Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label Latur. Show all posts

७ मे-सह्याद्री सुपरफास्ट न्यूज

 NEWS24सह्याद्री-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्ते सरसावले-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..





२३ फेब्रुवारी - सह्याद्री बुलेटिन

  News24 सह्याद्री: पंतप्रधानांच्या "त्या" वक्तव्याचा भंडारा जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध ...पहा !राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये ..





*नवाब मलिक यांच्या समर्थनात कार्यकर्ते मैदानात* !

--------------------
*समीर वानखेडे कोपरी पोलिस ठाण्यात दाखल*
---------------------
*पंतप्रधानांच्या "त्या" वक्तव्याचा भंडारा जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध*
--------------------
*नितेश राणे यांचा शिवसेनेवर निशाणा*
--------------------
*लातुरात नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स*

६ फेब्रुवारी - सह्याद्री बुलेटिन

     NEWS24सह्याद्री-औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचा वाद चव्हाट्यावर !...राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये.


NEWS24सह्याद्रि
 

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची भाचीच्या लग्नाला हजेरी

लातूरात 256 एसटी कामगार बडतर्फ

विश्वास नांगरे पाटलांची चौकशीच्या फेऱ्यात

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अजूनही पाच हजारांवर


२० नोव्हेंबर - *NEWS24सह्याद्री* *सह्याद्री सुपरफास्ट*

   News24सह्याद्री - *'दारू पिणारे कधीच खोटं बोलत नाहीत' अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल*.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...



TOP HEADLINES

-----------------
*स्मशानात जा आणि भुतांशी बोला, सदाभाऊ खोत यांचा अनिल परब यांना खोचक सल्ला*
-----------------
*'दारू पिणारे कधीच खोटं बोलत नाहीत' अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल*
-----------------
*आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाही : मुंबई उच्च न्यायालय*
-----------------
*स्वच्छ सर्वेक्षणात सांगलीचं विटा शहर देशात प्रथम*

------------------





१८ नोव्हेंबर- सह्याद्री वेगवान आढावा

  News24सह्याद्री :अमेरिकेला मागे सारत चीन ठरला जगातील सर्वात श्रीमंत देश... पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या .....




                       TOP HEADLINES


*कुलभूषण जाधवांना आंतरराष्ट्रीय न्यायालयामुळे मोठा दिलासा*

१७ नोव्हेंबर - सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स

     News24सह्याद्री : पुन्हा पावसाचं सावट, राज्यात तीन दिवस कोसळधारेचा इशारा.....पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...





TOP HEADLINES


*कच्च्या तेलाच्या किमतीत घट; मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम नाही*
-------------------
*श्रद्धा-सबुरीचा मंत्र देणाऱ्या शिर्डीत भाविक नियमांच्या अटींमुळे बेहाल*
-------------------
*पुन्हा पावसाचं सावट, राज्यात तीन दिवस कोसळधारेचा इशारा*


११ नोव्हेंबर - सह्याद्री वेगवान आढावा

      News24सह्याद्री : नगरसेवकांची संख्या वाढवली तरीही मुंबईत भाजपच येणार: अतुल भातखळकर....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा,,,मॉर्निंग हेडलाईन्समध्ये...




TOP HEADLINES


चंद्र मोहीम पुन्हा पुढे ढकलली, 'ब्लू ओरिजिन' बनली मोठं कारण?

