Breaking News

1/breakingnews/recent

सारिपाट सह्याद्रीचा - पालकमंत्री महोदय, कुठं हरवला होतात तुम्ही?

No comments

  News24सह्याद्री - 


राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे उद्या गुरुवारी नगरच्या दौर्‍यावर येत आहेत. खरे तर महिनाभर गायब झालेले पालकमंत्री हसन मुश्रीफ हरवलेत अशी उपरोधिक जाहीरतवजा टीपणी सोशल मिडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नगर आठवले असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

नगरकरांना आणि सामान्य जनतेला आज महागाईच्या चटक्यापेक्षाही चटका बसतोय तो कोरोना आणि त्याआड चालू असलेल्या दुकानदारीचा! होय दुकानदारीचा! ही दुकानदारी कधी बंद होणार? कोरोनाने मृत्यू झाला तर त्या मृतदेहाची विल्हेवाट शासकीय खर्चाने म्हणजेच महानगरपालिकेच्या वतीने लावली जाते. त्यासाठी येणारा खर्च महापालिका करीत असली तरी तो पैसा आमच्या खिशातील! एका अंत्यसंस्कारासाठी ८ हजार रुपये दिले जायचे आणि आम्ही हा गैरप्रकार चव्हाट्यावर आणताच जिल्हाधिकार्‍यांनी यात लक्ष घातले. 

आता अवघ्या १४०० रुपयात हा विधी होऊ लागला! जवळपास साडेसहा हजार रुपये प्रति मृतदेह कितीजण खात होते! पालकमंत्री साहेब, नगरच्या महापालिकेतील आयुक्त आणि महापालिकेतील आरोग्य अधिकारी या महामारीत दुकानदारी मांडून बसलेत आणि गब्बर झालेत! त्यांची चौकशी होणार आहे की नाही! नगरमधील मृतांचा नक्की आकडा किती हे दस्तुरखुद्द आयुक्तांनाच माहिती नसेल तर त्यापेक्षा दुर्दैव कोणते असेल! 

पालकमंत्री साहेब, नगरच्या महापालिका आयुक्तांना सुवर्णम प्राईडमधील शाही बडदास्त हवी असते आणि सोबतीला बरेच काही! आयुक्तांची ही बडदास्त ठेवण्याचं काम इमानेइतबारे करत आलेत ते महापालिकेचे आरोग्य अधिकारी! नगरकरांच्या आरोग्याचे काहीही घेणेदेणे नसणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याला सारेच राजकीय पक्ष पोसतात हे लपून राहिलेले नाही! पालकमंत्री साहेब, तुमच्याबद्दल नगरकरांना आजही आदर आहे. 

पालकमंत्री साहेब, गेल्या दोन- तीन महिन्यात तुम्ही नगरकरांच्या भावनांशी खेळलात असं आता नगरकरांच ठाम मत झालं आहे. तुम्ही येत आहात त्यानिमित्ताने नगरकरांच्या मनातील ही खदखद आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता निर्णय तुमच्या हातात आहे. कोल्हापूर- कागलकरांसारखी नगरकरांची काळजी घ्यायची की नाही हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचं आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *