सारिपाट / शिवाजी शिर्के…. काळजी घेतली नाही तर आमदार लंके यांचे ‘ते’ सेंटर कोरोनाचे सुपरस्प्रेडर सेंटर होणार
सारिपाट / शिवाजी शिर्के -
सारिपाट - ‘सिंघम’ कृष्णप्रकाश ‘यासाठी’ झाले जमालखान पठाण
सारिपाट / शिवाजी शिर्के -
सारिपाट / शिवाजी शिर्के…. एसपी साहेब, कायद्याचा धाक संपलाय का?
News24सह्याद्री -
आरोपीला घेऊन जिल्हाधिकार्यांच्या कशा होतात बैठका?
कलेक्टर, आयुक्तांच्या बदलीची ऑक्सीजन पुरवठादाराकडून धमकी! कमीशनर शंकरराव, खुषमस्कर्यांतून बाहेर या आणि जरा नगरचा कानोसा घ्या!
सारिपाट / शिवाजी शिर्के -
सारिपाट / शिवाजी शिर्के - मंत्री महोदय, नगरकरांची गंमत पहात असाल तर नगरकर तुमची गंमत करतील याचे भान ठेवा
सारिपाट / शिवाजी शिर्के -
मुश्रीफ, तनपुरे, गडाख सारेच कसे गायब? पालकमंत्र्यांसह राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे साहेब, नगरकरांची गंमत पहात असाल तर नगरकर तुमची गंमत करतील याचे भान ठेवा कोरोना महामारीत नगरला कोणी वाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केल्यास त्यात वावगे वाटू नये अशी आजची परिस्थिती आहे. संसर्ग वाढत चालला आहे आणि रुग्णांना बेड मिळायला तयार नाही. रेमडीसीवर इंजेक्शन भेटायला तयार नाही. ऑक्सीजनची अवस्था सर्वांच्या समोर आहे. यापार्श्वभूमिवर जिल्ह्यातील जनता हवालदिल झाली असताना जिल्ह्याचा पालक कोण असा प्रश्न पडला आहे. पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली ते हसन मुश्रीफ हे सपशेल फेल ठरले आहेत. जिल्ह्यात तीन मंत्री! बाळासाहेब थोरात यांचा अपवाद केला तर शंकरराव गडाख कोठेच दिसायला तयार नाही. दुसरे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राहुरी गावातच रमले आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळात मामाच्या आशीर्वादाने राज्यमंत्री झालेल्या प्राजक्त तनपुरे यांना जबाबदारीची कोणतीही जाण नाही आणि जाणिवही नाही! कोरोना महामारीत रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या मदतील कोणी धावायला तयार नाही. नगरमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली असताना ऑक्सीजन मिळावा यासाठी डॉक्टरांना मंत्री बाळासाहेब थोरात, पोपटराव पवार, अण्णा हजारे आठवले. ते मदतीला धावले असताना पालकमंत्री मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे नगरकरांची गंमत पहात होते का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
कोरोना महामारीत जिल्हा प्रशासन नक्की काय करतेय असा प्रश्न निर्माण झाला आहे. बैठकांचा सीलसीला चालू असला तरी त्यातून सकारात्मक आऊटपुट निघतंय का तेही पहाणं गरजेचे आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी त्यांचीही दिशाभूल काही विभागाकडून होत असल्याचं आता लपून राहिलेले नाही. ऑक्सीजनच्या मुद्यावर निर्माण झालेली परिस्थिती अवाक्याबाहेर जाण्यास फक्त आणि फक्त औषध प्रशासन कारणीभूत ठरले. नगरमधील हायटेक या ऑक्सीजन पुरवठादाराच्या औषध प्रशासन इतका का पे्रमात पडला याचा शोध घ्यावा असं का कोणालाच वाटले नाही. त्याची क्षमता तपासावी असंही कोणालाच वाटले नाही. अव्वाच्या सव्वा दराने ब्लॅक मार्केटने हाच हायटेक वाला ऑक्सीजन विकू लागला आहे. औषध प्रशासन झोपेचं सोंग घेऊन आहे. मुळात त्यांच्याच आशीर्वादाने हे सारे चालू आहे. ऑक्सीजनच्या गंभीर परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून होतो. दोन महिन्यांपूर्वीच आम्ही ही बाब जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. नगरमध्ये ऑक्सीजनची परिस्थिती काय आहे असा प्रश्न आम्ही जिल्हाधिकार्यांना मुलाखतीच्या माध्यमातून विचारला होता. दोन महिन्यात जे समोर आले आहे अत्यंत भयानक आणि विदारक आहे.
या विषयाला जबाबदार असणार्या औषध प्रशासनाच्या अधिकार्यांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या विषयात लक्ष घातले आहे. मात्र, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना या विषयाचे कोणतेही सोयरसुतक दिसून येत नाही.‘राष्ट्रवादी पुन्हा’ ही कॉलर ट्युन ऐकविण्यात पालकमंत्री मश्गुल आहेत. खरेतर या विषयाबाबत राष्ट्रवादीच जिल्ह्याचं पुढारपण करीत असलेले राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लक्ष घालण्याची गरज होती. मात्र, त्यांना राहुरी शहराशिवाय काहीच दिसायला तयार नाही. मामाच्या वशिल्यावर मिळालेले मंत्रीपद जिल्ह्यातील जनतेच्या कामी येणार की नाही असाच काहीसा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. आजच्या महामारीत तनपुरे यांनी नगरला ठाण मांडण्याची गरज होती. प्रशासनाला हाताशी धरत डॉक्टर, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात समन्वय कसा राहिल याची काळजी घेण्याची आवश्यकता होती. हसन मुश्रीफ यांचे वय झाले असल्याने त्यांच्याबाबत समजून घेता येईल! मात्र, प्राजक्त तनपुरे राज्याच्या मंत्रीमंडळातील सर्वात तरुण मंत्री! मग, त्यांचे हे तरुणपण आजच्या परिस्थितीत कोणाच्या कामाला येतंय हेही तपासण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या प्रशासनावर त्यांची कोणतीही पकड गेल्या दीड वर्षात निर्माण झाली नाही.