2025 पर्यंत पुढे ढकललं आहे. NASA ने यापूर्वी 2024 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची योजना आखली होती. पण त्याला आता उशीर होतोय. नासाचे प्रशासक बिल नील्सन यांनी या मोहिमेच्या विलंबाबाबत एक घोषणा केली. ते म्हणाले की, काँग्रेसने चंद्रावरील त्यांच्या मोहिमेसाठी लँडिंग सिस्टम विकसित करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला नाही.  मात्र, जेफ बेजोस ची रॉकेट कंपनी 'ब्लू ओरिजिन' च्या कायदेशीर आव्हानांमुळेही वेळ लागत आहे. ब्लू ओरिजिनने ऑगस्टमध्ये नासाविरुद्ध खटला दाखल केला होता. निल्सन म्हणाले की, NASA त्याच्या चंद्र रॉकेट 'स्पेस लॉन्च सिस्टम', किंवा SLS चे पहिले चाचणी उड्डाण पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लक्ष्य करत आहे . त्यात कोणीही असणार नाही. अंतराळवीर दुसऱ्या आर्टेमिस फ्लाइटवर जातील, जे चंद्राच्या मागे जाईल, परंतु चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार नाही. चंद्रावर उतरण्याची मोहीम 2025 पर्यंत पूर्ण होईल.

११ नोव्हेंबर - शहराची खबरबात


      News24सह्याद्री : *महिलेचा मृत्यू प्रकरणी मनपात चौकशी समिती*... पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये ... 







TOP HEADLINES


विभागीय आयुक्तांकडून आज चौकशी

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 11 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेशी  संबंधित असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटिसा पाठवल्या आहे. संबंधित सर्वांची आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी प्रक्रिया दिवसभर सुरू राहणार आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सहा नोव्हेंबरला लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेला. त्यानंतर विभागीय आयुक्त, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, आरोग्य विभागाचे प्रधान आणि अप्पर सचिव यांची रविवारी जिल्हा रुग्णालयात बैठक झाली. त्यामध्ये सर्व कारणांचा शोध घेण्यात आला आणि संबंधित असलेल्या सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
====================



 

१० नोव्हेंबर - सह्याद्री सुपरफास्ट

   News24सह्याद्री : नवाब मलिकसाठी माझा ट्विट पुरेसा; देवेंद्र फडणवीस....पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...




TOP HEADLINES

नवाब मलिकसाठी माझा ट्विट पुरेसा; देवेंद्र फडणवीस

नवाब मलिक यांनी जे आरोप लावले आहे. त्यावर माझा ट्विट पुरेसा आहे. व आशिष शेलार यांनी जे  वक्तव्य केलं आहे. तो ही पुरेसा आहे. नवाब मलिक यांचा एवढा वजन नाही की त्यांचा वर मी भाष्य करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय...


१० नोव्हेंबर - सह्याद्री बुलेटिन

  News24सह्याद्री :औरंगाबाद महानगरपालिकेचा मोठा निर्णय...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...




TOP HEADLINES


कर्मचाऱ्यांच्या संपाने एसटीची चाके थांबलेली  

राज्य परिवहन महामंडळाच्या विलगीकरणासाठी कर्मचार्‍यांनी लढा सुरू केला आहे. अकरा दिवस उलटूनही राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. कर्मचाऱ्यांच्या संपाने एसटीची चाके थांबलेलीच आहे. त्याचा फायदा घेत खासगी वाहन धारकांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. तर दुसरीकडे यवतमाळ, पांढरकवडा, राळेगाव येथील57 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होत असताना एसटीच्या कर्मचार्‍यांना मात्र, उपोषण मंडपात झुनका-भाकर खाऊन दिवाळी साजरी करावी लागली, त्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे.
 

- सह्याद्री सुपरफास्ट १७ सप्टेंबर

   News24सह्याद्री - उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही : नारायण राणे...पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...




TOP HEADLINES

उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही : नारायण राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील युतीबाबातच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही असं नारायण राणे यांनी म्हटलंय

१९ जुलै - सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स :-सांगली जिल्ह्य़ात अधिक रुग्ण असलेल्या १७४ गावांमध्ये निर्बंध

   News24सह्याद्री -सांगली जिल्ह्य़ात अधिक रुग्ण असलेल्या १७४ गावांमध्ये निर्बंध...  पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...





