Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label Sindhudurg. Show all posts

२४ फेब्रुवारी - गुड मॉर्निंग सह्याद्री

NEWS24सह्याद्री: ‘रामसेतू’ला राष्ट्रीय वारसा स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी.. सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यां पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...






*जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत सिंधुदुर्ग जिल्हा*
---------------------
*नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी*
----------------------
*मारुती सुझुकीच्या वाहनांची मागणी वाढली*
----------------------
*मेडिकलच्या दंत महाविद्यालयात विद्रृप चेहऱ्यांवर होणार उपचार*

गॉसिप कल्ला - आमिर खानच्या "सरफरोश" चा येणार सिक्वल

      News24सह्याद्री - आमिर खानच्या "सरफरोश" चा येणार सिक्वल....पहा गॉसिप कल्ला


TOP HEADLNES

1. सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्ये होणार हुरडा पार्टी

कमी कालावधीत तुफान लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’. अभिमन्यू आणि लतिका यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावत असल्यामुळे सध्या ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत आता अत्यंत रंजक वळणं आलंय. लतिकाची साथ मिळाल्यामुळे अभिमन्यूचं स्पोर्ट्स अॅकॅडमी काढण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून  नुकतंच अॅकॅडमीच्या जागेचं भूमिपूजन झालंय. त्यांमुळे जहागीरदार कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी हुरडा पार्टी करण्यात येणार आहे.

२.शिल्पा शेट्टीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक

गेल्या बऱ्याच काळापासून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र, आता पुन्हा एकदा ती प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. शिल्पा लवकरच ‘हंगामा 2’ या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील टायटल सॉन्ग नुकतंच चित्रित झालं असून याचे फोटो शिल्पाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या गाण्यात शिल्पा अभिनेत्री हेलन यांच्या रुपात दिसून येत आहे.

३. मोत्यांच्या ड्रेसमध्ये दिसला नोराचा ‘मधुबाला’वाला लूक

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही एक उत्तम बेली डान्सर असून ती येणाऱ्या प्रत्येक दिवशी आपल्या लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. आता पुन्हा एकदा नोरा चर्चेत आली आहे आणि त्याला कारणीभूत ठरला आहे तिचा खास ड्रेस. या फोटोमध्ये नोराने मोत्यांचा एक ब्लाऊज घातला आहे, सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुबालाचा लूक नोराने साकारला असून त्यामध्ये ती  खूप सुंदर दिसत आहे. नोराचा हा खास ब्लॅक अॅन्ड व्हाईट अंदाज क्वचितच पाहायला मिळतो. नोरा फतेहीने या लूकमध्ये एक फोटो आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 

४.अभिनेत्री प्रिया बापट इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये झळकणार 

उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे मराठी अभिनेत्री प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे.नव्या वर्षात ती नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अभिनेत्री प्रिया बापट एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे नाव फादर लाइक असे आहे. पुढिल महिन्यात सिंगापूरमध्ये याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक असून हा तिचा पहिलाच इंग्रजी चित्रपट आहे.

५. आमिर  खानच्या "सरफरोश" चा येणार सिक्वल 

बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान आणि सोनाली बेंद्रे यांच्या 'सरफरोश' चित्रपटाचा सिक्‍वल येणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट सीआरपीएफ जवानांसाठी समर्पित करण्यात येणार आहे. चित्रपट निर्माता जॉन मॅथ्यू मॅथन यांनी हा चित्रपट केंद्रीय राखीव पोलीस दलास समर्पित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. चित्रपटाचा सिक्‍वल हा भारताच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर आधारित असून यात विविध समस्या निर्माण होत असतानाही भारताची सुरक्षा व्यवस्था मजबूत असल्याचे दाखविण्यात येणार आहे.आता या सिक्‍वलमध्ये कोण-कोण झळकणार आहे याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.



5 सप्टेंबर Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - सिनेअभिनेत्री कंगना राणावतला जोडे मारो आंदोलन...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु

2. राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम

3. रेस्टाॅरंट सुरु करायला परवानगी द्या; हॉटेल व्यावसायिकांची मागणी

4. सिनेअभिनेत्री कंगना राणावतला जोडे मारो आंदोलन

5. महापुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये वाळवंटासारखी स्थिती

6. जालन्यात कंगनाच्या विरोधात शिवसेना आक्रमक

7. तीसगाव शेजारील तलावाच्या भिंतीला गेले तडे

8. कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याने डॉक्टरांच्या खोलीबाहेर मांडली व्यथा

