Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label saport. Show all posts

आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याच्या १२ दिवसांनंतर ते मायदेशी परतले




मुंबई -

 बायो बबल मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम ४ मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला ही स्पर्धा स्थगित करणे भाग पडले होते. त्यानंतर परदेशी खेळाडू, त्यातही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी कसे पाठवायचे? हा बीसीसीआयपुढे प्रश्न होता. भारतामध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली. त्यामुळे बीसीसीआयने ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचकांना मालदीव येथे पाठवण्याची व्यवस्था केली होती. मागील काही दिवस ते मालदीव येथेच थांबले होते. परंतु, आता रविवारी म्हणजेच आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याच्या १२ दिवसांनंतर ते चार्टर्ड विमानाने मायदेशी परत जाऊ शकतील.

यंदा १४ खेळाडूंसह एकूण ३८ ऑस्ट्रेलियन व्यक्ती या आयपीएलमध्ये सहभागी झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हवाई वाहतूक स्थगित केल्यामुळे त्यांना मायदेशी परतणे अशक्य झाले. मात्र, बीसीसीआयने त्यांची मालदीव येथे व्यवस्था करून दिली होती. आता त्यांना मायदेशी परण्यातची संधी मिळू शकेल. 'आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ३८ ऑस्ट्रेलियन लोकांना १६ मे रोजी चार्टर्ड विमानाने मालदीवहून आधी मलेशियाला आणि मग मलेशियाहून ऑस्ट्रेलियामध्ये नेण्यात येईल. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर त्यांना १४ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक असणार आहे,' अशी माहिती एका क्रिकेट वेबसाईटने दिली. ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत हवाई वाहतूक स्थगित केली आहे. परंतु, हा कालावधी वाढवण्यात येणार का, याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआयला माहिती मिळालेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाची आणि परवानगीची ते वाट पाहत आहेत. आयपीएलचा स्पर्धेचा यंदाचा मोसम ४ मे रोजी स्थगित करण्यात आला होता. मात्र, उर्वरित मोसम यावर्षीच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विश्वचषक खेळणारे ऑफ स्पीनर सूरज रणदीव सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बस चालक आहे



मुंबई -

सेहवागचे शतक हुकवणारे आता चालवत आहे बस श्रीलंकेने क्रिकेट संघासाठी २०११ च्या विश्वचषक खेळणारे ऑफ स्पीनर सूरज रणदीव सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बस चालक म्हणून काम करत आहे. मेलबर्नमधील ट्रान्सडेव कंपनीमध्ये सूरज सध्या बस चालक म्हणून करतोय. सूरजने श्रीलंकेने संघाकडून खेळताना १२ कसोटी सामनेही खेळले आहे. त्याच्या नावावर ४३ विकेट्सही आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची आकडेवारी सांगायची झाल्यास सूरजने श्रीलंकेसाठी ३१ एकदिवसीय सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ३६ विकेट्स घेतल्या आहे. त्याचप्रमाणे सर्वात जलद क्रिकेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी-२० प्रकारातील सात सामन्यांमध्ये सूरज श्रीलंकेने संघाचा भाग होता. त्याने या सात सामन्यांमध्ये सात बळी घेतले होते. सूरज रणदीव हा २०१९ पासून ऑस्ट्रेलियात राहत आहे. इथे तो बस चालवण्याबरोबरच एका स्थानिक क्रिकेट क्लबसाठीही खेळतो. त्याने २०१९ मध्ये स्थानिक पातळीवरील आपला शेवटचा सामना खेळला होता. 

२०१६ मध्ये सूरजने आपल्या देशासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळाला. त्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेदरम्यान सूरज हा मेलबर्न क्रिकेट मैदानामध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सराव घेणाऱ्या खेळाडूंमध्ये होता. सूरज रणदीव हा भारतीयांच्याही चांगलाच लक्षात असणारा श्रीलंकन खेळाडू आहे. मात्र यामागे गोड आठवणींऐवजी एक कटू आठवण आहे. २०१० साली दाम्बुलामध्ये ९९ धावांवर खेळणारा भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विरेंद्र सेहवाग याला शतकापासून रोखण्यासाठी सूरजने मुद्दाम नो बॉल टाकला होता. ९९ धावांवर खेळत असतानाच सेहवागने षटकार लगावला. या षटकारासहीत भारत जिंकला, मात्र नो बॉल असल्याने या धावा सेहवागच्या खात्यात जमा झाल्या नाही आणि तो ९९ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने यासाठी सूरजवर एका सामन्याची बंदी घातली होती. तसेच तिलकरत्ने दिलशानवरही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली. सूरज रणदीव हा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ससाठीही खेळला आहे. २०११ मध्ये त्याने सीएसकेकडून आठ सामने खेळताना सहा विकेट्स घेतल्या होत्या. याच वर्षी सीएसकेने अजिंक्यपद पटकावलं होतं.

