Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label Nagpur. Show all posts

२८ फेब्रुवारी-मोठी बातमी

 NEWS 24 सह्याद्री-प्राजक्त तनपुरे यांच्या कारखान्याची मालमत्ता जप्त-संपूर्ण बातमीसाठी खालील लिन कव्हर क्लिक करा...



१२ फेब्रुवारी-नागपूर शहरात पाच ठिकाणी आग,मोठ्या प्रमाणात नुकसान

                               

NEWS24 सह्याद्रि 

नागपूर शहरात एकाच दिवशी पाच आगीच्या घटना घडल्या. त्यामुळं या आगी का लागल्या. याची कारणे वेगवेगळी असली, तरी शंकेला वाव आहे. आग विझविण्याचे आवाहन अग्निशमन विभागापुढं होते. त्यामुळं त्यांची चांगलीच कसरत झाली.यशोधरानगर परिसरातील लाकडाच्या कारखान्याला भीषण आग लागली. या कारखान्यात लाकडाचे दरवाजे तसेच भुसा आणि केमिकलपासून दरवाजे तसेच फ्रेम बनविल्या जात होत्या. लाकूड असल्याने आग वाऱ्यासारखी पसरली. मात्र फायर ब्रिगेडचे जवान आणि पोलिसांनी या ठिकाणी पोहचत काम सुरू केलं. 9 फायरच्या गाड्यांच्या माध्यमातून आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आग सतत भडकत होती. त्यामुळे आजूबाजूला धोका वाढला होता. फायर ब्रिगेडच्या जवानांनी शेवटी आगीवर नियंत्रण मिळविले. या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती फायर ऑफिसर ए. चंदनखेडे यांनी दिली.

नागपूर शहरातली ही आग लागण्याची एकच घटना नव्हे, तर इतर पाच ठिकाणी अशा आगी लागल्या. पोलीस क्वॉर्टरच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला शुक्रवारी पहाटे आग लागली. लगेचच आगीचे लोळ सर्वत्र पसरले. अग्निशमन विभागाला बोलावण्यात आले. तीन बंब तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली. यात ढोबळे यांच्या फ्लॅटमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. तिसरी घटना अजनी परिसरात शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली. येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल समोरील आशा मेडिकल स्टोअर्सला आग लागली. यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

चौथी घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास इतवारी भागातील नमकगंज येथे घडली. तुळशीराम उमरेडकर यांच्या छतावरील स्टोअर रूमला आग लागली. आगीने जवळच्याच आत्माराम टॉवर इमारतीलाही आवाक्यात घेतले. या भीषण आगीमुळे गर्दी जमली होती. या घटनेत डॉ. श्याम छाडी यांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच या ठिकाणी गंजीपेठ व सिव्हील लाईन येथील अग्निशमन केंद्रातील चार गाड्या रवाना करण्यात आल्या. पाचवी घटना, सायंकाळी सहाच्या सुमारास कांजी हाऊस येथील आरामशीनला शॉट सर्किटमुळे आग लागली.तर वेगवेगळ्या पांच ठिकाणी लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुसान झाल्याचे निदर्शनास आले आहे ,




१० फेब्रुवारी- मोठी बातमी

 News२४सह्याद्री:-नागपूर मध्ये भाजप- काँग्रेस आमनेसामने...गडकरींच्या घरासमोर आंदोलनानंतर तणाव,मोठा पोलीस बंदोबस्त तैनात...पहा संपूर्ण बातमी....













६ फेब्रुवारी-नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू


NEWS24सह्याद्रि 

नागपूर येथे जिल्ह्यातील शेतात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा शॅाक लागून एका बिबट्याचा मृत्यू झालाय. रामटेक परिसरातील पंचाळा शिवारात ही घटना घडल्याच स्पष्ट झालाय तर या प्रकरणी शेतीत विद्युत प्रवाह सोडणाऱ्या नंदू शिवरकर याला अटक करण्यात आलीय.

वन्यप्राण्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होतं. विदर्भातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात याचा सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी नंदू शिवरकर यांनी विज  तारा सोडल्या, या तारांना स्पर्श झाल्याने दोन वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झालाय. यात नंदू शिवरकर या शेतकऱ्याला अटक करण्यात आलीय. रामटेक-पंचाळा रोडवरील पंचाळा शिवारात  बंद असलेल्या चित्रकूट वॉटर पार्कजवळील टॉवरजवळच्या शेतात ही घडना घडली. वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेला बिबट्याला स्पर्श झाला.यात एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे . मात्र, याबाबत वनविभागाला शुक्रवारी माहिती मिळाली.आणि त्यानंतर रामटेकचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केलिए . तर शनिवार याबाबत पंचनामा करून बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आणि त्या नंतर घटनास्थळी अग्नी देण्यात आला.

