Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label devendrafadanvis. Show all posts

४ मे-सह्याद्री सुपरफास्ट

 NEWS24सह्याद्री-ओबीसींची अपरिमित हानी होणार आहे-फडणवीस-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






११फेब्रुवारी- संजय राऊत तुम्ही फडणवीसांच्या घराबाहेर याच आम्ही बघू..


NEWS24सहयाद्री 

संजय राऊत विरुद्ध भाजप  असा सामना सध्या रंगात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा मागे  लावण्यावरून संजय राऊतांनी आता भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही देवेंद्र फडणवीसच या चौकशी मागे लावण्यातमागे असल्याचे सांगत आरोप केले आहेत. त्याला आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत तुम्ही महाविकास आघाडीच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले आणि आत्ता या 3 पक्षातील कोणतेच नेते त्यांच्या समर्थनार्थ बोलत नाही आहेत. दुर्दैव आहे की ते आज एकटे पडले आहेत. ज्या माणसाला स्वतःच पक्षच कोणता हे कळत नाही आहे, अशी टीका त्यांनी राऊतांवर केली आहे. तसेच संजय राऊत तुम्ही फडणवीस साहेब यांच्या घराच्या बाहेर याच आम्ही बघू असं खुलं आव्हानही देऊन टाकलं आहे. 2014 ते 2021 प्रत्येक दिवस आणि इतके वर्ष भाजपच्या विरोधात तुम्ही लिहत आलात. 7 वर्ष तुम्ही भाजपला बदनाम करण्याचं काम करत आहात. गेली 7 वर्ष तुमच्या पाठी ED का लागली नाही? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

Contact Me

Name

Email *

Message *