हुजर्यांची फौज आणि मागे- पुढे फिरणार्या स्वीय सहाय्यकांचा गोतावळा याच्या पलिकडे जिल्हा आहे हे प्राजक्त तनपुरे यांना कदाचित आठवत पण नसेल! जिल्ह्यातील जनता मेटाकुटीला आली असताना जिल्ह्यातील डॉक्टरांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. बेड- औषधांच्या जोडीने आज डॉक्टरमंडळींना चिंता वाटतेय ती ऑक्सीजनची! दोन टँकर आले म्हणजे विषय संपला असे नाही. जिल्ह्याची मागणी ६० केएलची आहे. प्रत्यक्षात त्याच्या साठ टक्के देखील ऑक्सीजन मिळत नाही. बाळासाहेब थोरात यांना सॅल्युट केला पाहिजे. नगर जिल्ह्याला म्हणून ऑक्सीजनचे दोन टँकर मिळाले. हे टँकर नगरकडे येत असताना ते पुणे- नगरच्या हद्दीवर शिरुरमध्ये अडवले गेले. पुण्यातील हॉस्पिटलला हे टँकर वळविण्याचे कारस्थान सुरू झाले आणि याची माहिती बाळासाहेब थोरात यांना मिळताच त्यांनी हे कारस्थान हाणून पाडले. नगरकरांचे पाणी पुणेकर अनेक वर्षांपासून असेच कटकारस्थान करून पळवून नेत आलेत! पुणेकरांची पळवापळवीची ही खोड तशी जुनीच! स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील कायमच पुणेकरांवर या विषयावर तुटून पडायचे! पाणी पळविण्यापर्यंत पुणेकरांची असणारी मजल आता थेट ऑक्सीजनचे टँकर पळविण्यापर्यंत जातेच कशी! अहो, पुणेकर आणि तुमचे दादा मंडळी! नगरमध्ये जनावरे राहतात का? माणसं तडफडून मरायला लागली असताना आपण आमच्या जीवाशी खेळू लागला होतात! थोरात साहेब, बरं झालं तुम्ही देव म्हणून पुढे आलात! तुम्ही ताठर भूमिका घेतली नसती तर आज नगरमध्ये अराजक निर्माण झाले असते. शेकडोजण अमरधाममध्ये गेले असते आणि पुण्याचे हे कारभारी श्रद्धांजलीसाठी आले असते. त्यावेळी त्यांच्याच नगरमधील वाजंत्र्यांनी पायघड्या घातल्या असत्या! थोरात साहेब, आपण जी भूमिका घेतली ती खरोखरच अभिनंदनीय आणि नगरकरांसाठी अभिमानाची आहे.
जे थोरातांनी केले ते काम पालकमंत्री म्हणवून घेणार्या मुश्रीफांना का नाही करावेसे वाटले! मुळात ते हे करूच शकत नाही! कारण, पुणेकर काका-पुतण्यांच्या आशीर्वादाने ते मंत्रीमंडळात आणि नगरच्या पालकमंत्री पदाच्या खुर्चीत आहेत. त्यांना खुर्ची सांभाळयची आहे! जिल्ह्यातील दुसरे मंत्री शंकरराव गडाख स्वत:च कोरोनाचा उपचार घेत आहेत. मात्र, ‘राष्ट्रवादी पुन्हा’ अशी कॉलर ट्युन वाजविणारे प्राजक्त तनपुरे झोपा काढीत आहेत का? मामाच्या वशिल्यावर मिळालेले मंत्रीपद आऊटघटकेचं ठरलं नाही म्हणजे बरे! वेळ अद्यापही गेलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाला जनता सहकार्य करीत असली तरी प्रशासनाकडून जे काम होत आहे त्यावर कोणी देखरेख ठेवणार आहे की नाही याबाबतही विचार करावा लागणार आहे. दुसरी लाट सध्या चालू आहे आणि तिसरी येण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जे झाले ते झाले! आता यापुढे तरी रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील, बेड मिळतील आणि उपचारात कोणतेही अडथळे येणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे.
15 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - औंध येथे ६०० कोटी रुपये खर्चून अद्ययावत साथरोग रुग्णालय..पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. पर्यावरणवादी तरुणी अटकेत
स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिचे शेतकरी आंदोलनाशी संबंधित कथित ‘टूलकिट’ समाजमाध्यमावरून प्रसारित केल्याबद्दल बेंगळूरुतील दिशा रवी या २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. ती टूलकिट प्रकरणातील प्रमुख कारस्थानी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
3. ‘जैश’चा दिल्लीत हल्ल्याचा कट
जैश -ए -मोहम्मद ही दहशतवादी संघटना दिल्लीत हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या पोलीसप्रमुखांनी रविवारी दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या कार्यालयाचे चित्रण करणाऱ्या दहशतवाद्याच्या अटकेपाठोपाठ आतादिल्लीत हल्ला करण्याची ‘जैश’च्या कटाची माहिती उजेडात आली आहे.
4. आसाममध्ये सत्तेवर आल्यास सीएए अंमलबजावणी नाही
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आसामला विभाजित करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. आपला पक्ष आसाम करारातील प्रत्येक तत्त्वाचे संरक्षण करेल आणि राज्यात सत्तेवर आल्यास सुधारित नागरिकत्व कायद्याची (सीएए) कधीही अंमलबजावणी करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सारीपाट सह्याद्रीचा - पवारांचा कानमंत्र भाजपाची मोट तोडणार
News24सह्याद्री -
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे जिल्हा दौर्यावर येत आहेत. जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने या दौर्याला महत्व आले आहे. खरे तर बँक निवडणुक ज्या- ज्यावेळी जाहीर झाली त्या-त्यावेळी पवारांचा नगर दौरा होतोच! याहीवेळी तसेच होतंय! त्यात नवीन काहीच नाही. जिल्हा बँकेत विखे विरोधकांची मोट बांधण्यात पवारांची खेळी कायमच यशस्वी ठरलीय! यावेळी तसे होईल की नाही याबाबत साशंकताच आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी थेट देवेंद्र फडणवीसांच्या दरबारात बैठक लावली अन् बँकेची निवडणूक भाजपाच्या वतीने लढविली जाणार हे जाहीर केले. त्यामुळेच यावेळी पवार नक्की काय कानमंत्र देऊन जातात याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.