TOP HEADLINES


सांगली जिल्ह्य़ात अधिक रुग्ण असलेल्या १७४ गावांमध्ये निर्बंध
===========================
मुसळधार पावसाने रत्नागिरीत पूरस्थिती
==========================
हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; अधिकाऱ्यांना दिले आदेश
==========================
राज्यात दिवसभरात ९ हजार नवीन करोनाबाधित वाढले ; १८० रूग्णांचा मृत्यू
==========================
प्रवासी वाहतूक करणारी जीप दरीत कोसळली;
==========================
“कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये; आपली लायकी काय? आपण बोलतो काय?”

माजी खा. आढळराव पाटील यांची खा. अमोल कोल्हेंवर टीका!
===========================


१५ जुलै - सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स

    News24सह्याद्री - मनसेची अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर पोस्टरबाजी ! पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...



TOP HEADLINES

१.
माजी कसोटीपटू वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, पुढच्या 2 वर्षांसाठी ओडिशा संघाचा मुख्य प्रशिक्षक !

२.
देशात नंबर 1 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच! 'प्रश्नम' या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात माहिती समोर

३.
मी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नाही, शरद पवार यांनी दिले  स्पष्टीकरण

४.
एनडीएच्या निकालात मराठी झेंडा, देवेन शिंदे देशात तिसऱ्या क्रमांकावर

५.
 नीट परीक्षा 13 भाषांमध्ये होणार; तर कुवेतमध्ये नवीन परीक्षा केंद्र सुरु



वेगवान आढावा

    News24सह्याद्री - मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हापहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...





                       मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा



 केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव डावलण्यात आल्यामुळे बीडमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. नाराज पदाधिकाऱ्यंची समजुत काढण्यासाठी मुंबईतील वरळीमध्ये असलेल्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. कोरोना नियमांना पायदळी तुडवत त्या ठिकाणी शेकडो पदाधिकारी जमले होते. यानंतर आता गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ जुलै -सह्याद्री वेगवान आढावा

   News24सह्याद्री - पेट्रोलचे भाव पुन्हा भडकले! पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...



TOP HEADLINES


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरु

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे द्वितीय सत्राच्या परीक्षा आज पासून सुरू होत आहे. यासाठी एकूण 6 लाख 18 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. पहिल्या दिवशी 76 हजार 804 विद्यार्थी 74 विषयांची परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ऑनलाइन व प्रॉक्‍टर्ड पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी देण्यात आली होती. 'एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन' विद्यापीठाच्या कंपनीमार्फतच द्वितीय सत्राची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षाबाबत कोणतीही अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर किंवा चॅट बॉक्‍सद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.




१२ जुलै - गुडमॉर्निंग सहयाद्री

  News24 सह्याद्री - अंतराळवीर शिरीषा बांदला अंतराळात झेपावली...! पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...



TOP HEADLINES

आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

निर्बंध पूर्णतः शिथिल करण्यात न आल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. त्यामुळे एक तर हे निर्बंध पूर्णतः काढून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा किंवा पूर्ण आणि कडक लॉकडाऊन करावे, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.सर्वसामान्यांकडून होत असलेल्या या मागणीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. जालना येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी याविषयी माहिती दिली



27 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

 News24सह्याद्री - चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे  चक्काजाम आंदोलन...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEALINES

1. विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणारा अटकेत.

अकोला शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या विशेष पथकाने विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास रंगेहात अटक केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकाजवळ एक जण विदेशी बनावटीचे पिस्टलसह येत आहे. त्याच्याकडे पिस्टल असून तो त्यांचा वापरही करू शकतो. 

2. संचारबंदीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व भाजप आमदारानी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा.
अकोल्यात जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात वाढविलेल्या संचारबंदीच्या विरोधात व्यापारी संघटना आणि भाजप आमदारांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. संचारबंदी वाढविल्यापेक्षा दुकाने जास्तवेळ उघडी ठेवण्यास परवानगी दिली तर कोरोना संसर्ग कमी होईल.तसेच व्यापाऱ्यांचे ही आर्थिक नुकसान होणार नाही,अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

3. पाचोरा तालुक्यातील घटना 
पिंपळगाव हरेश्वर येथील एका दलित कुटुंबातील २० वर्षीय तरुणीवर एका महिलेच्या मदतीने जिवे मारुन टाकण्याची धमकी देत शरीर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडून आरोपी गोपाल पाटील याच्या शेतातील पत्री शेडमध्ये तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला यातून ती गरोदर राहून तिने एका मुलीला जन्म दिला आहे. 

