Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label highschool. Show all posts

१२ फेब्रुवारी- पॉझिटीव्ह असाल तरीही देता येणार दहावी बारवी च्या परीक्षा

NEWS२४सह्याद्रि 

दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू आहे.नुकतेच आलेल्या माहितीनुसार आता  पॅाझिटिव्ह विद्यार्थी पीपीई कीट घालून परीक्षा देणार आहेत, अशी माहिती नागपूर बोर्डाचे अध्यक्ष चिंतामन वंजारी यांनी दिली.
चार मार्चपासून बारावी, तर 14 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. लसीकरण झालं नाही तरी परीक्षा देता येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटात दहावी आणि बारावीची ऑफलाईन परीक्षा होणार आहे. नागपूर विभागातील परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाबाधित positive विद्यार्थ्यांना पीपीई कीट  घालून, स्वतंत्र रुममध्ये परीक्षा देता येणार आहे. शिवाय लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांनाही दहावी आणि बारावीची परीक्षा देता येणार, अशी माहिती नागपूर विभागीय बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी दिलीय. त्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. बोर्डानं सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था केलेली आहे. मुख्याध्यापकांच्या बैठका घेण्यात येत आहेत.त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे.

नागपूर विभागात बारावीचे 1536 परीक्षा केंद्र असून, एक लाख 62 हजार 519 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासोबतच 2496 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. 1 लाख 57 हजार 32 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. वेतनेत्तर अनुदानाचे 60 कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळं संस्थाचालक आपली शाळा परीक्षा केंद्राला देणार, अशी माहिती वंजारी यांनी दिलीय. विद्यार्थ्यांना काही समस्या आल्यास हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. शिवाय जिल्हास्तरावर समुपदेशक नियुक्त केलेले आहेत.त्यांना फोन करून माहिती घेता येईल.

दहावी, बारावीचे प्रात्याक्षिक परीक्षांचे साहित्य शाळांपर्यंत पोहचंलेलं आहे. बारावीच्या प्रश्नपत्रिका शाळांपर्यंत पोहचविण्याचं काम एक मार्चपासून सुरू होणारा आहे.त्यापूर्वी उत्तर पत्रिका शाळांपर्यंत पोहचणार आहेत. शाळा तिथं केंद्र राहणार आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांच्या सभा घेतल्या आहेत. उपसंचालकसुद्धा या सभेला होते. राज्याचे अध्यक्ष गोसावी यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे. परीक्षा कशी सुरक्षित पार पाडता येईल, याची इतंभूत माहिती दिली आहे. शिवाय सर्व मुख्याध्यापकांच्या ऑनलाईन सभा आयोजित केल्या आहेत. परीक्षा कशी घ्यायची. वातावरण कसं ठेवायचं, यासंदर्भात आणखी सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

११ फेब्रुवारी-दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याचा दावा चुकीचा

                                     
NEWS24सह्याद्रि 

काही यूट्यूब चॅनेल्सवरुन दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याचे व्हिडीओ शेअर  करुन संभ्रम निर्माण केला जात आहे. विविध व्हाटसअप ग्रुपवर शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडीओचं सत्य नेमकं काय आहे?

गेल्या काही दिवसांपूर्वी दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा रद्द करा या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेडमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनामुळं खळबळ उडाली होती. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंदूस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला पोलिसांनी अटक केली आहे. हिंदूस्थानी भाऊ सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे.दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं होतं. मात्र, हे होऊनही काही यूट्यूब चॅनेल्सवरुन दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याचे व्हिडीओ शेअर करुन संभ्रम निर्माण केला जात  आहे.

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी असं म्हणत विविध व्हिडीओ चॅनेल्स व्हिडीओ एडिट करुन दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचं दाखवण्यात येतंय. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्याचा दावा करण्यात येतोय. व्हिडीओत करण्यात असलेला दावा हा चुकीचा आहे.  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील.दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत, असं बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी 3 फेब्रुवारी रोजी सांगितलेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारचा व्हायरल व्हिडीओ तुमच्यापर्यंत आला तर तुम्ही त्यावर विश्वास ठेऊ नका अस आव्हान देखील त्यानी केलय,

Contact Me

Name

Email *

Message *