9. देऊळगावराच्या नगराध्यक्षा व पती डॉ. शिंदेना लाच घेतांना रंगेहात अटक

10. जन्मदात्या पित्याकडून आपल्या १९ वर्षीय मुलीचा विनयभंग


1 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री - कर्जवसुलीवरील स्थगिती दोन वर्षांपर्यंत वाढू शकते - केंद्र सरकार...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा

TOP HEADLINES

1. कर्जवसुलीवरील स्थगिती दोन वर्षांपर्यंत वाढू शकते: केंद्र सरकार

2. मोदी सरकार म्हणजे ‘रामराज्य’- योगी आदित्यनाथ

3. “देशावासीयांनी उभ्या केलेल्या अर्थव्यवस्थेचा भाजपानं अनर्थ करून टाकला” - काँग्रेस

4. काँग्रेसची मोदी सरकारवर ‘रसोडे में कौन था’च्या ओळीतून मार्मिक टीका

5. नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण

6. शिवसेना आमदाराने 'एमआयएम'ला सुनावले

7. क्रीडा संकुलाच्या कामाचा आमदार डॉ.बालाजी किणीकर यांचा पाहणी दौरा 

8. माझ्या शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर सदैव असेच हसू फुलूदेत - प्रविण माने

9. सीएसके ला दिलासा! दोन तगडे क्रिकेटर युएईत दाखल

10.‘कसौटी जिंदगी की 2’ घेणार प्रेक्षकांचा निरोप?

सह्याद्री सुपरफास्ट l काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष, पण अंतर्गत वादामुळे जर्जर झाला : संजय राऊत

 News24सह्याद्री - काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष, पण अंतर्गत वादामुळे जर्जर झाला : संजय राऊत...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष, पण अंतर्गत वादामुळे जर्जर झाला : संजय राऊत

2. 'मन कि बात' मध्ये बीडच्या रॉकीचा उल्लेख करताना पंतप्रधान भावुक 

3. अकलूज आणि इंदापूर हद्दीचा वाद नागरिकांच्या जीवावर उठला 

4. तहसीलदार अविनाश शिंगाटे यांची धडकेबाज कारवाई 

5. दुसऱ्या दिवशीही बावनथडी नदीला पूर 

6. धार्मिकस्थळे सुरु झाल्याशिवाय शांत बसणार नाही 

7. भ्रष्टाचाराची शिक्षा सगळ्या समाजाला का देता - सचिन साठे 

8. सलग तिसऱ्या दिवशी सीबीआयकडून रियाची चौकशी 

9. मोदींनी खेळण्यांवर केली 'मन कि बात' ; राहुल गांधींचं टीकास्त्र 

10. चेन्नई सुपरकिंग्जच्या कोरोनाग्रस्त क्रिकेटपटूला खास संदेश 

सह्याद्री बुलेटिन l वयोवृध्द ७० वर्षाच्या आजीवर चक्क झाडाच्या सावली खाली उपचार !

News24सह्याद्री - वयोवृध्द ७० वर्षाच्या आजीवर चक्क झाडाच्या सावली खाली उपचार !....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. तंबाखूच्या पानांपासून कोविड प्रतिबंधक लस!

2. भंडाऱ्यात पूर, दोन राज्यांशी संपर्क तुटला

3. सुशांतच्या बँक खात्यांच्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमधून मोठा खुलासा

4. मंदिरे उघडण्यासाठी भाजपने गडचिरोली जिल्ह्यात केले घंटानाद आंदोलन

5. 'एमएसईबी' कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन

6. धार्मिक स्थळे उघडण्यासाठी भाजपाचे शंखनाद,व घंटानाद आंदोलन !

7. जालना  जिल्ह्यात काढण्यात आला पोलिसांचा रूट मार्च 

8. वयोवृध्द ७० वर्षाच्या आजीवर चक्क झाडाच्या सावली खाली उपचार

9. कोरोनाबाधित्यांच्या संख्येत नव्याने  98 रुग्णाची भर  

10. बजाजनगर-पंढरपूरात भाजपातर्फे घंटानाद आंदोलन


30 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

 News24सह्याद्री - अनलॉक ४ बाबत नियमावली जाहीर...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES


1. अनलॉक ४ बाबत महत्वपूर्ण बातमी आहे .