खा. शरद पवार यांच्या दौर्याचा प्रारंभच अकोलेमधून होत आहे. स्व. यशवंतराव भांगरे यांच्या पुण्यतीथीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार मार्गदर्शन करतील. खरेतर याच मेळाव्यात पवार हे पिचड पिता- पुत्रांवर हल्लाबोल करतील. पिचडांची भाजपाप्रेमातून विखेंशी वाढलेली सलगी कळीचा मुद्दा ठरणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले सीताराम गायकर हे राष्ट्रवादीकडून म्हणजेच पवारांच्या शब्दावर खुर्चीत बसले. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी पिचडांंची साथ धरली आणि आपसूकपणे जिल्हा बँक भाजपाकडे गेल्याचे कागदोपत्री दिसू लागले.
गायकर यांची बँकेतील कारकीर्दच वादग्रस्त ठरली. बँकेत काही गैरप्रकार झाले. त्यात त्यांनी अधिकार्यांना पाठीशी घातले. बँक सर्व संचालकांना विश्वासात घेऊन चालविण्याचा अलिखीत पायंडा गायकर यांनी मोडला. कर्मचारी भरती प्रकरणात झालेली दुकानदारी आणि त्यातून बँकेची झालेली बदनामी याची किंमत गायकरांना मोजावी लागू शकते. नोकरभरती मध्ये झालेल्या दुकानदारीत त्यांचे नाव चर्चेत आले. नगर तालुक्यातील संचालकाचे नावही चर्चेत आले. राहुरी कारखान्याला दिलेले कर्ज आणि त्यातून बँक अडचणीत येण्याचा जो प्रकार झाला, त्यास सर्वस्वी सीताराम गायकर हेच जबाबदार राहिले. बँकेेचे कामकाज करताना हुकुमशाही पद्धतीने केले गेले. त्यातून अनेक चुकीचे पायंडे पडले. बँकेच्या काही शाखांमध्ये गैरप्रकार झाले. मात्र, त्याबाबत कोणावरही गांभिर्याने कारवाई झाली नाही. उलटपक्षी पाठीशी घालण्याचे काम झाले.
आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट देेवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेत लक्ष घातले आहे. पक्षाचा विचार करता विखे पाटलांना अकोल्यातून मधुकर पिचड, कोपरगावमधून बिपीन कोल्हे, श्रीरामपूरमधून भानुदास मुरकुटे, राहुरी - नगरमधून शिवाजी कर्डिले, नेवासामधून बाळासाहेब मुरकुटे, पाथर्डीतून आ. मोनिकाताई राजळे, कर्जत- जामखेडमधून प्रा. राम शिंदे, श्रीगोंद्यातून आ. बबनराव पाचपुते आणि नगर शहरातून दिलीप गांधी- अभय आगरकर यांची साथ मिळू शकते. सध्याच्या चर्चेनुसार भाजपा समर्थकांची मोट कायम राहिली तर हे सारे मिळून महाविकास आघाडीच्या कथीत नेत्यांना मोठे आव्हान देऊ शकतात. पर्यायाने हेच मोठे आव्हान शरद पवार यांच्यासमोर असणार आहे.
राज्यातील महाविकास आघाडीची मोट बांधण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे खा. शरद पवार आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भूमिका जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कायमच निर्णायक राहिली आहे. राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवत या बँकेत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी भूमिका बजावली. स्व. भाऊसाहेब थोरात व स्व. मारुतराव घुले पाटील यांच्या भूमिकाही निर्णायक राहिल्या. कॉंग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीकडून स्वत: शरद पवार हे या निवडणुकीचा सारिपाट मांडत असताना शिवसेनेकडून शंकरराव गडाख भूमिका बजावणार आहेत. पवार- थोरात- गडाख यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळू शकतो. अकोले, संगमनेर, कोपरगाव, पारनेर, राहुरी, नगर शहर, कर्जत- जामखेड, शेवगाव, नेवासा हे तालुके महाविकास आघाडीची बलस्थाने आहेत. या बलस्थानांचा विचार करता महाविकास आघाडीची मोट बांधली गेली तर बँक सहजासहजी ताब्यात येऊ शकते. मात्र, असे असले तरी पवारांच्या नगर दौर्यात भाजपाच्या गोटात दिसणार्या म्हणजेच विखेंच्या गोटात दिसणार्यांना गळाला लावण्याचे काम होऊ शकते. तसे झाले तर ती जमेची बाजू असणार आहे.
निवडणुकीचे चित्र आताशी स्पष्ट होऊ लागले असताना पवारांचा नगर दौरा त्यामुळेच चर्चेत आला आहे. पवारांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कायमच बेरजेचे राजकारण केेले आणि विखेंना बँकेपासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळीही तसेच काहीसे होऊ शकते. बाळासाहेब थोरात यांचाही यापेक्षा वेगळा प्रयत्न असणार नाही. विखेंना सत्तेपासून रोखण्यास हे सारे सज्ज झाले असले तरी विखेंनीही तोडीसतोड तयारी चालविली असल्याचे दिसते. पवारांच्या दौर्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची दिशा नक्की होईल. तूर्तास पवारांच्या दौर्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
मोठी बातमी - पोलीस भरतीचा जी आर रद्द
News24सह्याद्री -
पोलीस भरतीच्या पार्श्ववभूमीवर पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहविभागाने चार जानेवारी रोजी काढलेला जीआर रद्द करण्यात आला आहे. याबाबत आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केली आहे. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग आता नवीन जीआर शुद्धीपत्रक काढणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. 4 जानेवारी रोजी गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. त्याला विरोध झाल्यानंतर गृहविभागाने निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता दिलासा भेटणार आहे.
