Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label jayantpatil. Show all posts

१४ मे-सह्याद्री-गुड मॉर्निग सह्याद्री

 NEWS24सहयाद्री-आनंद दिघे अमर रहेच्या घोषणांनी दुमदुमूले  चित्रपटगृह-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





११ फेब्रुवारी-जयंत पाटलांचं शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रॉमिस.

                                

NEWS24सह्याद्रि 

'प्रॉमिस डे' चे औचित्य साधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्याचे प्रॉमिस आदरणीय शरद पवारसाहेब आणि कार्यकर्त्यांना केले आहे. मंत्री जयंत पाटील यांचे सोशल मीडिया तसे तरुणांमध्ये असणाऱ्या ट्रेंडवर नेहमीच लक्ष असते. सोशल मीडियावर असलेला ट्रेंड ते नेहमीच फॉलोही करतात. सध्या सोशल मीडियावर व्हेलेंटाईन वीकचा ट्रेंड सुरू असून व्हेलेंटाईन वीकमध्ये आज 'प्रॉमिस डे' आहे हे लक्षात येताच मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार आणि कार्यकर्त्यांना ट्वीटरवर 'प्रॉमिस' केले आहे.

जयंत पाटील यांनी आपट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आज प्रॉमिस डे' ! आजच्या या दिनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी,वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे जयंत पाटीलल्या  यांनी म्हटले.

७फेब्रुवारी- विश्वजीत कदम यांची वाट पाहत बसल्याने कार्यक्रमाला उशीर.


NEWS24फेब्रुवारी 
राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आहे. मात्र शिवसेना हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकत आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी बोलताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
जयंत पाटील यांना कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांनी उपस्थितांची माफी मागितली. राज्यमंत्री विश्वजित कदम यांची वाट बघत बसावं लागलं आणि कार्यक्रम सुरू व्हायला वेळ लागला असं सांगताना जयंत पाटील यांची मिश्किलपणे टिप्पणी केली.“कार्यक्रमाला थोडासा वेळ झाला. तुम्हा सर्वांना बराच वेळ वाट पाहत बसावं लागलं. मी राज्यमंत्र्यांची वाट पाहत बसलो होतो. ते आल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन होईल. मला वाटलं होतं आपण सर्वात शेवटी पोहोचू. उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे. वेळेचं आणि माझं चांगलं जमतं,” असं यावेळी जयंत पाटील म्हणाले.

“राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आहे. मात्र धनुष्यबाण हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकायला लागली आहे,” असं त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांनाही लगेच छापू नका असंही म्हटलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “धनुष्यबाण, घड्याळ आणि हात एकत्रित आल्यापासून या जिल्ह्यात सहकार क्षेत्राच चांगली ताकद निर्माण झाली आहे. लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे”.

भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी दुःखद निधन झालं. त्यानंतर राज्य सरकारने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसंच आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, बँकेचे संचालक उपस्थित होते. दोन दिवस दुखवटा जाहीर केला असतानाही सांगलीमध्ये पुरस्कार वितरणाचा हा कार्यक्रम पार पडला.


Contact Me

Name

Email *

Message *