2. परीक्षांबाबत कुलगुरू समितीची आज बैठक

3. कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या खास गाडय़ांना मोठा प्रतिसाद

4. अविश्वास प्रस्तावाची भाजपची तयारी

5. मेहकरमध्ये  बालकांना वितरित केला जाणारा पोषण आहार निकृष्ट 
  
6. बोगस बियाणे विक्री करून  शेतकऱ्यांची फसवणूक 

7. अकोला जिल्ह्याची कामगिरी  सुधारावी-  ना. भुसे 

8. हिंगोलीत लाखोंचा गुटखा जप्त 

9. अकोल्यातील गणेशोत्सव मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम 

10. वैनगंगा नदीच्या पाणी  पातळीत  झपाट्याने वाढ

29 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकारची तयारी सुरु...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. अंतिम परीक्षा घेण्याची राज्य सरकारची तयारी- उदय सामंत

2. माजी अर्थमंत्र्यांच्या आश्वासनाकडे अजित पवारांचा रोख

3. राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक

4. राज्यातील साखर कारखान्यांना मिळणार लाभ

5. रस्त्याच्या खड्यांवरून शिवसेना मनसेत जुंपली

6.वंजारवाडी गाव  नागरी सुविधांपासून वंचित

7. मूग उत्पादक अडचणीत

8. बळीराजा पुरता कोलमडला

9. बुलढाण्यात  विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञाचे उद्घाटन

10. मोटारसायकल चोर गजाआड


27 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - मराठा आरक्षण प्रकरणी २८ ऑगस्ट रोजी सुनावणी...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. रक्तद्रव उपचारांबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा सावधानतेचा इशारा  

2. मराठा आरक्षण प्रकरणी  २८ ऑगस्ट रोजी सुनावणी 

3. आयुष काढ्याची ऑनलाइन बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री 

4. मच्छीमारांसाठी  ६० कोटीचे पॅकेज जाहीर

5. सततच्या पावसाने लिंबू उत्पादक शेतकरी अडचणीत 

6. मंदिर परिसरात एकाचा मृत्यू 

7. अकोल्यातील पंडित परिवारात गौरी गेल्या १२५ वर्षांपासून वास्तव्यास 

8. खवड्या डोंगरास  संरक्षक भिंत व तारेचे कुंपन बसवण्याची मागणी

9. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू

26 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

   News24सह्याद्री - मराठा आरक्षण मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही ?...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES
1. मराठा आरक्षण मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही ?

2. महाराष्ट्रातील 300 पेक्षा अधिक एपीएमसी मार्केटचा कडकडीत बंद

3. चैतन्य हरपलेला कोकणचा गणेशोत्सव

4. उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप

5. मानसरोवर गणपती विसर्जन घाटावर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

6. तरुणाने मित्रांना सोशल मीडियावर संदेश पाठवून केली आत्महत्या

7. मेळघाट फुलला निसर्ग सौंदर्याने

8. निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूर तालुका कोरोनाचा विस्फोट - हर्षवर्धन पाटील

9. श्री बाराभाई गणपतीची परंपरा अजूनही कायम

10. कोरोनामुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकला,सोनू सूदची मागणी

सह्याद्री TOP 24 HEADLINES | किम जोंग उनचा मृत्यु ?

   News24सह्याद्री - किम जोंग उनचा मृत्यु ?...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES


25 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

  News24सह्याद्री - सर्वसामान्यांना दिलासा : जीएसटी कपातीची माहिती जाहीर...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES



1. जीएसटी कपातीची माहिती जाहीर

2. काँग्रेस कार्यसमितीची बैठक वादळी

3. माफी मागण्यास प्रशांत भूषण यांचा पुन्हा नकार

4. ड्रायव्हिंग लायसन्स, परमिटबाबत मोठी घोषणा

5. लोकलसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार

6. स्वच्छतेत पालघरची पिछाडी

7.महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली

8. युरोलाईफ कंपनीच्या कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन मागे

9. रस्त्यांवरचे खड्डे ठरताहेत जीवघेणे

10. जालन्याच्या विजवीतरण कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

22 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

  News24सह्याद्री - सिंधुदुर्गात ३२ सार्वजनिक, ६८ हजार ६८ घरगुती गणेश स्थापित होणार...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES
1. सिंधुदुर्गात ३२ सार्वजनिक, ६८ हजार ६८ घरगुती गणेश स्थापित होणार

2. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं राज्य सरकारला केलेली 10 कोटींची मदत वादाच्या भोवऱ्यात

3. नीट परीक्षा १३ सप्टेंबरलाएन टी ए  ने केलं स्पष्ट

4. काटेवाडीतल्या गोविंदबागेतही कोरोनाचा शिरकाव

5. साखरेला योग्य दर न मिळाल्यास कारखाने संकटात

6. यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर

7. प्रसाधनगृहात शिरला बिबट्या एक जखमी

8. प्रेस गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्य करून गणेशोत्सव साजरा करणार