सारिपाट सह्याद्रीचा - एसपी साहेब, रेखा जरे यांचा प्रिप्लॅन्ड मर्डर झालाय !
News24सह्याद्री -
यशस्वीनी महिला ब्रिगेड आणि त्याआधी राष्ट्रवादी या राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नगर शहरासह जिल्ह्यात विविध विषयांवर आक्रमक भूमिका घेणार्या रेखा जरे यांची हत्या झाल्याची बातमी आली. दुचाकीस्वाराने त्यांच्या चार चाकी वाहनाला कट मारला आणि त्यातून शाब्दीक बाचाबाची झाली. त्यातूनच या दुचाकीस्वाराने थेट त्यांच्या गळ्यावर चाकूचे वार केले. रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या आणि दुचाकीस्वार निघून गेले. या संपूर्ण घटनेचा विचार केला तर गाडीला कट मारला या किरकोळ कारणातून कोणताही वाहन चालक खून करण्यापर्यंत मजल मारुच शकत नाही हे वास्तव विचारात घेतले पाहिजे. एसपी साहेब, तुम्ही आणि तुमच्या टीमच्याही ही बाब लक्षात आलीच असेल. मग, आता खुन्याचा तपास लावतानाच त्याच्या मागचा मास्टरमाईंड देखील शोधा! घटना घडून मोठा कालावधी उलटला. दुसरा दिवस उजाडला असताना जरे यांच्या हत्येचा, मारेकर्यांचा तपास लावा असं साधा चार ओळीचं पत्र एकाही महिला कार्यकर्ती, महिला संघटना अथवा राजकीय पक्षांच्या महिला आघाड्यांनी दिले नाही. याचा अर्थही एसपीसाहेब तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. कोणीतरी बडं प्रस्थ या खून प्रकरणाशी निगडीत आहे आणि त्याने जरेबाईची वाट लावली असताना आपण त्याबाबत पत्रक काढणे म्हणजेच हे प्रस्थ आपल्यामागे हातधुवून लावून घेणं, असंच काहीस मत बहुतांश महिलांचं झालेलं असावं! मात्र, वाघ म्हटले तरी खाणार आणि वाघोबा म्हटले तरी खाणार या युक्तीनुसार रेखा जरे जात्यात गेली आणि मुग गिळून गप्प बसलेल्या समस्त महिला सुपात आहेत याचे भान आणि जाण ठेवण्याची गरज आहे.
कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही! रेखा जरे यांच्या हत्याकांडात अत्यंत शांत डोके लावून त्यांचा मर्डर घडवून आणला गेेलाय आणि चर्चा घडवून आणली जाते ती वाहनाने कट मारल्याची आणि त्यातून झालेल्या बाचाबाचीची!रेखा जरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून वठविलेली भूमिका, त्याआधी विविध सामाजिक प्रश्नांवर केलेली आंदोलने, प्रशासनाला विचारलेला जाब, महिलांचं संघटन करण्यात घेतलेली महत्वपूर्ण भूमिका नगरकरांच्या कायम स्मरणात राहणारीच आहे. खरे तर आंदोलन अथवा विशिष्ट विषयाच्या माध्यमातून त्यांचे काहींशी मतभेदही झाले असतील.मात्र, ते टोकाचे नक्कीच नव्हते! त्या अनेकदा नगर सह्याद्रीच्या कार्यालयात यायच्या आणि विविध विषयांवर बोलायच्या! आपल्या जीवाला धोका आहे, असं त्यांच्या बोलण्यातून कधी जाणवलं नाही. सर्वच राजकीय पक्ष, संघटना व त्यांचे पदाधिकारी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. मग, असे असताना त्यांचा खून कशामुळे आणि कोणत्या कारणाने होऊ शकतो असा प्रश्न समस्त महिलांना पडलाय! रेखा जरे यांच्या खुनाचा उलगडा तातडीने होण्याची गरज आहे. कारण हे प्रकरण नाजूक वळणावर आल्याची चर्चा आहे.रेखा जरे यांच्या हत्येमुळे चळवळीत काम करणार्या महिला, राजकीय पक्षांच्या महिला आघाड्यांमधून काम करणार्या महिलांना त्यांच्या घरातून बाहेर सोडले जाईल का हा खरा प्रश्न आहे. जरे यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी अंधार होता. जातेगावच्या घाटात वाहनाचा वेग कमी होतो आणि हा कमी होणारा वेगच जरे यांच्या मारेकर्यांनी टीपला होता.
