११ फेब्रुवारी-जयंत पाटलांचं शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रॉमिस.
NEWS24सह्याद्रि
'प्रॉमिस डे' चे औचित्य साधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्याचे प्रॉमिस आदरणीय शरद पवारसाहेब आणि कार्यकर्त्यांना केले आहे. मंत्री जयंत पाटील यांचे सोशल मीडिया तसे तरुणांमध्ये असणाऱ्या ट्रेंडवर नेहमीच लक्ष असते. सोशल मीडियावर असलेला ट्रेंड ते नेहमीच फॉलोही करतात. सध्या सोशल मीडियावर व्हेलेंटाईन वीकचा ट्रेंड सुरू असून व्हेलेंटाईन वीकमध्ये आज 'प्रॉमिस डे' आहे हे लक्षात येताच मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार आणि कार्यकर्त्यांना ट्वीटरवर 'प्रॉमिस' केले आहे.
जयंत पाटील यांनी आपट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आज प्रॉमिस डे' ! आजच्या या दिनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी,वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे जयंत पाटीलल्या यांनी म्हटले.
१२-डिसेंबर-गॉसिप कल्ला
News२४सह्याद्री:-नोरा आणि गुरु रंधावाचे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरचे फोटो वायरल....पहा मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी गॉसिप कल्ला मध्ये..
*उत्कंठावर्धक गूढ रहस्यमय घटना मराठी साहित्यप्रेमींच्या भेटीला*
*मुलासाठी पुन्हा एकत्र आले अरबाज- मलायका*
*सिद्धार्थ शुक्लाचा आज वाढदिवस*