४फेब्रुवारी-नागपुरात वंदे मातरम् उद्यानाचे आज भूमिपूजन

NEWS24सह्याद्री 

नागपुरात वंदे मातरम उद्यान साकारण्यात येणार आहे . परमवीर चक्राने सन्मानित भारतीय सेनेच्या स्मृतीनिमित्त हे उद्यान तयार करण्यात येतंय. शुक्रवारी म्हणजेच आज  सायंकाळी सहा वाजता याचे भूमिपूजन होतेय.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस  यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने हे वंदे मातरम् उद्यान साकारण्यात येत आहे. मध्य नागपुरातील प्रभाग क्रमांक एकोणवीस बजेरिया या परिसरातील एम्प्रेस मॉल समोर हे तयार होणाराय. महापालिकेला 1.20 लाख वर्गफूट जागेत हे होणाराय. कारगिल वॉर हीरो परमवीरचक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते एम्प्रेस सिटी मॉलच्या समोर साकारण्यात येणाऱ्या वंदे मातरम् उद्यानाच्या
कार्याचे भूमिपूजन शुक्रवारी संध्याकाळी होईल. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहतील, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एम्प्रेस मॉलसमोरील 1.20 लाख वर्गफूट जागेत साकार होणाऱ्या वंदे मातरम् उद्यानाची विशेषत:, येथील व्यवस्था, येथे उभारण्यात येणारे शहिदांचे सिरॅमिकचे म्युरल आदी सर्व बाबींची माहिती देणारी संकल्प चित्रफीत तयार करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत चित्रफितचे प्रसारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओला स्वतः महापौर दयाशंकर तिवारी यांनी आवाज दिला आहे. या उद्यानाच्या माध्यमातून लोकांमध्ये भारतीय सैन्याबद्दल आकर्षण निर्माण व्हावे आणि भारतीय सेनेत नागपूर शहरातील आणि विदर्भीय जनतेत सैन्य भरतीबद्दल आकर्षण निर्माण होवून वातावरण निर्मीती करण्यासोबतच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय सैन्याला वैदर्भीय जनतेचे अभिवादन म्हणून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर कडून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. ‘वंदे मातरम्’ उद्यान या परिसरात 21 परमवीर चक्र विजेत्यांची ग्लास फायबरचे म्युरल राहणार आहे. सोबतच प्रत्येकांची जीवनी तेथे लावण्यात येणार आहे. या शिवाय ज्या युध्दामध्ये त्यांनी आपले शौर्य प्रदर्शित केले त्या युध्दभुमीचे चित्रांकन सुध्दा सिरॅमिकचे म्युरल प्रतिमेच्या पार्श्वमध्ये करण्यात येणार आहे. प्रतिमेच्या आजूबाजूला लॅन्डस्केप करून प्रत्येक प्रतिमेला सुशोभित करण्यात येणार आहे.




१८ नोव्हेंबर- गुडमॉर्निंग सह्याद्री

  News24सह्याद्री - १०० कोटी वसुली प्रकरणाला नवे वळण.. पहा देशभरातील महत्पूर्ण बातम्या.. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये.. 





 TOP HEADLINES


                        

*मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत*


१७ नोव्हेंबर- सह्याद्री बुलेटिन

  News24सह्याद्री समीर वानखेडे जन्मापासूनच मुस्लिम असल्याचा दावा.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...



TOP HEADLINES


 *महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी घोषणा*

२३ जुलै - गुडमॉर्निंग सह्याद्री

  News24सह्याद्री:  काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला :रामदास आठवले..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ..



TOP HEADLINES  





गिरीप्रेमींचे तीन दशकांचे स्वप्न झाले पूर्ण

केदारगंगा खोऱयातील 'मंदा 1' या शिखराच्या माथ्यावर गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी विजयी पताका फडकावली आहे. तब्बल 32 वर्षांनंतर भारतातील  गिर्यारोहकांनी हे यश मिळवले आहे. 6510 मीटर उंच आणि चढाईसाठी अत्यंत आव्हानात्मक असणाऱया शिखरावर केलेल्या चढाईबद्दल गिरीप्रेमींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गिरीप्रेमींच्या 10 जणांच्या टीमने 24 ऑगस्ट ला या  मोहिमेला सुरुवात केली होती  ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम झाली. ते स्वतः या मोहिमेत सहभागी झालेत.

27 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

 News24सह्याद्री मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबींवर चर्चा; बैठक होण्याची शक्यता....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मुलुंड टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं.

2. राज ठाकरे  यांना  कोरोना झाला तर सरकार जबाबदार नाही: विजय वडेट्टीवार
राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे

3. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चित्रा वाघ यांच्याकडून आणखी एक गंभीर आरोप
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्या दिवशी अरुण राठोडने पुणे कंट्रोल रुमला कबुली जवाब दिला होता. 

4. शिवसेनेनं भाजप नगरसेवकांच्या आर्थिक नाड्या आवळल्या 
 महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये  सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर आता भाजपनेही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सेनेचं नाक कापण्यासाठी तयारी सुरु केली आहे. 

5. अमरावतीत लॉकडाऊन वाढणार? कोरोना थांबेना

विदर्भातली कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचं वाढणारं प्रमाण प्रशासनाची झोप उडवणारं आहे. अमरावती जिल्हात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप थांबण्याचं नाव घेत नाही. 