बरोब्बर त्या वळणार त्यांची गाडी आली आणि पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्याची दुचाकी त्यांच्या चार चाकी वाहनाला आडवी लावली! शाब्दीक बाचाबाचीत त्यांनी त्यांच्या गाडीची काच खाली घेतली.मारेकर्याने थोडावेळ वाद घालण्याचे नाटक केले आणि दुसर्या क्षणाला त्याने त्याच्याकडील धारदार चाकूने रेखा जरे यांचा गळा कापला! जरे यांच्या बाजूलाच नगरच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी बसल्या होत्या! याशिवाय रेखा जरे यांचा मुलगा आणि आई देखील गाडीत होते. या सर्वांनी वाहन चालकाच्या शीटवर रक्तबंबाळ झालेल्या रेखा जरे यांना शेजारच्या शीटवर बसवले आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी असणार्या विजयमाला माने या स्वत: चालकाच्या शीटवर बसल्या. त्यांनी भरधाव वेगात गाडी सुप्याच्या दिशेने चालवली. सुपा टोल नाक्यावर आल्यानंतर तेथून ऍम्बुलन्समध्ये रेखा जरे यांना नगरला हलवले. मात्र, नगरला येईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.जिल्हा रुग्णालायच्या सुत्रांनी जरे यांना मृत घोषीत केले. जरे यांचा जीवनप्रवास अखेर संपला! मात्र, जरे यांची हत्या झाल्याच्या दिवशी त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. पुण्याला जाताना हेच तीघे त्यांच्या सोबत होते आणि येताना देखील हेच तीघे त्यांच्या सोबत होते. विजयमाला माने या त्यांच्या शासकीय कामासाठी गेल्या होत्या आणि त्यांचे काम आटोपून त्या पुन्हा या तीघांच्या सोबत माघारी आल्या! पोलिसांना या घटनेच्या खोलात जावे लागणार आहे. रेखा जरे यांना कोणी धमकावत होते का? त्यांच्या जीवनाशी कोणी खेळत होते का? त्यांचा कोणाशी संघर्ष झाला होता का? या प्रश्नांच्या खोलात पोलिसांना जावे लागणार आहे.
आणि त्यासाठी जरे यांच्या सहवासात आलेल्यांकडून पोलिसांना माहिती घ्यावी लागणार आहे. मात्र, ही माहिती घेताना त्या महिलांना विश्वास द्यावा लागणार आहे आणि विश्वासात घ्यावे लागणार आहे. असे झाले तर आणि तरच रेखा जरे यांच्या खुनाचा म्होरक्या, मास्टरमाईंड शोधला जाऊ शकतो. पोलिसांनी मारेकर्याचे छायाचित्र जाहीर केले आहे. मारेकरी सापडतीलही! मात्र, पोलिसांनी हे प्रकरण वेगळ्या अँगलमधून हाताळले तर मारेकर्यांच्या आधी मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात येऊ शकतो!एसपी साहेब, रेखा जरे यांच्या हत्येने महिलांमध्ये असुरक्षीततेची भावना नक्कीच वाढली आहे. महिलांनी एकटीने प्रवास करायचा की नाही असा प्रश्नच यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. जरे यांचा खून गाडीला कट मारल्याच्या कारणातून नव्हे तर त्यांचा खून पूर्वनियोजित होता आणि तो कसा होता हेच आता पोलिसांना सांगावे लागणार आहे. तरच महिलांमधील भिती कमी होऊ शकते. हे काम आता पोलिसांचे आणि त्यांच्या टीमचे नेतृत्व करणार्या पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे आहे.रेखा जरे यांची हत्या होण्याच्या दोन दिवस आधी नगर शहरातील तपोवन रस्त्यावर एका टोळक्याने किरकोळ कारणातून महिला- मुलींना लाकडी दांडक्याने जनावरासारखे बदडून काढण्याची घटना घडली. या घटनेचा व्हीडोओ आमच्या हाती आलाय! अर्थात तो सोशल मिडियावर व्हायरल झालाय! याबाबत भाष्य करण्याआधी आपण तो व्हीडोओ पाहू.नगर शहरातील तपोवन रस्त्यावर सुर्यनगर वसाहतीमध्ये महिलांना बेदम मारहाण करण्यात आली. कोणतेही कारण नसताना एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी हातात दांडके घेऊन महिला आणि मुलींना बेदम चोप दिला.
दरोडेखोर आल्यासारखे हे टोळके आले आणि मारहाण करीत राहिले. याचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. याबाबत स्थानिक नागरिक तोफखाना पोलिस ठाण्यात गेले. मात्र, निरीक्षक मुलानी यांनी त्यांना कोणतीही दाद दिली नाही. अत्यंत गंभीर असा हा प्रकार असताना तोफखान्याच्या निरीक्षकांना यात काहीही विशेष वाटले नाही. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असताना त्या विरोधात मोहिम राबविण्याचे धाडस केले जात नाही. समाजकंटक अशा पद्धतीने हातात दांडके घेऊन महिला- मुलींना बेदम चोप देत असतानाही तोफखान्याचे पोलिस बघ्याची भूमिका घेतात. तोफखाना पोलिसांना नक्की काय अभिप्रेत आहे असाच सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. अर्थात या प्रश्नाचे जनतेला आता थेट पोलिस अधीक्षकांकडून अपेक्षीत आहे.एसपी साहेब, खाकीतील बदमाशांना तुम्ही गेल्या महिना- दोन महिन्यात खड्यासारखे बाजूला केले. आता जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. सुर्यनगरमधील महिलांना न्याय देण्याची भूमिका न घेणार्या तोफखान्यातील मुजोर अधिकार्यांना याचा जाब विचारलाच गेला पाहिजे. ते तुम्ही नक्की करताल! मात्र, आता त्या जोडीने रेखा जरे यांच्या मारेकर्याला आणि या घटनेतील मास्टरमाईंडला लवकर शोधण्याचं आव्हान तुम्ही आणि तुमची टीम कसं पार पाडतेय याकडे नगरकरांच्या नजरा लागल्या आहेत
राज्य सरकारने ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी : देवेंद्र फडणवीस
News24सह्याद्री -
सारिपाट सह्याद्रीचा - खाकीवर्दीतील बदमाशांमध्ये मनोज पाटील यांची दहशत;दत्ता राठोड व गर्जेची नार्को टेस्ट होणार का?