हुक मारके दिखा, अख्तरने सेहवागला डिवचलं,शोएब सेहवागला चिडवून आऊट करण्याच्या विचारात



मुंबई -

सध्या खेळत असलेल्या टीम इंडिया आणि पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी. उभय संघात होणारा क्रिकेट सामना हा दोन्ही संघासाठी युद्धापेक्षा कमी नसतो. या दोन्ही संघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सामना खेळवण्यात आलेला नाही. पण आतार्यंत दोन्हा संघात खेळवण्यात आलेले सामने हे नेहमीच हायव्होल्टेज राहिले आहे. सामन्यांमध्ये दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये अनेकदा हमरीतुमरी पाहायला मिळाली आहे. अनेकदा काही खेळाडू हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते.  पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर सचिनने मारलेला सिक्सर आजही प्रत्यके भारतीय क्रिकेट चाहत्याला लक्षात आहे. आजपासून बरोबर 21 वर्षांपूर्वी हा सामना खेळवण्यात आला होता. या निमित्ताने आपण सिक्समागची इनसाईड स्टोरी जाणून घेणार आहोत.  1 मार्च 2003 रोजी सेंच्युरियनमध्ये वर्ल्ड कपमधील 36 वा सामना हा टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आला. 

एका बाजूला पाकिस्तानचे शोएब अख्तर, वसीम अकरम आणि वकार यूनुससारखे वेगवान गोलंदाज. तर दुसऱ्या बाजूला सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडसारखे दिग्गज फलंदाज होते. पाकिस्तानने टॉस जिंकला. सइद अनवरच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने भारताला विजयासाठी 274 धावांचे आव्हान दिले. विजयी आव्हानाचे पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही सलामी जोडी मैदानात आली. शोएब अख्तरने सुरुवातीपासूनच स्लेजिंग (डिवचणं) करण्याची सुरुवात केली. 

शोएब सेहवागला चिडवून आऊट करण्याच्या विचारात होता. शोएब सेहवागला हुक मारके दिखा असे सारखे म्हणत होता. यावर सेहवाग शोएबला म्हणाला की नॉन स्ट्राईकर एंडवर तुझा बाप उभा आहे. त्याला सांग.तो मारुन दाखवेल. नॉन स्ट्राईक एंडवर सचिन उभा होता.अख्तरने सेहवागला दिलेले चॅलेंज सचिनने स्वीकारालं. सचिननेने दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या चेंडू डॉट केला. दुसऱ्या चेंडूवर सचिनने एक धाव घेतली. तिसऱ्या बोलवर सेहवागने सिंगल रन घेतली. त्यामुळे पुन्हा सचिन स्ट्राईकवर आला. अख्तरचं चॅलेंज सचिनच्या डोक्यात होतं. सचिनने या चौथ्या चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने खणखणीत सिक्स खेचला. यामुळे मैदानात सचिनचा जयघोष करण्यात आला. यानंतर सेहवाग अख्तरला जाऊन म्हणाला, बाप बाप होता है, बेटा बेटा. सचिनने मारलेला हा सिक्स आजही चाहत्यांना चांगलाच लक्षात आहे.



‘या’ खेळाडूला वाढदिवशीच कोरोनाची लागण




मुंबई -

देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहे कोरोना हळूहळू डोकं वर काढत आहे. दररोज राज्यात काही हजारोंमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे प्रमखु, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि अभिनेता असलेला सलिल अंकोला  याला कोरोनाची लागण झाली आहे. अंकोल यांनी इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. दुर्देवाची बाब म्हणजे अंकोला यांना रविवारी कोरोना झाला आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. यामुळे त्यांचा वाढदिवस हा रुग्णालयातच साजरा करावा लागणार आहे. माझा उद्या वाढदिवस आहे आणि कोरोना झाला आहे. हा वाढदिवस माझ्यासाठी अविस्मरणीय असेल. 