6. तीव्र, अतितीव्र कुपोषणग्रस्त बालकांची वाढली संख्या

कोरोना काळात कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण आहार व अमृत आहार योजना सक्षमपणे राबविण्याचा दावा केला जात आहे; परंतु त्यानंतरही तीव्र व अतितीव्र स्वरूपातील कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढली आहे. 


7. महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण

गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर गावांमध्ये असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महानुभव पंथाच्या वतीने फिरत्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि साठ साधकांचा हा समूह जळगाव मध्ये काही दिवस राहून गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर या ठिकाणी असलेल्या महानुभव पंथाच्या आश्रमात आले होते.


8. शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे:  चित्रा वाघ

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केल्याची बातमी समजली तेव्हापासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ  यांनी केले. 

9. मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबींवर चर्चा? बैठक होण्याची शक्यता
मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

10. इंजिनिअरिंगचा अभ्यास आता मराठीतही उपलब्ध होणार
 मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित ठेवू नये. ते 365 दिवस चालू ठेवणे आवश्यक आहे, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ग्रंथालय संचालनालय आयोजित प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष आणि मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमावेळी त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले. 

27 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा

   News24सह्याद्री -  मुख्यमंत्र्यांकडून 'मराठी भाषा गौरव दिना'च्या शुभेच्छा...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1. मोदी, शहा यांच्या सूचनेनुसार
बंगालमध्ये आठ टप्पे?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी आठ टप्प्यांत मतदान घेण्यात येणार असल्याचे शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले, त्यावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

2. सुरतमध्ये महिलेचा पतीविरोधात आक्रमक पवित्रा  
गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीच्या दारू पिण्याच्या त्रासाला कंटाळून एक मोठे पाऊल उचलले आहे. महिलेने भावासोबत मिळून नवऱ्यासोबत केलेल्या कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने स्वतःच्या पतीला दोरीच्या सहाय्याने टेम्पोच्या मागे बांधले. यानंतर जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याला फरफटत नेले आहे. 

3. गोडसे समर्थकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर पालिकेचे नगरसेवक आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सन २०१७ मध्ये नथुराम गोडसेच्या प्रतीमेचे उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बाबूलाल चौरसिया यांचा सक्रीय सहभाग होता. 

4. मुख्यमंत्र्यांकडून 'मराठी भाषा गौरव दिना'च्या शुभेच्छा
कुसुमाग्रज जयंतीनिमित्ताने मराठी गौरव दिन साजरा केला जात असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन करत जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 'मी मराठी, माझी मराठी!' बाणा जपू या!,' असे आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले. 


5. इंग्लंडला मोठा धक्का

पाहुण्या इंग्लंड संघाला तिसऱ्या कसोटीत लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागलाय.. अहमदाबाद कसोटीत टीम इंडियानं १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे इंग्लंडचा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधून पत्ता कट झाला. त्यात त्यांना शनिवारी आणखी एक झटका बसला. 


6. आर्थिक सेवा या विषयावर मोदींचे वेबिनार

करोनामुळे देशाची अर्थव्यवस्था घसरत असताना बँकांनी उद्योगांची कर्जाची गरज  भागवावी, तसेच नवोद्योगांसाठी सुलभ आर्थिक साधने उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. खासगी क्षेत्राला पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी सार्वजनिक क्षेत्राचे अस्तित्व बँकिंग व विमा क्षेत्रात गरिबांसाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.


7. क्रिकेट स्पर्धेसाठी चक्क मेंढा, बोकड, कोंबडय़ांची बक्षिसे

वाळवा तालुक्यातील एका मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांसाठी चक्क मेंढा, बोकड, देशी कोंबडय़ा, अंडी अशा बक्षिसांची घोषणा केली आहे. वाळवा तालुक्यातील बोरगावच्या साथीदार ग्रुपच्या वतीने क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात  आलं आहे. 


8. अंबानींच्या बंगल्याबाहेर एक महिना रेकी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर शस्त्रास्त्राने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अंबानींच्या अँटालिया बंगल्याबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मोर आली आहे.

9. चित्रा वाघ अडचणीत

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती.

10. कोरोनामुळे पिफ चित्रपट महोत्सव लांबणीवर

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच पिफ पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे उद्धाटन 11 मार्चला होणार आहे. पिफ चित्रपट महोत्सव 11 ते 18 मार्च या कालावधीत असणार आहे. 


सह्याद्री टॉप २४ न्यूज - संशयास्पद गाडी विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती

   News24सह्याद्री - संशयास्पद गाडी विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES




26 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री -  नरेंद्र मोदींचे नाव स्टेडीयमला का दिले? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. नरेंद्र मोदींचे नाव स्टेडीयमला का दिले? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण

नरेंद्र मोदींचे नाव स्टेडीयमला का दिले? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण.. अहमदाबाद मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल या जगातल्या सर्वोत मोठ्या स्टेडीअमच्या उद्घाटन समारंभात स्टेडीअमचे नामकरण नरेंद्र मोदी केल्यानंतर सर्व स्थरातून टिका होत असताना बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दलची खात्री नसल्यानेच स्टेडिअमला आपलं नाव दिल्याची टीका केली आहे.