9. बुलडाण्याचा श्रीकांत वाघ पुन्हा राजस्थान रॉयल्स संघात

10. नगर परिषदेच्या कार्यालयात चिखल फेक आंदोलनाचा इशारा

19 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन

 News24सह्याद्री - नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर पुन्हा हल्ला...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा निकाल सीबीआयकडे - सर्वोच्च न्यायालय

2. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाताच भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा

3. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयावर, पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

4. तबलिगी जमात प्रकरणी मुंबईतील ४ ठिकाणी ईडी कडून छापेमारी सुरू

5. पुण्यात गेल्या २४ तासात ३१ पोलीसांना कोरोनाची लागण

6. अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा - किरीट सोमय्या

7. नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

8. पावसाळी अधिवेशनासाठी ७ सप्टेंबरचा नवा मुहूर्त

9. आयपीएलचं आयोजन युएईमध्येच – मुंबई उच्च न्यायालय

10. सुशांत मृत्यू प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अंकिताची प्रतिक्रिया


19 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

 News24सह्याद्री - परदेशी विद्यापीठांना भारतात मान्यता – डॉ. रमेश पोखरियाल...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES
1. सार्वजनिक कंपन्यांकडून १९०० कोटींचे योगदान

2. परदेशी विद्यापीठांना भारतात मान्यता – डॉ. रमेश पोखरियाल

3. राम मंदिराबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पत्रकार प्रशांत कनोजियाला अटक

4. वालधुनीनदी संवर्धन विकासासाठी नागरीकांचे मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड संदेश अभियान..

5. श्वसनासंबंधी 20 आजारांसाठी मोफत उपचार- राजेश टोपे

6. फक्त वंचितच का इतर पक्षांनी आंदोलने केल्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे

7. गंगापूर पोलिसांनी रोखला एका अल्पवयीन मुलीचा विवाह

8. आ. राजू नवघरे यांचे होतंय सर्व स्तरातून कौतुक

9. यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीनेच

10. चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस असुरक्षित

सह्याद्री TOP 24 HEADLINES | काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा - सुजय विखे

  News24सह्याद्री - काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा - सुजय विखे - राज ठाकरे...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES



सह्याद्री TOP 24 HEADLINES | महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही? - राज ठाकरे

 News24सह्याद्री - महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही? - राज ठाकरे...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES


16 ऑगस्ट सह्याद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री - राज्यात २४ तासांमध्ये ३०० पेक्षा जास्त पोलीस कोरोना पॉझिटिव्ह....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 


TOP HEADLINES
1. प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा  

2. राज्यात २४ तासांमध्ये ३०० पेक्षा जास्त पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

3. सर्वांना भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्वास, मात्र पंतप्रधानांना नाही - राहुल गांधी

4. पार्थ पवारांविषयी पवार कुटुंबाची चर्चा होणार?  

5. आजपासून वैष्णोदेवी यात्रेला सुरूवात

6. ठाण्यात  मनसे च्या कार्यकर्त्यांनी केली मुक्तीबोध स्मशानभुमीची स्वच्छता  

7. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएल बस सेवा पुण्यात होणार सुरु

8. अकोल्यात अकरा ठिकाणी वेगवेगळ्या रस्त्यावर वंचित चे आंदोलन  

9. पुण्यात मुलगा झाल्याचं सांगितलं अन् हातात मुलगी दिली

10. धोनीनं  २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी; भाजपा खासदाराचा सल्ला

तो परिपक्वच आहे - नारायण राणे

मुंबई | News24सह्याद्री -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पार्थ पवारांविषयी प्रश्न विचारला असता " तो अपरिपक्व आहे, त्याच्या कोणत्याही मताला कवडीची किंमत नाही" असं बोलू फटकारलं. त्यांनतर पार्थ पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र आता भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. पार्थ १८ वर्षांचा आहे. त्याने लोकसभा निवडणूक लढवली आहे. तो परिपक्वच आहे,” अशी भूमिका राणे यांनी मांडली आहे.

नारायण राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. खासदार राणे म्हणाले, “पार्थ पवार १८ वर्षाचा आहे. तो राजकारणात आहे. त्याशिवाय त्याने निवडणुकही लढवली आहे. त्यामुळे तो परिपक्वच आहे. पार्थने केलेल्या मागणी मागे त्याचे स्वतःचे म्हणून काही विचार असतील. त्यामुळेच त्याने हे विधान केलं असेल,” असं म्हणत राणे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली.

सरकारचा मोठा निर्णय : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल माफ

 मुंबई । News24सह्याद्री -


सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल माफ करण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत मिळणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतची माहिती दिली. या निर्णयामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे.

त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असेही मंत्री शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

Contact Me

Name

Email *

Message *