कोरोनाची लागण झाल्याने मला भिती वाटत आहे. माझ्या लवकर बरा होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. मी लवकरच कोरोनावर मात करत परतेन अशा आशावाद अंकोलाने व्यक्त केला आहे. अंकोला यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरसोबत पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केले होते. हा सामना अंकोलाच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला आणि अखेरचा ठरला. त्यानंतर अंकोलाला टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच अंकोलाने भारताकडून खेळताना 20 एकदिवसीय सामन्यात 13 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. अंकोलाने आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना 13 फेब्रुवारी 1997 ला खेळला होता.


सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज सुरूवात केली



मुंबई -

अहमदाबाद येथे मोटेरा स्टेडियम येथे हा सामना रंगत आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झाला आहे. दिवस-रात्र पद्धतीचा असलेला हा सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळला जात आहे. या सामन्याला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थितीत असल्याने हा सामना खास ठरला आहे. सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज सुरूवात केली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण त्याचा हा निर्णय सुरूवातीच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला आहे. 

आपला १००वा सामना खेळणारा इशांत शर्मा याने इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिबली याला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर या सामन्यासाठी संधी मिळालेला जॉनी बेअरस्टो मैदानात आला. त्याने काही काळ संघर्ष केला. पण त्यालादेखील शून्यावर माघारी जावे लागले. ९ चेंडू खेळल्यावर तो अक्षर पटेलचा बळी ठरला आहे. इंग्लंडला सुरूवातीलाच दोन धक्के बसल्याने भारतीय गोलंदाजांचा आत्मविश्वास दुणावला आहे. पण त्यानंतर कर्णधार जो रूट आणि जॅक क्रॉली या दोघांनी अतिशय संयमी आणि संथ फलंदाजी करत डाव सावरला आहे. इंग्लंडने संघात चार बदल केले. जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो आणि जॅक क्रॉली या चौघांना संघात स्थान देण्यात आले. तर जो बर्न्स, लॉरेन्स, स्टोन आणि मोईन अली यांना संघातून वगळण्यात आले. भारतानेही संघात दोन बदल केले. सिराजच्या जागी बुमराहला संघात स्थान मिळाले. तसेच कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदर संघात आला.

जगातील सर्वात मोठं स्टेडियम मोटेरा, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने भिडणार, मोटर स्टेडिअमची खासियत



मुंबई -

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड हा सामना सर्वात मोठे स्टेडियम मोटर येथे होणार आहे. यांच्यातील तिसरा कसोटी सामना 24 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचे आयोजन जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर अर्थात अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर करण्यात आले आहे. हा सामना डे नाईट असणार आहे. विशेषे म्हणजे या मॅचमध्ये गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. या स्टेडियमचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने आपण या स्टेडियमचे नक्की वैशिष्ट्य काय आहेत, जगातील सर्वात मोठे म्हणावणाऱ्या या स्टेडियममध्ये इतर स्टेडियमच्या तुलनेत काय वेगळं आहे, हे आपण पाहणार आहोत. साधारणपणे कोणत्याही स्टेडियममध्ये 2 ड्रेसिंग असतात. पण मोटेरामध्ये तब्बल 4 ड्रेसिंग रुम आहेत. प्रत्येक ड्रेसिंग रुममध्ये सुसज्ज जीमची सोय आहे. या स्टेडियमध्ये एकूण 55 क्लबहाऊस आहेत. त्यात 3 प्रॅक्टीससाठीची मैदानं आणि 50 खोल्यांचा समावेश आहे. 