2. अकोला परिमंडळात ४८ तासात ३४० वीज चोरांवर कारवाई..17 लाखांची वीज चोरी
परिमंडळातील थकबाकी वसूलीचे आवाहन समोरअसतांना परिमंडळाअंतर्गत अकोला,बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात वीज चोरीचा वाढलेला प्रकार महावितरणसाठी मोठे आव्हान ठरत आहे.त्यामुळे महावितरणने वीज अशा चोराविरूध्द एक्शन घेत वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या धाडीत परिमंडळात गेल्या ४८ तासात ३४० वीज चोरांवर कारवाई केली आहेय.यामध्ये थेट वीज चोरी किंवा मीटरमध्ये फेर फार करून वीज चोरी करणाऱ्यांची संख्या ही ३२६ आहे. 

3. शिरपूर शहरात मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राबवायच्या उपाययोजना आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी 10 वाजता उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रमसिंग बांदल यांच्या अध्यक्षतेखाखाली आढावा बैठक झाली.या बैठकीनंतर शिरपूर शहरातील दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध येण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शहरात मास्क न वापरणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

4. अकोल्याच्या दामिनी पथकाच्या प्रमुखपदी पीएसआय स्वाती इथापे.
महिला व मुलींच्या छेडखानीला पायबंद घालणे आणि प्रत्येक महिलेला भयमुक्त वातावरणात वावरता यावे, म्हणून पोलिस दलाने स्वतंत्र दामिनी पथक गठित केले आहेय. अकोल्यात या पथकाच्या प्रमुख पदी पोलिस उपनिरीक्षक स्वाती मधुकर इथापे यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केली आहे.

5. पाच दिवसांपासून कचरा संकुलात पडून,परिसरात पसरली दुर्गंधी !
डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड येथील बालाजी गार्डनमध्ये 9 सोसायट्या असून 522 सदनिका असून 2 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. दरवर्षाला 55 लाख रुपये कर भरुनही पालिका प्रशासन रहिवाशांना सहकार्य करीत नाही. सोसायटी आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही.

6. पेट्रोलियम मंत्र्यांचं अजब विधान
इंधनाच्या वाढत्या दरांमुळे एकीकडे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना विरोधकांनीही या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला घेरलं आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हिवाळा संपल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी हिवाळ्यात मागणी वाढत असल्याने इंधनाचे दर वाढत असल्याचं वक्तव्य केलं आहे.

7. WHOने मानले नरेंद्र मोदींचे आभार
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानॉम घेबेरियसस यांनी गुरुवारी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छोट्या देशांना मदत करण्यासाठी आणि लस समानतेला समर्थन देण्यासाठी आभार मानले. त्यांनी अशी आशा व्यक्त केली की, इतर देशांनीही भारताच्या अनुसरण केले पाहिजे.

8. प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ;
केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. एका महिलेकडून रेल्वे पोलिसांकडून हा साठा जप्त केला असून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.

9. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचं वक्तव्य
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुनावलं आहे. दोन्ही नेत्यांनी केरळमध्ये आपल्या रॅलीदरम्यान डाव्या सरकारवर टीका केली होती. “वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केरळच्या बाबतीत वेगळा दृष्टीकोन असेल, पण डाव्यांबाबत त्यांची भावना मात्र समान आहे. याबाबीत त्यांचं एकमत आहे,” असं पिनराई विजयन यांनी म्हटलं आहे.

10. दैनंदिन प्रवाशांना, पासधारकांना प्रवेश नसल्याने संताप
मुंबई ते वलसाड दरम्यान धावणारी व हजारो दैनंदिन प्रवाशांचा आधार असणारी  वलसाड फास्ट पॅसेंजर ही गाडी १ मार्चपासून पुन्हा सुरू करण्याचे पश्चिम रेल्वेने योजिले आहे. मात्र, ही गाडी पूर्णपणे आरक्षित राहणार असल्याचे घोषित केल्याने दैनंदिन प्रवाशांना तसेच पासधारकांना या गाडीतून प्रवास करता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांत संताप व्यक्त होत आहे.


गॉसिप कल्ला - ऋतिक रोशन हाजीर हो, मुंबई क्राईम ब्रांचचं समन्स

News24सह्याद्री -  ऋतिक रोशन हाजीर हो, मुंबई क्राईम ब्रांचचं समन्स.पहा गॉसिप कल्ला मध्ये 


TOP HEADLINES


1. अपर्णा पुरोहित यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली वेब सीरिज ‘तांडव’  गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तांडव वेब सीरिजच्या समस्या काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित नुकतीच लखनऊमध्ये आपले बयान नोंदवण्यासाठी गेल्या होत्या. मात्र ..

2. ऋतिक रोशन हाजीर हो, मुंबई क्राईम ब्रांचचं समन्स,
अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनौत हे चांगले मित्र होते. मात्र , नंतर त्यांच्यात वाद झाल्या नंतर कंगनाने ऋतिक आपल्याला सतत इमेल पाठवून त्रास देत असल्याचा आरोप केला होता. यावेळी आपण कंगनाला कोणतेही इमेल पाठवले नसल्याचा खुलासा ऋतिकने केला होता. ऋतिक रोशनच्या तक्रारीच्या अनुषंगाने हा समन्स बजावण्यात आला आहे.

3. करीनाच्या बाळाला भेटायला पोहोचली सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान  यांना दुसऱ्यांदा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती.

4. किमोथेरपी सुरु असतानाच राखी सावंतच्या आईने मानले सलमानचे आभार

राखी सावंतची आई कॅन्सरशी झुंज देतेय. सध्या तिच्या आईवर किमोथेरपी सुरु आहे. काल राखीने आईचे फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून सगळ्यांना धक्का ...

5. राधिका आपटेचा बोल्ड ब्लॅक अँड व्हाइट फोटो होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिचा कधी फोटो तर कधी व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. नुकताच तिने ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

26 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री “मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या”....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही

राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असं भाजपाने स्पष्ट केलं आहे. राठोड यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असं भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केलं आहे. 

2. “मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या”

हिंगोलीमधील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये या तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केलीय. सेनगाव तालुक्यातील ताकातोडा गावाचे रहिवाशी असणाऱ्या नामदेव पतंगे या शेतकऱ्याने हे पत्र लिहीलं आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये पतंगे यांनी केलाय.

3. खरंच महाराष्ट्रात १ मार्चपासून लॉकडाउन लागणार आहे का?
महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी २१ फेब्रुवारीला राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. म्हणजेच १ मार्चला लॉकडाउन लावायचा की नाही यासंबंधी उद्धव ठाकरे निर्णय़ जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच सोशल मीडियावर लॉकडाउनची अफवा सुरु झाली आहे.

4. शिवसेनेची मोदींवर बोचरी टीका
जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यावरुन विरोधक टीका करत असताना शिवसेनेनेही यावरुन नाराजी जाहीर केली आहे. भारतरत्न सरदार पटेल यांचे नाव बदलून मोदींचं नाव देण्यावरुन शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

5. केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ

केरळमध्ये आज सकाळी प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रोटेक्शन टास्क फोर्सने जिलेटनच्या 100 पेक्षा जास्त कांड्या जप्त केल्या आहे. ही स्फोटक केरळच्या कोझिकोड रेल्वे स्थानकावर चेन्नई-मंगलपुरम या सुपरफास्ट ट्रेनमधून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशीसाठी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

6. पूजाची शेवटची फेसबूक पोस्ट आता चर्चेत
पूजा चव्हाणनं मंत्र्यासोबतच्या कथित संबंधात आत्महत्या केल्याची जोरात चर्चा असतानाच तिच्या शेवटच्या फेसबूक पोस्टचीही आता तेवढीत चर्चा होते आहे. ही चर्चा विशेषत: साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रात होतेय. मराठीच्या सार्वकालिन महान कादंबरीकाराबद्दल जी भाषा पूजा चव्हाणनं वापरली आहे त्यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत.

7. विदर्भात मंगलकार्यालयांवर वॉच
कोरोनामुळे विदर्भातील चार जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मंगलकार्यालयांवर वॉच ठेवण्यात येत आहे. तसेच सिनेमागृहे बंद करण्याचा विचार सुरू आहे. 

8. यंदाच्या मराठी साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यातच आता 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या महिन्यावर येऊन ठेपले असतांनाच स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याने संमेलनावर अनिश्चितेचे सावट आहे.

9. शेअर मार्केट एक हजार अंकांनी कोसळलं
जागतिक शेअर मार्केटमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव खाली आल्यानंतर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक हजार अंकांची घसरण पहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारातील 30 कंपन्यांच्या शेअर निर्देशांक 49,950.75 अंकांवर घसरला होता. नंतर त्यात काही सुधारणा होऊन तो पुन्हा 50,112.10 वर पोहचला. निफ्टीही 270.40 अंकांनी घसरल्याने ती 14,826.95 अंकावर पोहोचली.

10पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या २४ लोकल फेऱ्यालवकरच
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते विरार धिम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून मार्चपासून या मार्गावर १५ डब्यांच्या २४ फेऱ्याचालवण्याचा विचार होत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.


26 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा

  News24सह्याद्री -  शेतकरी आता १०० रुपये लिटर दराने दूध विकणार...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. इंधन दरवाढ हे धर्मसंकट - अर्थमंत्री
महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत. 

2. हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये 'युद्धविराम'
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नेहमीच कुरापती काढत गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानने शस्त्रसंधीचे पालन करू असे पुन्हा आश्वासन दिले आहे. यासंदर्भात हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या लष्कराने संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे.दोन्ही देशांचे डायरेक्टर जनरल्स ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांच्यामध्ये हॉटलाइनवर चर्चा झाली. 