News24सह्याद्री -
सारीपाट सह्याद्रीचा - भयानकच! वनस्पतीपासून नव्हे तर खराब ऑईलपासून तयार केले जाते डिझेल! नगरमध्ये मोठे रॅकेट
News24सह्याद्री -
प्रदुषण पातळी वाढत चालली असताना आणि त्या विषयावर संपूर्ण जग चिंतेत असताना सात महिन्यांपूर्वी कोरोना नामक विषाणू आला आणि संपूर्ण जगात लॉकडाऊन झाले. आता काही महिन्यापूर्वी ते उठविले गेले असले अनेक बंधने घालण्यात आली. हवाई आणि रस्ते अशी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवली गेली आणि त्यामुळे रस्ते ओस पडले. त्यामुळे हवेतील प्रदुषण कमी झाले आणि शुद्ध हवा आपणास मिळू लागली. पर्जन्यमान वाढले आणि कालपरवापर्यंत पाऊस पडत राहिला. प्रदुषण कमी व्हावे यासाठी केंद्र शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. त्यात डिझेलवर चालणार्या वाहनांसाठी बायो डिझेल वापराचा विषय होता. हे बायो डिझेल वनस्पतीपासून तयार केले जावे आणि त्याचा वापर वाहनांसाठी केला जावा असे आदेश काढले गेले. मात्र, प्रत्यक्षात नेमकं काय घडलं? नेमक हे घडलंय की बायोडिझेलच्या नावाखाली वनस्पतीपासून तयार केलेले नव्हे तर वाहनांमधील खराब ऑईलचा वापर केला जातो. संपूर्ण काळे असणारे हे ऑईल काहीच उपयोगाचे नसते. मात्र, त्या ऑईलमध्ये विशिष्ट घटक टाकले की काळ्या ऑईलचे रुपांतर ज्वालाग्रही द्रवपदार्थात होते. हा द्रवपदार्थ पांढर्या रंगाचा असतो. त्याला डिझेलसारखा निळा रंग येण्यासाठी विशिष्ट केमिकल वापरले जाते आणि त्यानंतर हे काळ्या ऑईलपासून तयार केलेले बनावट डिझेल ‘बायो डिझेल’ या नावाखाली विकले जाते. बायोडिझेलचे काही पंप सरकार मान्य असले तरी अनेक पंप शासनमान्य नाहीत. याशिवाय हे डिझेल वाहनांना लहान- मोठ्या टँकरच्या माध्यमातून विशिष्ट जागांवर पोहोच केले जाते. त्यासाठी या छोट्या टँकरला डिझेलपंपांवर असतात तसे नोझल आणि छोटी मोटार, त्याचा मीटर असं सारं जोडलेले असते.
कोणत्याही पंपावर डिझेलची विक्री साधारणपणे ७८ ते ८० रुपये प्रतिलिटर होते. मात्र, बायोडिझेलच्या नावाखाली विकले जाणारे हे बनावट डिझेल ५५ रुपये प्रतिलिटर विकले जाते. म्हणजेच एक लिटरमागे जवळपास २५ ते २७ रुपये कमी लागतात. मोठे वाहतूकदार म्हणजेच ज्यांच्याकडे अनेक वाहने आहेत, ते अशा प्रकारचे डिझेल वापरतात! या बनावट परंतू कमी दराने मिळणार्या डिझेलच्या वापरामुळे हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. मालकांचा फायदा होत असला तरी शासनाचा काही कोटींमधील महसूल यातुन बुडतो. वास्तविक पाहता बायो डिझेल या खर्याखुर्या डिझेलच्या गोरख धंद्यातून शासनाला टोपी घालण्याचे कामही होते. रस्त्यांची बांधणी करण्यासाठी वापरले जाणारे डांबर आणि त्याच्या प्लँटसाठी या डिझेलचा वापर केला जातो. या डिझेलसाठी जीएसटी आकारणी केली जात नाही. जीएसटी वाचत असल्याने अनेक ठेकेदार या प्लँटच्या नावाखाली हे बायोडिझेल खरेदी करतात आणि त्याची बाजारात विक्री करतात. शेकडो कोटी रुपयांचा हा जीएसटी घोटाळा राज्यात घडला आहे आणि तो रेकॉर्डवर आला आहे. राज्याच्या अनेक भागात बायोडिझेलचे मान्यताप्राप्त पंप आहेत. मात्र, अनेक पंपांना मान्यता नाही. अनेक पंप बेकायदा आहेत. काही जिल्ह्यात पंप अस्तित्वात नसतानाही असे बनावट बायोडिझेल विकले जाते. त्यासाठी विशिष्ट जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. नगरच्या स्टेट बँक चौकात जो टँकर वाहनांमध्ये डिझेल भरताना सापडला तो टँकर म्हणजे हिमनगाचे एक टोक सुद्धा नाही. नगर शहराच्या परिसरात असे तब्बल बारा स्पॉट आहेत आणि त्याद्वारे अनधिकृतपणे वाहनांना डिझेल भरले जाते. जीपोओ कार्यालयासमोरील छावणी मंडळाच्या संकुलाजवळ चालणारे रॅकेट एकच नाही! असे अनेक ठिकाणी चालते.
पोलिसांनी कारवाई केली असताना पुरवठा विभागाचे अधिकारी रात्री दहा वाजेपर्यंत स्पॉटवर का गेले नाही? जिल्हाधिकारी कार्यालय आणि स्टेट बँक चौक यातील अंतर अवघे सातशे मीटर! हे अंतर चालून जायला पुरवठा अधिकार्यांना सात तास लागले! जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख दोघेही जिल्ह्यात नवीन आहेत. दोघांनीही सोलापूरमध्ये एकत्र काम केले आहे! अवैध धंदे आणि व्यावसायिक यांच्या विरोधात दोघेही आक्रमक दिसत आहेत. पुरवठा विभागाच्या अधिकार्यांना सातशे मिटर अंतर चालून जायला सात तास का लागले याचा जाब जिल्हाधिकारी विचारतील का हा खरा प्रश्न आहे. नगर शहराच्या मध्यवर्ती भागात जसा हा गोरख धंदा चालताना दिसला तसाच तो औरंगाबाद रस्त्यावरील शेंडी चौक, वडगावगुप्ता बायपास, केडगाव उपनगर येथे का दिसला नाही. नगरमध्ये एका राजकीय पक्षाचा बडा पदाधिकारीच या धंद्यात काळेबेरे करीत असल्याची चर्चा झडत आहे. बायोडिझेलच्या नावाखाली काळे ऑईलवर प्रक्रिया केले जाणारे असे कारखाने नगरमध्ये कमी नाहीत! या काळ्या कारखान्यांना कोणकोण पाठीशी घालत आहेत याचा शोध स्वत: जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख हे दोघेही घेतील का, या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल!