ऑलिम्पिकसाठी बनवतात तसा स्विमींग पूलसुद्धा या स्टेडियममध्ये आहे. इनडोअर क्रिकेट अकादमी, बॅडमिंटन, टेनिस कोर्ट, टेबल-टेनिस एरीना, स्क्वॅश एरीना, 3D प्रोजेक्टर असलेलं थिएटरही या स्टेडियममध्ये आहे. या स्टेडियममध्ये फ्लड लाइटऐवजी LED लाइट्स वापरलेत. यामुळे कशाचीच सावली दिसत नाही. अनेकदा खेळाडूंना सामन्यादरम्यान सावलीमुळे अडथळा निर्माण होता. प्रेक्षकांना सामन्याचा पूर्णपणे लाभ उचलता यावा यासाठी, स्टेडियमध्ये कुठेही पिलर उभारलेला नाही. ते हलकं आणि भूकंपरोधकसुद्धा आहे.स्टेडियमच्या ग्राऊंडवरची ड्रेनेज व्यवस्था ही जगातली सर्वात आधुनिक आहे. कितीही मोठा पाऊस पडो, पाऊस थांबला की अर्ध्या तासात मॅच खेळवता येणार आहे. मोटेरा स्टेडियमच्या मैदानात 4-6 नव्हे तर तब्बल 11 खेळपट्ट्या आहेत. लाल, काळी आणि दोन्ही प्रकारची माती अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या या खेळपट्ट्या आहेत. यातल्या काही वेगवान तर काही फिरकी गोलंदाजांस मदतशीर आहेत. स्पर्धेची, मॅचची गरज बघून खेळपट्टी निवडता येणार आहेत. या आधी या जुन्या स्टेडियममध्ये एकच प्रवेश मार्ग होता. 

तर नव्या स्टेडियमला तीन प्रवेश मार्ग आहेत. एक प्रवेशद्वार तर 16 स्कायवॉकद्वारे थेट मेट्रो स्टेशनला जोडलेले आहे. यामुळे प्रेक्षकांना थेट मेट्रो स्टेशनवरुन स्कॉयवॉकद्वारे येता येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण होणार नाही. हे स्टेडियम साबरमती नदीच्या किनाऱ्यावर एकूण 63 एकरावर बांधण्यात आलं आहे. या स्टेडियमची प्रेक्षक संख्या ही तब्बल 1 लाख 10 हजार इतकी आहे. प्रेक्षक संख्येच्या बाबतीत मोटेराने ऑस्ट्रेलियाच्या एमसीजी अर्थात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला पछाडलं आहे. एमसीची प्रेक्षक संख्या ही 1 लाख इतकी आहे. हे स्टेडियम पूर्णपणे तोडून बांधकामासाठी एकूण 5 वर्षांचा कालावधी लागला. हा स्टेडियम 2015 ला पूर्णपणे पाडण्यात आला. त्यानंतर या स्टेडियमच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली.

 या मोटेराचे स्टेडियमचे बांधकामासाठी देशातील अनेक नामचीन कंपन्यांनी टेंडर भरले होते. यामध्ये लार्सन अँड टुब्रो (677 कोटी ), शापूरजी पलूनजी (847 कोटी) आणि नागार्जुना कन्स्ट्रक्शन्स (1065 कोटी) यांचा समावेश होता. अखेर हे लार्सन अँड टुब्रोला मिळालं. लार्सन टुब्रोने 5 वर्षात सुसज्ज आणि क्रिकेटच्या दृष्टीने परिपू्ण स्टेडियमम बांधलं. या स्टेडियमच्या बांधकामासाठी एकूण 800 इतका खर्च आला या आधुनिक स्टेडियममध्ये एकूण 76 कॉर्पोरेट बॉक्स आहेत. एका बॉक्सची क्षमता ही 25 इतकी आहे. म्हणजेच एका वेळेस एका बॉक्समध्ये 25 जण ऐशोरामात बसून सामन्यांचा थरार अनुभवू शकणार आहेत. या स्टेडियममची अफाट अशी पार्किंग क्षमता आहे. एकाच वेळेस या स्टेडियममध्ये 3 हजार चारचाकी आणि 10 हजार दुचाकी पार्क करता येणार आहे. तसेच या स्टेडिमवर एकाचवेळी तब्बल 60 हजार लोके ये जा करतील इतका मोठा रँपही आहे.

भारताला मोठा धक्का, पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजारा दुखापतग्रस्त




मुंबई -

भारताला मोठा धक्का चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी अनुभवी चेतेश्वर पुजारा दुखापतग्रस्त झाला. उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे चेतेश्वर पुजारा दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. बीसीसीआयनं याबाबतची माहिती दिली आहे. दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराऐवजी क्षेत्ररक्षणासाठी मयांक अगरवाल मैदानात उतरला होता. पहिल्या दिवशी फलंदाजीदरम्यान पुजाराला दुखापत झाली होती. पुजाराची दुखापत कितपत गंभीर आहे याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही. पण तिसऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यात अनुभवी पुजाराची भारतीय संघाला गरज लागेल.

