१२ फेब्रुवारी -सोनाली-कुणाल यांचा ‘व्हॅलेंटाईन वीक
NEWS24सह्याद्री
अनेकांना आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.आपल्या फोटोंमधून चाहत्यांना ‘कपल गोल्स’ देत आहे.‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने सोनालीने पती कुणालसोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात त्यांनी कपल टीशर्ट परिधान केले आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मागच्या वर्षी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली.अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.तिच्या या ‘कपल गोल्स’ फोटोंना चाहत्यांची खास पसंती मिळतेय.
४ फेब्रुवारी-सोनाली लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी केली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
NEWS24सह्याद्री
हलव्याचे दागिने, काळ्या रंगाची साडी आणि पारंपरिक साजशृंगार या सगळ्यात नववधूचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं.
सोनालीने संक्रांतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.सोनालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर हलव्याचे दागीने परिधान केले आहेत.हलव्याच्या दागिन्यांमुळे सोनालीचं सौंदर्य अगदी खुलून आलंय.‘जेव्हा संपूर्ण कुटुंब येतं एकत्र.. तेव्हाच साजरी होते पहिली संक्रांत..’ असं कॅप्शन देत सोनालीने हे फोटो शेअर केले आहेत.
तीळगुळाच्या गोडीप्रमाणेच नात्यातलाही गोडवा वाढवणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे.सोनाली सध्या पतीसोबत दुबईत राहत आहे.सोनालीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.