Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label instagrampost. Show all posts

६ फेब्रुवारी- स्टार क्रिकेटर सुरेश रैनाच्या वडिलांचं निधन..



NEWS24सह्याद्रि 

गाझियाबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचे वडील त्रिलोक चंद रैना यांचे आज रविवारी निधन झाले. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. गाझियाबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रैनाचे वडील ऑर्डिनन्स फॅक्टरीत काम करायचे.

सुरेश रैनाने १५ ऑगस्ट २०२० रोजी महेंद्रसिंह धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने १५ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला, त्याच्यासोबतच रैनाही निवृत्त झाला. रैनाने भारतासाठी १८ कसोटी, २२६ एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त एकूण ७८ टी-२० सामने खेळले आहेत.

Contact Me

Name

Email *

Message *