 पुजाराची जुखत गंभीर नसली तरीही संघ व्यवस्थापनाने काळजी म्हणून पुजाराला आराम देण्याचा निर्णय घेतला. चेन्नई येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पुजारानं ५८ चेंडूचा सामना करताना २१ धावांची छोटेखानी खेळी केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल शून्य धावसंख्येवर बाद झाल्यानंतर पुजारा मैदानात उतरला होता. पुजारानं रोहित शर्मासोबत दुसऱ्या गड्यासाठी ८५ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. भारतीय संघानं पहिल्या डावांत ३२९ धावांपर्यंत मजल मारली आहे. प्रत्त्युत्तर इंग्लंड संघानं ८७ धावांत ६ गडी गमावले आहे.


विराट कोहली आपल्या संघाला विजयाच्या वाटेवर नेण्यास पूर्णपणे सक्षम आहे - केविन पीटरसन




मुंबई -

केविन पीटरसन म्हणाला की इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनच्या मते विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदाबद्दल होणाऱ्या चर्चेला अर्थ नाही. ही चर्चा अनावश्यक आहे. पण कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चार कसोटी सामने गमावले आहे आणि त्यावेळी अजिंक्य रहाणे संघात होता, त्यामुळे ही चर्चा होतच राहणार आहे. भारतात कसोटी कर्णधारपदावरुन होणारी चर्चा टाळणे अशक्य आहे. कर्णधार म्हणून विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग चार सामने हरला आहे. त्याचवेळी अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियातील भारताच्या मालिका विजयाचे नेतृत्व केले आहे. असे पीटरसनने ‘बेटवे’साठी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. पितृत्वासाठी घेतलेली रजा संपवून विराट कोहली पुन्हा एकदा नियमित कर्णधार म्हणून परतला आहे. 

पण इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातच भारताला पराभव पत्करावा लागला आहे. सोशल मीडिया, प्रत्येक रेडिओ स्टेशन आणि प्रत्येक वृत्त वाहिनीवर काय घडले? याची सखोल चर्चा सुरु आहे. देशाचे कर्णधारपद भूषवणे हे कठिण असते. विराटला विचलित करणारी किंवा कर्णधारपदावरुन पुन्हा एकदा गोंधळाची स्थिती नकोय. विराट कोहली आपल्या संघाला विजयाच्या वाटेवर नेण्यास पूर्णपणे सक्षम आहे असे पीटरसनने त्याच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. स्टुअर्ट ब्रॉड पहिल्या कसोटी सामन्यात नव्हता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करण्याचा त्याच्यावर दबाव असेल. आर्चर दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. शनिवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत ब्रॉड टीममध्ये असेल असे पीटरसनने ब्लॉगमध्ये लिहिले आहे.


वासिम जाफर यांच्यावर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप



मुंबई -

वासिम जाफर हे भारताचे माजी सुप्रसिद्ध खेळाडू आहे. यांनी अलीकडेच उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या वादानंतर वासिम जाफर यांनी हे पाऊल उचलले आहे. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वासिम जाफर यांच्यावर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. वासिम जाफर यांनी बुधवारी हा आरोप फेटाळून लावला आहे. माहिम वर्मा यांनी मीडियामधून, माझ्यावर मी मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मला प्रचंड दु:ख झाले आहे असे वासिम जाफर यांनी सांगितले आहे. ४२ वर्षीय वासिम जाफर भारतासाठी ३१ कसोटी सामने खेळले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये वासिम जाफर हे एक मोठे नाव आहे. माहिम वर्मा हे उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव आहे.

वासिम जाफर यांनी मंगळवारी उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. हस्तक्षेप आणि पक्षपाती निवडसमिती ही कारणे त्यांनी राजीनामा देताना दिली. संघ निवडीत जातीयवादाचा अँगल आणणे, खूप दु:खद आहे असे वसीम जाफर म्हणाले. संघ निवडीमध्ये मी इक्बाल अब्दुल्लाला प्राधान्य देतोय. इक्बालला मला संघाचे कर्णधार बनवायचे होते, हे माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार चुकीचे आहे. असे जाफर म्हणाले. मला जय बिस्ताला कर्णधार बनवायचे होते. पण रिझवान शमसाद आणि निवड समितीच्या अन्य सदस्यांनी इक्बालला कर्णधार बनवण्याचा पर्याय सुचवला. तो संघातील वरिष्ठ खेळाडू आहे. त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे मी त्यांच्या सल्ल्याशी सहमत झालो असे वासिम जाफर यांनी सांगितले.