3. स्फोटकं सापडल्याने मुंबईसह उपनगरांमध्ये हाय अलर्ट जारी
मुंबईतील हाय प्रोफाइल परिसरात स्फोटकं ठेवलेली गाडी साडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबई शहरासह उपनगरांमध्ये हाय अलर्ट  जारी केला आहे. तसंच बेवारस गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाकाबंदी करुन चोख सुरक्षा करण्याचे आदेशही पोलीस आयुक्तालयातून जारी करण्यात आले आहेत.

4. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवर स्फोटकं जप्त
रात्री मुंबईत स्फोटकं सापडल्याने खळबळ उडालेली असतानाच केरळमध्ये आज सकाळी कोझिकोड रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर स्फोटक सापडली आहेत. कोझिकोड स्टेशनवर चेन्नई-मंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये 117 जिलेटिन स्टिक आणि 350 डिटोनेटर सापडले आहे.

5. ग्राहकांना मिळणार घर खरेदीसाठी झटपट लोन
देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक आणि बांधकाम व्यावसायातील दिग्गज नाव शापूरजी पालोनजी रिअल एस्टेट यांच्या एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी दोघांनीही सामंजस्य करार केला. या अंतर्गत शापूरजी पालोनजी यांची घरं खरेदी करणाऱ्यांना फायदा होणार आहे.

6. शेतकरी आता 100 रुपये लिटर दराने दूध विकणार
दिल्लीत सुरू असलेलं शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू असून, ते आणखी तीव्र करण्याचे प्रयत्न सुरू आहे. विरोध आणखी तीव्र व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी काही कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. शेतकऱ्यांच्या या निर्णयांचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. 

7. ११ राज्यात कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक
देशातील 9 राज्ये दोन केंद्रशासित प्रदेश मिळून अकरा राज्यात  जाण्यासाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती करण्यात आली आहे. दिल्ली सरकारनेही महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि पंजाबमधील प्रवाशांना दिल्लीत एन्ट्री करण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक केला आहे. 

8. अ‍ॅमेझॉनवर बंदीची मागणी, 'कॅट'कडून आज भारत बंदचे आवाहन
देशभरातील व्यापार्‍यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटकडून जीएसटीच्या नियमांच्या समीक्षेची मागणी करत आज  भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनवर ताबडतोब बंदी लावण्याचीही मागणी व्यापार्‍यांकडून करण्यात आली आहे.

9. विधिमंडळाचे अधिवेशन 1 ते 10 मार्च, 8 मार्च रोजी अर्थसंकल्प
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत अधिवेशनाचा आटोपशीर कार्यक्रम ठरविण्यात आला. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10 मार्च चालणार असून प्रत्यक्ष कामकाज 8 दिवस चालणार आहे. 

10. अहमदाबाद पिचबाबत रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया
भारतानं इंग्लंडचा 10 विकेटनं पराभव केल्यानंतर अहमदाबाद पिचवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तिसरी टेस्ट फक्त दोन दिवसांमध्ये संपली. दुसऱ्या दिवशी तर तब्बल 17 विकेट्स पडल्या. त्यामुळे अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी  अहमदाबादचं पिच खराब असल्याचं म्हंटलं आहे. या टेस्टमध्ये सर्वात जास्त रन करणारा भारताचा ओपनर रोहित शर्माला तसं वाटत नाही.


सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाईन्स - दुसऱ्या टप्प्यात २७ कोटी लोकांना लस टोचणार

News24सह्याद्री - दुसऱ्या टप्प्यात २७ कोटी लोकांना लस टोचणार...पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये 




26 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - व्याजाचे पैसे वसुलीसाठी कल्याणात बिहार पॅटर्न.....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES


1. पाच दिवसांपासून कचरा संकुलात पडून,परिसरात पसरली दुर्गंधी
डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड येथील बालाजी गार्डनमध्ये 9 सोसायट्या असून 522 सदनिका असून 2 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. दरवर्षाला 55 लाख रुपये कर भरुनही पालिका प्रशासन रहिवाशांना सहकार्य करीत नाही. सोसायटी आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही. 

2. शाळा पुन्हा बंद ठेवण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश
राज्यभरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येत असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 

3. मतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील 43 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी ही माहिती दिली आहे. मतिमंद मुलांच्या या निवासी विद्यालयात जवळपास 69 जण शिकण्यासाठी आहेत. 

4. महाराष्ट्र शासनाला संत नामदेवांचा विसर
देशाचे प्रमुख व आद्य क्रांतिकारी संत म्हणून ओळख असलेल्या संत नामदेवांचा राज्य सरकारला विसर पडल्याचं दिसतं. संत नामदेव यांच्या 750 वे जयंती वर्ष असतानाही महापुरुषांच्या शासकीय अभिवादन यादीत संत नामदेव महाराजांचे नाव नाही. 