सारिपाट सह्याद्रीचा - राज्यपालांचं हिंदुत्व अन् दानवेंचं येड्यागबाळ्याचं राज्य!
News24सह्याद्री - राज्यपालांचं हिंदुत्व अन् दानवेंचं येड्यागबाळ्याचं राज्य!...पहा सारिपाट सह्याद्रीचा
राज्यपालांच हिंदुत्वप्रेम शिवसेेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना चिमटा काढताना अजिबात लपून राहिले नाही. अर्थात त्यास उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना सणसणीत टोला लगावला हा भाग वेगळा! आता केंद्रात मंत्री असणार्या रावसाहेब दानवें साहेबांनी वापरलेली येड्यागबाळ्याची भाषा अकलेचे तारेच तोडणारी ठरली आहे. राजभवनाच्या प्रतिभेचे आणि प्रतिमेचे काय असा सवाल जसा मध्यंतरी हिंदुत्वाच्या लेटरबॉंबमुळे चर्चेत आला तसंच काहीसं दानवेंच्या गावरान वक्तव्याने झालं आहे! याची मोठी किंमत उद्या भाजपला मोजावी लागली नाही म्हणजे बरे!
राज्यात कोरोनापाठोपाठ अवाकाळी वादळी पाऊस यासह अनेक अस्मानी संकटं उभी असताना राज्याच्या राज्यपालांना हिंदुत्वाचा मुद्दा आठवतोच कसा हा थेट प्रश्न उपस्थित केला गेला. राज्यपाल महोदयांबद्दल सोशल मिडियातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या! एखाद्या राज्यपालाला राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून संबोधले जाण्याचा नवा विक्रमही यानिमित्ताने नोंदविला गेला. देशाच्या गृहमंत्र्यांनी म्हणजेच अमित शहा यांनी राज्यपालांच्या अशा बेजबाबदार विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली असली तरी हे महोदय या पदावर अद्यापही कायम कसे असा थेट सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केला आहे आणि तो वास्तव वाटतो!
देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल न बोललेच बरे! ती अत्यंत चिंताजनक आहे. आपल्या देशाचा जीडीपी बांगलादेशपेक्षा कमी झाला आहे. कुपोषणाच्या बाबतीत भारताची स्थिती गंभीर आहे.
एका बाजूला आपण पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे नगारे वाजवित असताना दुसर्या बाजूला कुपोषणाच्या बाबतीत पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार या देशांची स्थिती भारतापेक्षा चांगली कशी या प्रश्नाचे उत्तर कोणी देणार आहे की नाही? कुपोषणाच्या मुद्याचा विचार केला तर जगातील १०७ देशांच्या यादीत भारत ९४ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान ८८, बांगलादेश ७१, म्यानमार ७८व्या क्रमांकावर आहे. नेपाळ, चीन, श्रीलंकेचे स्थान आपल्यापेक्षाही चांगले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला येण्यास कोरोना वगैरे कारणं असतीलही, पण ती बांगलादेशसारख्या देशांना का नाहीत? या प्रश्नाचं उत्तर आज तरी कोणीच द्यायला समोर येताना दिसत नाही. अर्थात या प्रश्नाचं उत्तर केंद्रात मंत्री असणार्या रावसाहेब दानवे यांच्याकडे दिसत आहे.
सारिपाट सह्याद्रीचा - के. के. रेंज : नोटीफिकेशन, रेडझोन आणि आरक्षण रद्द नाहीच
News24सह्याद्री -
सारीपाट सह्याद्रीचा - राष्ट्रवादी वगळता भाजपा, शिवसेनेत का वाहू लागलेत नाराजीचे वारे?
News24सह्याद्री -
सारीपाट सह्याद्रीचा - डीएसपी मनोज पाटील साहेब, वेलकम टू नगर!
News24सह्याद्री -
निष्क्रीय ठरल्यानंतर नगरमधून बदली झालेले पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची बदली झाली. मात्र, या सहा महिन्यात पोलिस दलात मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी वाढली. विशेषत: नगर शहरातील कोतवालीसह तोफखाना, भिंगार कँप आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू असणारे अवैध धंदे आणि त्याला मिळणारा छुपा आशीर्वाद आता लपून राहिलेला नाही. जिल्ह्याचं मुख्यालय म्हणून नगर शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करतानाच अवैध धंद्यांना आळा घालण्याचे काम शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांनी केले असले तरी पोलिस ठाण्यांमधून त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. एकूणच नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना सुत्रे हाती घेतल्याबरोबर नगर शहरात लक्ष घालण्याचे काम करावे लागणार आहे.
नव्याने हजर होत असलेले मनोज पाटील यांना खाकीची प्रतिमा वाढीस लावण्याचे काम करावे लागणार आहे. मध्यंतरीच्या काळात या वर्दीला काही डाग लागले. हे डाग पुसण्याचे काम करावे लागणार आहे. नगरमधील काही अधिकारी हे ड्रस्कीन करन्सीफमध्ये गुंतले असल्याचे अखिलेशकुमार यांच्या अनेकांनी निदर्शनास आणून दिले. त्याचे पुरावेही दिले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता मनोज पाटील यांना त्यात लक्ष घालावे लागणार आहे.
