२७ एप्रिल -वेगवान आढावा
NEWS24 सह्याद्री-नवनीत राणांच्या अडचणीत आणखी वाढ-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा,,,
१४ फेब्रुवारी-जे उखडायचे ते उखडा; संजय राऊतांचा मोठा दावा
NEWS24सह्याद्रि
उद्या शिवसेना भवनात शिवसेनची पत्रकार परिषद होणार आहे. मी या पत्रकार परिषदेत असणारच पण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेत असतील. शिवसेना आणि ठाकरे परिवारांवर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल असं ते सांगत आहेत.शिवसेना आणि ठाकरे परिवारांवर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊच . अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जातील असंही वारंवार सांगितलं जात आहे. पण तुम्हाला सांगतो, भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील. आय रिपीट. आता बस्स झालं. राजकीय मर्यादांचं उल्लंघन तुम्ही केलं आहे. आता तुम्हाला कळेल काय असतं ते.त्याच बरोबर हमाम में सब नंगे होते है, असं विधान देखील शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. भाजपचे कोण नेते तुरुंगात जातील यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
१३फेब्रुवारी- उपोषणबद्दल अण्णा हजारेंचा महत्वपूर्ण निर्णय
अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत आज ग्रामसभा झाली.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार होते. मात्र, अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला.त्यामुळे अण्णांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतलाय.राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते.मात्र,अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला.वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली.अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे.त्यामुळे अण्णा आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत आज ग्रामसभा झाली.दरम्यान,यावेळी अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. अण्णांना वयाचा विचार करून उपोषण निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली.अखेर अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे.
११ फेब्रुवारी-चंद्रभागेतील दूषित पाण्यापासून वारकऱ्यांची अखेर सुटका
चंद्रभागेच्या पात्रामध्ये नवीन पाणी सोडायची व्यवस्था करण्यात आली आहे.आज माघ दशमी असून यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात पोहोचले आहेत.
पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या दूषित पाण्यामुळे भाविकांना त्वचा रोग होऊ लागल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने आदेश देत चंद्रभागेच्या पात्रामध्ये नवीन पाणी सोडायची व्यवस्था केली आहे. आज माघ दशमी असून यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात पोहोचले आहेत.
विठ्ठल दर्शनापूर्वी पवित्र चंद्रभागा स्नानाची परंपरा वारकरी संप्रदायात असल्याने हजारो भाविकांनी आज या शुद्ध पाण्यात स्नानाचा आनंद घेतला. चंद्रभागेवरील गुरसाळे बंधाऱ्यातून काल सायंकाळी पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने पूर्वीचे प्रदूषित झालेले अळ्यायुक्त पाणी आता वाहून गेले असून त्याठिकाणी हे नवीन पाणी पोचल्याने भाविकांना चांगल्या पाण्यात स्नान करता येत आहे.
सध्या एसटीचा संप अजूनही संपला नसल्याने यंदा कार्तिकी वारी प्रमाणे माघी यात्रेवरही परिणाम होईल असे वाटत असताना आज हजारोंच्या संख्येने भाविक मिळेल त्या वाहनाने पंढरपूरमध्ये पोहोचले आहे.
५फेब्रुवारी-हिंगणघाट जळीतकांड प्रकरण;अद्याप निकाल नाही
NEWS24सह्याद्रि
हिंगणघाट मधील शिक्षिकेच्या जळीत हत्याकांड प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत.हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे.संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता होती. मात्र आज निकाल लागणार नसल्याची माहिती आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट इथं आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवलं होतं. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपी विकेश नगराळेविरोधात तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आलेत. या प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपला असून आता निकालाची प्रतीक्षा आहे.
हिंगणघाट मधील शिक्षिकेच्या जळीत हत्याकांड प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. आज त्या संदर्भात हिंगणघाटच्या न्यायालयात निकाल अपेक्षित होता. मात्र, आजही निकाल लागणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर ती शिक्षिका शिकवत असलेल्या मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात नैराश्याचे वातावरण झाले आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट असल्यामुळे या प्रकरणी निकाल लवकर लागेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, घटनेला दोन वर्ष झाले तरी नराधम आरोपीला अजून शिक्षा झालेली नाही हे दुर्दैवी असल्याचे मत महाविद्यालयातील सहकारी शिक्षक व शिक्षिकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान एका तरुण शिक्षिकेला रस्त्यावर अशा पद्धतीने जिवंत जाळल्या गेल्यामुळे हिंगणघाट आणि ग्रामीण भागात वातावरण मोठ्या प्रमाणावर बदल्याचे मतही अनेक शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केले आहे. जळीत हत्याकांडाच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर महिला आणि मुलींच्या बाबतीत घरातून अनेक बंधनं लादली गेल्याचं त्यांचं मत आहे. एकटे बाहेर जाण्यापासून जास्त वेळ बाहेर रहण्याबद्दल ही निर्बंध असल्याचे महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचे मत आहे.
१३ डिसेंबर-मोठी बातमी-राजकारण्यांचा पोलीस ठाण्यात राडा
News२४सह्याद्री:-पोलिसांसमोर एकमेकांना शिवीगाळ; परस्परविरोधी गुन्हे दाखल.....पहा संपूर्ण बातमी.....