रभागेतील पाणी प्रवाहीत करून नदीचं प्रदूषण दूर करावं अशी मागणी वारकरी आणि स्थानीक नागरीकांनी केली आहे.
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे म्हणत विठुरायाच्या दर्शनाला येणारे हजारो भाविक आधी चंद्रभागेचे पवित्र स्नान करतात आणि मगच विठुरायाच्या दर्शनाला जातात. वारकरी संप्रदायात विठुरायाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा स्नान आणि पुंडलिकाचे म्हणजे संतांचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. मात्र सध्या या चंद्रभागेच्या स्नानाला येणाऱ्या भाविकांना प्रदूषित झालेल्या चंद्रभागेमुळे त्वचा विकार होण्यास सुरुवात झाली असून स्नान करून बाहेर आले की अंग खाजवायला सुरुवात होत असल्याची तक्रार भाविक करू लागले आहेत.
सध्या कोरोना सुरु असून याच पाण्यात स्नान केल्यामुळे त्वचा विकार वाढू लागले आहेत. या पाण्यात जनावरे आणि वाहने देखील धुतली जात असल्याने पाण्याला घाण दुर्गंधी येत आहे. विठ्ठल दर्शनाला देशभरातून येणार भाविक हा या पवित्र पाण्याने स्नान करतो तसेच हे पाणी तीर्थ म्हणून घेतो. मात्र प्रशासन या प्रदूषित पाण्याबाबत विचार करीत नसल्याने याचा फटका रोज हजारो भाविकांना बसत आहे.या गोष्टीला आळा बसण्यासाठी ठराविक दिवसानंतर चंद्रभागेतील पाणी बदलण्यासाठी तरी प्रशासनाने प्रयत्न केल्यास भाविकांना होणारे आरोग्याचे त्रास कमी होतील अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे . प्रशासनाचा गलथानपणा पाहायचा असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीपुन्हा चौकशी केली तर भाविकांना भोगाव्या लागणाऱ्या मरण यातना त्यांना समजतील अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी केली आहे.