4. संत रविदास महाराज यांच्या जयंती 
संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी  मुकेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.. तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश अपार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

5. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा  मनमानी कारभार शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा आरोप
चोपडा येथील  कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 तारखेला  हरभरा मोजणी दरम्यान राडा झाला असून सदर शेतकऱ्याचा  हरभरा व्यापाऱ्याने सहा हजार तीनशे रुपये भावाने खरेदी केला व हरभराचे जवळपास 90 टक्के मोजणी सुद्धा झाली असताना व शेवटी हरभरा थोडाफार मोजणीचा  शिल्लक असतांना त्या मालाचा पुन्हा लिलाव  करून भाव ठरविणार व नन्तर  मोजणी करू असे व्यापाऱ्यांनी सांगितले या कारणावरून बाजार समितीच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते  .
       
6. चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे  चक्काजाम आंदोलन
चोपडा - येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडीच्या वतीने पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युची योग्य ती चौकशी व्हावी तसेच शिवसेनेचे नेते तथा वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्या द्यावा म्हणून होत असलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरा जवळील धरणगाव नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

7. ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी टी-20 वर्ल्ड कपमध्ये गेलचे पुनरागम
वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हटले गेलेल्या ख्रिस गेलचा आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड मध्ये समावेश करण्यात आला आहे. गेलनं वयाच्या 41 व्या वर्षी 18 महिन्यानंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी वेस्ट इंडिजनं सुरू केली आहे.

8. "मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपावाले माझ्यावर दिवसभर टीका करतात"
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले आहे तसेच मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

 9. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले 'कारण'
गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवरूनच विरोधक सरकारवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवरच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं विधान केलंय.

10. मराठीच्या मुद्द्यावरून भाजपचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप
आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने 2021 च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मरठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत आहे,' अशी विखारी टीका भाजपचे  मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.    

27 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

 News24सह्याद्री - मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबींवर चर्चा; बैठक होण्याची शक्यता....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मुलुंड टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं.

2. राज ठाकरे  यांना  कोरोना झाला तर सरकार जबाबदार नाही: विजय वडेट्टीवार
राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे

3. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चित्रा वाघ यांच्याकडून आणखी एक गंभीर आरोप
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्या दिवशी अरुण राठोडने पुणे कंट्रोल रुमला कबुली जवाब दिला होता. 

4. शिवसेनेनं भाजप नगरसेवकांच्या आर्थिक नाड्या आवळल्या 
 महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये  सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर आता भाजपनेही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सेनेचं नाक कापण्यासाठी तयारी सुरु केली आहे. 

5. अमरावतीत लॉकडाऊन वाढणार? कोरोना थांबेना

विदर्भातली कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचं वाढणारं प्रमाण प्रशासनाची झोप उडवणारं आहे. अमरावती जिल्हात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप थांबण्याचं नाव घेत नाही. 

6. तीव्र, अतितीव्र कुपोषणग्रस्त बालकांची वाढली संख्या

कोरोना काळात कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण आहार व अमृत आहार योजना सक्षमपणे राबविण्याचा दावा केला जात आहे; परंतु त्यानंतरही तीव्र व अतितीव्र स्वरूपातील कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढली आहे. 


7. महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण

गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर गावांमध्ये असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महानुभव पंथाच्या वतीने फिरत्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि साठ साधकांचा हा समूह जळगाव मध्ये काही दिवस राहून गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर या ठिकाणी असलेल्या महानुभव पंथाच्या आश्रमात आले होते.


8. शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे:  चित्रा वाघ

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केल्याची बातमी समजली तेव्हापासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ  यांनी केले. 

9. मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबींवर चर्चा? बैठक होण्याची शक्यता
मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

10. इंजिनिअरिंगचा अभ्यास आता मराठीतही उपलब्ध होणार
 मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित ठेवू नये. ते 365 दिवस चालू ठेवणे आवश्यक आहे, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ग्रंथालय संचालनालय आयोजित प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष आणि मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमावेळी त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले. 

27 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा

   News24सह्याद्री -  मुख्यमंत्र्यांकडून 'मराठी भाषा गौरव दिना'च्या शुभेच्छा...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1. मोदी, शहा यांच्या सूचनेनुसार
बंगालमध्ये आठ टप्पे?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी आठ टप्प्यांत मतदान घेण्यात येणार असल्याचे शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले, त्यावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

2. सुरतमध्ये महिलेचा पतीविरोधात आक्रमक पवित्रा  
गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीच्या दारू पिण्याच्या त्रासाला कंटाळून एक मोठे पाऊल उचलले आहे. महिलेने भावासोबत मिळून नवऱ्यासोबत केलेल्या कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने स्वतःच्या पतीला दोरीच्या सहाय्याने टेम्पोच्या मागे बांधले. यानंतर जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याला फरफटत नेले आहे. 

3. गोडसे समर्थकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर पालिकेचे नगरसेवक आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सन २०१७ मध्ये नथुराम गोडसेच्या प्रतीमेचे उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बाबूलाल चौरसिया यांचा सक्रीय सहभाग होता. 

4. मुख्यमंत्र्यांकडून 'मराठी भाषा गौरव दिना'च्या शुभेच्छा
कुसुमाग्रज जयंतीनिमित्ताने मराठी गौरव दिन साजरा केला जात असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन करत जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 'मी मराठी, माझी मराठी!' बाणा जपू या!,' असे आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले. 


5. इंग्लंडला मोठा धक्का

पाहुण्या इंग्लंड संघाला तिसऱ्या कसोटीत लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागलाय.. अहमदाबाद कसोटीत टीम इंडियानं १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे इंग्लंडचा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधून पत्ता कट झाला. त्यात त्यांना शनिवारी आणखी एक झटका बसला. 


6. आर्थिक सेवा या विषयावर मोदींचे वेबिनार

करोनामुळे देशाची अर्थव्यवस्था घसरत असताना बँकांनी उद्योगांची कर्जाची गरज  भागवावी, तसेच नवोद्योगांसाठी सुलभ आर्थिक साधने उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. खासगी क्षेत्राला पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी सार्वजनिक क्षेत्राचे अस्तित्व बँकिंग व विमा क्षेत्रात गरिबांसाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.


7. क्रिकेट स्पर्धेसाठी चक्क मेंढा, बोकड, कोंबडय़ांची बक्षिसे

वाळवा तालुक्यातील एका मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांसाठी चक्क मेंढा, बोकड, देशी कोंबडय़ा, अंडी अशा बक्षिसांची घोषणा केली आहे. वाळवा तालुक्यातील बोरगावच्या साथीदार ग्रुपच्या वतीने क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात  आलं आहे. 


8. अंबानींच्या बंगल्याबाहेर एक महिना रेकी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर शस्त्रास्त्राने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अंबानींच्या अँटालिया बंगल्याबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मोर आली आहे.

9. चित्रा वाघ अडचणीत

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती.

10. कोरोनामुळे पिफ चित्रपट महोत्सव लांबणीवर

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच पिफ पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे उद्धाटन 11 मार्चला होणार आहे. पिफ चित्रपट महोत्सव 11 ते 18 मार्च या कालावधीत असणार आहे. 


सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाईन्स - कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबईतील आयपीएलच्या सामन्यांवर टांगती तलवार

 News24सह्याद्री - कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबईतील आयपीएलच्या सामन्यांवर टांगती तलवार....पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये 




Contact Me

Name

Email *

Message *