नगर शहरात लक्ष घालतानाच शहराच्या लगत असणार्या नगर तालुका, नेवासा, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा या पोलिस ठाण्यांचे काम काही दलालांच्या हाती गेले असल्याकडेही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. काही पोलिस ठाण्यांमधील अधिकारी आणि कर्मचार्यांचे लागेबांधे हे थेट गुन्हेगारांशी आणि गुन्हेगारी टोळ्या चालविणार्यांशी आले आहेत. हे लागेबांधे शोधून खाकी वर्दीला बदनाम करणार्या अशा बदमाश अधिकार्यांचा बंदोबस्त करण्याचे काही नव्या अधीक्षकांना करावे लागणार आहे.
सारीपाट सह्याद्रीचा - भारतीय जनता पार्टी नगरमध्ये राष्ट्रवादीच्या दावणीला
News24सह्याद्री -
सारीपाट सह्याद्रीचा - भाजपासह कॉंग्रेस आधीपासूनच सारसनगरच्या दावणीला; शिवसेनेचा एक गटही भरतोय पाणी
News24सह्याद्री -
सारीपाट सह्याद्रीचा - ऑडीटर डॉक्टरला अन् डॉक्टर पेशंटला लुटू लागलेत!
News24सह्याद्री -
कोरोना महामारीत काहींनी दुकानदारी मांडली असल्याचे ‘रेमडीसीवर’ या इंजेक्शनच्या काळ्या बाजारातील विक्रीतून स्पष्ट झाले आहे. ऐकीकडे हे सारे चालू असताना दुसरीकडे पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांना काही हॉस्पिटलमधून अव्वाच्या सव्वा बीलांची आकारणी करुन लुटले जात असल्याचे समोर आले. त्यातून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासनातील काही अधिकार्यांच्या ऑडीटर नामक टीमने आता थेट हॉस्पिटल चालकांची लूट चालविली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोनाग्रस्तांचा आकडा काही केल्या कमी व्हायला तयार नाही. अशा परिस्थितीत आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असलीे तरी या संकटकाळात काही महाभाग रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णाला आवश्यक असणारे ‘रेमडीसीवर’ हे इंजेक्शन नगरमध्येच नव्हे तर राज्याच्या अनेक भागात उपलब्ध व्हायला तयार नाही. उत्पादक कंपन्यांनी त्यांचे हेल्पलाईन नंबर जाहीर केले असले आणि त्यावर संपर्क साधून इंजेक्शन मिळत असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात तसे नाही.
हॉस्पिटलमधून अव्वाच्या सव्वा बिले घेतली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सर्वच कोविड हॉस्पिटलचे ऑडीट करण्याचे आदेश देण्यात आले. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकार्यांच्या टीमकडून हे ऑडीट सुरू झाले आणि याच ऑडीटच्या नावाखाली डॉक्टरांना लुटले जात असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. ऑडीटरच लुटू लागल्याने हे पैसे आपसूकपणे रुग्णाच्या खिशातून काढण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अत्यंत भयानक असा हा प्रकार असून यात कोणी लक्ष घालणार आहे की नाही असाच काहीसा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सारिपाट सह्याद्रीचा - पालकमंत्री महोदय, कुठं हरवला होतात तुम्ही?
News24सह्याद्री -
राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे उद्या गुरुवारी नगरच्या दौर्यावर येत आहेत. खरे तर महिनाभर गायब झालेले पालकमंत्री हसन मुश्रीफ हरवलेत अशी उपरोधिक जाहीरतवजा टीपणी सोशल मिडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नगर आठवले असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
नगरकरांना आणि सामान्य जनतेला आज महागाईच्या चटक्यापेक्षाही चटका बसतोय तो कोरोना आणि त्याआड चालू असलेल्या दुकानदारीचा! होय दुकानदारीचा! ही दुकानदारी कधी बंद होणार? कोरोनाने मृत्यू झाला तर त्या मृतदेहाची विल्हेवाट शासकीय खर्चाने म्हणजेच महानगरपालिकेच्या वतीने लावली जाते. त्यासाठी येणारा खर्च महापालिका करीत असली तरी तो पैसा आमच्या खिशातील! एका अंत्यसंस्कारासाठी ८ हजार रुपये दिले जायचे आणि आम्ही हा गैरप्रकार चव्हाट्यावर आणताच जिल्हाधिकार्यांनी यात लक्ष घातले.
आता अवघ्या १४०० रुपयात हा विधी होऊ लागला! जवळपास साडेसहा हजार रुपये प्रति मृतदेह कितीजण खात होते! पालकमंत्री साहेब, नगरच्या महापालिकेतील आयुक्त आणि महापालिकेतील आरोग्य अधिकारी या महामारीत दुकानदारी मांडून बसलेत आणि गब्बर झालेत! त्यांची चौकशी होणार आहे की नाही! नगरमधील मृतांचा नक्की आकडा किती हे दस्तुरखुद्द आयुक्तांनाच माहिती नसेल तर त्यापेक्षा दुर्दैव कोणते असेल!
पालकमंत्री साहेब, नगरच्या महापालिका आयुक्तांना सुवर्णम प्राईडमधील शाही बडदास्त हवी असते आणि सोबतीला बरेच काही! आयुक्तांची ही बडदास्त ठेवण्याचं काम इमानेइतबारे करत आलेत ते महापालिकेचे आरोग्य अधिकारी! नगरकरांच्या आरोग्याचे काहीही घेणेदेणे नसणार्या वैद्यकीय अधिकार्याला सारेच राजकीय पक्ष पोसतात हे लपून राहिलेले नाही! पालकमंत्री साहेब, तुमच्याबद्दल नगरकरांना आजही आदर आहे.
पालकमंत्री साहेब, गेल्या दोन- तीन महिन्यात तुम्ही नगरकरांच्या भावनांशी खेळलात असं आता नगरकरांच ठाम मत झालं आहे. तुम्ही येत आहात त्यानिमित्ताने नगरकरांच्या मनातील ही खदखद आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता निर्णय तुमच्या हातात आहे. कोल्हापूर- कागलकरांसारखी नगरकरांची काळजी घ्यायची की नाही हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचं आहे.