पराभवानंतर विराट कोहलीनं इंग्लंड संघाला पुढील सामन्याासाठी दिला इशारा



मुंबई -

इंग्लंड सांग पराभवानंतर विराट कोहली याने इंग्लंडचं कौतुक करत त्यांना इशारा दिला पाहुण्या इंग्लंड संघाने चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा २२७ धावांनी पराभव करत दौऱ्याला दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर विराट कोहलीने इंग्लंड संघाचे कौतुक करतानाच पुढील सामन्याासाठी इशाराही दिला आहे. सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की, ‘आम्हाला पुनरागमन करायला येत. पुढील सामन्यात आम्ही सर्वस्वी झोकून देऊन आमचे बेस्ट देऊ. पहिल्या सामन्यात झालेल्या चुका आम्ही सुधारु. पुढील सामन्यात मोठ्या भागीदाऱ्या करण्याचा आमचा प्रयत्न असेल. 

पुढील सामन्यात सकारात्मकतेने सुरुवात करावी लागेल. तसेच इंग्लंडच्या संघावर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करावा लागेल.असे विराट कोहली म्हणाला  ५७८ धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात निराशाजनक फलंदाजीमुळे सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले. प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्णाण करण्यातही आम्हाला अपयश आले. फलंदाजाच्या खराब कामगिरीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. आमच्या एका फलंदाजाने जरी शतक केले असते, तरी आम्हाला झुंज देण्याची संधी निर्माण झाली असती. मात्र, पहिल्या डावात इंग्लंडला मोठी आघाडी मिळाली आणि याचा आम्हाला फटका बसला, असे कोहली म्हणाला आहे.

ऑस्ट्रेलियाने भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंना कमी लेखण्याची चूक केली - जोफ्रा आर्चर




 मुंबई -

जोफ्रा आर्चर याने भारता बद्दल आपले मत व्यक्त केले त्यांनी सांगितले की जी चूक ऑस्ट्रेलियाने केली ती होणार नाही.  इंग्लंड संघातील वेगावन गोलंदाज जोफ्रा आर्चरला भारतामध्ये मर्यादीत षटकांच्या सामन्याचा मोठा अनुभव आहे. पण पहिल्यांदाच जफ्रा आर्चर भारतामध्ये कसोटी खेळणार आहे. पाच फेब्रुवारीपासून आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. जोफ्रा आर्चरची या मालिकेत इंग्लंडच्या संघात वर्णी लागली आहे. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी जोफ्रा आर्चरने दावा केलाय की, भारतीय संघातील सहाव्या क्रमांकापर्यंतचा कोणताही फलंदाज शतक झळकावू शकतो. तसेच आयपीएलमधील अनुभव कसोटीत कामाला येणार नाही. 

आगामी कसोटी मालिकेसाठी आम्ही पूर्ण तयारी केली असून भारताच्या प्रत्येक खेळाडूविरुद्ध आम्ही खास रणनीती आखली आहे, असे मत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने व्यक्त केले. भारतीय संघातील कोणत्या खेळाडूपासून इंग्लंडला सर्वाधिक धोका आहे, असे विचारले असता आर्चर म्हणाला भारताच्या संघातील सर्वच खेळाडू एकापेक्षा एक सरस आहे. ऑस्ट्रेलियाने भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंना कमी लेखण्याची चूक केली आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. 

त्यामुळे आम्ही भारताच्या प्रत्येक खेळाडूच्या कमकुवत बाजूंचा अभ्यास करत असून प्रत्यक्षात सामन्यादरम्यान त्यांच्याविरुद्ध आखण्यात आलेली रणनीती दाखवून देऊ. भारतामध्ये मी याआधी कधीही कसोटी क्रिकेट खेळलेलो नाही. त्यामुळे वास्तवात आयपीएल आणि कसोटी सामन्याची तुलना आपण करु शकत नाही. भारतीय संघातील सर्वच फलंदाज एकापेक्षा एक असे सरस आहेत. पहिल्या सहा क्रमांकापर्यंतचा कोणताही फलंदाज शतक झळकावू शकतो. रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यासारखे दर्जेदार फलंदाज असतील. 

Contact Me

Name

Email *

Message *