5. लग्नात उखाणा घेत ग्राहकांना वीज भरण्याचं आवाहन
कोरोना काळात जास्त वीज बिल आल्याने ग्राहक त्रस्त आहे तर महावितरण उरलेल्या थकबाकीमुळे ते संकटात आहेत. अशा वेळी महावितरण सध्या वीज बिल वसुली करत आहे. यावरून राजकारण ही तापलं अस असलं तरी एक महावितरणचे कर्मचारी मात्र आपल्या कामात किती कर्तव्यदक्ष आहेत याचं उदाहरण समोर आले आहे. 

6. 'वाढत्या रुग्णसंख्येत गडबड', मनसे आमदाराने उपस्थित केली शंका
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकही चक्रावले आहे. वातावरणातील बदलांमुळे ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून काही नागरिकांनी याची धास्ती घेतली आहे. लसीचा बाजार, विविध लॅब व इतर अर्थकारणाशी याचा संबंध जोडला जात आहे. याबाबत कुजबूज सुरू असतानाच मनसेने मात्र उघडपणे भूमिका घेतली आहे. 'मागील दोन अधिवेशनांपासून आम्ही लोकप्रतिनिधी हे बोलत होतो. 

7. व्याजाचे पैसे वसुलीसाठी कल्याणात बिहार पॅटर्न, नगरसेवकावर गुन्हा दाखल
कल्याण-डोंबिवलीमध्ये पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित व्हावा असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्याजाने घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी रिक्षाचालकाला भररस्त्यात फरफटत नेत, मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर परिसरात ही घटना घडली आहे.

8. कोरोनाचा फायदा घेत लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचा धक्कादायक प्रयत्न
कोरोनाचं संकट पुन्हा एकदा गडद झालं असताना, नागपुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत, स्वतःची तिजोरी काही स्वार्थी भरत आहेत.  नागपूर शहरातल्या जुना सुभेदार ले-आऊट इथल्या एका क्लबवर महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांना सोबत घेऊन धाड टाकली. त्यावेळी 450 स्क्वेअर फूट खोलीत दीडशेहून जास्त लोकांनी गर्दी केलेली आढळून आलं. 

9. इंधन दरवाढीविरोधात आज व्यापाऱ्यांचा भारत बंद
जीएसटीतील तूट भरून काढण्यासाठी डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किंमतींविरोधात आज भारत बंद पुकारण्यात आला आहे. या भारत बंदमध्ये सुमारे ८ कोटी छोटे व्यवसायिक सहभागी होतील. तसेच देशातील जवळपास १ कोटी वाहतूकदार आणि लघु उद्योग आणि महिला उद्योजकही यात सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे.  

10. पुणे जिल्ह्यात करोनाचे २१ हॉटस्पॉट; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले 'हे' आदेश
करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून रुग्णालयामध्ये खासगी एजन्सीकडून डॉक्टरांपासून ते वॉर्डबॉय पर्यंत मनुष्यबळाची व्यवस्था करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

सह्याद्री टॉप २४ न्यूज - वाघ असाल तर चित्राताईंसारखे व्हा; भाजपने शिवसेनेला डिवचलं

  News24सह्याद्री - वाघ असाल तर चित्राताईंसारखे व्हा; भाजपने शिवसेनेला डिवचलं....पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES




23 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

       News24सह्याद्री - गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिला इशारा..पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. आसमामध्ये एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी दिले संकेत
आगामी काळात आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांसह केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तारखेची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. कारण, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तसे संकेत दिले आहेत.

2. गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिला इशारा
लॉकडाउनसंदर्भात सोशल मीडियावर आलेला मेसेज फॉरवर्ड करत असाल, तर खबरदार… कारण लॉकडाउनबद्दलच्या मेसेजमुळे तुम्हाला पोलिसी कारवाईला सामोर जावं लागू शकतं. हो, हे खरं असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे. सोशल मीडियातून लॉकडाउन होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आहे. त्यामुळे सायबर सेलला लॉकडाउनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

3. ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांचे पेजेस फेसबुकवर पुन्हा दिसणार
शुल्क आकारण्याच्या आपल्या नव्या कायद्यात सुधारणा करण्याची तयारी ऑस्ट्रेलिया सरकारने दर्शवल्यानंतर अखेर फेसबुकनेही नरमाईची भूमिका घेतली आहे. प्रस्तावित नवीन कायद्यानुसार, फेसबुक आणि गुगलला बातम्या दाखवण्यासाठी माध्यम कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. या मीडिया लॉवरुन फेसबुकचा ऑस्ट्रेलिया सरकारशी संघर्ष सुरू आहे.

4. २६ जानेवारी हिंसाचार प्रकरणी २ प्रमुख आरोपींना अटक
२६ जानेवारी रोजी देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी २ प्रमुख आरोपींना अटक केली आहे. यामध्ये ४५ वर्षीय मोहिंदर सिंग आणि ३० वर्षीय मनदीप सिंग या दोघांचा समावेश आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांना जम्मूमधून अटक करण्यात आली आहे. 

5. जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यामागे काय आहे कारण ?
पूर्व लडाख सीमेवरुन भारत-चीन संबंधात निर्माण झालेला तणाव आता हळूहळू कमी होत आहे. लडाखच्या अतिक्रमण केलेल्या काही भागांमधून चिनी सैन्याने माघार घेतली असली, तरी अजूनही हा वाद पूर्णपणे मिटलेला नाही. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनने ब्रिक्स परिषद भारतात आयोजित करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

6. छाप्याच्या भीतीने साठा लपवत असताना स्फोट
कर्नाटकातील चिक्काबल्लापूर जिल्ह्यात मंगळवारी जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना झाली आहे. यात सहा जणांचा मृत्यू आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. उत्खनन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला आहे.

7. २३ फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांचा श्रीलंका दौरा नियोजित आहे
भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमानाला आपल्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्यासाठी परवानगी दिली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान पहिल्यांदाच श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून यावेळी त्यांचं विमान भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांचा श्रीलंका दौरा नियोजित आहे.

8. "माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार"
पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर असणारे संजय राठोड यांनी अखेर मौन सोडलं आहे. संजय राठोड पोहरादेवीत दर्शनासाठी पोहोचले होते, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

9. खासदार इम्तियाज जलील कोरोना पॉझिटिव्ह
मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथील एमआयएमचे मा.खासदार इम्तियाज जलील यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळते. मागील दोन-तीन दिवसापासून त्यांना कोरोना ची लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट घेतली असता त्यांना कोरोना असल्याचे कळाले.

10. दिग्विजय सुर्यवंशी सांगलीच्या महापौरपदी
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा फडकला असून राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत. या विजयाबरोबरच सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या एका वाक्याची आठवण विरोधकांना करुन दिली जात आहे. ‘टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच’ या वाक्याचा आज प्रत्यय आला असल्याचं राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांकडून सांगितलं जात आहे.  सांगली मनपावर राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा महापौर बसल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय.  


20 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

    News24सह्याद्री - नवी मुंबईत कोरोना धोका वाढला...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. चंद्रकांत पाटलांचा अजब दावा

राजकीय नेते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी धार्मिक तर राजकीय टीकांमुळे पुढारी चर्चेत येतात. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे एका कार्यक्रमातील भाषण व्हायरल झाले आहे. या भाषणात त्यांनी अजब दावा केला असून त्यांचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.

2. भारतात यंदा महिलांना मिळणार सगळ्यात जास्त नोकऱ्या
महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या जीवघेण्या काळामुळे आता नोकरी मिळणं मोठं कठीण झालं आहे. अशात आता तंत्रज्ञानाची मागणी वाढल्यामुळे तरुणांचा रोजगारही घटला आहे. पण डिजिटल क्रांतीमुळे महिलांच्या रोजगारामध्ये सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. 

3. पुण्यात 12 गावं कोरोनाची हॉटस्पॉट, चिंता वाढली
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येथील प्रशासन कोरोनाला थोपवण्याचा प्रयत्न करत असले तरी, म्हणावे तेवढे यश मिळत नाहीये. तालुका पातळीवर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून कोरोनाची धग गावकुसापर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील 12 गावं कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. 

4. संजय राऊतांकडून मोठी घोषणा
शिवेसना नेते संजय राऊत यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. राऊत यांनी पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी घोषणा केली आहे. ते पुण्यात बोलत होते

5. व्यापारी असोसिशनचा निर्णय
अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल अमरावती जिल्ह्यात 598 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी महानगर पालिका आयुक्तांयांनी शहरातील व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. शहरातील गजबजलेली आणि मुख्य बाजारपेठ समजणारी सक्कर साथ या बाजारपेठेतील दुकाने सायंकाळी सहा वाजताच बंद करण्याचा निर्णय इथल्या व्यापाऱ्यांनि घेतला आहे.

6. नवी मुंबईत कोरोना धोका वाढला,
महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने नवी मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्येही मोठी गर्दी होते. या ठिकाणी मास्कचा वापर होताना दिसत नाही. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगही पाहायला मिळत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत नवी मुबंई परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

7. आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना! – गिरीश महाजन
भाजपला रामराम ठोकून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमय झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांना यापूर्वीही दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक मागणी केली आहे. हा नेमका कोणत्या प्रकारचा कोरोना आहे, यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करावं अशी मागणीच गिरीश महाजन यांनी केली आहे. 

8. महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसचे ५.२ टक्के डोस गेले वाया
महाराष्ट्रात ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. पण आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेत ५.२ टक्के डोस वाया गेले. जवळपास ४० हजार डोस वाया गेले.

9. जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोटरीची चतुरसुत्री अंगिकारा  
चोपडा रोटरी क्लबची स्थापना 1971 साली झाली असून सदर क्लबचे प्रथम अध्यक्ष डॉ नवाल होते , चोपडा रोटरी क्लब ला 50 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा अरुणभाई गुजराथी बोलत होते .
    

Contact Me

Name

Email *

Message *