Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label threefriendsdied. Show all posts

१३ फेब्रुवारी-अहमदनगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना।


NEWS24सह्याद्रि 

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून काष्टी येथील मित्राला सोडविण्यासाठी जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कार धडकल्याने भीषण अपघात झाला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून काष्टी येथील मित्राला सोडविण्यासाठी जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कार धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना काल रात्री एक वाजता हॉटेल अनन्या समोर घडली.

        या अपघातात राहुल आळेकर, केशव सायकर, आकाश खेतमाळीस या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. राहुल आणि आकाश हे आपला मित्र केशव सायकरला घरी सोडविण्यासाठी काष्टीला जात असताना हा अपघात झाला.तिनही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघाताचे नेमके कारण समजले नाही. मात्र, श्रीगोंदा ते दौंड हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आणि मोठ असल्याने वाहनांची गती अधिक असते. तालुक्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु आहे ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे बोललं जातं आहे.

Contact Me

Name

Email *

Message *