Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label anildeshmukh. Show all posts

१४ फेब्रुवारी-जे उखडायचे ते उखडा; संजय राऊतांचा मोठा दावा


NEWS24सह्याद्रि

उद्या शिवसेना भवनात शिवसेनची पत्रकार परिषद होणार आहे. मी या पत्रकार परिषदेत असणारच पण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेत असतील. शिवसेना आणि ठाकरे परिवारांवर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल असं ते सांगत आहेत.शिवसेना आणि ठाकरे परिवारांवर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊच . अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जातील असंही वारंवार सांगितलं जात आहे. पण तुम्हाला सांगतो, भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील. आय रिपीट. आता बस्स झालं. राजकीय मर्यादांचं उल्लंघन तुम्ही केलं आहे. आता तुम्हाला कळेल काय असतं ते.त्याच बरोबर  हमाम में सब नंगे होते है, असं विधान देखील  शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. भाजपचे कोण नेते तुरुंगात जातील यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

      शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार. शिवसेना हे महाराष्ट्राचे पॉवर केंद्र आहे. त्याच ठिकाणी बसून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्य आणि देशाला दिशा दिली. त्याच शिवसेना भवनात उद्या 4 वाजता पीसी होईल. मी असेलच. पण ही पत्रकार परिषद शिवसेनेची असेल. आमदार, खासदार आणि मंत्री असतील. संपूर्ण देश उद्या ऐकेल. काय होतंय हे उद्या पाहा. आम्ही खूप सहन केलंय आता बर्बादही करणार, असं संजय राऊत म्हणाले.

Contact Me

Name

Email *

Message *